Submitted by निंबुडा on 26 July, 2012 - 01:49
तुझा माझा रेशमी बंध..
ती गाठ रेशमीच राहू दे
.
सुती गाठ किती घट्ट बसते माहितीये ना?
सोडवू म्हणता सोडवता येत नाही...
उलट सोडवण्याच्या नादात अजूनच घट्ट होत जाते!
जितकी जास्त आवळली जाते तितके जास्त वळ!
आणि मग ओढाताणीत तुटतेच ती
किंवा दोर कापून टाकावे लागतात...
तरीही उमटलेले वळ स्वतःची खूण सोडतातच मागे..
कधी हुळहुळती... कधी भळभळती!
.
रेशीमगाठीचं तसं नाही!
जितकी अलगद बसते तितकीच अलगद सुटतेही!
आणि सुटतानाही कुठल्याही वळाचा लवलेशही नाही
उलट मऊसुत झुळझुळत्या स्पर्शाची अनुभूती..
.
.
एक मात्र आहे!
वळ दिसत नाहीत म्हणून वेदनांचं अस्तित्त्व मात्र नाकारता येत नाही!
मनातला एक हळवा कोपरा पकडून त्या बसतातच ठाण मांडून!
.
.
पण तरी,
आपल्या मनातलं कुणाला बघता येत नाही हे किती चांगलंय ना!
म्हणूनच म्हणते!
ही रेशीमगाठ रेशमीच राहू दे!
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
सह्हीच आहे ही 'रेशीमगाठ'....
सह्हीच आहे ही 'रेशीमगाठ'....
चांगली आहे
चांगली आहे
मस्त शेवटून दुसरा आणि तिसरा
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटून दुसरा आणि तिसरा तर थेट पोहचला
सहीचचच..........
सहीचचच..........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली
आवडली
छान!! शेवटून दुसरा आणि तिसरा
छान!!
शेवटून दुसरा आणि तिसरा तर थेट पोहचला >>>पॅरेग्राफ नाहीये तो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वळ दिसत नाहीत म्हणून वेदनांचं
वळ दिसत नाहीत म्हणून वेदनांचं अस्तित्त्व मात्र नाकारता येत नाही!
आवडली
वाह ! नेमकं उतरवलंय..
वाह ! नेमकं उतरवलंय.. पोहोचलं.
आवडली.
आवडली.
खूप दिवसांनी निंबुडा,कुठे
खूप दिवसांनी निंबुडा,कुठे होतीस? छानच कविता,नात्यांमधल्या पिळांना हळूवारपणे हाताळणारी.
कविता छान आहे
कविता छान आहे
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना
प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सह्हीच
सह्हीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)