पाऊस आणि मन

Submitted by सुधाकर.. on 29 June, 2012 - 13:11

छेडीतो सतार, इंद्राचा गंधार
झुले मेघमल्हार, देऊन हूंकार.

ओथंबले मेघ, कोसळल्या धारा,
ओलावली माती, गंधाळला वारा.

खळाळले पाणी, ओसंडला पुर
धुंदावल्या कळ्या, नाचु लागे मोर.

उसवले मन, आठवला पुर
उलगल्या गाठी, सुठे गुंतलेले दोर.

गजबजले पार, मनातले घर
उघडता दार, गेली उडून पाखरं.

---------------------------------------------
पुर्व प्रसिध्दी :- दिवाळी अंक ' प्रतिभा' २००८
---------------------------------------------

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उसवले मन, आठवला पुर
उलगल्या गाठी, सुटे गुंतलेले दोर.

गजबजले पार, मनातले घर
उघडता दार, गेली उडून पाखरं
ही दोन कडवी अतोनात आवडली. मन भिजले.

पहिली तीन कडवी - सुरेख चित्रदर्शी वर्णन
तर शेवटची दोन सुंदर मनदर्शन.....

मस्त आहे..............सुरेख.......... Happy