Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनुसया, पास्ता सॅलॅड,पोटेटो
अनुसया,
पास्ता सॅलॅड,पोटेटो सॅलॅड, एग-मेयो-लेट्स सँडिचेस, चिकन-मेयो बर्गर्स, मेयो+ मस्टर्ड सॉस फॉर चिकन/मटन चॉप्स इ इ साठी वापरता यइल.' रेसिपीज युजिंग मेयोनेज' असे गुगलुन बघा
.शिरा आणी उपमा करायला जाड कि
.शिरा आणी उपमा करायला जाड कि बारिक रवा वापरतात ? ( एक बाळबोध प्रश्न )
जाड रव्याचा सांजा करतात..
जाड रव्याचा सांजा करतात.. शिरा बारीक रव्याचा. उप्पीट दोन्हीचे होते.
इतके मेयो हृदयासाठी हितकारक
इतके मेयो हृदयासाठी हितकारक नाही.
मामी, हल्ली लो फॅट, कॅल.
मामी, हल्ली लो फॅट, कॅल. फ्री, एगलेस असे मेयोज पण मिळतात.
अनु, कोलेस्ट्रॉलसाठी मेयो खरंच चांगलं नाही. एवढं एक किलो कशाला आणलं? आणि कुठली कंपनी आहे ही एवढा मोठा जार विकणारी? हां तुझा साइझ बघता तुला मेयो खायला काही हरकत नाही.
लादी पावा ची पाकक्रुती कुणाला
लादी पावा ची पाकक्रुती कुणाला माहित आहे का?
किन्वाची साबुदाणा खिचडी माहित
किन्वाची साबुदाणा खिचडी माहित आहे का कुठे आहे ते?
वत्सला, इथे
वत्सला, इथे बघ.
http://www.maayboli.com/node/24483
हा घ्या वत्सलातै:
हा घ्या वत्सलातै: http://www.maayboli.com/taxonomy/term/4845
किन्वा म्हणून सर्च मारताक्षणी मिळाला. गिळायला पण मिळाला असतातर!
धन्स ग मैत्रीणींनो! रच्याकने,
धन्स ग मैत्रीणींनो!
रच्याकने, तुम्ही कुठे सर्च मारता? मी पाककृतीमध्ये जाऊन पानच्या पानं शोधते.
ते शब्द लिहुन शोधण्याचे ज्ञान मला प्रदान करा प्लीज!
चिन्नु, ये इकडे १ तासाभरात तयार होईल!
कित्ती ग गोड तू! उजवीकडं
कित्ती ग गोड तू!
उजवीकडं 'शोध' म्हणून आहे ना, त्याच्या खालच्या बॉक्समध्ये टाइप कर किन्वा म्हणून आणि 'Enter' key दाबणे, बस्स!
मी पाककृतीमध्ये जाऊन पानच्या
मी पाककृतीमध्ये जाऊन पानच्या पानं शोधते.
वत्सला
इथली माझी पोस्ट वाच पाककृती कशी शोधावी?
चिन्नू + १, ती 'शोध' पट्टी पानाच्या उजव्या बाजूला तसेच पानाच्या सगळ्यात खालीही दिलेली आहे.
मंजुडी, आता एक पाकृ शोधुन
मंजुडी, आता एक पाकृ शोधुन बघते!
घरचं साजुक तुप संपलय, तर मला
घरचं साजुक तुप संपलय, तर मला सध्या प्रेग्नंसीमध्ये आणि नंतर बाळासाठी चांगल्या ब्रॅंड्चे विकतचे तुप कोणते ते सांगा. मी अजुन कधीच विकतच आणलेलं नाहीय.
सध्या भाजी/आमटीतील लसुण आवडीने खाते म्हणुन नवर्याने चक्क लसणीचं लोण्चच आणलं
पण मला ते नाही आवडलं, फोडणीत वापरुन पाहिलं पण लसुण कच्चीच राहते आणि खाताना लोणच्याचीच चव लागते, तर या लसणीच्या लोणच्याच काही करता येईल का? टाकुन द्यायला जीवावर आलंय.
साक्षी, लोणचं सरळ मिक्सरमधे
साक्षी, लोणचं सरळ मिक्सरमधे फिरवुन घे आणि ती पेस्ट भाज्यांमधे वापरून टाक
लोणचं ग्राईंदकेल्यावर मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट लागली असेल ती काढण्यासाठी ताक्/दही वापर किंवा सरळ धिरड्यासाठी पिठं घालुन बॅटर बनव.
ओके लाजो, धन्स
ओके लाजो, धन्स
डबल पोस्ट
डबल पोस्ट
साक्षीमी, गरोदर आहात ना? मग
साक्षीमी, गरोदर आहात ना? मग सरळ ती लोणच्याची बाटली फेका.. राग येइल. पन लोणचे खावु नये गरोदरपणात. कैच्याकै मीठ, तेल. त्यात बाहेरचे तर बिलकूलच नाही.
पटलं तर करा.
जुनी लोणची अस्तात बहुतेकदा इ. ग्रो. मी तर डेट लेबलवर दुसरा लेबल चिकटवलेला पाहिलाय अश्या बाटल्यांवर.
पन लोणचे खावु नये गरोदरपणात.
पन लोणचे खावु नये गरोदरपणात. कैच्याकै मीठ, तेल. त्यात बाहेरचे तर बिलकूलच नाही. >>> +१
साक्षीमी, घरी लोण्याचा अगदीच
साक्षीमी, घरी लोण्याचा अगदीच खडखडाट झाला असेल तर चांगल्या डेअरीतून चांगलं लोणी आणून घरी कढवा. साजूक तूप नुसतं खायचं असेल बोटाने चाटून किंवा पोळीला लावून तर घरच्या साजूक तुपाला पर्याय नाही. फोडण्यांसाठी वापरायचं असेल तर अमूल, गोवर्धन, चितळे हे चांगले ब्रँड आहेत. चितळ्यांचं तूप त्यातल्या त्यात घरच्यासारखं लागतं.
हाय साक्षी, पुण्या-मुंबईत
हाय साक्षी, पुण्या-मुंबईत आहेस कि देशाबाहेर? जर पुण्या-मुंबईत असशील तर महाग जास्त आहे पण ABC फार्म एवढं शुद्ध तुप दुसरं नाहीच. अगदी चितळेसुद्धा मला आवडत नाही. सगळ्यात उत्तम म्हणजे घरीच तुप कढवणे. घरच्या तुपाची चव बाहेरच्या कोणत्याही तुपाला नाही. मी सगळे ब्रँडस ट्राय करुन शेवटी ABC चं गायीचं लोणी आणायला लागले आहेत. तेच कढवते. बाकी घरातल्या सायीचं तुप निघतंच.
झंपी, नुसतं लोणचं मी खात
झंपी, नुसतं लोणचं मी खात नाहीच, म्हणुनच त्याचा काही इतर उपयोग होईल का बघत होते. शिवाय खात्रीच्या दुकानातुन आणलेलं आहे आणि ४-५ दिवसच झालेत आणुन, लाजो म्हणते तसं पेस्ट करुन वरच तेल, मीठ न घालता ट्राय करुन बघणार नाही आवडलं तर मग टाकणारच आहे. धन्यवाद.
धन्स मंजुडी, मनिमाऊ, हो गोड पदार्थात, वरणावर आणी पोळीला लावुनच खाते मी, फोडणीला वगैरे नाही वापरत तुप. घरच्या साजुक तुपाचीच सवय झालीय, मी अजुन कधीच बाहेरच तुप खालेलं नाहीय. पण आता या अवस्थेत ते सगळे खटाटोप नाही जमणार. पुढचे ३-४ महिने तरी जमणं शक्य नाही. शिवाय मी म्हशीच्या दुधाच्या सायीचे तुप काढायची, पण आता प्रेग्नंट राहिल्यापासुन गायीचे दुध चालु केलेय, त्याला दाट साय येत नाही. त्यामुळे आधी केलेलंच तुप वापरुन संपलंय. आता डेअरीतुन लोणी आणुन तुप कढवण्याचाच पर्याय बेस्ट वाटतोय. गायीच लोणी मिळतं का डेअरीमध्ये?? पण त्यात भेसळ आहे की नाही कसे ओळखायचे? चितळेच चांगल आहे ऐकुन आहे, ABC च मुंबईत इथे मिळतं का बघते.
साक्षी, पारसी डेअरीचे तुपही
साक्षी, पारसी डेअरीचे तुपही चांगले असते.
मला चिकन खिमा वापरून कुठल
मला चिकन खिमा वापरून कुठल स्टार्टर बनवता येईल..आणि महत्तवाच म्हणजे खिमा कसा स्वच्छ करू? मी एक पाकेट खिमा पाण्यात नेहेमी प्रमाणे धुवायला घेतला तर तो पाण्यात जवळ जवळ विरघळला आता काय कराव अजून एक पाकीट शिल्लक आहे..
व्हेज फ्रॅकी घरी कशी बनवायची
व्हेज फ्रॅकी घरी कशी बनवायची ?
कच्छी दाबेली कशी बनवायची..?
कच्छी दाबेली कशी बनवायची..?
(No subject)
हसरी ही घे वेज फ्रँकी ची
हसरी ही घे वेज फ्रँकी ची लिन्क
http://ruchkarjevan.blogspot.in/2010/04/veg-frankie-with-cheese.html
आणि ही कछी दाबेली
http://chakali.blogspot.in/2008/02/dabeli.html
दिविजा, अमेरिकन ग्रोसरीमधनं
दिविजा, अमेरिकन ग्रोसरीमधनं आणला असेल चिकन खिमा, तर धुवायची गरज नाही.
त्यात आले -लसूण - हि मिरची- कोथिंबीर जाडे भरडे वाटून , मीठ - हळद-तिखट - गरम मसाला , एग व्हाइट असे मिक्स करून चपटे पॅटिस सारखे करून शॅलो फ्राय करू शकता.
किंवा असेच मिश्रण सळईवर लावून बार्बेक्यू ग्रिलवर कबाब करू शकता.
आवडत्या रेसिपीने खिमा करून , खिमा- चीझ-पातीचा कांदा असे घालून केसादिया करू शकता. छोटे कॉर्न टोर्तीया वापरून केलेत तर त्याच्या वेजेस हाताने उचलून खायला सोप्या पडतील.
मला कुणी तुपाची बेरी वापरुन
मला कुणी तुपाची बेरी वापरुन केलेली रेसेपी देऊ शकेल का? म्हणजे वड्या वगैरे. मागे पुनमने कुठेतरी लिहील्याचे वाचले होते, पण आता आठवत नाही. ती लिंक कुणाला माहिती असेल तर कृपया द्या, नाहीतर स्वत: ची रेसेपी पण चालेलच.
तसेच तुपाची बेरी बाहेर किती ( फ्रिझवाचुन ) दिवस राहते/ टिकते?
Pages