गोड पावसाचे गाणे
Submitted by पुरंदरे शशांक on 7 July, 2012 - 03:23
गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
पावसात भिजताना गाऊ
ये रे ये रे चे गाणे
पाऊस पडता बेडुक गाती
डराँव डराँवचे गाणे
वा-यावरती नाचत येते
थेंबाथेंबांचे गाणे
थेंब टपोरे धावत येती
सरसरसर गाती गाणे
अंगणात मग फेर धरुनी
आम्हीही गातो गाणे
पावसात भिजताना गाऊ
गोड पावसाचे गाणे
हिरवी हिरवी होती शेते
कणसांचे गाती गाणे.......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा