विंबल्डन - २०१२

Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17

यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.

महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.

यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!

हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो शब्द कुठल्या कंटेक्स्ट मध्ये लिहिला आहे ते ध्यानात घेशील की नाही. >>> म्हणूनच लिहिलेलं ना वर क्रॅजेक बद्दल काय लिहिलस ते अजिबात कळलं नाही...

पण मला तरी त्यातला कोणीही फेडररचा-सॅम्प्रासचा वारसदार वाटत नाही >>>> शैली रे शैली !!! ती वेगळी आहे ह्या दोघांची त्या दोघांपेक्षा !

नुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणार. >>>>> राफा आणि ज्योको फक्त बॉलच रिटर्न करत बसतात असं तुझं म्हणणं असेल तर तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. Proud

स्टॅट्स- सेरेनाची ५१% सर्व्हिस अनरिटर्न्ड
अ‍ॅनॅलिसीस - सेरेनाची सर्व्हिस मस्त आहे.
>>>> रिझल्ट - सेरेनाने एस मारून मॅच जिंकली आणि फायनल गाठली. Proud

Lol

वरच्या पोश्टीत राहिलेले-

स्टॅट्स- सेरेनाचे २४ एसेस.
अ‍ॅनॅलिसीस - सेरेनाची सर्व्हिस मस्त आहे.
रिझल्ट - सेरेना जिंकली.

कुठल्याही प्रकारची बोलींग खेळण्यासाठी लागणार्‍या तंत्राच्या बाबतीत द्रविड नक्कीच गांगुलीपेक्षा वेल-वर्स्ड आहे आहे आणि हे त्याने प्रत्येकवेळी दाखवून दिलंय हे असा तरी तू मान्य करशील की नाही >> उद्या तू नाडाल नि क्रॅज्चॅकला पण द्रविडशी compare करशील नि हेच म्हणशील असे मला राहून राहून आता वाटायला लागलय. फेडरर retire झाला कि काय करणार रे तू ? Lol

"नदाल जोकोने जे पीअर प्रेशर आणलं आहे त्याला तोंड देण्यासाठी दुसरा पर्यायही नाही दिसत आहे म्हणा"
"फक्त खेळात एकसुरीपणा नसून गुणवत्ता आणि वैविध्य हवं एवढंच म्हणणं आहे." ह्यांचा अर्थाअर्थी काहि संबंध नाही का ? अगदी १००% वैविध्य असले तरी जर गेम प्लॅन बदलायला भाग पाडत असेल तर ज्या गोष्टीमूळे हे होतेय त्या गोष्टीची किम्मत तुझ्या लक्षात येतेय का ? त्याला "नुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणा" एव्हढे हिणकस शेर्‍यामधे ढकलतोयस (हे त्या १००% अचूक फोरहॅण्ड comment पेक्षा फारसे वेगळे नाही) ? किंबहुना समोरच्याप्रमाणे आपला खेळ बदलायची हुशारी फेडरर दाखवतोय पण त्याचे फॅन मात्र अजून परीपूर्णतेच्या हव्यासात अडकलेत ह्यासारखी शोकांतिका नाही.

लालू स्टॅट्स- अ‍ॅनॅलिसीस - रिझल्ट Lol

राफा आणि ज्योको फक्त बॉलच रिटर्न करत बसतात असं तुझं म्हणणं असेल तर तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. >>> त्यांचं जे काही आज ५०%टेनीसचे शॉट्स ऑप्शनला टाकून खेळणं चालू आहे लवकरच त्यांच्यापेक्षा जास्त फीट आणि ८०% टेनिसचे शॉट्स ऑप्शनला टाकून खेळणारा येईलच. मग वर म्हंटल्याप्रमाणे चित्र दिसलं की तुला माझी आठवण येईल. वाटचालीसाठी शुभेच्छा खरं तर राफ्-जोकोला हव्या आहेत.

उद्या तू नाडाल नि क्रॅज्चॅकला पण द्रविडशी compare करशील नि हेच म्हणशील असे मला राहून राहून आता वाटायला लागलय. फेडरर retire झाला कि काय करणार रे तू ? >>> पुन्हा तू जादुगाराच्या पोतडीतून नवीन गृहीतकं बाहेर काढलीस ना Proud

फेडरर retire झाला कि काय करणार रे तू ? >>> लिहिलं ना वर. वाट बघणार फेडररसारखा खेळणारा कोण येतो आणि कधी येतो?

बरं ठीक आहे माझे राफा-जोकोबद्दलचे सगळे शेरे हिणकस आणि अतिरेकी त्यांच्याकडे दूर्लक्ष करा पण ते ईंग्लिशमधून वर जे लिहिलं आहे (जे मी नाही लिहिलेलं) त्याबद्दल काही बोलाल की नाही Wink

किंबहुना समोरच्याप्रमाणे आपला खेळ बदलायची हुशारी फेडरर दाखवतोय पण त्याचे फॅन मात्र अजून परीपूर्णतेच्या हव्यासात अडकलेत ह्यासारखी शोकांतिका नाही. >> अरे बाबा हे मी नाही तर स्वतः फेडररच म्हणतोय. थांब तो विडीओ शोधून लिंक देतो तुला.

अमेरिकेचे दणकट पाऊल फायनलमध्ये पोचले आहे! >> दणकट आणि दुखरे. Happy

स्टॅट्स- सेरेनाचे २४ एसेस.
अ‍ॅनॅलिसीस - सेरेनाची सर्व्हिस मस्त आहे.
रिझल्ट - सेरेना जिंकली. >>> पण तिने परिपूर्ण टेनिस खेळलं की नाही ते पण सांग ना! Proud

LOL
नाही, एवढ्या aces मुळे ते खेळता आले नाही किंवा गरज पडली नाही. Proud

काल तिने व्हिनसबरोबर एक अर्धवट राहिलेली डबल्स पूर्ण केली. ती तीन सेटमध्ये झाली आणि तिसरा सेट लांबला. मग अजून एक नवीन मॅच खेळली (मिर्झा आणि मॅटेक-सॅन्ड) आणि जिंकली. आज सेमि झाली आणि नंतर डबल्सची क्वार्टरफायनल खेळणार आहे! डू व्हॉट वर्क्स. Happy aces तर aces.

चमन, साधी गोष्ट आहे, जो फेडररसारखा खेळत नाहि त्याचा गेम प्लॅन दुय्यम आहे असा सूर तुझ्या बहुतेक पोस्टमधून लागतोय असे निदान मला (नि परागलाहि) वाटतेय. तू अजून तरी कुठेही ह्याला विरोध करणारे लिहिलेले नाहिस तर ह्याउलट अजून काही लिंक्स दिल्या आहेत. बाकी द्रविड, गांगूली, क्रायजेक हे सगळे तूच मधे आणले आहेत. १००% वैविध्य असलेला गेम प्लॅन बदलायला भाग पाडणारी गोष्ट ही दुय्यम असू शकत नाही एव्हढा साधा मुद्दा आहे. (भले ती गोष्ट जोकोविच मुळे येवो किंवा नदाल किंवा अजून कोणामुळे) ह्याबद्दल काहि अधिक बोलायचे असेल तर सांग.

किंबहुना समोरच्याप्रमाणे आपला खेळ बदलायची हुशारी फेडरर दाखवतोय पण त्याचे फॅन मात्र अजून परीपूर्णतेच्या हव्यासात अडकलेत ह्यासारखी शोकांतिका नाही. >> अरे बाबा हे मी नाही तर स्वतः फेडररच म्हणतोय. थांब तो विडीओ शोधून लिंक देतो तुला.>> फेडरर नक्की काय बोलतोय ?

चमन, साधी गोष्ट आहे, जो फेडररसारखा खेळत नाहि त्याचा गेम प्लॅन दुय्यम आहे असा सूर तुझ्या बहुतेक पोस्टमधून लागतोय असे निदान मला (नि परागलाहि) वाटतेय. तू अजून तरी कुठेही ह्याला विरोध करणारे लिहिलेले नाहिस तर ह्याउलट अजून काही लिंक्स दिल्या आहेत. >>> तुम्ही मी मराठीतून लिहिलेलं सगळं नक्की वाचताय ना रे? खरं सांगा अगदी कळकळीने हा प्रश्न विचारतोय.
आधीच्याच पोष्टीत मी हे लिहिलं आहे.

पराग म्हणाला >>>ती वेगळी आहे आणि तुला आवडत नाही म्हणून तू ती दुय्यम होत नाही.
मी म्हणालो >>> हे तुझंच वाक्य मी अशा प्रकारे लिहितो.
ती वेगळी आहे आणि (अपूर्णही आणि म्हणून) मला आवडत नाही म्हणून(च) मी तिला 'दुय्यम' न म्हणता 'परिपूर्ण नाही' म्हणालो.

दुय्यम नाहीये रे त्यांचा गेम पण ते टेनिसच्या पुस्तकातले केवळ मोजकेच शॉट फक्त खेळतात आणि असे मोजके शॉट्स आणि फिटनेसच्या जोरावर मॅचेस जिंकण्यात यशस्वी होतात. फेडी-सॅम्प्राससारखे वैविध्य त्यांच्या खेळात नाही आणि म्हणून पर्यायाने त्यांच्या खेळातून (माझ्यासारख्या काहीच) प्रेक्षकांना ते फेडररच्या खेळातून मिळणारा आनंद देऊ शकत नाहीत.

आता काही क्रिकेटमधली ऊदाहरणं देत बसत नाही कारण त्याने बहूतेक गैरसमजच अजून वाढतोय.

ऊद्याच्या टेनिसमध्ये कोणीही बेसलाईन सोडत नाही म्हणून 'बेसलाईनपासून दोन फूट कोर्टच्या आत आल्यास फुट फॉल्ट' असा नियम केला मला नवल वाटणार नाही. रॅली करतांना सर्विसलाईनपर्यंत जाणं ही भूतकाळातली गोष्टं झालेली असेल आणि आपण त्याला वेगवान टेनिस म्हणत टाळ्या पिटत असू.

फेडरर नक्की काय बोलतोय ? >>> फेडरर म्हणतोय की सर्व्ह्/व्हॉली आणि बेसलाईन काऊंटर्-पंचर्स (राफा-जोकोची स्टाईल) अशा मिक्स्ड शैलीने त्याने त्याकाळाच्या मोठमोठ्या प्रस्थापितांविरूद्ध यशस्वी लढा दिला पण आता खेळ फक्त बेसलाईन ओरिएंटेडच होत आहे आणि ह्या बेसलाईन खेळाच्या रेट्यामुळे (व वयोमानामुळे अजून दुसरे काही प्रयत्न करणे शक्य नसल्याने) त्याचा स्वतःचा खेळ त्याला मिक्स्ड ठेवायला जमत नाहीये आणि बेसलाईन ओरिएंटेडच करावा लागत आहे. (मी विडीयो शोधतोय)

आता हे ईवान लेंडलचं आर्टीकल देत आहे. तो आणि सॅम्प्रास काय म्हणातोय ते प्लीज प्लीज प्लीज वाचाच.
मग तू शोकांतिका म्हणालास ते किती चुकीचं आहे हे तुलाच पटेल.

http://edition.cnn.com/2012/06/26/sport/tennis/wimbledon-tennis-lendl-se...

अजून काय म्हणू?

फेडरर-सॅम्प्रास ने आधी जे टेनिस खेळून दाखवलं ते आता फेडीसहित कोणीही खेळंत नाही. मरे (बहूतेक लेंडल त्याचा कोच आहे म्हणून) आणि फेडीच अधूनमधून त्यांच्यापेक्षा खालच्या सीडेड अपोनंट्सविरुद्ध तसे खेळतात.

बस ह्यापेक्षा अजून काहीही स्प्ष्ट लिहिण्यासारखं माझ्याकडे नाहीये.

अगदी कळकळीने हा प्रश्न विचारतोय>> वाचतोय ना म्हणूनच तर ह्या वाक्यांना अडखळतोय (तुझ्या दर पोस्टमधे असे एकतरी वाक्य आहेच जे त्या पूर्ण पोस्टचा अर्थ माझ्यासाठी तरी बदलून टाकतेय)
"नुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणार."
"ह्याऊलट मुळातच तुमच्याकडे भरपूर गेम स्कील्स असतील आणि सततच्या सराव/अनुभवातून तुम्हाला ती शार्प ठेवणे जमत असेल तरच तुम्ही तुमचा खेळ आणि सीड ऊंचावत नेऊ शकाल."
"पण मला तरी त्यातला कोणीही फेडररचा-सॅम्प्रासचा वारसदार वाटत नाही मग त्यांनी जिंकलेल्या ग्रँडस्लॅमचे आकडे काहीही सांगोत. ठीक आहे येईलही कोणीतरी नंतर ज्याच्याकडे गेमही असेल आणि फिटनेसही किंवा ह्यांच्यापैकी कोणीतरी 'मला सगळे शॉटस आणि ह्या खेळाची प्रत्येक शैली आत्मसात करून खेळायची आहे' असं म्हणत खेळू लागला तर आनंदच आहे "
"१००% अचूक फोरहँड" ची पोस्ट.

आता हे ईवान लेंडलचं आर्टीकल देत आहे. तो आणि सॅम्प्रास काय म्हणातोय ते प्लीज प्लीज प्लीज वाचाच.
मग तू शोकांतिका म्हणालास ते किती चुकीचं आहे हे तुलाच पटेल >> ते जे म्हणाले आहेत नि तू जे म्हणतोयस ह्यात फरक आहे. त्यांचे म्हणणे हे बर्‍यापैकी प्रत्येक मोठ्या बदलाच्या वेळी प्रस्थापीत किंवा जुनेजाणते म्हणतात त्यापेक्षा अधिक वेगळे नाहिये. (उद, वन डे आले तेंव्हा किंवा आयपील आले तेंव्हा, astro turf आले तेंव्हा, अगदी adidas ने नवा सॉकर बॉल आणला तेंव्हाही) . They are lamenting about lost art of serve and volley. But their buck stops there, while yours ....

असो, मला आता कंटाळा आला एव्हढे टाईप करून करून. आणि माझ मूळीच आग्रह नाहिये कि तू इतरांचा गेम appreciate कर किंवा नको करूस ह्याबाबत खर तर (तरी मी का एव्हढे सगळे लिहिले ते देव जाणे :D). माझ्या पुरते तरी बदलेले skill sets सुद्धा तेव्हढीच मजा आणत आहेत जेव्हढी बेकर, एडबर्ग,लेंडल, विलँडर असताना येत होती (त्यांची नावे घेतली कारण मी टेनिस बघायला लागलो तेंव्हा हे खेळू लागले होते.)

वरची लोलाची लिंक मजेशीर आहे ..

परागने स्वतःहूनच म्हंटलंय की पोस्टींचा कीस पाडायचा असेल तर वाहत्या बाफवर भेटा .. Biggrin

>> माझ मूळीच आग्रह नाहिये कि तू इतरांचा गेम appreciate कर किंवा नको करूस ह्याबाबत खर तर

पण चमनचा मात्र हाच आग्रह आहे की फेडरर सोडून बाकी कोणाच्या खेळाचं कौतुक करू नका .. त्याचं काय करायचं बरं? Happy

ते जे म्हणाले आहेत नि तू जे म्हणतोयस ह्यात फरक आहे. त्यांचे म्हणणे हे बर्‍यापैकी प्रत्येक मोठ्या बदलाच्या वेळी प्रस्थापीत किंवा जुनेजाणते म्हणतात त्यापेक्षा अधिक वेगळे नाहिये. >>> तुला खरंच असं (आणि एवढंच) वाटतंय. म्हणजे ह्याचा अर्थ जे चाललंय ते मस्त आहे आणि तुला आजिबात नाही आवडणार की 'राफाने त्याच्या फास्ट गेम बरोबरच ड्रॉप शॉट्स मारले. धडाधड हा कॉर्नर ते तो कॉर्नर रॅली होत असतांना मधूनच त्याचा फसवा फोरहॅंड बॉल अगदी नेटजवळ ड्रॉप करतोय आणि समोरचा हताश निराश चरफडतोय. जोकोने त्याचं ईन्क्रेडीबल स्प्रिंटिंग नेट जवळ येऊन समोरच्याचा पावरफूल बॅकहॅड ब्लॉक करण्यासाठी वापरले किंवा त्याचं अमेझिंग स्ट्रेचिंग वापरत बॉल नुसता डायवर्ट करून समोरच्याला जीव खात बेसलाईनवरून नेट जवळ पळण्यास भाग पाडले.' बरोबर ना?

माझ्या पुरते तरी बदलेले skill sets सुद्धा तेव्हढीच मजा आणत आहेत जेव्हढी बेकर, एडबर्ग,लेंडल, विलँडर असताना येत होती (त्यांची नावे घेतली कारण मी टेनिस बघायला लागलो तेंव्हा हे खेळू लागले होते.) >>> काय म्हणावे ह्या अल्पसंतुष्ट पणाला Uhoh पण ठीक आहे तुला त्यात आनंद आहे तर माझेही काही म्हणणे नाही.

They are lamenting about lost art of serve and volley. But their buck stops there, while yours .... >>> काहीही. त्यांना मायबोलीवर आणू का मग आता. Proud

तुला खरंच असं (आणि एवढंच) वाटतंय. म्हणजे ह्याचा अर्थ जे चाललंय ते मस्त आहे आणि तुला आजिबात नाही आवडणार >> चमन हे तुझे conclusion आहे परत कारण तुझा "चष्मा". मी जे समोर आहे ते enjoy करतोय, त्यातले बारकावे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. "जे चाललंय ते मस्त आहे " तुझ्या प्रत्येक पोस्टमधे हे असे काहि snippet असतेच जे दर वेळी तुझ्या पोस्टचा अर्थ संपूर्ण बदलते.

even I wish you could broaden your narrow vision beyond 'what has been there' and see 'what is out there' and start enjoying it (and respecting it) Happy

त्यांना मायबोलीवर आणू का मग आता >> माझी काहीच हरकत नाहि. पण तू आणत असलास तर तिथे फेडरर सोडून आणी कोणी आणशील असे वाटत नाहि ? Lol

अनालिसिसीस बद्दल दोन पैसे.... Wink

शेवटी प्रत्येक गेममध्ये कुठली चूक कुठल्यावेळी केली जाते तर ती त्याप्रकारे भोवते याचं पण अनालिसिस करतात का? मी काही यात फार किडा नाहीये पण हा प्रश्न आहेच न..समजा ज्या काही अनफोर्स्ड एरर्स किंवा डबल फॉल्ट्स जर समोरच्याचे ४० किंवा अड्व्हांटेज असताना केल्यामु़ळे ब्रेक झालेल्या (गंभीर) चुकांमुळे सेट पर्यायाने म्~अच हातातून जाऊ शकते...मग उरलेल्या अनालिसिसमध्ये चार चांद का लावेनात..

शेवटी प्रत्येक सामना हा त्यावेळी तो तो खेळाडू कसा सांभाळतो त्यानेच हा खेळ पाहायची मजा वाढते.....बाकी तर आहेच.. Happy

मला स्वत:ला फेडररची स्टाइल आवडते... आणि त्यामागोमाग ज्योकोची झुंजार खेळायची वृत्ती...:) नदाल फार पॉवर प्ले करायला जातो असं मला वाटतं...कदाचीत त्याने सामने जिंकता येतही असतील पण तो माझा पर्सनल फेवरीट नाहीये...आणि तेच सेरेनाच्याही बाबतीत...अर्थात तिशीत तिने इतका स्ट्~अमिना ठेवलाय याचं श्रेय तिला द्यायला हवं...कारण फीटनेस संभाळणं महत्त्वाचं.....

चनन बेसलाईन खेळा बद्द्ल दोन गोष्टी मला माहीत आहेत त्या आणि मला काही शिकवल आहे त्या बद्द्ल

Comtemporary टेनीस मघे ऑफेंसीव गेम हा बेसलाईन च्या मागे २ फूटा वरूनच खेळला जातो. फक्त सर्व अ‍ॅन्ड व्हॉली म्हणजेच ऑफेंसीव गेम नव्हे तर ती एक स्टाइल आहे. २ फूटा पे़क्षा मागे उभ राहून खेळलेला गेम हा डीफेंसीव असतो कारण खेळाडु कोर्ट मधे स्टेप इन न करता रीटर्न करत राहातो. जरी कोर्ट मधे शॉर्ट रीटर्न आला तरी तो स्टेप इन करून कन्ट्रोल घेत नाही तो डीप रीटर्न मारुन प्रतिस्पर्ध्याला पण बेसलाइन वर खीळवून ठेवतो त्यालाही तो स्टेप इन करुन चार्ज घेवू देत नाही. या गेम प्लान मधे जबरद्स्त कन्सिसटन्सी लागते आणि जोरदार रीटर्न लागतात. नुसते जोरदार रीटर्न मारुन होत नाही तर बरेच रीटर्न हे ऑन द रन मारवे लागतात ते सुध्धा डीप आणि अ‍ॅक्युरेट. हे कन्सिटंट लेवल वर करण अतिशय अवघड आहे कारण त्याला स्टॅमिना आणि टायमिंग पण लागत. एवढी सगळी धावाधाव करून हे दोधे क्वचितच ऑफ बॅलन्स झालेले दिसतात.
राफा आणि जोको चेंडू नुसते अडवत नाहीत तर ते डीप अँगल्ड रीटर्न पण मारतात.राफाचा फोरहँड टॉपस्पिन रीटर्न हार्ड हीटरना पण भारी पडतो.

अपल्याला फेडररचा गेम आवड्तो कारण तो कोर्ट मधे स्टेप इन करून प्रत्येक पॉइंट चा कंट्रोल घेतो त्यामु़ळे तो जास्त डॉमिनेंटींग वाटतो. ऑफेंसिव प्लेयर्ला प्रत्येक पॉइंट जिंकयचा असतो तर डीफेंसीव प्लेयरला एकही पॉइंट घालवायचा नसतो.

मला या दोघांची डीफेंसीव स्टाइल आवड्त नाही कारण दे रेफ्युज टू स्टेप इन अ‍ॅन्ड टेक कंट्रोल. बेसलाइनवर गस्त घालण्यात दंग असतात. कधीतरी आत येवून पॉइट कंट्रोल करावा अस वाटत्.त्यांच्या लाँग रॅली कंटाळवाण्या वाटतात. ते जसे खेळतात तो त्यांचा कंफर्ट झोन आहे तो ते सोडून खेळणार नाहीत आणि खेळू पण नये.

हल्ली जोकोची एक्सेपशनल रीट्रीवल स्किल्स आणि विलिंगनेस टू स्टेपिंग इन टू कंट्रोल द पॉइंट राफालाच काय फेडरर ला पण सहज डॉमिनेट करतात. परत फेडरर च्या सिंगल हॅडेड बॅक हॅन्डला सतावणारा राफाचा रायजींग रीटर्न जोको च्या डबल हॅन्डॅड बॅकहॅन्ड ला त्रासदायक ठरत नाही.

१२ नवीन पोस्ट्स पाहून मला वाटलं होतं पेले, रोनाल्डो, मेसी, युसेन बोल्ट, फेल्प्स वगैरे मंडळी पण आली असतील आत्तापर्यंत ह्या बाफवर.. Proud

तुझ्या प्रत्येक पोस्टमधे हे असे काहि snippet असतेच जे दर वेळी तुझ्या पोस्टचा अर्थ संपूर्ण बदलते. >>>> अगदी अगदी ! Happy

परागने स्वतःहूनच म्हंटलंय की पोस्टींचा कीस पाडायचा असेल तर वाहत्या बाफवर भेटा >>>>> सशल ते मी फक्त तुला म्हंटलं होतं.. टेनिस बद्दल 'परिपूर्ण' पोस्टी लिहिणार्‍यांना नाही.. Proud

सेरेना वि राडाव्हान्स्का ! मजा येणार..

आजही मजा येणार !

युरो.. चांगली पोस्ट

Comtemporary टेनीस मघे ऑफेंसीव गेम हा बेसलाईन च्या मागे २ फूटा वरूनच खेळला जातो. फक्त सर्व अ‍ॅन्ड व्हॉली म्हणजेच ऑफेंसीव गेम नव्हे तर ती एक स्टाइल आहे. २ फूटा पे़क्षा मागे उभ राहून खेळलेला गेम हा डीफेंसीव असतो >>> दोन वाक्यांमध्ये कन्फुजन होतय जरा..

२ फूटा पे़क्षा मागे उभ राहून खेळलेला गेम हा डीफेंसीव असतो >>> दोन वाक्यांमध्ये कन्फुजन होतय जरा..>>>> जनरली सर्विस रीटर्न करताना आपण बेसलाइनच्या मागे उभे रहातो अगदी अ‍ॅकयुरेट मोजले नाही तरी २ फूट लांब उभे राहातो. सर्विस रीटर्न केल्या नंतर मी अग्रेसीव खेळणार असेन तर मी आणखी मागे जानर नाही मी ते डिस्टंन्स मेनटेन करेन किंवा बेस लाइन जवळ सरकेन. हे समोरचा कीती जोरदार रीटर्न मारतो त्यावर अवलंबून असेल जर मी जास्त जास्त मागे सरकत गेलो तर मला एकच काम उरेल ते म्हणजे समोरच्याचे रीटर्न जोरात परतवून लावणे कारण त्याला शॉर्ट रीटन देवून मी कन्ट्रोल देवू शकत नाही आणि एवढया लांब वरून मी कंट्रोल करू शकत नाही . यावरचा उपाय म्हण्जे डीप रीटर्न मारणे. हे सगळ करताना समोरच्या खेळाडूला पण बराच वेळ मिळतो आणि रॅली लांबत जाते. जर एखद्याने स्टेपइन करून चार्ज केलाच तर एक्स्ट्रीम रीट्रिवल स्किल लागतात.

राफा आणि जोको ४ फूट लांब उभे राहून सर्विस रीसीव करतात. राफा सर्विस रीसीव केल्या नंतर बेसलाइन च्या फार जवळ येत नाही. काका टोनीना (uncle toni) पण हल्ली अस वाटायला लागल आहे की राफा ने थोडं पुढे जाव थोडं जास्त अग्रेसीवली खेळाव.

मॅच बघताना ऑब्सर्व कर कोण बेस लाइन पासुन किती लांब आहे. कोण पुढे सरकतो शॉर्ट रीटर्न मिळल्यावर आणि परत बेस लाइन कडे न येता पॉइंट कंट्रोल करतो.

अच्छा २ फुट आणि दोन फुटापेक्षा मागे अश्या दोन कॅटेगर्‍या म्हणतोयस.. ओके..

चर्चा आवडली. मला फेडररचा खेळ आवडतो, कारण तो अगदी सहज खेळतो आहे असं वाटतं. नदाल फार कष्ट करतो आहे असं वाटतं. जोकोविच दोघांच्या मधे. Happy

काल पेस+वेस्निनाची तिसर्‍या फेरीची लढत बघितली. मजा आली. समालोचक लोक पेसच्या 'क्विक रिफ्लेक्सेस'चे कौतुक करत होते ते फारच आवडले. Happy एकोणचाळीस वयाला, न-सपाट पोटासह एकदम वेगात खेळत होता तो.

फेडी - जोको....

सही चालू आहे... फेडेक्सनी पहिला सेट आरामात खिशात घातला आणि आता दुसर्‍या सेट मध्ये ०-३ मागे पडलाय...

गो जोको गो....

>> सशल ते मी फक्त तुला म्हंटलं होतं.. टेनिस बद्दल 'परिपूर्ण' पोस्टी लिहिणार्‍यांना नाही..

बरं .. मग तुमच्या परिपूर्ण पोस्ट्स साठी तुम्हाला शुभेच्छा! Happy

गो फेडरर.

ऑफेन्सिव आणि डिफेन्सिव मधला फरक तुम्ही कुठे उभ राहून खेळताय याच्या पेक्षा तुम्ही किती धोका घेउन फटके मारताय याच्यात आहे.

उदाहरणार्थ बेस लाइनच्या मागे उभे राहून सतत पलिकडच्या कोर्टच्या मधे , किंवा फक्त मधल्या नेटवरून फटके मारणे आणि प्रतिस्पर्ध्याच्या चुकांची वाट बघत बसणे हा डिफेन्सिव गेम झाला.
याउलट बेस लाइनच्या मागे उभे राहून सतत पलिकडच्या कोर्टच्या साइड लाइन्स वर किंवा डाउन द लाइन मारलेले फटके, किंवा अगदी अशक्य कोनाने मारलेले फटके, हा अग्रेसिव गेम झाला, मग तो बेस लाइन वरून का असेना.

आपण जर तिघांचा खेळ पाहिला तर तिघेही तितकेच अ‍ॅग्रेसिव आहेत असेच म्हणावे लागेल. पण फेडररचा खेळ सहज सुंदर वाटतो.

माझी पसंती फेडरर - जोको- मग नादाल. (पूर्ण कारकिर्द लक्षात घेता)
अर्थात फेडरर ऑल टाइम ग्रेट आहे. नादाल थोडासा मागे पण बाकीच्या क्राउड मधे, पण तो क्राउड म्हणजे लेव्हर, बोर्ग, सॅंम्प्रास, पेरी. :). जोको सध्या या क्राउडच्या जवळपास ही नाही. तो लेंडल, कुरियर, एडबर्ग , बेकर आणि असे किती तरी मधे, अजून तरी. पण गेल्या पूर्ण वर्षभर त्याने ज्या पद्धतीने एकाच कालावधीत या दोघांना हरवलय त्याला तोड नाही.

आगासी ला फेडरर आणि सँप्रासच्या पंक्ति मधे कुठल्याही कारणा साठी बसवू नये. कृपया.. Happy

मॅच फारच जबरी चालू आहे... दोघेही मस्त खेळताहेत.. फक्त फेडेक्स थोडा जास्त अ‍ॅग्रेसिव्ह खेळत आहे..

Pages