अष्टविनायक

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 July, 2012 - 02:42

दोन महिन्यांपूर्वी केलेल्या अष्टविनायक यात्रेचे हे थोडे नेहमीपेक्षा वेगळे फोटो. नेहमी मंदीराचे पुर्ण फोटो टिपण्यावर माझा कटाक्ष असतो, यावेळी मात्र मी माझा कॅमेरा मंदीरांपेक्षा त्यांच्या कळसांवर रोखला होता. एक लेण्याद्री सोडला तर सगळीकडे कळसाचे फोटो मिळाले.

शास्त्रानुसार मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव आणि शेवटी पुन्हा मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेवुन यात्रेची सांगता असा क्रम ठरवलेला आहे. पण आजकाल यात्रा कंपनीवाले अंतर आणि त्यानुसार लागणारा वेळ यानुसार क्रमात थोडाफार बदल करतात.

मोरगावचा श्री मयुरेश्वर

सिद्धटेकचा श्री सिद्धीविनायक

पालीचा श्री बल्लाळेश्वर

महडचा श्री वरद विनायक

थेऊरचा श्री चिंतामणी

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज

लेण्याद्रीला गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यानंतर मध्ये वडगाव काशीबेंग येथील अर्धपीठाचेही दर्शन घेण्याचा योग आला. इथले मंदीर अगदी छोटेसेच आहे, पण या अर्धपिठाचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे फक्त श्री गणेशाची सोंडच आहे. असे म्हणतात की लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाला सोंड नाही, तिथे त्याच्या पाठीवर पुजा केली जाते. त्याची सोंड इथे वडगाव काशीबेंगच्या मंदीरात आहे. (इथे बाकीचे शरीर नाही.) थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी काशीबाई येथे नित्य नियमाने दर्शनाला येत असत अशी नोंद आहे.

ओझरचा श्री विघ्नेश्वर

रांजणगावचा श्री महागणपती

या क्रमाने मोरगावपासुन प्रारंभ करुन शेवटी पुन्हा एकदा मोरगावला जावून दर्शन घेतले की अष्टविनायक यात्रा पुर्ण होते असा संकेत आहे.

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

__/\__

आम्ही म्हणजे मी, बायको आणि मुलगा कधी एक तर कधी दोन असे गणपतीचे दर्शन घेत गेलोय.
सध्या फक्त सिद्धटेकचा राहिलाय.
एकसंघ अशी यात्रा नाही केलेली...

फोटु चांगले आहेत.. Happy

सुंदर फोटो आहेत, अष्ट्विनायक मंदिरांच्या कळसाचे दर्शन झाले आम्हाला...... २०% यात्रा घरबसल्या झाली.......... धन्यवाद Happy

फोटोग्राफी तर मस्तच..
आणी तुमच्या क्रुपेने संकष्टी दिवशी अष्टविनायक दर्शन पण झाले.
धन्यवाद:)

_/\_ Happy

खुप छान फोटो आणि माहिती.(वडगावच्या बाप्पाच्या सोंडेबद्दल.) हे फोटो पाहून आम्ही नुकतीच एप्रिल महिन्यात केलेली अष्टविनायक यात्रा आठवली. Happy त्याचेही फोटो डकवेन इकडे लवकरच.

धन्यवाद मंडळी !
मानस, फ्रेम्ससाठी फोटोस्केप (PhotoScape) म्हणुन एक फ्री सॉफ्टवेअर मिळते नेटवर, ते वापरलेय Happy
त्यात बर्‍याच प्रमाणात एडीटींगही करता येते, तसेच वॉटरमार्कही देता येतात. Happy

|| जय गणेश || _/\_

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अष्टविनायकांचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद विशालदा Happy

फोटो सुंदरच आहेत!

_/\_

_/\_

वाह........ अगदी योग्य दिवशी टाकलेस फोटो विशाल.......
धन्यवाद तुला Happy

एकदंताय विघ्न्महे वक्रतुंडाय धीमहि
तन्नो दन्ति: प्रचोदयात् ||

झकोबा +१
माझंही सिद्धटेक राहिलय Happy
लाजो,निखिल +१
मस्त प्रचि आणि चतुर्थीच्या दिवशी यात्रा घडवुन आणलीस त्याबद्दल तुझे आभार Happy

_/\_ या चिन्हाचा अर्थ काय आहे, काहीजण प्रतिकीया देताना हे चिन्ह का टाइप करत आहेत ????

Pages