पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा, मला घटकांचे प्रमाण पण हवे आहे.तसेच घरी कुटता येते का मिक्सरमधे?
कच्ची केळी मी सालासकट चिरुन काचर्‍या केल्या होत्या...मस्त लागत होत्या. मला माहीत नाहीये कि केळ्याची साल चांगली की वाईट्...मी आपला असाच प्रयोग केला पण मला पात्तळ पात्त्ळ कुरकुरीत केळ्याच्या काचर्‍या अगदी आवडल्या.

कच्च्या केळ्याचा कीसही छान होतो. केळी किसून नेहेमी प्रमाणे बटाटा किंवा रताळ्याचा करतो तसा उपासाचा कीस करायचा. छान होतो.

कच्च्या केळ्याची कोफ्ताकरी -
एक कच्चं केळं असेल तर एक छोटी कच्ची पपई आणि ३-४ छोटे ते मध्यम आकाराचे बटाटे लागतील (कच्चं केळं जास्त झालं तर गोड होतात कोफ्ते. ज्यांना चालतं त्यांनी अर्धी पपई घेतली तरी चालेल)
केळ्याचे दोन तुकडे (सालीसकट), पपईचे छोटे तुकडे (साल आणी आतला खरखरीत भाग काढून) आणि बटाटे दोनदोन तुकडे करून कुकरमधून शिजवून घ्यावेत. तुकडे किती हे सांगितलं कारण प्रत्येकाचा शिजण्याचा वेळ थोडा वेगळा आहे. वरच्या प्रमाणात तुकडे डाळ शिजवताना वरती ताटलीत टाकून शिजवले (एखादी शिट्टी जास्त) की शिजून निघतात
शिजवल्यावर केळ्याची साल लगेच निघून येते. केळं, पपई आणि बटाटा पूर्ण निथळून घेऊन एकत्र मॅश करून घ्यावं आणि त्यात मीठ, किंचित हळद-धणेजिरेपूड आणि गोळे वळण्याइतकं बेसन घालावं (भाजणी घातल्यास आणखी खमंग लागतं). साधारण लिंबाएवढे गोळे वळून तळून घेणे. गोळे सैलसरच वळावेत. फार टणटणीत झाले तर रस्सा शोषून घेणार नाहीत.
तेलात जिरे, तेजपाता, हळद घालून फोडणी करणे. त्यातच किसलेलं आलं, धणेपूड, तिखट, मीठ आणि व्यवस्थित रस्सा राहील अशा प्रमाणात पाणी घालून एक रटरटून उकळी आणावी. तळलेले कोफ्ते त्यात सोडून आणखी दोन मि. ठेवून गॅस बंद करणे.

या प्रमाणात साधारण २०-२५ कोफ्ते होतात

रैना शिर्^याचा रियाज ही प्रतिक्रिया अजून वाढवली तर एक खाद्यसंगीतमय पोस्ट तयार होईल..मनावर घ्या... Happy

मस्त वाटलं वाचताना...

माझ्या एका मैत्रिणीने केळी खूप बारीक चौकोनी कापून घालायची असं सांगितलंय...तूप सढळ वापरणं ही पण एक कला आहे...शिर्^याला सढळ तूपाचा "सा" लावावा लागतो... Proud

केळ्याच्या भाजीची सोपी पद्धतः
कच्चे केळे मायक्रोवेव मध्ये साधारण ३ मिनीटे भाजायचे.

नंतर हव्या तशा फोडी/काचर्या करुन नेहमीसारखी भाजी करायची.उपवासाला हवी असेल तर दाण्याचे कुट घालायचे...तुपावरच्या मिरची-जीरेच्या फोडणीसह..

मी अशी केली होती क के ची भाजी. बहुतेक ही रेस्पी माबोवरच आहे. किंवा मग मी नेटवरून शोधली होती.

कच्च्या केळयांची भाजी
साहित्य :- भाजीची ३ कच्ची केळी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ नारळ, ५-६ छोटे कांदे, १/२ चमचा जिरे, २ कडीलिंबाचे डहाळे, १ डाव तेल, चवीनुसार मीठ
कृती :- केळाची साले काढून प्रत्येक केळाचे १६ तुकडे करावेत व ते थोडया ताकात घालून स्वच्छ धुवावेत. मिरच्या वाटून घ्याव्यात. नंतर थोडी हळद व वाटलेली मिरची केळांना चोळून ठेवावी. थोडया पाण्यात मीठ घालून, त्यात केळांच्या फोडी टाकून मंदाग्नीवर त्या शिजवून घ्याव्यात. सर्व पाणी आटून केळाच्या फोडी कोरडया कराव्यात. १/२ नारळ व जिरे बारीक वाटून केळांवर घालावे. सतत हलवत रहावे. नंतर खाली उतरून ठेवावे. दुसर्या पातेल्यात तेल,हळद,मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगावर आला, की त्यात खोबरे खवून घालावे व जरा परतावे. त्यात शिजलेली केळी टाकून पुन्हा जरा परतावे व उतरवावे. आता ही भाजी तयार झाली.

मस्त होते एकदम

कच्च्या केळाची वरची पद्धतीप्रमाणे भाजी खूप मस्त होते.
फेफड्या( फुफुस. ..हा शब्द कसा लिहितात) साठी चांगली असते.

बर्‍याच ठिकाणी Proud

केळाची, केळाचे, केळांना, केळांच्या, केळाच्या, केळांवर.

वाच नीट. ती पाकृ माबोवरून किंवा नेटवरून मी कॉपी करून इथे चिकटवलीये.
बाकी एक केळं च्या ऐवजी एक केळ असा उच्चार केला तर केळाची बरोबर होते.

एवढ्या केळ्यांच्या रेसेपीज बघुन अल्पना हादरली की काय्?:अओ:

बहुतेक केळी पिकुन उपासाला तयार झाली असतील्.:दिवा:

बर्गर स्लाइजच एक पॅकेट आणलय. त्याच्यावर ते फक्त तळायचं आहे एवढंच लिहलयं. ते फक्त तळून खायचं का? मि कधी बर्गर खाल्ला नाही त्यामुळे कळतं नाही. प्लिज सांगा

नमस्कार, मला मारी बिस्किट वापरुन बनवतात त्या केकची रेसिपी हवी आहे. कोणाला माहिती आहे का? तो केक फ्रीज मधे ठेवतात आणि त्यात अखंड बिस्किटं वापरतात. धन्यवाद!

हसरी - म्हणजे burger patty का? तसे असेल तर तव्यावर थोड्या तेलात परतायचे आणि पोळी किंवा ब्रेड बरोबर खायचे.

हव तर cheese spread, इतर काही salads ही वापरता येतील.

३ कच्च्या केळ्यांना एक नारळ जास्त नाही का होणार ? ३ क.के. म्हणजे साल काडून फक्त २०० ग्राम भाजी समजून घ्या, तेव्हा? Uhoh ती कृतीची लिंक देणार का? म्हणजे यो.जा.प्र.वि. Happy
काचर्‍यालिहीणार्‍याणंनो, साल काढून, न काढता काप काढल्या वर कापडावर सुकवता का? माझी २ दा फजिती झाली. साल छिलून, मी काचर्‍या काढून लगेच तळल्या, दुसर्यादा थोडे मीठ लावून तळल्या. पण कुरकुरीत काही झाल्या नाहीत. तेव्हा सांगा बघू कुणीतरी. Happy

मी भाजी केली नाही केळ्यांची. काचर्‍याच तळल्या. पातळ काचर्‍या करून त्यावर मीठ, किंचितसा गरम मसाला आणि थोडी आमचुर पावडर शिंपडून तळलं. मंद आचेवर तळल्यावर छान कुरकुरित काचर्‍या झाल्या होत्या.
आता वरच्या सगळ्या रेसेप्या करण्यासाठी रोजच कच्ची केळी घ्यावी लागतिल काही दिवस. Happy

आता पनीरची एखादी डिश सुचवा बरं. काल घरच्या गाईचं ४-५ लीटर दुध आलं होतं. परवाच्या संध्याकाळी काढलेलं दुधं होतं म्हणून एकदा उकळवून घेतल्यावर मी सरळ त्याचं पनीर बनवलं. काल रात्री पनीर बुर्जी बनवून झालिये. अजूनही घरात पावकिलो पनीर उरलं असेल. घरी बनवलेलं असल्याने बाजारातल्यासारखं फर्म झालं नाहीये आणि गाईच्या दुधाचं आहे म्हणून फॅट कंटेट पण कमी आहे. तुकडे करून बनणार्‍या भाज्या करता येणार नाहीत. त्याचं काय करावं?

शिर्^याला सढळ तूपाचा "सा" लावावा लागतो... >> वेका.. वरचा सा असं लिहायला विसरलीस काय? Happy

Pages