लंडन ऑलिम्पिक्स २०१२:
२७ जुलै २०१२ रोजी ओपनिंग सेरेमनी आहे. इतर मनोरंजक कार्यक्रम आणि खेळांबरोबरच 'खादडी' हा एक महत्वाचा मनोरंजक खेळ आहे.
तर यंदाच्या ऑलिंपिक ओपनींग सेरेमनी बघताना करण्याच्या खादडीचा मेन्यु आपणा सर्व खाद्य खेळाडुंसमोर सादर करत आहे
मेन्यु जास्तीत जास्त 'पौष्टिक' असेल याची काळजी घेतली आहे. सांगता सोडुन.... कारण शेवट नेहमीच गोडच असावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वागत: तरण तारका:
लागणारे जिन्नस: लिंबाचा रस, मिठ, साखर, लेमोनेड, खाण्याचे रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा
१. लिंबाच्या रसात मिठ, साखर आणि थोडे पाणी घालुन अर्क बनवुन घ्या. त्याचे ४ भाग करा.
२. प्रत्येक भागात लाल, निळा, पिवळा, हिरवा रंग घाला आणि चांदणी शेपच्या आईस ट्रे मधे प्रत्येकी २/३ खळग्यात प्रत्येक रंगाचा अर्क घाला. उरलेला अर्क एकत्र करा - पाचवा डार्क रंग तयार होइल तो देखिल २-३ खळगयात घाला आणि ट्रे फ्रिझर मधे ठेवा.
३. आयत्या वेळेस ग्लासात लेमोनेड ओता आणि सर्व्ह करताना त्यात तयार फ्रोझन तारका सोडा.
**अर्क न वापरता नुसत्या पाण्यात लाल, हिरवा, पिवळा, निळा आणि सगळ्यांचे एकत्र कॉम्बो करुन बनवलेला डार्क रंग घालुन बर्फाच्या चांदण्या बनवता येतिल. आणि या चांदण्या मग लिंबु सरबतात घालुन प्या.
संदर्भ - खेळ: सिंक्रोनाईज्ड स्विमिंग
********************
सुरुवात - ऑलिंपिक रिंग्ज विथ फ्लेम सॉस
१. रिंग्ज साठी टॉपिंग: पनीर/ रिकोटा चिज, चाटमसाला / मिरेपूड, थोडे दूध, चवीला मिठ, साखर
सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या. फ्रिज मधे ठेऊन द्या.
२. रिंग्ज साठी -
शक्यतो सगळ्या रिंग्ज एकाच मापाच्या होतिल याची काळजी घ्या
निळी रिंग: उकडलेले बटाटे पूर्ण मॅश करुन घ्या. त्यात थोडा खाण्याचा निळा रंग घाला आणि नीट मिक्स करुन घ्या. थोडे बटर/ऑलिव्ह ऑइल आणि मिठ, पांढरी मिरेपूड घाला आणि मळून घ्या. कुकी रिंग किंवा वाटीला तेलाचे बोट लावुन त्यात या नि़ळ्या गोळ्याचे सारण थापा. आणि हलकेच चकती पाडा. तयार चकतीची जाडी साधारण १/४ इंच असली पाहिजे.
काळी रिंग: बीटरूट कच्चा/ उकडुन त्याच्या चकत्या कापा आणि १.४ इंचाचा थर होइल अश्या एकावर एक रचा . हवेच असल्यास चकतीच्या बाहेरच्या कडेवर थोडे तेल लावुन त्यावर थोडी भाजलेली कलौंजी चिकटवा.
लाल रिंग: लाल कॅप्सिकम ला तेलाचा हात लावुन गॅसवर्/ओव्हनमधे भाजुन घ्या. गरम असतानाच साले काढुन घ्या. कॅप्सिकम मोठा असेल तर त्याच्या चकत्या कापा अन्यथा कॅप्सिकमच्या स्ट्रिप्स कापुन त्या कुकी कटरमधे दाबुन एकावर एक बसवा आणि चकती तयार करुन घ्या.
किंवा
टॉमेटोच्या १/४ इंच किंवा अर्धा सेमी जाड चकत्या कापा. बिया काढुन टाका.
पिवळी रिंग: भोपळ्याचे १/४ इंच जाड गोल काप कापुन मावे मधे उकडुन घ्या. फार लगदा होऊ देऊ नका किंवा भाजके डाग पडु देऊ नका.
हिरवी रिंग: पालकाची पाने स्वच्छ धुवुन उकळत्या पाण्यात घाला आणि लगेच झार्यात निथळून बर्फाच्या गार पाण्यात घाला आणि मग परत एकदा निथळून पेपर टॉव्हेलवर पसरा.
पाने एकावर एक रचा आणि १/४ इंचाचा थर करा. कुकी रिंग ला तेलाचा हात लावुन गोल आकारात कापुन घ्या.
३. सर्व रिंग्ज ओलिंपीक सिम्बॉल प्रमाणे प्लेट मधे अरेंज करा. प्रत्येक रिंग वर मध्ये पनीर / रिकोटाचे मिश्रण नीट पसरा. बाजुच्या कडा किमान अर्धा सेंमी मोकळ्या ठेवा म्हणजे रिंग्ज चे रंग दिसतिल
४. फ्लेम सॉस - मेयोनीज + पेरी-पेरी सॉस किंवा मेयॉनीज + टोबॅस्को + थोडा टोमॅटो सॉस किंवा हॉट चिली सॉस आणि क्रिम चिज यातिल कुठलेही काँबीनेशन.
रिंग्ज सोबत फ्लेम सॉस खा
संदर्भ - ऑलिंपिक रिंग्ज आणि फ्लेम
********************
मुख्य कार्यक्रम:
उडती तबकडी :
१. पराठ्याची कणिक भिजवताना त्याचे तीन / चार भाग करा.
अ) लाल / केशरी रंग - थोडे बीटरूट मॅश करुन ते एका भागात मिसळून कणिक मळा किंवा भरपूर गाजराचा किस घालुन कणिक मळा.
ब) हिरवा रंग -पालकाची प्युरी घालुन कणिक मळा.
क) पिवळा रंग - भोपळा आणि थोडी हळद घालुन कणिक मळा.
ड) उरलेली कणिक तशीच मळा.
२. भारत तबकड्यांसाठी - अ), + ब) + ड) कणकेचे छोटे गोळे घेऊन पराठा लाटा आणि तव्यावर भाजुन घ्या.
३. ऑझी तबकड्यांसाठी ब) + क) कणकेचे गोळे एकत्र घेऊन पराठा लाटा आणि तव्यावर भाजुन घ्या.
**वरच्या अ-ब-क-ड च्या कॉम्बिनेशनने अजुनही काही देशांच्या तबकड्या बनवता येतिल. (कोण म्हणतो रे तबकड्या गोल नाहियेत म्हणून???)
संदर्भ - खेळ: डिस्कस थ्रो (थाळी फेक)
*****
ऑलिम्पिक पंच-कडी आखाडा:
१. मसाला - कांदा, आले + लसूण पेस्ट, गरम मसाला/छोले मसाला + मीठ + साखर (ऐच्छिक) = एकत्र वाटुन घ्या आणि तेलावर परतुन ग्रेव्ही बनवुन घ्या. ग्रेव्ही फार पातळ नको.
२. हिरवे मूग, अख्खे मसूर/काळे वाटाणे, पांढरे वाटाणे /व्हाईट बीन्स, राजमा आदल्या रात्री वेगवेगळे भिजत घाला आणि सकाळी निथळून चाळणीत वेगळे वेगळेच काढा आणि किंचित मिठ घालुन वेगवेगळेच उकडुन घ्या. प्रत्येक कडधान्याचे दाणे जास्तीत जास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.
मक्याचे दाणे - ताजे/फ्रोझन वाफवुन घ्या.
निळी रिंग: एका वाटीत २ थेंब निळा रंग आणि वाटीभर पाणी घालुन शिजलेले पांढरे वाटाणे/व्हाईट बिन्स त्यात किमान २ तास भिजत घाला. थोड्या वेळाने बीन्स्/वाटाणे निळसर रंगाचे होतिल. तव्यावर थोडे तेल घालुन जरासे परतुन घ्या.
काळी रिंग: अख्खे मसुर/काळे वाटाणे तेलावर थोडे परतुन त्यात तयार मसाला घाला. मसूर/वाटाणे जास्तीतजास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.
लाल रिंग: राजमा तेलावर थोडा परतुन घ्या. यात तयार मसाला घाला. राजमा जास्तीतजास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.
हिरवी रिंग: हिरवे मूग तेलावर थोडे परतुन घ्या. यात तयार मसाला घाला. मूग जास्तीतजास्त अख्खे रहातिल याची काळजी घ्या.
पिवळी रिंग: मक्याचे दाणे काढुन वाफवुन घ्या. वाफवलेले दाणे तेलावर थोडे परतुन घ्या. यात तयार मसाला घाला. दाणे अख्खे रहातिल याची काळजी घ्या.
३. तांदुळ धुवुन थोडा वेळ भिजत ठेवा. लवंग, दालचिनी, मसाला वेलची, मिरे, जिरे यांची स्वच्छ पंचाच्या/धोतराच्या/मसलिन कापडात पुरचुंडी बांधा. भात शिजवताना त्यात थोडे तूप, चविला मिठ आणि ही पुरचुंडी घाला. गॅसवर भात शिजवुन घ्या आणि पुरचुंडी काढुन बाजुला ठेवा.
४. एका डब्याला/ट्रे ला आतुन तुपाचा/पाण्याचा हात लावुन घ्या. त्यात गरम भात भरा. आणि नीट दाबुन बसवा. छोट्या वाटीने / कुकी रिंग ने ऑलिम्पिक सिंबॉल प्रमाणे यात भोके करुन घ्या. हा डब्बा/ट्रे आता प्लेटमधे उपडा करा आणि मोल्ड हलकेच काढुन घ्या.
५. तयार भोकात निळ्या बिन्स, मसूर/काळे वाटाणे व राजमा वरती आणि मक्याचे दाणे आणि हिरवे मूग खालच्या भोकात भरा आणि सगळे नीट दाबुन घ्या.
पंचकडी आखाडा खेळायला (खायला) तयार
आखाडा चौकोनी असतो आमचा आयताकृती आहे.. चालवुनच घ्या
संदर्भ - खेळ: बॉक्सिंग
********************
आजुबाजु:
चेंडु रायता:
अर्थात बुंदी रायता यात रंगीत बुंद्या किंवा बुंदी बरोबरच टॉमेटोचे बारिक तुकडे आणि हिरव्या कॅप्सिकमचे बारिक तुकडे घालता येतिल.
संदर्भ - खेळ: टेनिस्/टेबल टेनिस्/फुटबॉल, गोल्फ इ इ ज्यात खेळायला चेंडु वापरतात.
*****
जल ज्वाला:
अर्थात टोमॅटोचे सार टॉमॅटो + रेड कॅप्सिकम उकडुन मिक्सरमधुन काढतानाच यात हिरवी मीरची + लसूण + आले + लवंग + चवीला साखर आणि मिठ घालायचे. हवेच असल्यास पंच-कडी आखाडा बनवताना जशी पुरचुंडी तयार केली तशीच पुरचुंडी यात घालुन एल उकळी आणा. असे थोडेसे झणझणीत सूप / सार थंडच जास्त छान लागते.
संदर्भ - खेळ: जलतरण
*****
आलू समशेर:
अर्थात - बटट्याच्या फ्राईज - फ्रोझन्/फ्रेशली मेड
संदर्भ - खेळ: फेन्सिंग (तलवारबाजी)
********************
सांगता
हे एव्हढे सगळे प्रकार खेळल्यावर माझा स्टॅमिना संपला आणि आता डेस्झर्ट काय करू असा मोठ्ठा प्रश्न पडला??? मग म्हंटल सोप्पे काहितरी करु:
रो-बोट्स इन टेम्स :
अर्थात आईस्ड शॉर्टब्रेड कुकिज इन व्हॅनिला कस्टर्ड:
शॉर्ट्ब्रेड फिंगर्स- लांबट कुकिज(शॉर्टब्रेड कुकिजची पाकृ नंतर देते).
आयसिंग शुगर
लाल, निळा, हिरवा, पिवळा खायचे रंग
जेम्स्/स्मार्टीज/m&m
सजावटीचे सामान
व्हॅनिला कस्टर्ड
१. आयसिंग शुगर च्या पॅकेटवरच्या सुचनांनुसार आयसिंग बनवा. त्याचे ४-५ भाग करा. प्रत्येक भागात रंगांचे थेंब/पावडर टाका आणि लाल, निळा, हिरवा, पिवळा रंग घालुन आयसिंग बनवा.
२. हे आयसिंग पातळ असतानाच शॉर्ट्ब्रेड फिंगर्स वर पसरा.
३. आयसिंग थोडे ओले असतानाच त्यावर रोइंग करणारे खेळाडु म्हणून जेम्स्/स्मार्टीज/m&m चिकटवा. आयसिंग सेट होऊ द्या.
४. कस्टर्ड तयार करुन घ्या. थोड्या कस्टर्ड मधे १-२ थेंब निळा रंग घाला.
५. सर्व्ह करताना मोठ्या पसरट प्लेट मधे खाली कस्टर्ड पसरा आणि त्यावर रो-बोट्स ची रेस लावा किंवा प्रत्येक प्लेट मधे कस्टर्ड पसरून २-२ रो-बोट्स ठेवा
उत्साह असेल तर रो-बोट्स स्प्रिंकल्स वगैरे घालुन सजवा, ओअर्स (वल्ही) बनवा
संदर्भ - खेळ: रोईंग आणि लंडनची टेम्स नदी
*****************************************
तर अश्या पद्धतीने लंडन ऑलिम्पिक २०१२ ओपनिंग सरेमनी व्ह्यु केल्यावर थोडा आराम करा आणि ऑलिम्पिक खेळांच्या मुख्य सामन्यांच्या व्ह्युइंगच्या तयारीला लागा
केव्हढी कल्पकता! (आणि
केव्हढी कल्पकता!
(आणि केव्हढे परिश्रम!)
व्वा लाजो , काय चिकाटी आहे
व्वा लाजो , काय चिकाटी आहे तुझ्या अंगात !
बापरे बाप! लाजोजी __//\\__
बापरे बाप! लाजोजी __//\\__
खूप सुंदर मेनु आणि फोटो.
मस्त आहे!
मस्त आहे!
लाजो, तुला दंडवत!! नतमस्तक!
लाजो, तुला दंडवत!! नतमस्तक! तुझी कल्पकता जबरदस्त आहे आणि चिकाटी महान!
आता डिटेलवार वाचते (आणि थोडे तरी पदार्थ करतेच!)
वॉव! तुझ्या कल्पकतेला _/\_
वॉव! तुझ्या कल्पकतेला _/\_
लाजो.....तू महान आहेस.
लाजो.....तू महान आहेस. ..!!!!!!!!!!! तूझ्या डोक्यात या कल्पना कश्या 'शिजतांत' तेच कळत नाही...!
लाजो म हा न आहेस
लाजो म हा न आहेस ___/\____
परमेश्वरा!! ही अशी कल्पकता
परमेश्वरा!!
ही अशी कल्पकता वाटत होते तेव्हा चाळणी लिस्टीत आम्ही होतो. लाजोला ड्रम मिळाला आहे.
_/\_
Great!!!!!
Great!!!!!
श प्प थ्थ ! ! ! बंगालीत
श प्प थ्थ ! ! !
बंगालीत म्हणतात तसं, भीषण भालो अन भीषण सुंदर
साष्टांग दंडवत माते _______________/\_________________
मायबोलीवरचा हा माझा पहिला साष्टांग दंडवत आहे, याची नोंद घ्यावी.
आता भेटलीस की खरच नमस्कार करणार बघ तुला
रैनास खूप मोदक! लाजो तू अशक्य
रैनास खूप मोदक!
लाजो तू अशक्य महान आहेस! _/\_
रैना+१०० महान आहेस तु लाजो
रैना+१००
महान आहेस तु लाजो
ग्रेट !!
ग्रेट !!
धन्यवाद, अनेक धन्यवाद मंडळी
धन्यवाद, अनेक धन्यवाद मंडळी
चंबु, कल्पना सुचतात रे...अश्याच
रैना, ड्रम काय....
अवलतै, दंडवत वगैरे मला नको हां घालुस... तु पण एकदम कल्पक आहेस
Yummy.....लाजो.....तु खरच
Yummy.....लाजो.....तु खरच great आहेस.........तुला वेळ कधि मिळ्तो ग एवढ करायला......
लाजो, छे छे माझा तसा गैरसमज
लाजो, छे छे माझा तसा गैरसमज होता, आता तो दूर झाला. अगदी खरच मनापासून सांगतेय अगं मराठी भाषेत एका नवीन शब्दाची भर पडली बघ, अप्रतिम सुंदर कल्पकता = लाजोगिरी
अगं केव्हढी कल्पकता, केव्हढी चिकाटी अन केव्हढा उत्साह ! हॅट्स ऑफ टू यू डिअर
अगदी नावंही कसली भारी दिलीय्स
अगदी नावंही कसली भारी दिलीय्स !
लाजो ___/\____. दुसरे शब्दच
लाजो ___/\____.
दुसरे शब्दच नाहीयेत तुझ्या कल्पकतेला. महान आहेस तू!!!!!!!!!!!!
लाजो ___/\___ हे असले जबरी
लाजो ___/\___ हे असले जबरी प्रकार खाता खाता मी मुळ सेरेमोनीच विसरुन जाईन...
रिअली अमेझ्डं.
लाजो, ___________________/\__
लाजो,
___________________/\________________
रैना +++१०००००
अशक्य आहेस तू लाजो.
(तुझ्या घरी धाड टाकावी किंवा तुझंच अपहरण करून इकडे आणावं काय अशा (दुष्ट) विचारात आहे मी !)
हे बनवणं माझ्या आवाक्याबाहेरचं दिसतंय. पण तरी सोप्यातली सोपी पाकृ करून बघण्यात येईल.
लाजो तू अशक्य महान आहेस!
लाजो तू अशक्य महान आहेस! _/\_
खरंच आम्ही मोठ्या भोकाची चाळणी घेऊन गेलेलो आणि तुम्ही मोठ्ठा ड्रम!!!
महान!!!
महान!!!
--------------------------//\
--------------------------//\\-------------------------..
भारीच.. लाजो तू खरच ग्रेट आहेस.. कल्पकता सॉलिड आहे तुझी.... खरच फूड डिझायनंग चे क्लास ठाण्यात येवुन घे.. अमेझिंग..
लाजो दि ग्रेट. कसले भारी
लाजो दि ग्रेट.
कसले भारी प्रकार करतेस.
रुणुझुणू >>> +१
_/\_ लाजो तु महान आहेस.
_/\_ लाजो तु महान आहेस.
जबरदस्त.
देवा मला ह्या लाजोचा शेजारी बनव रे... प्लीज प्लीज..
ती दयाळु आहेच. मला आयत खायला मिळेल..
ओये.. गेले ७-८ दिवस रजा काढली
ओये.. गेले ७-८ दिवस रजा काढली की काय एव्हडे सगळे करायला मला तरी काढावी लागेल ग बोये
___/\___ तुला आणी तुझ्या कल्पनाशक्तीला
__/\__ __/\__ !!
__/\__ __/\__ !!
लाजो,खरंच "धन्य "आहेस
लाजो,खरंच "धन्य "आहेस तू..
अफलातुन कल्पना साकार करतेस तू.
खुप आभार्स मंडळी अवल सेना
खुप आभार्स मंडळी
अवल
सेना
रुणु, तुच घुसवलास माझय डोक्यात किडा
झकासराव
वर्षे, सुट्ती कसली घेत्ये
कालचा डिनर मेन्यु आखाडा आणि आजुबाजु . आणि परवाचा तबकड्या आणि सुरुवात असं २ रात्रीत जमवलं
Pages