आग-डोंब !

Submitted by सुचेता जोशी on 31 July, 2012 - 02:13

पावसाची
रिमझिम
पान-पान
ओलचिंब

उभ्या-उभ्या
शहारतो
परसात
कडुलिंब

गवताच्या
पातीवर
उसासतो
थेंब-थेंब

डहाळीला
सोसवेना
वा-याची ही
झोंबा-झोंब

मातीतून
धुमारतो
कोवळासा
कोंब-कोंब

सख्याविण
श्रावणात
अंग-अंग
आग-डोंब !

गुलमोहर: 

सुंदर आगमन!
आपले, मायबोलीवर.
सुरेख कविता,खुप आवडली.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!

आहाहा सुर्र्रेख!!

आग-डोंब !>> अस्सं अस्सायला हवय टायटल.(....वैयक्तिक मत!!)

चतुराक्षरी.................... व्वा वा !!!!

______/\________

छानच !

हे काय??
कवितेच शिर्षक आणि शेवटचं कडवं बदललं की काय Uhoh
मी प्रतिक्रिया दिली तेंव्हा वेगळं कडवं होतं?

कवितेच शिर्षक आणि शेवटचं कडवं बदललं की काय
मी प्रतिक्रिया दिली तेंव्हा वेगळं कडवं होतं?......

शिर्षक बदललय कडव तेच तर आहे .:-)

पुनशः धन्यवाद !

आभार!