दोन महिन्यांपूर्वी केलेल्या अष्टविनायक यात्रेचे हे थोडे नेहमीपेक्षा वेगळे फोटो. नेहमी मंदीराचे पुर्ण फोटो टिपण्यावर माझा कटाक्ष असतो, यावेळी मात्र मी माझा कॅमेरा मंदीरांपेक्षा त्यांच्या कळसांवर रोखला होता. एक लेण्याद्री सोडला तर सगळीकडे कळसाचे फोटो मिळाले.
शास्त्रानुसार मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव आणि शेवटी पुन्हा मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेवुन यात्रेची सांगता असा क्रम ठरवलेला आहे. पण आजकाल यात्रा कंपनीवाले अंतर आणि त्यानुसार लागणारा वेळ यानुसार क्रमात थोडाफार बदल करतात.
लेण्याद्रीला गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यानंतर मध्ये वडगाव काशीबेंग येथील अर्धपीठाचेही दर्शन घेण्याचा योग आला. इथले मंदीर अगदी छोटेसेच आहे, पण या अर्धपिठाचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे फक्त श्री गणेशाची सोंडच आहे. असे म्हणतात की लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाला सोंड नाही, तिथे त्याच्या पाठीवर पुजा केली जाते. त्याची सोंड इथे वडगाव काशीबेंगच्या मंदीरात आहे. (इथे बाकीचे शरीर नाही.) थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी काशीबाई येथे नित्य नियमाने दर्शनाला येत असत अशी नोंद आहे.
या क्रमाने मोरगावपासुन प्रारंभ करुन शेवटी पुन्हा एकदा मोरगावला जावून दर्शन घेतले की अष्टविनायक यात्रा पुर्ण होते असा संकेत आहे.
विशाल कुलकर्णी
__/\__
__/\__
आम्ही म्हणजे मी, बायको आणि
आम्ही म्हणजे मी, बायको आणि मुलगा कधी एक तर कधी दोन असे गणपतीचे दर्शन घेत गेलोय.
सध्या फक्त सिद्धटेकचा राहिलाय.
एकसंघ अशी यात्रा नाही केलेली...
फोटु चांगले आहेत..
मस्त रे भाऊ. मंदिराचा कळस आणि
मस्त रे भाऊ.
मंदिराचा कळस आणि छोट्या चौकोनान गणपतीची मुर्ती दाखवण्याची कल्पना आवडली
_/\_ छान
_/\_
छान
सुंदर फोटो आहेत, अष्ट्विनायक
सुंदर फोटो आहेत, अष्ट्विनायक मंदिरांच्या कळसाचे दर्शन झाले आम्हाला...... २०% यात्रा घरबसल्या झाली.......... धन्यवाद
सुंदर.. सिद्धटेकला जाणारा
सुंदर..
सिद्धटेकला जाणारा रस्ता नीट केलाय का? आम्ही गेलो मार्च मधे तेव्हा काम सुरु होते.
छानच
छानच
फोटोग्राफी तर मस्तच.. आणी
फोटोग्राफी तर मस्तच..
आणी तुमच्या क्रुपेने संकष्टी दिवशी अष्टविनायक दर्शन पण झाले.
धन्यवाद:)
विशाल, धन्यवाद रे. आज छान
विशाल, धन्यवाद रे. आज छान दर्शन घडवलेस.
मस्त फोटो बाप्पा _/\_
मस्त फोटो
बाप्पा _/\_
१ नंबर फोटो... ते पण संकष्टी
१ नंबर फोटो... ते पण संकष्टी दिवशी.. धन्यवाद..
सुंदर फोटो आहेत, अष्ट्विनायक
सुंदर फोटो आहेत, अष्ट्विनायक मंदिरांच्या कळसाचे दर्शन झाले आम्हाला..>>++११
मस्त फोटो ...........
_/\_
_/\_
खुप छान फोटो आणि
खुप छान फोटो आणि माहिती.(वडगावच्या बाप्पाच्या सोंडेबद्दल.) हे फोटो पाहून आम्ही नुकतीच एप्रिल महिन्यात केलेली अष्टविनायक यात्रा आठवली. त्याचेही फोटो डकवेन इकडे लवकरच.
येवांदे टोकू
येवांदे टोकू
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया -----^----^-----
फोटो अप्रतिम आहेत. मला एक
फोटो अप्रतिम आहेत.
मला एक सांगा बॉर्डर कुठून मिळाल्या खुपच छान.....
गणपती बाप्पा मोरया , __/\__
गणपती बाप्पा मोरया , __/\__ सुंदर प्रचि.
.. सुंदर कळस, अ प्र ति म
.. सुंदर कळस, अ प्र ति म फोटोज
कल्पना आवडली.. मस्त प्रचि.!
कल्पना आवडली.. मस्त प्रचि.!
धन्यवाद मंडळी ! मानस,
धन्यवाद मंडळी !
मानस, फ्रेम्ससाठी फोटोस्केप (PhotoScape) म्हणुन एक फ्री सॉफ्टवेअर मिळते नेटवर, ते वापरलेय
त्यात बर्याच प्रमाणात एडीटींगही करता येते, तसेच वॉटरमार्कही देता येतात.
|| जय गणेश || _/\_ संकष्टी
|| जय गणेश || _/\_
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अष्टविनायकांचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद विशालदा
फोटो सुंदरच आहेत!
_/\_
_/\_
_/\_
_/\_
श्री गणेशाय नमः
श्री गणेशाय नमः
वाह........ अगदी योग्य दिवशी
वाह........ अगदी योग्य दिवशी टाकलेस फोटो विशाल.......
धन्यवाद तुला
एकदंताय विघ्न्महे वक्रतुंडाय धीमहि
तन्नो दन्ति: प्रचोदयात् ||
शास्त्रानुसार हा क्रम कोणी
शास्त्रानुसार हा क्रम कोणी कधी ठरवला? ह्याबद्दल अधिक महिती कोणी देउ शकेल का?
झकोबा +१ माझंही सिद्धटेक
झकोबा +१
माझंही सिद्धटेक राहिलय
लाजो,निखिल +१
मस्त प्रचि आणि चतुर्थीच्या दिवशी यात्रा घडवुन आणलीस त्याबद्दल तुझे आभार
_/\_ या चिन्हाचा अर्थ काय
_/\_ या चिन्हाचा अर्थ काय आहे, काहीजण प्रतिकीया देताना हे चिन्ह का टाइप करत आहेत ????
_/\_ याचा अर्थ नमस्कार.
_/\_ याचा अर्थ नमस्कार.
Pages