पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॉम ज्युस केला की त्यात अगदी थेंबभर टोबॅस्को सॉस टाकायचा, मस्त चटपटीत चव येते Happy

ज्युस टॉमॅटोज बरोबर थोडी सेलरी देखिल घालायची.

मी भारतात असताना रिअल चा टोमॅटो ज्यूस प्यायचे. त्याची चव साधारण वर्जिन मेरी टोमॅटो ड्रींक सारखी होती.

kachchi dabeli ghari banvaychi aahe. kashi banvaychi? kay sahitya lagel?

मी आज काही कारण नसताना /गरज नसताना, उगीचच ३ कच्ची केळी घेतलीयेत. त्याचं काय करता येईल? काय करतात? सोप्पं जमेल असेल काहीतरी सुचवा प्लिज(रेसेपीसकट). (आणि हो फणस /अरवी इ सारखं कच्ची केळी कापताना पण काही काळजी घ्यायची असते का हे ही सांगा)

अल्पना, कच्च्या केळ्याच्या कोफ्ता करीची पाकृ‍ वरदेला विचार.
आणि आपण उपासाच्या बटाट्याच्या काचर्‍या तश्याच क. के.च्याही करतात.

कच्ची केळी सोलताना/ चिरताना विशेष काही काळजी नाही घ्यावी लागत. पिकलेल्या केळ्यापेक्षा कच्च्याची साल कठीण असते एवढंच. सुरीने निघते सहज. लाल भोपळ्याची साल काढतो तशीच केळ्याची साल काढायची.

अल्पना,कच्च्या केळ्याचे बटाटा घालुन पॅटीस्,कांदा -खोबरे घालुन भाजी,कच्ची दाबेली चे सारण हे सोप्पे आहेत .विशेष काळजी काहीच घ्यायची नाही.सोलले -चिरले कि थोड्या पाण्यात टाक नाहीतर काळे होते.

धन्यवाद मंजू, सुलेखा. काचर्‍या सगळ्यात सोप्पा प्रकार आहे. तोच करुन बघते.

ह्या कच्च्या केळ्याच्या काचर्‍या फार तेल पितात का ? मी मागे एकदाच प्रयत्न केला होता कच्च्या केळ्याची भाजी करायचा. भऽरपूर तेल घातले ते सगळे शोषले गेले आणि भाजी तरीही कोरडीच झाली. परत नाही आणली मग कधी कच्ची केळी.

मी आम्ही सारे खवय्ये मधे एक रेसिपी पाहीली होती
कच्ची केळी चे काप करुन डिप फ्राय करुन घ्याय्चे...पेपर वर काढुन जास्तीच तेल काढुन टाकायच
मग त्यात चिंच -खजुर चट्णी,हिरवी चटणी (आवडत असेल तर) मीठ टाकाय्च,आनि अजुन काही हव असेल तर टाकायच आनि चाट सारख खायच Happy

मला जरा आपला नेहमीच्या रव्याच्या शिर्‍याची (केळं घातलेली) रेसिपी कुणी सांगेल का?
मी एकदा करून पाहिला होता तेव्हा गिच्च आणि कोरडा झाला होता.

अल्पना,
सोप्पी भाजी कर.
कच्ची केळी सोलुन, हिंग,मोहरी, कढीपत्ता, तेलाची फोडणी करुन शिजव. वरुन कोथिंबीर, दाण्याचा कुट, ओलं नारळ घाल. झाली भाजी. मस्त लागते फोडी सुबक चिरल्या की. Happy

लाजो,वेका,मवा धन्यवाद. वेका मॉटस वॉलमार्ट मध्येच मिळेल, पण वॉलमार्ट अजून भारतातच नाही तर पुण्यात कुठे मिळेल? असु दे पण तू निदान पर्याय तरी सांगीतलास.

अल्पना मागे मी कच्च्या केळ्यांच्या भाजीची रेसेपी थोडक्यात इथे दिली होती. परत सांगते. केळ्याच्या साल सोलुन काचर्‍या करायच्या. तेलात मोहरी ( आवश्यक नाही, पण चालेल )हिंग्,हळद आणी उडदाची डाळ घालुन फोडणी करायची, त्यात काचर्‍या टाकुन परतायच्या, त्यावर सांबार मसाला ( हाच पाहीजे दुसरा मसाला नकोच, कंपनी कोणतीही चालेल) भुरभुरुन टाकायचा, परतुन मग मीठ घालावे. तिखटाची गरज नाही. मात्र ही भाजी सांबार किंवा रस्सम भाताबरोबरच चांगली, पोळीबरोबर अज्जीबात नको.

दक्षिणा,
शिर्‍यासाठी पौर्णिमेने एक बाफ उघडला होता. माझ्यामते भलेभले पाककलाविशारद (बहरातले माझे करिक्युलम पहा) शिरा आणि उपम्याने घायाळ होतात. संगीतविशारद जसे मैफलीत भूपाली गायचा असला तरी थरकापतात तसेच.
ती साधना आहे. किमान वीस वेळा शिरा केल्यावर मगच हात बसतो. गाणं बसवायचे तसे हे दोन पदार्थ बसवायचे Wink
सढळ हाताने तूप हे अनिवार्य आहे. पेशन्सही. मंद आचेवर न कंटाळता (रवा भाजायचा) रियाज करणे. रवा भाजण्यात कला आहे.

मजेत लिहीले आहे गं. Light 1 Wink
पौर्णिमेच्या बाफवर चांगल्या टिपा आहेत.

रैना
तु दिवा का दिलास? त्याची काही गरज नव्हती. कारण आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर असं बहिणाबाई उगिच म्हणाल्या नाहीत.
तु म्हणतेस ते परिश्रम करायलाच हवेत तु म्हणालेली प्रत्येक गोष्ट १००% पटली. Happy

अर्र सॉरी,
मंजूडी ने दुवा दिलाय तोच बाफ शिर्‍याच्या युक्त्यांसाठी. मला पौर्णिमेचे पोस्ट आठवत होते फक्त.

कच्च्या केळाचे साल काढून दीड दोन इंच लांब तुकडे करायचे. त्या तुकड्यांच्या पातळ स्लाइसेस करायच्या. त्यावर हळद तिखट मीठ चिमूटभर हिंग थोडा लिंबू रस लावून १०-१५ मिनिटे ठेवायचे. मग तांदळाच्या पिठीत किंवा बारीक रव्यात घोळवून तव्यावर सढळ हाताने तेल घालून मध्यम आचेवर परतावे. वरण भात अन असे केळ्याचे काप एकदम क्लासिक ! नुसते अ‍ॅपेटायझर म्हणून हाणायला पण छान लागतात.

पुण्याला वैशालीत इडली-डोश्याबरोबर देतात त्या चटणी कशी करतात माहिती आहे का? दक्षिणेत केल्या जाणाऱ्या कोरड्या चटण्या कश्या करतात?

सुमेधा, मसाला सुपारीत घालावे तितके घट्क कमीच.
पण साधी सुपारी, तूकडे करून भाजून, चिकनी सुपारी (लाल), बडीशेप, जेष्ठमध, कंकोळ, वेलची, काथ, जायफळ,लवंग असे सगळे बेताचे भाजून एकत्र कुटायचे असते. त्यात स्वादासाठी ठंडक (पानसुपारीचे घाऊक सामन विकणार्‍याकडे मिळते, दादरला कबुतरखान्यासमोर दुकाने आहेत) किंवा केवडा अत्तर मिसळतात.

आवडीप्रमाणे धणाडाळ व ओवा पण घालता येतो. तीळ मात्र भाजून पण न कूटताच घालायचे. प्रत्येकाची अशी खास रेसिपी असते. पण घरी केली तर एकदाच मेहनत होते पण भरपूर होते आणि घटकांची खात्री असते. साखर व मीठही आवडीप्रमाणे मिसळतात.

मसाली सुपारी खाताना मात्र चघळतच खायची नाहीतर हमखास घश्यात बसते.

दक्षिणा जुन्या माबोवर जयवि यांनी प्रसादाच्या केळं घातलेल्या शिर्‍याची रेसिपी दिल्ये. त्याने चवीला आणि दिसायला फार सुंदर होतो शिरा. चुकणारही नाही. ही बघ लिंकः
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116528.html?1196797934

दक्षिणा, शिरा चिकट न होण्यासाठी रवा मस्त खरपुस भाजला गेला पाहीजे. शक्यतो मंद आचेवर भाजून घ्यावा. मग कमी तुपात पण चांगला होतो. बर्याचदा काय होतं की मोठ्या आचेवर फक्त रंग बदलतो पण रवा निट भाजला गेला नसतो. हे जरा पेशन्सचं कामं असतं Happy मावे असेल तर जस्तीचा भाजूनच ठेवावा. म्हणजे आयत्या वेळी जरा कमी कष्ट.
माझ्या अनुभवाप्रमाणे शिर्याचा पुरेसा कॉन्फिडन्स येई पर्यंत मध्यम जाडीच्या रव्याचा वापर करावा. ह्याचा शिरा शक्यतो चिकट होत नाही. फुलत जातो. त्यावर जम बसला की मग बारीक रव्याकडे वळावे.
मावे मधे रवा खुप छान फुलतो.

आमच्याकडेही डबाभर रवा तुपात भाजुन ठेवतात. तो खराब होत नाही आणि लगेच शिरा बनवता येतो.
मी बाहेर गावी जाणार असेल तर भाजलेला रवा, ड्रायफ्रुट, साखर व वेलची पुड याचे मिश्रण तयार ठेवते. किती पाण्यात किती रवा टाकायचा हे प्रमाण नव-याला सांगुन ठेवते.

कच्च्या केळ्याचे चिप्स छान होतात. चिप्स तळल्यावर त्याला मिठ/काळेमिरी पावडर /लाल तिखट लावुन ज्या चवीचे पाहीजे तसे बनवु शकता.
गोड शिरा, तिखट शिरा करताना सर्व साहित्य टाकुन शिरा होत आल्यावर वरुन ३-४ चमचे तुप सोडायचे म्हणजे शिरा मोकळा होतो.

Pages