Submitted by सीमा on 19 March, 2012 - 10:58
यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही, दुधी भोपळा नाही. नागपून
नाही, दुधी भोपळा नाही.
नागपून विद्यापीठ अस्तित्त्वात नाही!
लौकी= घिया= दुधी हा दुधी वाटत
लौकी= घिया= दुधी
हा दुधी वाटत नाहीये आकारावरुन तरी.
सायो, करेक्ट. दुधी भोपळा हा
सायो, करेक्ट. दुधी भोपळा हा भोपळ्यासारखाच गोल, पण आतून पांढरा असतो.
पडवळ ऑन स्टेरॉइड्स?
>>दुधी भोपळा हा भोपळ्यासारखाच
>>दुधी भोपळा हा भोपळ्यासारखाच गोल, पण आतून पांढरा असतो
आमच्यातला असाच अस्तो. उगाच
आमच्यातला असाच अस्तो. उगाच डोळे फिरवू नका.
पडवळ ऑन स्टेरॉइड्स? >> असू
पडवळ ऑन स्टेरॉइड्स? >> असू शकेल. चिरुन पाहिलंस तर प्रश्न विचारायचं वेळ यायची नाही
दोडका असता तर तुला तुरिया पात्रा वाटाणा करता आली असती
घोसाळं वाटतंय ते.
घोसाळं वाटतंय ते.
घोसाळं नाहीये, दुधीच आहे. जरा
घोसाळं नाहीये, दुधीच आहे. जरा उजळ असतो दुधी पण हा सुद्धा दुधीच आहे.
त्याचा आकार दुधीसारखा आहे.
त्याचा आकार दुधीसारखा आहे. लौकी म्हणजे दुधीच. पण रंग घोसाळ्यासारखा आहे.
घोसाळं नाहीये, दुधीच आहे. जरा
घोसाळं नाहीये, दुधीच आहे. जरा उजळ असतो दुधी पण हा सुद्धा दुधीच आहे. >> सिंडी +१.
पडवळावर पांढरे-हिरवे चट्टे असतात.
अरे भांडू नका .. खरंतर हे
अरे भांडू नका ..
खरंतर हे प्रकरण दुधीसारखंही वाटत नाहीये ..
आमच्यातले दुधी लांबट असतात
आमच्यातले दुधी लांबट असतात बै.
मृ , एक भाजी टाकलीस ती पण
मृ , एक भाजी टाकलीस ती पण कन्फ्युजिंग.
ते sponge gourd आहे बहुदा. गिलकी म्हणतात आपल्याकडे ते. MP ची लोक भरपुर वापरतात. मध्यप्रदेशच्या मैत्रिणीकडे लागलेत म्हणून मला माहित. नेटवर बघितल फोटो तर ते बरोबर पण वाटतय.
http://www.evergreenseeds.com/edibleluffa.html
मला पहिल्यांदा कोरिअन दुधी वाटला. H Mart मध्ये मिळतो तसा. पण त्यावर अशी फजी लव असते. ती यावर नाही. आमच्याकडे नेहमीचे दुधी लागलेत. फोटो टाकते नंतर.
>> पण त्यावर अशी फजी लव
>> पण त्यावर अशी फजी लव असते
मी रेग्युलर दुधीवर आणि भेंडी वरही अशी लव बघितली आहे .. वेलींवरच्या भाज्यांवर असते काय अशी लव (असली तर)?
सीमा, >>गिलकी म्हणतात
सीमा,
>>गिलकी म्हणतात आपल्याकडे ते
>>>मृण्मयी | 17 July, 2012 - 15:29
मग हे गिलकं असावं
बघा, मी म्हंटलं नव्हतं??
माहित नाही गं. पण भेंडीवर
माहित नाही गं. पण भेंडीवर असते त्याच्यापेक्षा थोडी जास्त असते त्या कोरिअन बॉटल गार्ड वर. आणि रंग पोपटी नसतो. त्या ऐवजी डार्क हिरवा असतो. मी फक्त सुपर H Mart मध्येच पाहिलेत ते. आपल्या रेग्युलर दुधी पेक्षा अल्टीमेट चव असते. कधी कोरिअन भाजी बाजारात मिळाले तर घेवून बघ.
बरं मुलिंनो मला एक सांगा मला
बरं मुलिंनो मला एक सांगा मला इथे गॅलरीत ठेवता येतील अशी झाडे लावायची आहेत .. कोणती लावू शकेन ? म्हणजे इथल्या सिझन प्रमाणे ... आणि नंतरही कुठली टिकतिल ?? भारतातून काही बिया आणल्या आहोत पण अजून सुरवात नाही.. कुंड्या आणण्यापासून सुरु...
टोमॅटो मिर्ची कोथंबीर चालेल का ? किती दिवस राहातिल ?
मदत करा...
थोडासा उशीर झालाय. पण हरकत
थोडासा उशीर झालाय. पण हरकत नाहीये.. तांदूळ थोडी ना पेरायचेत....अजून वेळ गेली नाहीये.
कोंथीबीर, मिर्ची, टोमॅटो सोप्पी आहे उगवयाला.
अहो झंप्पिक्क्का उशिरानेच
अहो झंप्पिक्क्का उशिरानेच आलेय तुमच्या अमेरिकेत म्हणून तर विचारतेय ना
Daffodil, try googling the
Daffodil, try googling the USDA hardiness zone where you live. Based on that you will know the growing season. Most varieties of tomatoes and peppers take 60-70 days from planting to first harvest . Beans take 45-55 days. Radish takes 45 days if you want leaves, slightly longer if you want the radish itself.methi coriander take much shorter.scallions take 4-6 weeks. Figure out when the growing season ends for your zone and then you can decide what you want to plant.
If you buy small plants rather than starting from seed you can get a jumpstart.
हा वेलीवरचा दुधी. अजुन लहान
हा वेलीवरचा दुधी. अजुन लहान आहे म्हणून तोडला नाही.
हा दुसरा , तोडलेला मोठा झालाय. सोबत अंबाडी आहे. दोडके , स्क्वाश अजुन लागताहेत.
>>>अहो झंप्पिक्क्का उशिरानेच
>>>अहो झंप्पिक्क्का उशिरानेच आलेय तुमच्या अमेरिक>>><<
झंप्पिक्क्का नाही हो, हि अमेरीका आहे, तेव्हा हाक मारायहे नियम सांगते. नुसते नावाने हाक मारा व्यवस्थित. .. झंपी म्हणून.
घरच्या अंगणातला शेपू आणि आंबट
घरच्या अंगणातला शेपू आणि आंबट चुका. हे सर्व सीॅट्ल झोन ८ मधून.
सोनुली. मस्तच दिसती आहे भाजी.
सोनुली. मस्तच दिसती आहे भाजी. आंबट चुका तर एकदम छान आलाय. आमच्याकडे आलाच तर एप्रिल मध्ये. नाहीतर नाही.
सोनुली,छानच दिसतेय भाजी,शेपू
सोनुली,छानच दिसतेय भाजी,शेपू मस्त दिसतोय.कसा,कधी लावलात सांगू शकाल का?मी कॅलि. मधे असते,आत्ता शेपू लावून येइल का?आंबट चुक्याच्या बिया देशातून आणल्या होत्या का?सॉरी ,खूप प्रश्न विचारतेय्,पण इतकी छान भाजी बघून रहावेना..
सीमा,तु़झ्याकडचीही मस्त दिसतेय गं भाजी.दुधी भोपळ तर मस्तच.त्याचं रोप आणलस विकत की बिया लावल्यास्?मी कारली,काकडी,वांगी,कोबी लावलाय,२ गड्डे निघाले कोबीचे,फोटो टाकते जमलं की,बाकी भाज्या अजून होताहेत तयार
आंबटचुका मस्त दिसतोय . बिया
आंबटचुका मस्त दिसतोय . बिया इथेच मिळाल्या का ? काय नावाने ?
dill उर्फ बाळंतशोपा लावल्या की शेपूची भाजी होते का ?
मेघा, वृशाली आणि सीमा:
मेघा, वृशाली आणि सीमा: धन्यवाद.
सीमा - येथे चुका येतो, एकदम थंड हवामान असल्यामुळे. मला तुझ्या सारखी दुधी, भेंडी, मिरच्या, अंबडी उगवाता येत नाही ही खंत आहे. मी दरवर्षी वेगवेगळे प्रयत्न करते पण विशेष यश येत नाही. थंड हवेत जमतात तेवढ्या भाज्या अजूनही ह्या भागात ८२ च्या वर तापमान गेले नाही. ८० च्या वर फक्त ३ वेळा.
वृशाली आणि मेघा - इंडियन ग्रोसरी मधून डिल च्या बिया (बाळंतशोपा ) पेरल्या. तापमान ६५-७० च्या वरती गेले की मगच डिल रुजतो. एका महिन्यामाधे तयार.
आंबट चुका म्हणजे Green Sorrel. Evergreen Seeds or other seed companies sell it. येथे एकदा लावला की पुढच्या वर्षी परत येतो. एकदाच लावावा लागतो कारण तो perennial आहे.
हे आमच्या बागेतले यलो स्क्वाश
हे आमच्या बागेतले यलो स्क्वाश ! USDA झोन 8B.....
सोनुली मस्त दिसतेय गं तुझी
सोनुली मस्त दिसतेय गं तुझी भाजी..तुझ्या झोनसाठी थोड्या टिपा दे नं....म्हणजे जनरली तू सुरूवात काय लावून करतेस आणि मग कसं कसं पीक बदलतेस इ..
माझ्या बागेशेजाराच्या काकांनी या झोन (८) ला वेगवेगळ्या वाटाण्याच्या जाती छान येतात म्हणून सांगितलंय...पुढच्या वर्षी बघू...
झोन १० मध्ये रहाते. हा बाफ
झोन १० मध्ये रहाते. हा बाफ वाचुन, होम डेपो मधुन potting soil आणली आहे. (भरतामध्ये आई बाबा चक्कर येउन पडायच्या बेतात ) घरच्या शेताकडे मी फिरकतही नसे!!! ) असो!
सध्यातरी फक्त पुदिना, कोथिंबीर आणि मिरची लावायचा विचार आहे. पुदिना काडी लावून येइल असे इथे वाचाले. धणे भरडून लाविन, मिरची : red chilli flakes मधल्या बिया पेरुन येतिल का?
झोन १० मध्ये ह्या गोष्टी लावण्यासाठी योग्य ऋतु कुठला?
Pages