पालक : एक जुडी
बटाटा : मध्यम. एक किंवा दोन
टोमॅटो : एक
तिखट, मीठ, तूप, जिरे, हिंग, आलंलसूण पेस्ट, गरम मसाला (बादशाहचा नबाबी मटण मसाला)
ही भाजी करायला अतिशय सोपी आणि तरीही अप्रतिम चवीची होते.
पालक धुऊन बारीक चिरून घेणे. बटाटे (सोलून वा न सोलून) मध्यम आकारात चिरून घेणे. टोमॅटो बारीक कापून घेणे.
कढईत (लोखंडी असेल तर उत्तम) चमचाभर तूप घालून, ते गरम झाल्यावर चमचाभर जिरे घालून तडतडून द्यावेत. हिंग घालून त्यावर पालक, बटाटा, टोमॅटो, आल्यालसणाची पेस्ट, तिखट, मीठ, गरम मसाला घालून झाकून ठेवावे. मधेच एकदा काढून जर थोडं पाणी हवं असेल तर घालावे. जरा अंगालगत रस्सा असेल तर भाजी मस्त लागते. पटकन शिजते. सगळे जिन्नस एकाचवेळी घालायचे असल्याने डोक्याला ताप नाही. बटाटे शिजेपर्यंत भाजी शिजवावी. नंतर वाटल्यास बटाटे हलकेच मोडून घ्यावेत म्हणजे जास्तीचा रस्सा असेल तर दाट होतो.
गरमागरम खावी. चपाती, पराठ्याबरोबर मस्त लागते.
१. बटाट्याऐवजी पनीरही घालता येईल. पण ते भाजी शिजल्यानंतर क्युब्ज करून घालावे. पण बटाट्याची चव जास्त मस्त लागते हा अनुभव आहे.
२. छोटे बटाटे सालासकट जराजरा काट्याने टोचून आख्खे घातले तरी मस्त लागतात.
३. मला यात बादशाहचा नबाबी मटण मसाला आवडतो, पण इतर कोणताही आपल्या आवडीचा गरम मसाला चालेल.
४. आल्यालसणाची पेस्ट अनिवार्य आहे.
छान लागत असणार !
छान लागत असणार !
मागे दिनेशनी अशीच पालक
मागे दिनेशनी अशीच पालक बटाट्याची भाजी टाकली होती ना? मसाला, रंगरुप वेगळं होतं बहुतेक.
ह्म्म सोपी आणि यमी वाटते आहे.
ह्म्म सोपी आणि यमी वाटते आहे. पालकची नेहमीची महाराष्ट्रीयन स्टाइल भाजी खावुन कंटाळा आला कि अधुन मधुन ट्राय करायला हवी.
फोटो दिसत नाही.
कोणाला फोटो दिसत नाहीये का?
कोणाला फोटो दिसत नाहीये का?
अरेच्चा, आता दिसतो आहे.
अरेच्चा, आता दिसतो आहे.
मने, तू मगाशी डोळे बंद केले
मने, तू मगाशी डोळे बंद केले असणार.
दिसला..मला..फोटू.. मस्त
दिसला..मला..फोटू.. मस्त तोंपासुये ही रेसिपी!!!
वर्षुताई, तुझ्यासारखी गुरू
वर्षुताई, तुझ्यासारखी गुरू लाभल्यानं बघ कशी फोटू टाकतेय आता मी. पुन्हा एकदा धन्यवाद गं.
करून बघण्यात येईल व रिपोर्ट
करून बघण्यात येईल व रिपोर्ट देण्यात येईल. पालक आवडत असल्याने बाजारातून कधी माझ्यावर भाजी आणायची वेळ आली तर हमखास पालकच निवडला जातो!
छान दिसतेय
छान दिसतेय
ए नाही हं. राइट क्लीक करुन
ए नाही हं. राइट क्लीक करुन मग 'शो पिक्चर' केल्यावर दिसला. खालची कोरलची प्लेट पण दिसली. सेम पिंच हं. माझ्याकडे पण हाच सेट आहे.
पालेभाज्यांची आठवण येते
पालेभाज्यांची आठवण येते आहे.....:मुळुमुळू रडणारी बाहुली:
पालक आणि टोमॅटो कधीही एकत्र
पालक आणि टोमॅटो कधीही एकत्र करू नये. स्टोन्सचा त्रास होतो.
छानच.! आमचं मराठी पालक
छानच.! आमचं मराठी पालक मुगडाळीशी पार्ट्नरशिपमध्ये असतं त्याला एक चांगला पर्याय. :)) फोटो यम्मी.
भारी पंजाबी पालक म्हण्जे एकटे
भारी
पंजाबी पालक म्हण्जे एकटे पालक वै. सारखा प्रकार वाट्ला.
सही पाककृती. लवकरंच करून
सही पाककृती. लवकरंच करून बघते. फोटू पण तोंपासो, मात्र 'गोंगुरा पिकल विथ पोटेटोज' म्हणून खपण्यासारखा!
पालक आणि टोमॅटो कधीही एकत्र
पालक आणि टोमॅटो कधीही एकत्र करू नये. स्टोन्सचा त्रास होतो. >>>> हे काही माहित नाही. पण इतका सर्रास त्रास होतो का? कधी ऐकिवात नाही. तसं असतं तर आतापर्यंत सगळा उत्तर-भारत आजारी पडला असता.
'गोंगुरा पिकल विथ पोटेटोज' >>> इ गोंगुरा की हय?
पंजाबी पालक म्हण्जे एकटे पालक वै. सारखा प्रकार वाट्ला. >>>>
सोपी आहे रेसिपी .. पालक
सोपी आहे रेसिपी .. पालक ओव्हरकूक होइल का?
करून बघते ..
>> इ गोंगुरा की हय? इ गोंगुरा
>> इ गोंगुरा की हय?
इ गोंगुरा मतबल हमार अंबाडी ..
हमार अंबाडी! ऐसन कहो ना. अब
हमार अंबाडी! ऐसन कहो ना. अब जाके बात समझ मे आयी गवा.
मस्त रेसिपी ! सशल चा प्रश्न
मस्त रेसिपी !
सशल चा प्रश्न मलाही आहे , इन जनरल बटाटा मिक्स भाजीत मी आधी बटाटा तेलावर परतून घेते(थोडं मीठ घालून) , मग इतर भाजी घालते जसे कोबी , फ्लॉवर इ.
कान्दे पोहे मधे सुध्दा आधी बटाटा मग् कान्दा .
फारच शंका येत असेल तर उकडलेला
फारच शंका येत असेल तर उकडलेला बटाटा घालण्याचा पर्याय आहे. पण कच्चा बटाटा भाजीबरोबर शिजून जास्त चव येते हे नक्की. शिवाय उकडलेला बटाटा आधीपासून घातला तर जास्त शिजतो. फारतर अर्ध्यावेळेत घालता येईल म्हणजे चवही लागेल. पण कच्चा बटाटा घालून करून पहा, ओव्हरकुक होत नाही.
माझ्या पंजाबी मैत्रिणीला आणि
माझ्या पंजाबी मैत्रिणीला आणि माझ्या सासरच्या मंडळींना हा त्रास झाल्यावर डॉकने हा सल्ला दिला होता. पंजाबी मैत्रिणीचे स्टोन्स ऑपरेशन करून काढावे लागले.
उत्तर भारताचे माहीत नाही, पण आपल्याला माहीत असलेल्या व्यक्तीला प्रॉब्लेम येउ नये म्हणून पोस्ट केले इतकचं. तुमच्या पोस्ट्स मी नियमित वाचते. पटले तर पहा, नाहीतर तुमची मर्जी.
तुम्हाला माझा मेसेज तुमच्या धाग्यावर नको असेल तर स्पष्ट सांगा, उडवते, उत्तर भारत वगेरे उपहास नको.
सांगायचं राहीलच, फोटो नी रेसिपी छानेत. विशेष करून लोखंडी कढईची टिप. धन्यवाद.
चिन्नु, रागावू नका. मी
चिन्नु, रागावू नका. मी उपहासाने म्हटलं नाहीये. खरंच उत्तर भारतात पालक, टोमॅटो हे अगदी कॉमन काँबो आहे. त्यामुळे स्टोनबद्दल इतकं सर्वसाधारण विधान ऐकून मी चकीत झाले. (तसंही आपण फार्फार तर महिन्यातून एकदा हे काँबो करणार.) स्टोन मुख्यत्वे अति टोमॅटो खाल्ल्याने होत असेल (नक्की कल्पना नाही). पालकाचा स्टोनशी काही संबंध असेल असं वाटत नाही. पालक ही उलट सारक भाजी आहे.
तुमच्या अभिप्रायाबद्दल आणि सुचनेबद्दल धन्यवाद. इतर कोणी अधिक प्रकाश टाकू शकतील.
नेटवर थोडंफार सर्च केल्यावर असं दिसतंय की मुळात स्टोनचा प्रॉब्लेम असेल तर पालक आणि टोमॅटो खाऊ नयेत. त्यांच्या काँबोमुळे काही विशेष फरक पडत नाही.
शिवाय हा एक उत्तम चार्ट मिळाला.
http://www.acidalkalinediet.com/food-combining-chart
यातही पालक आणि टोमॅटो एकाच शीर्षकाखाली येत आहेत. त्यामुळे ते एकत्र करण्यावर बंदी नाही असं वाटतंय. प्लीज कोणीतरी हा मुद्दा स्पष्ट करा.
चिन्नु, उलट तुम्ही तुमच्या मनातलं लिहिलंत हे फारच छान केलंत. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांनाच काही नविन माहिती मिळेल.
मामी यू आर अ गूड इश्टूडंट !!!
मामी यू आर अ गूड इश्टूडंट !!!
यम्मी.. खरंच उत्तर भारतात पालक, टोमॅटो हे अगदी कॉमन काँबो आहे..यू आर राईट
तेरेमेरे जैसे जानते हैं ये!!
धन्यवाद, गुरू!
धन्यवाद, गुरू!
ऐ गुरु नको म्हणूस गा.. मला
ऐ गुरु नको म्हणूस गा.. मला सिद्दू सारख्या दाढामिशा असून ,मी पगडी घातल्याचा भास होतो बै!!
(No subject)
थँक्स मामी!
थँक्स मामी!
पालक पनीरच जास्त आवडते.. पनीर
पालक पनीरच जास्त आवडते.. पनीर खरपूस तळलेले असावे.
बाकी पालकाची कोणतीही भाजी झाकून न शिजवता तशीच शिजवीली तर हिरवा रंग जास्त जात नाही.. दिसायला चांगली हिरवीगार दिसते.
लोखंडी कढईत केल्याने लोह मिळते आणि चवही वेगळी येते. स्पेशली भेंडीची भाजी लोखंडी कढईत केल्यास गिळगिळीत न होता चांगली खरपूस होते.
बाकी रेसीपी छान..
Pages