Submitted by बागेश्री on 12 July, 2012 - 08:18
मी व्यर्थसा दवबिंदू
पानावर गोठलेला,
धरणीला जो नकोसा
आकाशाने त्यागलेला..!
तुज रुपवान भासे,
मज भासे, मी अभागी
उदास घुसमटतो,
थिजतो, बसल्या जागी...!
क्षणभंगूर सारे काही
जाणतो आपण सारे,
देखणे दिसणे फक्त
हे जगणे आहे का रे..?
पानावर ओल्या ओल्या
मी खिन्नसा बसलेला
टिपेल का मज कोणी,
आशेवर बेतलेला..
मज नाते ना रुचते
ना जमते बिलगाया,
थिजणे संपून जावे
वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..
ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!
घे जगून संपतो आहे
मी मिथ्या जगलो आहे,
इच्छा लपेटून सार्या
जागीच विरतो आहे!
माझ्या रूपाने जिंकले
तुज पुरते मोहवले,
पण जाण जगा, तू ही
मी जगलो थिजलेले!!
मी जगलो थिजलेले...
गुलमोहर:
शेअर करा
आह्ह!! क्या बात है! _/\_
आह्ह!!
क्या बात है! _/\_ घ्याच!
मस्त! पहिले कडवे सोडून बाकी
मस्त!
पहिले कडवे सोडून बाकी थेट!
क्षणभंगूर सारे काही जाणतो
क्षणभंगूर सारे काही
जाणतो आपण सारे,
देखणे दिसणे फक्त
हे जगणे आहे का रे..?
>>
वा !
मस्त !
जमलिये
गुड वन....!!!!
गुड वन....!!!!
बागे __/\__ अनेकदा वाचली वा
बागे __/\__
अनेकदा वाचली
वा वा वा!
छान!! आशय, प्रवाह. ..
छान!!
आशय, प्रवाह. .. मस्तच
कवितेला लय हवी होती किंवा मला सापडली नाही...
पु.ले.शु!!!
छान कविता .... आवडली. "मज
छान कविता .... आवडली.
"मज नाते ना रुचते......... जन्म नवे उमलावे.." >>> हे अधिक आवडलं.
(यापुढची कडवीही चांगली आहेतच, तरी)
एकदा वाटलं, याच ओळीशी कविता संपली असती तर ....
तर ..... अपूर्णतेचा एक वेगळा फील आला असता,
चुटपुट लागली असती.
बाग्ज, अप्रतिम ! अतिशय सुंदर
बाग्ज, अप्रतिम ! अतिशय सुंदर आशय.
बागेश्री............ अतिशय
बागेश्री............ अतिशय सुंदर रचना........
<<ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!
घे जगून संपतो आहे
मी मिथ्या जगलो आहे,
इच्छा लपेटून सार्या
जागीच विरतो आहे! >>
अहाहाहाहा......... अप्रतिम अगदी....
आशय छान अप्रतिम कविता
आशय छान अप्रतिम कविता
अष्टाक्षरी नसेल तर "ईच्छा
अष्टाक्षरी नसेल तर "ईच्छा अधुरी आहे" म्हणायाला हरकत नाही
छानच!
छानच!
प्रतिसाद देणार्या सार्यांची
प्रतिसाद देणार्या सार्यांची आभारी आहे.
उकाका, पटतंय... तसाही शेवट छान वाटला असता नक्कीच
भुंग्या,
व्यक्त झालेली ईच्छा ही एका, जागीच थिजलेल्या दवबिंदूची आहे आणि म्हणूनच ती पंगू, अधू आहे असंच म्हणायचंय, अधूरी नाही.
(No subject)
खूप छान आहे काविता
खूप छान आहे काविता
अष्टाक्षरी असेल तर लय , यमके , एखाद्या शब्दातली अक्षरसंख्या, एखाद्या ओळीतली शब्दमांडणी यावर अजून खोलवर विचार व्हायला हवाय.........
-जसे घुसमटतो हा शब्द ५ अक्षरी आहे त्याच्या आधी उदास हा ३अक्षरी शब्द आहे इथे लयीत वाचताना मजा येत नाही यास्तव 'घुसमटतो उदास'........... अशी शब्दमांडणी करावीत
-अधू म्हणताना त्या ओळीत एक अक्षर कमी पडते त्या ऐवजी 'पांगळी' असे करावेत
- क्षणभंगूर सारे काही,,,, ; घे जगून संपतो आहे......; आणि .....तुज पुरते मोहवले,.....इथे एक-एक अक्षर जास्त आहे
- पहिल्या कडव्यात त्यागलेला ऐवजी टाकलेला असे यमक गोठलेला या यमकाशी अधिक मिळते जुळते ठरते. तसाच बदल 'बिलगाया -घ्यावा' याबाबत अपेक्षित
असो हा प्रतिसाद शांतपणे लक्षपूर्वक वाचलत याबद्दल आभारी आहे
आपला निस्सीम चाहता
वैवकु
__________
अवांतर : आपणास सौंदर्य या विषयाची आसक्ती/ ओढ आहे हे आम्ही पूर्वीच ताडले आहे (आपल्या व्यक्तिगत माहितीत आपण डकवलेल्या मधुबालेच्या फोटोवरून .............:D)
सुरेख......... सुंदर........
सुरेख......... सुंदर........
छानच...
छानच...
मज नाते ना रुचते ना जमते
मज नाते ना रुचते
ना जमते बिलगाया,
थिजणे संपून जावे
वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..
2 gud

असो हा प्रतिसाद शांतपणे
असो हा प्रतिसाद शांतपणे लक्षपूर्वक वाचलत याबद्दल >> तुला रे कसे कळाले?

आपणास सौंदर्य या विषयाची आसक्ती/ ओढ आहे हे आम्ही पूर्वीच ताडले आहे >> परफेक्टो
वैवकु, तू म्हणतोस ते पक्के पटलेय, बाकी, एक प्रांजळपणे सांगेन, ह्या कवितेतून फक्त एक खिन्नतेचा मूड परावर्तित करायचा होता आणि लयीकडे मी कमीच ल़क्ष पुरवले- त्यामुळे लहान मोठ्या गोष्टी खटकत असाव्यात... (स्टील नेक्स्ट टाईम ऑल इम्प्रुवमेंटस विल बी सीन, सर! )
सर्वांची आभारी आहे दोस्तों!
बागेश्री , सह्हीच कविता
बागेश्री , सह्हीच कविता
फक्त एक खिन्नतेचा मूड
फक्त एक खिन्नतेचा मूड परावर्तित करायचा होता >>>>>>
तेच तर ना गं बागे ........ .लयीत अजून पक्की बसली असती ना ही कविता तर तो मूड आपसूकच पसरला असता आणि काळजात रुतूनही बसला असता बघ !!! लयीन्ची हीच तर जादू असते बाळा........ जादू.असते बघ !!
स्टील नेक्स्ट टाईम ऑल इम्प्रुवमेंटस विल बी सीन>>>>>
-मनःपूर्वक पुलेशु!!
कविता आशयाने आवडली..
कविता आशयाने आवडली.. सुरेख!
पण सुंदरश्या दवबिंदूचा हा खिन्नसा मूड नाही भावला.. कृपया गै. नसावा
धन्सॉल
धन्सॉल
लयीन्ची हीच तर जादू असते
लयीन्ची हीच तर जादू असते बाळा........

(वरील गंभीर भावमुद्रा ही
(वरील गंभीर भावमुद्रा ही पाध्यांच्या प्रतिसादावरील प्रतिसाद असून तिचा संबंध मूळ साहित्याशी कृपया जोडला जाऊ नये)
(अवांतर - 'भूत' म्हणाले की ही भावमुद्रा मूळ साहित्यास अतिशय सौम्य प्रतिसाद ठरेल)
जबराट !
जबराट !
सुरेख. आवडली कविता
सुरेख. आवडली कविता
वाचली होती पण मुद्दामच
वाचली होती पण मुद्दामच प्रतिसाद दिला नाही
हम उम्हारे चार मारते है (कवितेवरचे प्रतिसाद) तब जाके तुम हमारा एक मारते हो. ये हिसाब नही चलेग. हमारा दिवाळा वाजेगा भई ! अब बैसो ऐसेच. कविता कशी काय वाटी ये लिखाच नही
छान जामलिये
छान जामलिये
छान बागेश्री, वेगळा विचार.
छान बागेश्री, वेगळा विचार.
Pages