२००७ मधे वासोट्याला जाताना वाटेत अजिंक्यतारा आणि सज्जनगडच्या नाका खालून गेलो होतो. तेव्हा कधी तरी परत यायचेच हा मनसुबा मनात पक्का केला होता. तो योग जुळून यायला ५ वर्ष वाट पहावि लागली. गेल्याच आठवड्यात एका लग्ना निमित्त सातार्याला जाणे झाले. शनिवारी सकाळी पुण्या वरुन निघालो तेव्हा वाटेत सिंहगडाचे दर्शन झाले.
खेड-शिवापूरला दुपारी पिठलं-भाकरीच जेवण करुन निघालो ते थेट सातार्याच्या दिशेने. पहिलं लक्ष होतं अजिंक्यतारा... पण चौकातील ट्रॅफिक हवालदारच्या कृपेन समर्थांच्या सज्जनगडावर पोहचलो.
गडावरुन दिसणारा नजारा...
गडाचे प्रवेशद्वार
महाद्वार
पुर्वाभिमुख महाद्वाराच्या उजविकडे प्रवेश करताच एक शिलालेख पहावयास मिळतो. त्याचा अर्थ पुढिल प्रमाणे... १. ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवीत आहे. २. तू विंवंचना दूर होण्याचे स्थान युक्त आहेस, परंतु पुन्हा विवंचना युक्त आहेस. ३. तुझ्या पासून सर्व विवंचना दूर होतात. ४. सर्व फुलांना प्रफुल्लित करीत आहे.
आश्वालायन ऋषींचे वास्तव्य असलेला या गडाची उभारणी राज भोज ह्याने ११व्या शतकात केली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावामुळे गडाला 'परळीचा किल्ला' अशी ओळख मिळाली. महारांजाच्या विनंती वरून समर्थ रामदास कायमस्वरूपी वास्तव्यास गडावर आले, तेव्हा गडाचे नामकरण करण्यात आले 'सज्जनगड'. समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला बर्याच संकटांना समोरे जावे लागले. स्वराज्याचे युवराज दिलेर भेटी साठी गेले ते येथूनच...
घोड्यांची पाण्याची व्यवस्था बघणारे 'घोडाळे तळे'
गडावरिल पिण्याच्या पाण्याचे बांधिव 'सोनाळे तळे'
पेठेतील मारुती मंदिर
मंदिरा समोरील 'श्रीधर कुटी' नावाचा आश्रम
समर्थांचा मठ आणि शेजघर...
श्रीराम मंदिर
शेजघरात समर्थांची समाधी आणि त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. मठाच्या उजविकडे श्रीराम मंदिर आहे तर मागे धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. तेथून दिसणारा 'उरमोडी' (उर्वशी) नदिचा नजारा कॅमेर्यात कैद करुन मागे फिरलो.
रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या धर्मशाळेतून भरुन घेतल्या आणि घोडाळे तळ्याच्या डावीकडून 'आंग्लाई' देवीच्या मंदिराकडे गेलो.
तळ्याच्या मागे दिसणार्या इमारतीचे अवशेष.
कास-बामणोलीला जाणारा रस्ता...
महाद्वारातील नक्षीकाम
महाद्वारातून दिसणारा अजिंक्यतारा
दोन तासात पुर्ण गड फिरून झाला तेव्हा ४ वाजले होते. ढगाळ वातावरणमुळे उन्हाचा फारचा त्रास जाणवत नव्हता आणि समोर अजिंक्यतारा खुणावत होता. मग काय... त्वरीत रथात स्वार होउन अर्ध्या तासात अजिंक्यतार्याच्या कमानी समोर पोहचलो...
सातारचा 'सप्तर्षी' म्हणून ज्याची ख्याती आहे त्या 'अजिंक्यतारा' गडा वरून दिसणारे पायथ्याच्या सातारा शहराचे विहंगम दृष्य...
कास-बामणोली डोंगरधारेवरील अग्नेय कडिल शेवटचे टोक म्हणजे 'अजिंक्यतारा'... गडाच्या पुर्वेला नांदगिरीचा 'कल्याणगड' आणि 'चंदन-वंदन' ही जोड गोळी दिसते... तर पश्चिमेला 'सज्जनगड' दिसतो.
राजगड, रायगड, जिंजी नंतर मराठ्यांच्या चौथ्या राजधानीचा मान मिळाला तो अजिंक्यतार्याला.. १७०८ मधे शाहुने याच किल्ल्यावर स्वतःस राज्याभिषेक करुन घेतला.
दरवाजातून पुढे गेल्यावर उजविकडे महादेवाचे मंदिर दिसते.
मंगळादेवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत ताराबाईचा ढासळेला राजवाडा दिसतो.
गडावर तीन तळी आहेत, पैकी दोन आटलेली आहेत.
भटकंती दरम्यान गडावरील इमारतींचे भग्नावशेष नजरेस पडले...
एव्हाना सुर्वे साहेब माघारी निघाले होते... परतीच्या वाटेवर टिपलेल्या काही चौकटी...
मस्त रे इंद्रा, प्रचि एकदम
मस्त रे इंद्रा, प्रचि एकदम कल्लास!
सज्जनगडाच्या पायथ्याच्या परळी गांवात प्राचिन मंदीरांचे अवशेष आहेत.
फोटो मस्तच रे. गाडिसर केलेस
फोटो मस्तच रे.
गाडिसर केलेस ते हेच दोन होय.
छानच माझ्या मते, त्या नदीचं
छानच
माझ्या मते, त्या नदीचं नाव 'उरमोडी' आहे. माझ्या मावस-सासूबाई गेली ५० वर्षे उरमोडीवरील धरणाजवळच्या कुमठे-आसनगाव या गावात राहतात. (धरण आत्ता आत्ता झालंय)
त्या गावी जायला सातारा पार करून अजिंक्यताराच्या कमानीतूनच पलिकडे जावं लागतं. कमान पार केली, की आसपासचं दृष्य एकदम बदलतं, ते मला नेहमी फार आवडतं.
इंद्रा, मस्त फोटो आणि वर्णन
इंद्रा, मस्त फोटो आणि वर्णन
त्या नदीचं नाव 'उरमोडी' आहे>>>>+१
वा! क्या बात है इंद्रा.
वा! क्या बात है इंद्रा.
इंद्रा मस्तच रे. शेवटचा फोटो
इंद्रा मस्तच रे. शेवटचा फोटो आणि माहिती मस्तच.
तो शिलालेख कुठल्या लिपीत आणि भाषेत आहे?
इंद्रा खुप छान फोटो न
इंद्रा खुप छान फोटो न माहिती.. छान भटकण तुमच.
मस्त रे इंद्रा ... लेका
मस्त रे इंद्रा ... लेका आमच्या गावाकड जाऊन आलास की ...
मस्त फोटु...
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
मस्तच रे
मस्तच रे
भन्नाट वाटलं ! असा वरून
भन्नाट वाटलं ! असा वरून सातार्याचा फोटो पाहून नॉस्टाल्जिक वाटलं.
मस्तच रे.
मस्तच रे.
निवडक १० त नेहमी प्रमाणे
निवडक १० त नेहमी प्रमाणे
मस्त!
मस्त!
खल्लास रे इंद्रा जबराट प्रचि
खल्लास रे इंद्रा जबराट प्रचि आणि सुंदर लेख,
तो महाद्वाराच दरवाजा प्राचीन आहे का ?
मस्तच फोटो, आवडले
मस्तच फोटो, आवडले
सर्व प्रकाशचित्रे सुंदर, छानच
सर्व प्रकाशचित्रे सुंदर, छानच भटकंती.
_/\_ जय जय रघुवीर समर्थ.
ओ मावळे, लई भारी
ओ मावळे, लई भारी
फोटोज माहिती सगळे छानच !
फोटोज माहिती सगळे छानच !
मस्त
मस्त
. सर्व प्रकाशचित्रे सुंदर,
.
सर्व प्रकाशचित्रे सुंदर, छानच.
सुंदर ! सगळे एकदम मस्त आलेत
सुंदर ! सगळे एकदम मस्त आलेत
आजून अस्तिल तर नक्की टाका ( समाधी , श्री राम इ. )
छान फोटो. गडावरचा प्रसाद
छान फोटो. गडावरचा प्रसाद जेवलात कि नाही ?
माधव तो फारसी लिपीत आहे !
धन्यवाद मित्रांनो तो
धन्यवाद मित्रांनो
तो महाद्वाराच दरवाजा प्राचीन आहे का ? > कदाचीत असावा.. कारण सज्जनगडाची देखभाल चांगली आहे.
दादाजी... समाधी आणि राम मंदिरात प्रचि काढायला बंदी होती.
दिनेशदा... आम्ही उशिरा पोहचलो.