Submitted by सुधाकर.. on 29 June, 2012 - 01:54
काय सांगू तुला सखी नवल आज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.
तहानलेल्या उन्हामध्ये पावसाची सर,
अमृताची धार जणू सुजल पाजते.
दुर गेले सूर तुझ्या पायांसवे तरी,
धावतात भास मजल दरमजल आज ते.
जीवाशी या खेळतात खेळ रांगडा,
रुणूझुणू सूर तुझे दगलबाज ते.
जुने ग तू टाक आता नवे ऋतू आले,
शृंगाराचे तुझ्या सखी बदल साज ते.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान, बरेचसे गझलतंत्र आले या
छान, बरेचसे गझलतंत्र आले या रचनेत, आता वृत्तात बसले की झाले
धन्यवाद बेफिकीरजी आपले खुप
धन्यवाद बेफिकीरजी आपले खुप खुप आभार
-----------------------------------------------------------
सर्व वाचक मित्रांना नम्र विंनंती :- गझल आवडल्यास, माझी याच शिर्षकाची कविता - कविता विभागात वचावी. व आपले मत मांडावे.
..................................................ऑर्फिअस..!
छान आहे......... दुर गेले
छान आहे.........
दुर गेले सूर तुझ्या पायांसवे तरी,
धावतात भास मजल दरमजल आज ते.
जीवाशी या खेळतात खेळ रांगडा,
रुणूझुणू सूर तुझे दगलबाज ते.
हे खयाल आवडले ..........
थँक्स योगुली .
थँक्स योगुली .
छान, बरेचसे गझलतंत्र आले या
छान, बरेचसे गझलतंत्र आले या रचनेत, आता वृत्तात बसले की झाले >>>>>>>>>>>>>> सहमत