निवृत्त ग्रामसेवकाचे आइनस्टाइनला आव्हान
महाराष्ट्र टाईम्स ,गायत्री काळकर , नाशिक
वयाच्या नव्वदीकडे वाटचाल करणाऱ्या व केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नाशिकच्या सुखलाल विसपुते यांनी आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये १२ शोधनिबंध सादर करत ' थीअरी ऑफ अॅबसल्युट ' हा भौतिकशास्त्राचा सिद्धांत जगासमोर मांडला आहे. या नवीन सिद्धांतामुळे भौतिकशास्त्राच्या अभ्यासाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न त्यातून झाला आहेच ; शिवाय यामुळे आइनस्टाइनच्या सिद्धांतालाही आव्हान मिळाले असल्याचा दावा विसपुते यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात ग्रमासेवक म्हणून काम करणाऱ्या सुखलाल यांच्या वाचनामध्ये वयाच्या ४२ व्या वर्षी ' आइनस्टाइनचे नवे विश्व ' हे पुस्तक आले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी भौकिशास्त्राचा अभ्यास सुरू केला. १९४१ मध्ये सातवी पूर्ण केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाशी संबंध आलेला नसल्याने पुन्हा एकदा त्यांना अभ्यासाचा श्रीगणेशा करावा लागणार होता. परंतु केवळ भौतिकशास्त्राच्या जिज्ञासेपोटी त्यांनी हा अभ्यास सुरू केला. डिक्शनरी आणि भौतिकशास्त्राची विविध पुस्तके यांच्या मदतीने भौतिकशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांचा त्यांनी शोध घेतला. यासाठी त्यांनी रशियाहूनही अनेक पुस्तके मागवली. आइनस्टाइनच्या ' थीअरी ऑफ रीलेटिव्हिटी ' चा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या काळात विशेष भर दिला. १९७१पासून सुरू असलेला हा अभ्यास करताना २६ वर्षांनंतर त्यांनी ' थीअरी ऑफ अॅबसल्युट ' हा सिद्धांत मंडला आहे. हा सिद्धांत मांडताना आइनस्टाइनच्या ' थीअरी ऑफ रीलेटिव्हिटी ' या सिद्धांताचे नाव ' थीअरी ऑफ करोलरी ' असणे कसे योग्य आहे याबाबतही त्यांनी या एक शोधनिबंध सादर केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर झालेल्या या १२ पेपर्समध्ये त्यांनी अनेक नव्या संकल्पनाही मांडल्या आहेत. हे सर्व शोधनिबंध २००७-०८ दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरील ' द जनरल सायन्स जर्नल ' मध्ये प्रसिद्ध केले आहेत. नाशिकमधील ८९ वर्षांच्या सुखलाल विसपुते यांनी सादर केलेले हे शोधनिबंध अनेक देशांमधील भौतिकशास्त्राच्या अभ्यासकांनी अभ्यासले आहेत. हे शोधनिबंध वाचून ऑस्ट्रेलिया आणि इस्त्राइल या देशातील संशोधकांनी विसपुते यांना आपले शोधनिबंध पाठवले आहेत. विश्वाच्या व्युत्पत्तीचे कोडे उलगडण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनामध्ये हे शोध निबंध निश्चितच उपयोगी ठरतील , असा सुखलाल विसपुते यांचा विश्वास आहे.
' हिग्ज बोसन ' हा देवकण असण्याबाबत शंका
विश्वाच्या व्युत्पत्तीचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञानांनी हिग्ज बोसन हा कण उत्पन्न होऊन दुसऱ्या कणात रूपांतरीत होतो , असे म्हटले आहे. त्यामुळे हा कण मूलकण किंवा देवकण आहे , असे म्हणता येणार नसल्याचे विसपुते यांचे मत आहे. देवकण रूपांतरीत होणे शक्य नसल्याचे त्यांचे मत आहे. रूपांतरीत न होणारा कण शोधायचा असेल तर एक सेकंदाच्या ३० अब्जांश भागापर्यंत जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14811920.cms
छान
छान
मंदार, तुम्ही नुसतीच बातमी
मंदार, तुम्ही नुसतीच बातमी दिली आहे की त्याला दुजोरा, विरोध वगैरे काही आहे?
अस्चिग यांच्याशी सहमत, दुजोरा
अस्चिग यांच्याशी सहमत, दुजोरा वाचायची इच्छा आहे
तरीही, हे खरे असले तर त्या व्यक्तीला वाकून मुजरा
मी पण एकदा सलमानखानला आव्हान
मी पण एकदा सलमानखानला आव्हान दिले होते.. त्याला फारशी प्रसिद्धी नाही मिळाली कात्रेसाहेब, लिव्हा कि ओ त्याच्यावर
गुगलुन तरी काही मिळाले
गुगलुन तरी काही मिळाले माहीय..... पण हेडिंग मात्र सनसनाटी आहे...
मी पण एकदा सलमानखानला आव्हान
मी पण एकदा सलमानखानला आव्हान दिले होते.. त्याला फारशी प्रसिद्धी नाही मिळाली >>>>>>>> अरे किरण कशात दिलेलेस ?
मी पण एकदा सलमानखानला आव्हान
मी पण एकदा सलमानखानला आव्हान दिले होते.. त्याला फारशी प्रसिद्धी नाही मिळाली >>>>>>>> अरे किरण कशात दिलेलेस ?
<<
फेक्या मारण्यात....:फिदी:
छान
छान
खरे असेल तर फार छान! भारतात
खरे असेल तर फार छान! भारतात राहूनच भारतीयाने असे काही करावे ही सर्वात जास्त आनंदाची गोष्ट आहे. भारतप्रेमींना नक्कीच अभिमान वाटला पाहिजे.
देव करो नि हे खरे असो!
हे पेपर्स प्रसिद्ध (publish
हे पेपर्स प्रसिद्ध (publish या अर्थाने) झाले आहेत हे जरी खरे असले तरी त्या "जर्नल" चा दर्जा काय हे सुद्धा विचारात घेणे आवश्यक आहे. (माहितीसाठी - हे पेपर्स इथे उपलब्ध आहेत - http://gsjournal.net/Science-Journals-Papers/Author/161/S.%20S.,%20Vispute )
--
कानडा
इन्टरेस्टिंग जर्नल आहे: हे
इन्टरेस्टिंग जर्नल आहे: हे सापडले तिथे.
Purpose:
The original and continued purpose of these pages is to provide an opportunity for public presentation of scientific theories without prior and arbitrary assessment, criticism or rejection by the recipient. Judgement by the few runs counter to the spirit of scientific exploration. The internet provides a potential world of criticism and support. Authors who make their theories known in this manner will probably find both.
कानडा लिन्क साठी ध्न्यवाद.
कानडा लिन्क साठी ध्न्यवाद. वाचुन धन्य झालो. इथले अनेक बाफ तिथे चिटकवले तर न्युटन पासुन स्टीफन पर्यंत आणि गेल्या १०००० वर्षात जेवढे फिलॉसॉफर झाले त्यांना आव्हान दिल्यासारखे होइल.
(कदाचित तो लिहलेला मॅटर माझ्या आकलना पलिकडेल असेल तर वरच्या कॉमेंट बद्दल आधिच माफी मागतो)
कानडा, दुव्याबद्दल धन्यवाद.
कानडा,
दुव्याबद्दल धन्यवाद. एकदोन लेख उघडून पहिले. फारसे विश्वासार्ह वाटले नाहीत. आईन्स्टाइनच्या विशिष्ट सापेक्षतावादाच्या समीकरणांत v = c टाकून नव्याने लिहिलेली वाटतात. या समीकरणांना लॉरेंट्झ ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स असे म्हणतात.
विसपुत्यांचे निष्कर्ष आणि ते काढण्याची पद्धती विवादास्पद आहे. त्यामुळे एक संशोधक म्हणून त्यांना फारसे महत्त्व द्यावेसे वाटंत नाही. मात्र एक तत्त्वज्ञ म्हणून त्यांची मते विचारात घेतली जाऊ शकतील असे वाटते.
आ.न.,
-गा.पै.
मायबोलीवर(पण) स्केप्टिसिझम
मायबोलीवर(पण) स्केप्टिसिझम पुरेशा प्रमाणात आहे हे चांगले आहे.
दूसर्यांच्या प्रस्थापीत थेर्यांना आव्हान दिले की त्याचा उदोउदो केला जातो आणि तेच जर डळमळीत पण देशी कल्पनांवर हल्ला केला तर तसे करणार्यांवरच हल्ला केला जातो यात नॅशनलिझम संबंधीत कोणती जीन असावी? (ही केवळ मीम नसावी कारण बहुतांश देशांच्या लोकांमधे हा प्रकार आढळतो).
टीपः येथे सलमानला कल्पनेची उपमा/दर्जा द्यायची/चा नाही.
@ aschig, दूसर्यांच्या
@ aschig,
दूसर्यांच्या प्रस्थापीत थेर्यांना आव्हान दिले की<<
हे theories किंवा थिअर्या असे न वाचता 'थेर' चे अनेकवचन म्हणून वाचले गेले अन लै वेळ तुमच्या वाक्याचा अर्थ लावित बसलो होतो..
सल्मानचा रेफ. लक्षात आला नाही
आणि तेच जर डळमळीत पण देशी
आणि तेच जर डळमळीत पण देशी कल्पनांवर हल्ला केला तर तसे करणार्यांवरच हल्ला केला जातो >> लै भारी !
:
:
ब्वॉर, चालायचंच. न्युटनला
ब्वॉर, चालायचंच. न्युटनला झाडावरुन सफरचंद खाली पडले तेव्हा GRAVITYचा शोध लागला ,तेव्हा तो चाळीशीचा होता. मग इतके वर्ष धार मारताना त्याचे पाणी खालीच पडत होते ना! तेव्हा त्याला नाय ग्रॅवटी सुचली... बघा कीती यडे असतात हे
>>>> दूसर्यांच्या प्रस्थापीत
>>>> दूसर्यांच्या प्रस्थापीत थेर्यांना आव्हान दिले की त्याचा उदोउदो केला जातो <<<<<
यातील शब्द वाचून सुचतय ते मान्डतोय.....
इन्ग्रजी शब्द मराठीत उच्चारताना "थेअरी" असा उच्चारला जाऊन, त्यातुनच नन्तर मराठी "थेरं" हा शब्द तयार झाला नसेल ना?
वरील वाक्यालाच अनूसरून, "विदेशी थेरं मस्तकीच धारण करावी" असे मानणार्या देशीन्चा वर्ग सातत्याने वाढतो आहे अशी थेअरी मान्डून एखाद प्रबन्ध लिहावा का?
@ गा. पै - पूर्ण सहमत.
@ गा. पै - पूर्ण सहमत.
लिंबाजीराव. थेर हा शब्द थोर
लिंबाजीराव. थेर हा शब्द थोर वरुन आला आहे. बौद्ध धर्माच्या पंथाशी संबंधीत आहे.