विंबल्डन - २०१२

Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17

यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.

महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.

यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!

हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल,
कट्टर फॅन आपल्या आवडत्या खेळाडूच्या खेळाचे अ‍ॅनालिसिस करतात. त्याने कुठे सुधारणा करायला हव्यात किंवा कसे ज्या गोष्टी त्याला जमत नाहीत त्यांच्या नादी न लागता जेवढे काही भले-बरे जमते त्याचाच ऊपयोग करून पॉईंट्स मिळवत रहावेत. ई ई...
असे थोडे डीटेल्स लिहिकी जोकोविकबद्दल.
कदाचित तुझ्या लिखाणामुळे त्याची फॅनसंख्या अजून वाढेल. आपला बाब्या कसा गुणाचा आहे आणि बाकीची कशी मठ्ठ कार्टी आहेत हे सुद्धा सांग की.
भरपूर चूका झाकून ठेवल्यातरी एक-दोन ज्या काय बर्‍या गोष्टी आहेत त्याही नेहमी उध्रूत करत जाव्यात.
त्यानेच आपल्या खेळाडूला प्रसिद्धी मिळेल ना.

नुसता एक सेट जिंकला, चार गेम जिंकले असे सांगण्यात काय अर्थ आहे. तो स्कोर तर सगळ्यांनाच दिसतो. Happy

चमन, इथे फक्त अ‍ॅनलिसिस करणार्‍या पोस्ट्स लिहाव्यात असं तर नाहीये ना .. प्रत्येक जण एक घेतला, दोन हरला असल्याच पोस्ट्स टाकतंय की ..

पण तुझा मोर्चा मी आणि ज्योको वरच का बरं?

>> आपला बाब्या कसा गुणाचा आहे आणि बाकीची कशी मठ्ठ कार्टी

हे फक्त इथले काही फेडरर फॅन्स् च करताना दिसतात .. मी एक प्रेक्षक आहे आणि फक्त चीअर करणार्‍या पोस्ट्स टाकतेय .. क्रिकेट स्टेडियम मध्ये नाही का लोकं फोर/सिक्स वगैरे किंवा मग जितेगा भाई जितेगा अशा प्रकारचे स्लोगन्स् घेऊन असतात .. तर तू अशा प्रत्येकाला हेच म्हणशील का की काहितरी अ‍ॅनालिसीस करा बुवा .. स्कोअर तर मलाही दिसतोय ..

ज्योको ला चीअर करणार्‍या पोस्ट्स चा त्रास होतो का तुला? तसं असेल तर मात्र मी नक्की टाकणार नाही अशा पोस्ट्स .. काय ते एकदा सरळ सरळ सांग पाहू ..

>>त्याने कुठे सुधारणा करायला हव्यात किंवा कसे ज्या गोष्टी त्याला जमत नाहीत त्यांच्या नादी न लागता जेवढे >>काही भले-बरे जमते त्याचाच ऊपयोग करून पॉईंट्स मिळवत रहावेत

हे हरल्यावर बोलता येईल. Wink
सध्या 'तुझ्या गर्लफ्रेंडला कोर्टावर शांत बसायला सांग' एवढेच आपण सांगू शकतो. Proud

घ्या!! अगं आता ईथे तूच आहेस तर तुलाच लिहिणार मी.....जे ईथे लिहित नाही त्यांना ऊद्देशून कसं लिहिणार मी? लोकं वेड्यात काढतील ना.
लोला पण लिहिते ईथे, पण ती पण फेडररलाच सपोर्ट करते मग मी तिला कसं लिहिणार?
तू आमच्या शत्रूपक्षालाला सपोर्ट करतेस आणि एकाच्या फॅनने दुसर्‍याच्या फॅनशी भांडायचं नाही असं ठरवलं तर मग हा बाफ कसा चालावा?
ते म्हणतात ना
"In tennis love means nothing...
Love sucks. Play Hard ...
We don't just hit it, we hit it hard"
(इंटरनेटवरून ऊचलेगिरी)

हे खास जोकोला लागू पडतं
Though your game is hardly the best, you can fray your opponent’s nerves by methodically bouncing the ball at least ten times before your serves. .....Arnold J. Zarett

हे खालचं फेडररसाठी जोकोने म्हणावं अशी माझी खूप ईच्छा होती.

He can’t cook.” (Michael Chang, on being asked to list Pete Sampras’s weaknesses)

मी कुठे म्हणालो तू जोकोला चिअरअप करू नकोस, मी तर ऊलट म्हणतो नुसता स्कोअरच न टाकता चिअर पण कर आणि त्याच्या खेळाबद्दल अजून माहिती पण लिहि.
नुसत्या ४-६ चिअर करणारेपण म्हणतातच ना अरे द्रविडचा स्क्वेअर कट काय स्टायलिश असतो. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, सचिनचा कवर ड्राईव, अक्रमचा स्विंग, शेन वॉर्नचा लेग स्पीन, मुरलीचा दुसरा....तसं तू पण सांग की जोकोच्या खेळाबद्दल.
तू पण फेडररला सपोर्ट करणार असशील तर गप्प बसेन मी बिचारा..अजून काय?

जाऊ दे तू हा जोक वाच
रॉडिक विरूद्ध खेळतांना मॅच च्या सुरूवातीला आगासी म्हणाला

Andre Agassi: "Let’s see what you’ve got, big boy."

Roddick: "Hair."

पीजेच होता.

चला.........................आपला गाशा गुंडाळतो इथुन....... दोन्ही खेळाडु बाहेर ..... Sad

मी टेनिस तज्ञ नाही आणि जोकोविच फॅन पण नाही. मला त्याचा डीफेन्सिव गेम अजीबात आवडत नाही आणि याच कारणासाठी मी राफा चा पण फॅन नाही, कही झाल तरी त्यांची डीफेंसीव स्किल्स वादातीत आहेत. मग भले ते बेसलाइन वरून कंथाकुंथी करोत.
सध्या तरी जोकोविच चांगल्याच फॉर्म मधे आहे, कालच्या त्रोय्की विरुद्ध झालेल्या सामन्यात तरी तो पूर्णपणे कंट्रोल मधे होता. ज्योकोविच ने त्याच्या खेळात बरीच सुधारणा केलेली आहे. त्याने सर्विस स्टाइल बदललेली आहे आणि त्याचा बॅकहॅन्ड बराच जोरकस झालेला आहे. मुख्य म्हणजे त्याने बॅहन्ड down the line या फट्क्यावर मिलवलेली हुकुमत. बरेच खेळडू बॅकहॅन्ड क्रॉस्कोर्ट रॅली करताना दिसतात मग तो अलमग्रो असो रिशा गस्के असो किंवा वावरींका असो. क्रॉस कोर्ट रॅली सेफ असते कारण

तुम्हाला शोर्ट मारण्या साठी जास्त विड्थ मिळते.
चेंडू नेट्च्या मध्यभागवरून गेल्यामूळे तो नेटच्या लो लेव्हल वरुन मरता येतो आणि येणारा परतीच्या फटक्याचा कोन आणि वेग या दोन गोष्टींचा फायदा घेता येतो. फार कमी खेळाडू अशा फट्क्याचा कोन बद्लून down the line विनर मारू शकतात. डेविड नालबान्डीयन, रॉजर फेडरर हे मी पाहीलेले खेळाडू जोकविच ते हल्ली सहज करतो. राफा किन्वा मरे चा in side out ripper forehand तो कोन बदलून down the line back hand मारून विनर वसुल करतो.

बकी त्याचा कोर्ट कवरेज फोर्हॅन्ड जोरदार आहेतच. कदचीत त्याने temperament वर पण बर्या पैकी कंट्रोल आणलेला आहे. हे मला वाटलेले मुद्दे बकी तज्ञ संगतीलच.

मला त्याचा डीफेन्सिव गेम अजीबात आवडत नाही आणि याच कारणासाठी मी राफा चा पण फॅन नाही, कही झाल तरी त्यांची डीफेंसीव स्किल्स वादातीत आहेत.>>
वादातीत आहे म्हणता, मग तरीही आवडत नाही काय म्हणता? Happy

स्किल्स नक्कीच जबरद्स्त आहेत पण ती डीफेंसिव गेम स्टाइल आवड्ली पाहीजे ना? माझा मते मला डीफेंसीव गेम स्टाइल आवडत नाही म्हण्जे ते लगेच बेकार खेळाडु होत नाहीत. त्सोंगा जोकोची मॅच असेल तर मी त्सोंगा ला चीअर करेन. प्रत्येक बॉल रीर्टन करून समोरच्याला फ्रस्ट्रेट करण्या या दोघांचा हात कोणी धरणार नाही.

राफा व शारापोव्हा.. दोन्ही गेले.. Sad

युरो.. तुम्हाला कोण आवडतो व कोण नाही हे ठरवण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आहे हे मी मान्य करतो पंण राफा व जाकोव्हिक यांची स्टाइल फक्त डिफेन्सिव्हच आहेत हे तुमचे म्हणणे मला मान्य नाही. तुम्हाला सधारणतः लेंडल पासुन अश्या प्रकारचे टेनीस बघायला मिळाल्याचे दिसुन येइल. लेंडलने त्याच्या अत्युत्तम फिटनेसच्या जोरावर विंबल्डन सारख्या वेगवान सरफेसवरही बेसलाइन न सोडता मॅकेन्रो-कॉनर्स व बेकरविरुद्द त्यांच्या सर्व्ह अँड व्हॉली गेमविरुद्ध कडव्या लढती दिल्या(अर्थात त्याला एकदाही विंबल्डन जिंकता आले नाही हा भाग निराळा!)

मग विलँडरनेही त्याचा वारसा चालु ठेवला व आता गेल्या ७-८ वर्षात नादाल व जाकोव्हिकने त्यावर कळस चढवला. तुम्ही म्हणता तसे बेसलाइन वरुन कुंथत खेळण्यासाठी जबरदस्त स्टॅमिना व फिटनेस लागतो. ते बेसलाइनवर असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध डाउन द लाइन म्हणा किंवा क्रॉसकोर्ट म्हणा.. तसे विनर्स मारणे कठीण जाते कारण ते डाउन द लाइन शॉटही हंट डाउन करुन लिलया रिटर्न करु शकतात. तसे करण्यात किती कौशल्य लागते ते कोणालाच सांगायला नको. नुसते सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली करुन विंबल्डनला(किंवा यु एस ओपनलाही!) जिंकण्याचे दिवस केव्हाच संपले. राफा व जाकोव्हिक (व फेडररसुद्धा!) त्यांच्या बेसलाइन डिफेन्सिव्ह खेळातुनच ऑफेन्सिव्ह विनर्स निर्माण करतात हे तुम्ही विसरु नका. तसे बेसलाइनवरुन ते बाकीच्या साधारण खेळाडुंना लिलया कोर्टाच्या एका टोकापासुन दुसर्‍या टोकापर्यंत नाचवुन त्यांना दमवताना तुम्ही पाहात नाहीत काय? तसे त्यांच्या अपोनंट्सना नाचवणेही तुम्हाला डिफेन्सिव्हच वाटते काय? असो..

तुमच्या डाउन द लाइन व क्रॉस कोर्ट शॉट्सबद्दल... परत एकदा... आजकाल तुम्हाला डाउन द लाइन पासींग शॉट्स विनर्स जास्त दिसत नाहीत त्याचे कारण म्हणजे बहुतेक सगळे टॉप टेनिस प्लेअर्स बेसलाइनवरुनच आपला गेम खेळत असल्यामुळे डाउन द लाइन विनर्स मारणे कठीण जाते. डाउन द लाइन विनर जेव्हा प्रतिस्पर्धी सर्व्ह अँड व्हॉली करुन नेटजवळ येतो तेव्हा मारता येतो. पण सँप्रास रिटायर झाल्यापासुन तुम्हाला किती जण सर्व्ह अँड व्हॉली करताना दिसतात? पुर्वी जेव्हा मॅकेन्रो -कॉनर्स्-बेकर्-एडबर्गसारखे सर्व्ह अँड व्हॉली प्लेयर्स खेळत होते तेव्हा तसे डाउन द लाइन विनर्स बोर्ग्-लेंडल्-विलँडर्-अ‍ॅगॅसी सारख्यांकडुन खुप वेळा दिसायचे. इन्फॅक्ट अ‍ॅगॅसी वॉज प्रॉबेबली द बेस्ट सर्व्हिस रिटर्न प्लेअर ऑफ ऑल टाइम बिकॉज ऑफ हिज अ‍ॅबिलिटी टु रिटर्न सर्व्हिस विथ हिज डाउन द लाइन टु हँडेड बॅकहँडेड रिटर्न! पण त्याच अ‍ॅगॅसीला फेडरर्-नादालविरुद्ध तश्या रिटर्न्सची जास्त संधीच मिळाली नाही कारण फेडरर-नादाल क्वचितच सर्व्ह अँड व्हॉली करतात. असो.

अ‍ॅगॅसीइतके हुकमी नाही पण तरीही तसे बॅकहँड डाउन द लाइन शॉट मारण्यात मी पुरुषांमधे केन रोझवॉल-बोर्ग-लेंडल्-विलँडर्-मिलोस्लाव मेचिर-स्टिफान एडबर्ग व गुस्ताव्ह क्युरेटन यांचाही जरुर उल्लेख करीन तर महिलांमधे तश्या डबल हँडेड बॅकहँड डाउन द लाइन शॉट्समधे ख्रिस एव्हर्टची बरोबरी खुद्द देवही करु शकणार नाही हे माझे मत! Happy

मुकुंद , तुमची पोस्ट वाचताना एक उत्कंठावर्धक, अतिप्रेक्षणीय रॅली पाहिल्यासारखे वाटले. विनर तर डोळ्यांचे पारणे फेडणारा Happy

मुकुंद आपले म्हणणे बरोबर आहे आज सर्व्ह आणी व्हॉलि करणारे जास्त खेळाडु दिसत नाही. याला महत्वाचे कारण आहे खेळाचा वाढलेला वेग. रॅकेट जशा जशा हलक्या झाल्या आहेत तसा वेग जास्त वाढ्त गेला आहे त्या वेगा बरोबर सर्विस नंतर व्हॉलि करायला वेळ मिळणे कठीण आहे. मी डाउन द लाइन पासींग शॉट नाही तर क्रॉस कोर्ट रॅली मधे अँगल बदलून सर्ळ रेषेत ओपन कोर्ट मधे मारलेल्या शॉट बद्द्ल बोलत आहे.

रफा अणि जोको बद्दल मी डीफेंसीव आहेत असे म्हणतो तेंव्हा मॅच स्टॅटीक बघीतले तर कळेल. प्रतिस्पर्ध्या पेक्षा कमी अनफोर्सड एरर कमी आणि विनर्स पण कमी असतात. प्रत्येक बॉल रीटर्न करून ते प्रतीस्पर्धी खेळाडू वरचा दबाव वाढवत नेतात आणि त्याला एस्ट्रा रिस्क घेण्यास भाग पाडतात ज्या योगे तो एरर करेल. they make you do some extra to win the point. हा ऑफेंसीव डीफेंस असेल आणि तो वाईट खेळ आहे असही माझं म्हणणं नाही किंवा यात काहीही कौशल्य नाही असही मी म्हणत नाही. प्रतीस्पर्धी खेळडू च्या चुकांची वाट पहात बेसलाईन वरून खेळ करत रहाण मला कंटाळवाण वाटत.

माझा मुद्दा स्पष्ट करण्या साठी २ उदाहर्णे देतो.

ऑस्ट्रेलियन ओपन
फरनांडो गोन्झालेझ वि. रफाएल नडाल
गोन्झालेझ स्ट्रेट सेट्स या पेक्षा स्टॅट्स ऑफ द मॅच
गोन्झु ४३ विनर्स आणि ६ अन्फोर्स्ड एरर्स
राफा हरला याला मला तरी दिसणार कारण गोन्झु ने एरर कमी करुन राफाला बाहेर काढला. राफाला लाँग रॅली ची संधीच मीळाली नाही. extreme defence राफाला घातक ठरला.

ATP 1000/५०० match. कोणती ते साल आणि टुर्नामेंट आठवत नाही पण गेल्या ३ वर्षातील.
फेडरर वि. थॉमस बर्डिच
फेडरर ६६ अनफोर्स्ड एरर बर्डिच ६० अन्फोर्स्ड एरर
फेडरर मॅच हरला जरी त्याच्या कडे २ मॅच पॉइंट होते.

कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही मी फ्क्त मला वाटलेले मुद्दे मंडले.
आपले सगळे पैसे फेडरर वर जरी त्याला जिंकणे कठीण दिसते आहे.

Go Ferrer!
हा फार सालस माणूस आहे.
पण त्याला बघितल्यावर मला श्रेक मधल्या Lord Farquaad ची आठवण येते. हेयरस्टाईलमुळे.

स्किल्स नक्कीच जबरद्स्त आहेत पण ती डीफेंसिव गेम स्टाइल आवड्ली पाहीजे ना? माझा मते मला डीफेंसीव गेम स्टाइल आवडत नाही म्हण्जे ते लगेच बेकार खेळाडु होत नाहीत. त्सोंगा जोकोची मॅच असेल तर मी त्सोंगा ला चीअर करेन. प्रत्येक बॉल रीर्टन करून समोरच्याला फ्रस्ट्रेट करण्या या दोघांचा हात कोणी धरणार नाही. >>> तो मॉनफिल्स पण ह्या बाबतीत डेंजर आहे.

यूरोला पूर्ण अनुमोदन. मी आधीच्या एका टेनिस बाफवर हाच मुद्दा मांडला (भरपूर तांत्रिक माहितीसहित) पण सगळ्यांना फक्त रिझल्टवरच बोलायचे असते.
'हरवले ना जोकोने फेडीला मग बास. पुढे काही बोलू नका.'

जोको आणि नदाल कितीही यशस्वी होवोत ते परिपूर्ण टेनिस खेळत नाहीत हे माझं स्पष्ट मत आहे. (फक्त टोलवाटोलवी करतात.) जयसूर्या किंवा सेहवाग सारखे.
जोवर बरा फिटनेस आहे तोवर ते जिंकत राहणार ज्यादिवशी त्यांच्यापेक्षा जास्त फिटनेसवाला खेळाडू मैदानात ऊतरेल तेव्हा ते हरणार. ज्यावेळी ते नवनवीन शॉट्स प्रयत्नपूर्वक आत्मसात करतील त्यावेळी ह्याने फेडररची जागा घेतली असे म्हणायला आनंदच होईल. जसं सॅम्प्रासनंतर प्रत्येक स्लॅमगणिक फेडीला अ‍ॅक्सेप्ट करणं खूप सोपं आणि आनंददायी होत गेलं.
ऊदा. नदाल कधीही ड्रॉप शॉट्स खेळत नाही. फक्त आणि फक्त कोर्ट कवरेज आणि फोअरहॅंडसची १००%च्या जवळ जाणारी अचूकता हीच काय ती त्याची अस्त्र.
सँप्रास-आगासी किंवा सँप्रास्-कुरियर गेम सॅम्प्रास्-सेविक गेमपेक्षा किती वेगळा असे. जसा प्रतिस्पर्धी तसे शॉट्स.
एका फ्रेंच ओपनमध्ये (बहूतेक जो एकमेव फेडीने जिंकला) फेडी ने डेल पोट्रोला पहिल्या ४-६ गेम्स्मध्येच एवढे ड्रॉप शॉट्स दिले की पुढच्या प्रत्येक फोर हँडसच्या फटक्यावर डेल ची भंबेरी ऊडायला लागली की हा नेमका फोर हँड मारणार आहे की ड्रॉप.

Lord Farquaad >> Lol

कारण फेडरर-नादाल क्वचितच सर्व्ह अँड व्हॉली करतात. असो. >> मुकुंदच्या ह्या वाक्याशी असहमत.

फेडरर ला आपण सॅम्प्रासचा वारस म्हणतो मग तो सर्व्ह/व्हॉली करत नाही असं कसं म्हणता येईल. Happy
पण तो अताश्या करत नाही हे मान्य कारण नदाल्/जोकोच्या खेळाच्या वेगाशी कीप अप करतांना त्याला ते करणं पहिल्यासारखे जमत नाही.
नदाल आणि जोकोच्याही आधी सर्व्ह/व्हॉली न करता खेळणं ह्युईट चालू केलं.

http://essentialtennis.com/spotlight/2011/05/313/

ह्या आर्टिकलमध्ये मस्त सांगितलं आहे सर्व्ह/व्हॉली चा चढऊतार. जरूर जरूर वाचाच.

नवीन येणार्‍या खेळाडूंचा (५-२५ सीडेड) गेम शक्यतो कोचनेच घडवलेला असतो. आता कोचचा वयोगट काय आणि तो कोणती शैली जास्त पसंद करतो (थोडक्यात खेळाडूवर लादतो) हे खेळाडूचा खेळ पाहिल्यानंतरच सांगता येईल. पण एखादा गुणी खेळाडू भरपूर सराव आणि मार्गदर्शनाने एखादी शैली आत्मसात करून ज्युनिअर लेवल जिंकत वर येतो. स्लॅम्समध्ये ही शैली नेमकी एखाद्या प्रस्थापित खेळाडूच्या शैलीला काऊंटर करणारी ठरली आणि जर प्रस्थापित जागा होईपर्यंत गेम त्याच्या हाताबाहेर गेला असेल तर प्रेशरमुळे कोलॅटरल डेमेज मध्ये प्रस्थापिताचाच बळी पडतो आणि अपसेट घडून येतो. पूर्वी विविध शैलीचे वेगवेगळे खेळाडू होते म्हणून जास्त अपसेट्स घडून येत. आता जो जास्त वेगाने आणि जोराने धोपटेल तो जिंकला अशीच शैली सगळीकडे दिसते आहे. म्हणून भरपूर फिटनेस आणि थोडे स्कील असले की आपला सीड टिकवता येतो.

चमन, 'परिपूर्ण टेनिस' नक्की कशाला म्हणायचं ? >> जे सॅम्प्रास (कायम), फेडरर (दीड-दोन वर्षापूर्वीपर्यंत) आणि अगासी (केस काढल्यानंतर) खेळत होते. Happy

>> लिसिकी-कर्बर जोरात चालू आहे!

लोला, नुसतंच काय जोरात चालू आहे सांगतेस? काहितरी अ‍ॅनालिसीस कर .. जोरात चालू आहे हे तर आम्हालाही स्कोअर बघून कळेल (काहींनां खरंतर तेही बघता येत नसेल ऑफीसातून पण असो ते महत्वाचं नाही ..)

की हे अ‍ॅनालिसीस वगैरे ची गरज फक्त फेडरर ला जेतेपदापासून दूर राखणार्‍या खेळाडूंपुरतीच आहे .. कल्पना नाही .. मला वाटलं सगळ्या विद्वानांनीं येऊन अ‍ॅनालिसीस केलं तर विम्बलडन २०१२ मधल्या त्या त्या खेळाडूंच्या मॅचेस् चं करतील .. पण हे तर जनरल टेनीस बद्दल आहे .. जे म्हणे मागेही एकदा करून झालंय .. असो, पण रिझल्ट्स् महत्वाचे नाहीत .. अ‍ॅनालिसीस महत्वाचं .. ते गामा (च ना?) ते प्रपोज् करत होते खरंतर नवी मोजमापं पण एका फेडरर फॅननेच त्यांनां रीझल्ट महत्वाचा असं सांगितलं ..

जाऊ दे .. आता मी उद्या मॅच बघेन ..

>>आम्हालाही स्कोअर बघून कळेल
मॅच कशी चालू आहे ते स्कोअर बघून कळत नाही. Wink

पण ते अ‍ॅनॅलिसिस चं काय मलाही कळलं नाही हां. Proud नंतरची मोठी भाषणं मी वाचली नाहीत.

>>हे खालचं फेडररसाठी जोकोने म्हणावं अशी माझी खूप ईच्छा होती.
>>He can’t cook.

याला तर माझा आक्षेपच आहे. Proud येत असेल की त्याला. राफाला येते. फेबुवर फोटो पहा.

इन्फॅक्ट अ‍ॅगॅसी वॉज प्रॉबेबली द बेस्ट सर्व्हिस रिटर्न प्लेअर ऑफ ऑल टाइम बिकॉज ऑफ हिज अ‍ॅबिलिटी टु रिटर्न सर्व्हिस विथ हिज डाउन द लाइन टु हँडेड बॅकहँडेड रिटर्न! > > +मस्त पोस्ट मुकुंद.

ऊदा. नदाल कधीही ड्रॉप शॉट्स खेळत नाही. फक्त आणि फक्त कोर्ट कवरेज आणि फोअरहॅंडसची १००%च्या जवळ जाणारी अचूकता हीच काय ती त्याची अस्त्र.>> १००% अचूक forehand असणे हि अगदीच खुल्लक गोष्ट असल्यासारखे लिहिलेले वाटतेय बाबा हे.

Pages