Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
डोकोमोच्या रणबीर कपूरच्या
डोकोमोच्या रणबीर कपूरच्या जाहिराती भारी आहेत...>>> +१
शाळेतल्या मुलांच्या मधल्या
शाळेतल्या मुलांच्या मधल्या सुटीची 'तेरा हँडवॉश स्लो है क्या?' ही जाहिरात चूक वाटली. एखादा हँडवॉश दहा सेकंदांत जर्म्स किल करत असेल कदाचित, पण मुले हात दहा सेकंदांत नीट/संपूर्ण धुऊ शकतील का? त्यातून तो एक्स्ट्रा हायजीनवाला मुलगा बिचारा ब्राउन ब्रेड वापरून केलेले हेल्थफुल सँडविच खात असतो. दुसर्या मुलांच्या हातात बर्गर वगैरे असावेत. > अगदी अगदी. आणि मुलं पण मठ्ठ दिसणरी घेतली आहेत.
डोकोमोच्या रणबीर कपूरच्या
डोकोमोच्या रणबीर कपूरच्या जाहिराती भारी आहेत...>>> +१
कॅडबरी डेरीमिल्कच्या "किसी भी
कॅडबरी डेरीमिल्कच्या "किसी भी चीज का शुभारंभ..." वाल्या अॅड्स च्या थीम्स छान असतात. ती प्रेग्नन्सी ची न्यूज नवर्याला कशी सांगू ह्यासाठी आरशासमोर उभं राहून प्रॅक्टीस करताना हृषिता भट ची जाहिरात, किंवा कॉलेज मधे रॅगिंग करणार्या मुलांची जाहिरात ह्यांच्या थीम्स लक्षवेधक आहेत.
मायक्रोमॅक्स टॅबलेटची नवीन
मायक्रोमॅक्स टॅबलेटची नवीन जाहिरात आवडली म्हणावी की नाही समजत नाही. पण 'ढिंगचिका' च्या चालीवर रसायनशास्त्राची सूत्रं म्हणणारा छोटा, 'ऑल इज वेल' च्या चालीवर 'ओ रं ग जे ब' म्हणणारा गोल्या, आणि 'साड्डा हक' च्या चालीत 'डेबीट इन क्रेडिट आउट' म्हणणारी मुलगी पाहून हसायला नक्कीच येतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
...खरंच लहान मुलं अश्या प्रकारे गोष्टी लक्षात ठेवायला लागली तर कठीण आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लक्सची 'चोरा एकमेकींचे
लक्सची 'चोरा एकमेकींचे नेकलेस' असा संदेश देणार्या अॅडसंदर्भाने एका दुसर्या ग्रुपमधे एकीने आपल्या मुलीचा आणि तिच्या मैत्रिणींचा अनुभव सांगितला. ते वाचून जरा धक्का बसला.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
त्या मुलींना एकमेकींच्या वस्तू ढापणं यात काही चूक आहे हे कळत नाही आणि टिव्हीवर तर दाखवतातच ना. वर ती एवढी सुंदर पण असते म्हणजे सुंदर दिसण्यासाठी नेकलेस वगैरे ढापला तर चालतो असंच त्यांना वाटतंय. आणि आयांना 'हे चूक आहे तर टिव्हीवर का दाखवतात?' याला पटेल असे उत्तर देता येत नाहीये.
फ्लिपकार्ट च्या जाहिरातींमधली
फ्लिपकार्ट च्या जाहिरातींमधली पोरं काय एक्स्प्रेशनस देतात ! परफेक्ट!
डोकोमो सहीयेत त्या पण!
स्पाइस मोबाइल्सची जाहीरात
स्पाइस मोबाइल्सची जाहीरात नाही आवडली. त्या भडक मेक-अप केलेल्या मॉडेल्स आणि त्यांचे एक्सप्रेशन्स नाही पाहवत.
रच्याकने, आजकाल प्रियांका चोप्रा प्रत्येक अॅड मध्ये शॉर्टसमध्येच दिसते![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अक्षयकुमारची "हिरो" बाइक्सची
अक्षयकुमारची "हिरो" बाइक्सची नविन अॅड मस्त आहे.
ती संडे कब है ची तेलाची
ती संडे कब है ची तेलाची जाहीरात डोक्यात जाते माझ्या![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
सगळीकडे पुरूषांच्या डोक्याला तेल लावताना एक तर बाई किंवा दुसरा बाबा.![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
एखाद्या बाईच्या डोक्याला तेल लावताना ही दाखवायचं, बायांच्या डोक्याला ताप नसतो की काय? त्यांना हापिसात कामं नसतात का?
जाहीरात बनवणार्याचा निषेध![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
दक्षे, घरी जाउन डोस्क्याला
दक्षे, घरी जाउन डोस्क्याला तेल लाव हो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आगावा दक्षे माझ्याकडे ये..
आगावा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दक्षे माझ्याकडे ये.. मी देते तुझ्या डोस्क्याला तेल थापुन
ती कुठलीशी नोकरीसाठीची अॅड.. त्यात एक एक गोष्टी बॅगेतुन काढतात शकुन म्हणुन.. अशा गोष्टींची टर उडवणे ठीक आहे.. पण आईची
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला ती गूगल-क्रोमची
मला ती गूगल-क्रोमची पेण्टिंग्जच्या संदर्भातली जाहिरात खूप आवडते. जरा मोठी आहे, पण छान वाटते पहायला.
(विस्मृतीत गेलेली तंजावर पध्दतीची चित्रं, मग तो वयस्क मनुष्य क्रोमच्या मदतीनं त्याचं ऑनलाईन स्टोअर सुरू करतो. वगैरे)
गूगळताना सापडलेली लिम्काची ही
गूगळताना सापडलेली लिम्काची ही जाहीरात.. लहानपणीची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.madaboutads.com/video/food-drink/587/limca-fun-time-limca-tim...
लहान असताना घरी टीव्ही नसताना
लहान असताना घरी टीव्ही नसताना मित्राकडे पाहण्याचा अनुभव निराळा. त्यावेळची एक जाहीरात " लिम्का आफ्टर लिम्का..लाईम एन लेमनी लिम्का " खूप आवडायची. त्यातला मॉडेल ( त्या वेळी सगळ्यांना हिरोच म्हणायचं असतं असं वाटायचं ) आमच्या ग्रुपचा आवडता होता. त्याचा खून झाला असं शाळेत कुणीतरी म्हणालं. कुणाला नाव आठवतं का त्याचं ?
त्यातला मॉडेल ( त्या वेळी
त्यातला मॉडेल ( त्या वेळी सगळ्यांना हिरोच म्हणायचं असतं असं वाटायचं ) आमच्या ग्रुपचा आवडता होता. त्याचा खून झाला असं शाळेत कुणीतरी म्हणालं. >>>>> उप्र ही सात्विकपणाची कमाल झाली हां! (उप्र ही तुमच्या आयडीची आद्याक्षरं हायती लग्गेच तिकडे जाव नका विचारायला.)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
आता पुन्हा ती किट्कॅट ची
आता पुन्हा ती किट्कॅट ची खारीची जाहीरात दाखवत आहेत...मला आवड्ते मी मस्त... मस्त प्रपोज करतो तो तीला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनू मला झूझूच्या अॅड जास्त
अनू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला झूझूच्या अॅड जास्त आवडायच्या वोडाफोनच्या
पुर्वीच्या कुत्र्याच्याही चांगल्या होत्या
आताच्या काहीतरीच आहेत
अनुसुया मला ती जाहीरात
अनुसुया मला ती जाहीरात अज्जिबात आवडत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दक्षिणा, तो बॅगेतून "आई" काढत
दक्षिणा, तो बॅगेतून "आई" काढत नाही. "गुरूमैय्या" वा "माताजी" वगैरे बाहेर काढतो.
मला आवडला तो टच.
का ग दक्षिणा किटकॅट ब्रेक
का ग दक्षिणा
किटकॅट ब्रेक बनता है ची जाहीरात....तो काटे नही कटते दिन ये रात >>> हे गाण म्ह्णुन तिला प्रपोज करतो ती जाहीरात बोलत आहे मी...
सचिनची कोकची जाहिरात फेक
सचिनची कोकची जाहिरात फेक वाटते. अनवाणी पोरे क्रिकेट खेळतात, मातीत डाईव्ह वगैरे मारतात, त्यात ती कोकची बाटली एकदम उपरी दिसते.
एफ.एम वर विठोबा दंतमंजन ची
एफ.एम वर विठोबा दंतमंजन ची जाहिरात एकवतात..... मला अजिबात आवडत नाही ...६० च्या दशकात गेल्यासारख वाटत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अनुसुया मी त्याच
अनुसुया मी त्याच जाहीरातीबद्दल बोलतेय.
फारएण्ड तुझ्याशी सहमत.. मलाही पटली नाही ती जाहीरात.
आणि एक ती लग्नाच्य वेबसाईटची जाहीरात आहे, म्हातारा ज्या त्या मुलाच्या मागे सेहरा घेऊन पळताना दाखवलाय. डोक्यात जाते ती अख्खी जाहीरात.
सचिनची कोकची जाहिरात फेक
सचिनची कोकची जाहिरात फेक वाटते. अनवाणी पोरे क्रिकेट खेळतात, मातीत डाईव्ह वगैरे मारतात, त्यात ती कोकची बाटली एकदम उपरी दिसते.>>> +१ आम्ही दरवेळी हेच म्हणतो ती जाहिरात पाहून.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती राखी पोर्णिमेची जाहिरात
ती राखी पोर्णिमेची जाहिरात सुद्धा बकवास आहे बहुतेक cadbury ची आहे.
सध्याची "दाग अच्छे है" ची
सध्याची "दाग अच्छे है" ची सर्फ एक्सेल अॅड फारच गोंडस आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिखलात पडालेला मुलगा अंगभर चिखल चोळून झप्पी द्यायला जातो, सिनिअर पोरं कपडे खराब होऊ नये म्हनून धुम्म ठोकतात... कंसेप्ट्च इनोसंट आहे फार... जाम आवडली
मेडिमिक्स ची त्या लहान मुलाची
मेडिमिक्स ची त्या लहान मुलाची `कॅमिकल' वाली जाहिरात आवडली.
व्हिको नारायणी ची जाहिरातही ६० च्या दशकातली वाटते. अगदी त्या सर्वांच्या कपड्यांचे रंग सुद्धा ऑड वाटतात.
बागे अनुमोदन, अत्यंत गोड
बागे अनुमोदन, अत्यंत गोड जाहीरात आहे ती.
सेन्सोडाईनच्या सर्व जाहीराती
सेन्सोडाईनच्या सर्व जाहीराती एकदम बकवास. अगदी टेक्निकली सुद्धा साऊंड नाहीत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages