Submitted by पुरंदरे शशांक on 7 July, 2012 - 03:23
गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
पावसात भिजताना गाऊ
ये रे ये रे चे गाणे
पाऊस पडता बेडुक गाती
डराँव डराँवचे गाणे
वा-यावरती नाचत येते
थेंबाथेंबांचे गाणे
थेंब टपोरे धावत येती
सरसरसर गाती गाणे
अंगणात मग फेर धरुनी
आम्हीही गातो गाणे
पावसात भिजताना गाऊ
गोड पावसाचे गाणे
हिरवी हिरवी होती शेते
कणसांचे गाती गाणे.......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
गोड गोड पावसाचे गाणे........
गोड गोड पावसाचे गाणे........
गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
यावरुन लहानपणी गायलेल्या बालगितांची आठवण झाली.......
गोड ! आमच्याकडे मुसळधार पाऊस
गोड !
आमच्याकडे मुसळधार पाऊस आहे आज.
सकाळी उठतानाच लेकाला ऐकवली कविता. तो खुष !
सर्वांचे मनापासून आभार......
सर्वांचे मनापासून आभार......
वा! छान!
वा! छान!
देवकाका - चाल छानच लावलीये
देवकाका - चाल छानच लावलीये तुम्ही.... मनापासून आभार......
ही पण किती ग्वाड!!!
ही पण किती ग्वाड!!!
पाऊस कोसळतो आहे. आणि हे
पाऊस कोसळतो आहे. आणि हे पावसाचे गाणे म्हणत गोल फिरावस वाटत आहे.
मस्त कविता.
सर्वांचे मनापासून आभार......
सर्वांचे मनापासून आभार......
नेहमी प्रमाणेच आवडल.. या गोड
नेहमी प्रमाणेच आवडल..:)
या गोड पावसाच्या गाण्याच्या गोडीने (ओढीने) तरी पाऊस नक्कीच येऊन त्याचा back log भरुन काढेल.
सर्वांचे मनापासून आभार......
सर्वांचे मनापासून आभार......