Submitted by बागेश्री on 25 July, 2012 - 03:46
कधी कधी आयुष्य,
साचून राहिल्यासरखं वाटतं!
सगळे मु़ख्य प्रश्न
एकाच पदावर जाऊन बसलेले,
अनुत्तराच्या!
वेळेने तरी किती कळ सोसावी?
शेवटी,
आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ,
आपलेच दोन घाव आणि
साचलेल्या आयुष्याला नवी वाट,
नवा प्रवाह!!
मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात,
सार्या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली,
कायमचीच!
आता, नव्या प्रवाहाचा उन्माद, त्याचा खळाळ,
सुगंधी.... वेडावणारा!
गुलमोहर:
शेअर करा
आपल्याच इच्छाशक्तीची
आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ,
आपलेच दोन घाव आणि
साचलेल्या आयुष्याला नवी वाट,
नवा प्रवाह!! >>>> जबरी आवडल्या या ओळी.
मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात,
सार्या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली,
कायमसाठी! >>>> हे पण लय भारीच !
सुंदर कविता !
सुंदर !! खूपच छान.. पॉझिटिव
सुंदर !! खूपच छान.. पॉझिटिव अॅटीट्यूड..
शेवटी, आपल्याच इच्छाशक्तीची
शेवटी,
आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ,
आपलेच दोन घाव
ग्रेट !!
किती सहजतेने आणि अगदी
किती सहजतेने आणि अगदी थोडक्यात पण महत्वाचं लिहिलंय..... मस्तच.
“मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात,
सार्या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली,
कायमसाठी!” >>>> हे सर्वाधिक आवडलं.
उकाकांचे अभिप्राय... मला
उकाकांचे अभिप्राय... मला शिकायचंय असे अभिप्राय द्यायला.
वा छान कविता आपल्याच
वा छान कविता
आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ,
आपलेच दोन घाव आणि
साचलेल्या आयुष्याला नवी वाट,
नवा प्रवाह!!
>>>>>>>>>शेतात पिकाला पाणी देताना अश्शीच दारं धरतात/ मोडतात आमच्याकडे त्याची याद आली
__/\__
__/\__
अय्या किती छान
अय्या किती छान
मस्तच्..........आवडली........
मस्तच्..........आवडली........
व्वा.. आवडली ही पण
व्वा.. आवडली ही पण
अतिसुंदर
अतिसुंदर
छानच कविता.इच्छाशक्तीची कुदळ
छानच कविता.इच्छाशक्तीची कुदळ आवडली.
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
(No subject)
ए बागू, छानच
ए बागू,
छानच ग्....मस्तच.....
सावरी
आवडली
आवडली
सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे!
सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे!
ग्रेट
ग्रेट
सुरेख!!
सुरेख!!
खुपच सुंदर वा वा पुन्हा एकदा
खुपच सुंदर
वा वा
पुन्हा एकदा __/\__
एक विचार म्हणून
एक विचार म्हणून आवडली...
पु.ले.शु!
आवडली
आवडली
एकदम छान! खूप आशावादी आहे हा
एकदम छान!
खूप आशावादी आहे हा "प्रवाह"!
आवडली कविता!
खुपच छान! गगो वर आल्याच
खुपच छान!
गगो वर आल्याच सार्थक झाल
सर्वांची खूप आभारी आहे,
सर्वांची खूप आभारी आहे, दोस्तहो...
दीपक, सचिन, सावू फारा दिसांनी प्रतिसाद, छान वाटलं
भारतीतै आवर्जून कविता वाचून मतं कळवत आहात, मस्त वाटतंय,
मार्गदर्शन व लोभ असावा...
छान कविता!!!
छान कविता!!!