नमस्कार मंडळी,
कोळंबीचा हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे. तंदूर कोळंबी नुसतं म्हंटल तरी तोंडाला पाणी सुटतं. पटकन साहित्य घ्या.
१. पावशेर कोळंबी
२. एका लिंबाचा रस
३. लाल तिखट १-२ टे.स्पून
४. काश्मिरी लाल तिखट १ टे.स्पून
५. एक पळी वितळलेले बटर
६. आलं पेस्ट १ टे.स्पून
७. लसूण पेस्ट १ टे.स्पून
८. तंदूर मसाला २ टे.स्पून
९. मीठ चवीनुसार
१०. अर्धा कांदा उभा चिरून
१. कोळंबी स्वच्छ धुवुन घ्या आणि धागा काढुन घ्या.
२. लिंबाचा रस, लाल तिखट, काश्मिरी तिखट, आल आणि लसूण पेस्ट, मीठ, तंदूर मसाला आणि बटर चांगले एकजीव करुन घ्या.
३. या मिश्रणात कोळंबी मरीनेट करा. कमीत कमी १ तास.
४. ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करा १० मिनिटे.
५. ट्रे वर अॅल्युमिनिअम फॉईल पसरवा.
६. आता फॉईलवर कोळंबी पसरवून ठेवा.
७. १८० डिग्रीवर फॅन फोर्स्ड मोडमधे १५-२० मिनिटे ठेवा. दर ५ मिनिटांनी कोळंबीची बाजू बदलत रहा. इथे जरा अंदाजानेच आणि लक्ष ठेवून वेळ किती ते ठरवा.
८. कांदा पाण्यात धुवुन घ्या. त्यात मीठ आणि थोडे काश्मिरी तिखट घाला.
९. कांदा, लिंबू आणि कोळंबी प्लेटमधे ठेवून सजवा आणि लुटा मस्त आनंद.
मस्त! फोटो मधे एकदम सही
मस्त! फोटो मधे एकदम सही दिसतायत कोळंब्या.
या कोळंब्या स्क्युअरवर लावुन बार्बेक्यु करायच्या सोबत बारिक किसलेली काकडी+पुदिना+दही यांचे डिप.
मी खात नाही पण नवरोबांना करुन देते
मस्त ................. बुधवार
मस्त ................. बुधवार पावला आज
वाचता वाचता कीबोर्ड ओला!!!
वाचता वाचता कीबोर्ड ओला!!! सहीय्ये
भ्रमर +१ तोंपासु
भ्रमर +१
तोंपासु
डिश दिसतेय फार सुंदर. कधी
डिश दिसतेय फार सुंदर.
कधी कधी मांसाहारी नसण्याचे तोटे जाणवतात.
मस्त
मस्त
तोपासु.
तोपासु.
:तोंपासु: आता मी ती डिश फस्त
:तोंपासु:
आता मी ती डिश फस्त केलीय, तेव्हा या नंतरच्यांना फोटो दिसणार नाही
कधी कधी मांसाहारी नसण्याचे
कधी कधी मांसाहारी नसण्याचे तोटे जाणवतात.>>> दक्षे अगदी मनातलं बोललीस..
दक्षे, एवढे तोटे वाटतात तं
दक्षे,
एवढे तोटे वाटतात तं तुमच्या हातात आहे , फायद्यात कसं बसवायचं ते. हा. का. ना. का.
मस्त........ करून पहायला
मस्त........ करून पहायला हवी.........
तोंपासु... दक्षे.. आताशी अशा
तोंपासु...
दक्षे.. आताशी अशा डिशेस पाहून तुला तोंपासु होतंय.. हे लक्षण चांगलंय बर्का ..
यम्मी ! बघुन प्रचंड टेम्पटेशन
यम्मी ! बघुन प्रचंड टेम्पटेशन होतं आहे.
बेश्ट! फोटोपण मस्त आहे!
बेश्ट!
फोटोपण मस्त आहे!
sahi distay..
sahi distay..
मस्त!
मस्त!
वाव मस्तच! तन्दूर मसाला
वाव मस्तच! तन्दूर मसाला कोणत्या ब्रँडचा घेतलास?
ओव्हन नसेल तर काय पर्याय आहे
ओव्हन नसेल तर काय पर्याय आहे
एअरफ्रायर चालेल का?
एअरफ्रायर चालेल का?