Submitted by ओवी on 27 July, 2012 - 14:11
ढगांची रांग आषाढी सांज
कधीच नाही सरायची
ओलेत्या मनात हव्याशा स्वप्नात
खरीखुरी चिंब जगायची
धुक्याच्या कुपीत धारांच्या मिठीत
थेंबथेंब नक्षी रेखायची
सजल छायेत देवाच्या मायेत
चातक चोचीने झेलायची
हिरव्या रानात पिवळ्या ऊन्हात
भान हरपून भूलायची
वार्याचा मारवा शिरशिर गारवा
थरारुन झोकात फुलायची
नाना परींच्या नाचर्या सरींच्या
पाऊलखुणा शोधायची
आभाळ तोलीची हिरव्या बोलीची
अवखळ गीते बोलायची
ढगांची रांग आषाढी सांज
कधीच नाही सरायची
क्षणांच्या गतीत हळव्या स्मृतीत
अलगद जपून ठेवायची !
गुलमोहर:
शेअर करा
ओवी, गोड जमली आहे. पहिलीच
ओवी, गोड जमली आहे. पहिलीच कविता ना?
एकदम पावसाळी संध्याकाळचं चित्रं आलं डोळ्यासमोर.
आता या नंतर काही वाचत नाही. आता खरंच प्रचंड झोप आली आहे. पाऊस नाहीए तर छानशी पावसाची स्वप्न तरी येवु देत कवितेमुळे.
गुड नाइट !
वा वा !
वा वा !
(No subject)
अरे वा! श्रावणात आषाढाची
अरे वा! श्रावणात आषाढाची कविता?
मस्ताय!! पुलेशु
मस्त!!! पुलेशु
मस्त!!!
पुलेशु
सुंदर्!आवडली.
सुंदर्!आवडली.
खूपच गोड कविता, ओवी मस्त
खूपच गोड कविता, ओवी मस्त लिहिलयस
अतिशय सुरेख व सुरेल कविता,
अतिशय सुरेख व सुरेल कविता, खूप आवडली.
आवडली कविता
आवडली कविता
धन्यवाद मंडळी! श्रावणात
धन्यवाद मंडळी!
श्रावणात आषाढाची कविता? >>>> नानुभाऊ, आषाढातच टाकणार होते.... तेवढ्यात नी ची 'पाऊस' ही काकाक वाचली (जी अज्जिबात 'काकाक' नाहीये, उलट एकदम नितळ पारदर्शी आणि प्रामाणिक आहे! ) मग परत एकदा धीर गोळा करून टायपेपर्यंत श्रावण की हो उजाडला!
कवितेत गोडवा आहे. सफाईदारपणा
कवितेत गोडवा आहे.
सफाईदारपणा आणल्यास अधिक चांगली होऊ शकेल.
वैम. कृगैन.
छानच ओवी..........सुंदर आहे
छानच ओवी..........सुंदर आहे कविता........
लीहीत रहा छान छान्.......पुलेशु.....
ए मस्तच
ए मस्तच
वार्याचा मारवा शिरशिर
वार्याचा मारवा शिरशिर गारवा
थरारुन झोकात फुलायची
वा ओवे भारीये कविता
पु ले शु
ओवे, फार सुंदर जमलेय ही
ओवे, फार सुंदर जमलेय ही कविता.

ही पहिलीच आहे? वाटत नाही हो. पु.ले.शु.
वाह... किती तरल! मस्तच!
वाह... किती तरल! मस्तच!
सुंदर आहे
सुंदर आहे