वेबमास्तरांना भेटण्यासाठी विलेपार्ले, मुंबई येथे गटग

Submitted by नीधप on 29 July, 2012 - 03:22
ठिकाण/पत्ता: 
द शॅक रेस्टॉरंट, संगीता'ज नेस्ट, ग्राउंड फ्लोअर, ऑफ प्रार्थनासमाज रोड. गजाली पासून २ मिन चालत.

अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.

द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.

सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)

विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक

भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, August 5, 2012 - 09:00 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा वर राहु दे रच्याकनी.. ज्यांनाशक्य आहे त्यांनी माबोचे चहा शर्ट घालुन या.. अगदे जुनी नवी सगळी डीझाइन्स एकत्र आल्यावर मजा येइल

नाही. हनुमान रोडवर नाहीये शॅक. प्रार्थनासमाज रोडच्या कॉर्नरला लागून आहे ही जागा तिथे किंवा हाच रस्ता पुढे सरळ महिलासंघाकडे जातो त्या रस्त्याला असते पार्कींग.

सायन बाजूने वा बोरीवली बाजूने दोन्ही कडून येणार्‍या रथांसाठी व रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने येऊ इच्छिणार्‍यांसाठीही सचित्र रस्ताखुणा दिलेल्या आहेत.

आता चुकू नका Happy

नी छ्या उगाच कशाला मनीला मॅप, तशी ती स्मार्ट आहे हो (मांजरं म्हणे नुस्त्या वासावरुन रस्ता ओळ्खतात कोठेही सोडली तरी परत घराकडे परततात: ऐकिव माहीती )

सव्वासात मिनिटांत नाही पोहोचलो तर कोणाला जबाबदार धरायच ???

मनी प्रष्न विचारुन विचारुन हा बाफ ओसंडून व्हाहवणार आहे ....

अरेरे, ह्या गटगला येता येणार नाही म्हणून हळहळले अगदी. नाहीतर चालत सव्वा-मिनिटावर पडले असते हे ठिकाण. हा योग ( सव्वा मिनिटाचा ) पुन्हा येणे नाही Wink आईला सांगते यायला Happy

त्याना इमानात येळेत बसवा...
काल आम्ही निघु निघु करत गफ्फांचा फड परत परत रंगताना अनुभवलाय.
तेवढं त्यांच इमान चुकवु नगासा. Happy

गटगला शुभेच्छा. Happy

Pages