विंबल्डन - २०१२

Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17

यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.

महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.

यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!

हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणि श्वेडोवाचा गोल्डन सेट बघितला का? स्टॅट्स कही तरी अस होत म्हणतात..सलग २४ पॉइंट त्यात ४ एस आणि इरानि ची फक्त १ अनफोर्स्ड एरर बकी सगळे विनर्स.

मी तात्पुरता बाहेर.......................राफा बाहेर गेल्याच्या दु:खाने........................ अजुन मारिया आहे Happy तिच्या साठी काही काळाने परत येईन ... Wink

तो सेंटरकोर्टचा 'अकरा वाजायच्या आत खेळ संपला पाहिजे' हा नियम नाही समजला. काय आहे तो नियम?

चिमण.. काल पण पाऊस होता का? हवामान खात्याचा योग्य अंदाज असूनही जर काल पाऊस असेल तर परंपरेच्या नावाखाली काल सुट्टी होती.. त्यामुळे नेहमी प्रमाणे एका दिवशी दोन मॅचेस वगैरे खेळण्याचे प्रकार होतीलच... दोन दिवस जर गेले पावसामुळे तर..

आता उदयन काही येत नाही. तशी अजून एक मारिया आहे..

मंजूडी, रात्री ११ वाजता 'विम्बल्डन कर्फ्यू'. सगळं बंद करायचं. मरेला एक गेम खेळू दिला..
(आमच्याकडे नसते असले काही, Wink मध्यरात्रीनंतरही चालू असते... )

ब्रायन बेकर... सॉलिड कमबॅक केलंय ह्या माणसाने.
२००५ च्या यू एस ओपन आणि ५ सर्जरीजनंतर २०११ मध्ये पुनरागमन करीत आता ४थ्या राऊंडपर्यंत मजल मारलीये. सही स्पिरिट. ज्युनिअर्स मध्येसुद्धा फार चांगली कामगिरी होती त्याची.
रॉडिककडून आता अमेरिकन लोकांची फार अपेक्षापूर्ती होईल असे वाटत नाही.
एकेकाळची टेनिसमधली(सुद्धा) महासत्ता असलेली अमेरिका सध्या पुरुष आणि महिला दोन्ही गटात अस्तित्वासाठी झगडते आहे. पुरुष गटात बाळपावलांनी चाचपडते आहे तर महिला गटात थकलेल्या पयांनी धडपडते आहे. Happy
प्रोफेशनल टेनिसमध्ये वैयक्तिक कामगिरीच महत्त्वाची असली आणि त्यात देश वगैरे फारसं येत नाही हे खरे असले तरी सॅम्प्रास, आगासी काळात आणि विल्यम्स भगिनींच्या चढत्या काळात 'डॉमिनेटिंग अमेरिकन्स' असं जे चित्र होतं ते आता पुसल्यातंच जमा आहे.

टडोपा होऊन एवढा वेळ झालाय की आता टडोपाचं रडगाणं होत आलंय अमेरिकेचं Proud

पण क्रिकेट, सॉकरचा प्रभाव की काय मला लहानपणापासून एक स्लॅम स्पर्धा एकाच देशाच्या खेळाडूंनी जिंकावी असं कायम वाटायचं Proud पण असं फारंच कमी वेळा घडत असे आणि असा आनंद क्विचितच मिळत असे.

बेकर-ग्राफ
सॅम्प्रास्-डेवनपोर्ट
आगासी-विल्यम्स
फेडरर्-हिंगिस (फेडरर जिंकायला लागला तोवर हिंगिसचा कार्यक्रम आटोपला होता)

असे विजेते असावेत असं वाटायचं.

सध्या असा आनंद मिळवण्यासाठी सशलच्या देशाचा नागरिक झाल्यास थोडीफार आशा आहे. पण तो आनंद जास्त दु:खदायक असेल Proud

फेडरर ला कसलीशी बॅक इंज्युरी झाली आहे म्हणे!

>> पण तो आनंद जास्त दु:खदायक असेल

मग जाऊच दे बघू! कशाला एव्हढा जीवाचा आटापिटा!

पोवा हरली ! किम पण हरली... :|
आता सेरेनाला संधी आहे परत..

सेंटर कोर्ट बंद करून इव्हानोविक अझारेंका मॅच सुरु होत्ये..

टेनीस तज्ज्ञांसाठी एक प्रश्न .. हे कोर्ट बंद केल्यामुळे असं काय घडतं एकदम की लोकांच्या खेळावर परिणाम होतो, इंज्युरी चा त्रास व्हायला लागतो?

कोर्ट बंद केलं तर मोकळी हवा कमी होती आणि श्वास अडतो का?

सेरेना हरली तर (आणि ईवानोविक हरलीच असं समजून) नवीन स्लॅम विनर मिळेल ना?
तिचा कितीही रागराग केला तरी सत्ता गाजवलेली सेरेना शेवटचीच म्हणावी लागेल.
बाकी शारापोवसहित एकीच्याही खेळात सातत्य नाही.

सेरेना हरली तर क्विटोव्हा आहे. ईवानोविक हरलीच असं समजलं तर अझारेंका आहे. ह्या दोघीही आधी स्लॅम जिंकलेल्या आहेत.

सशल मी काही तज्ञ नाही पण टीटी खेळतो म्हणून माझ्या टीटीच्या अनुभवावरून सांगतो.

कोर्ट बंद केल्यानंतर आपल्या गेझ मध्ये फरक पडतो. खेळत असलेल्या जागेचे डायमेंशन्स डोक्यात फिट्ट बसलेले असतात आणि त्या जागेबद्दलच्या गेझनुसार आपली हालचाल आणि शॉट मारतांनाच कंफर्ट ठरतो.
रूफ टाकल्याने गेझ बदलून हा कंफर्ट बहूतेकांचा जातो. तर काहींना ऊलट ह्या चेंज ऑफ गेझचा सायकॉलिजक फायदा वाटतो.
टीटी टेबलला समोरच्या बाजूंनी दहा फूट जागा आणि साईडला सात फुटांची जागा पुरेशी असते पण त्या बाजूच्या भिंतींचं एक सायकॉलॉजिकल लिमिटेशन वाटतं. हेच जर बाजूला २० बाय २० फुट जागा असेल तर खेळ अविश्वसनीयरित्या ऊंचावतो. हा बहूतेक टीटी खेळणार्‍यांचा जनरल अनुभव आहे.
एखाद्याला हाच अनुभव अगदी ऊलटा येतो.

लोला, जर्मन का? जर्मन 'मेन्स' मध्ये स्लॅम जिंकू शकेल असा कोण आहे?

मी सर्बियन जोकोविक आणि इवानोविक असे बोलत होतो. कारण दोघांनी किमान एखादीतरी स्लॅम जिंकली आहे.

छ्या!! तू फार विनोदी लिहितेस.
मी जर्मन खेळाडू नाही तर 'पहिल्या तिघांना हरवून स्लॅम जिंकू शकेल असा जर्मन खेळाडू आहे का' असं विचारलं. Proud
टॉमी हास ईवानसेविक पेक्षाही थोडा कमनशिबी ठरला बिचारा.

Pages