तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

Submitted by सुधाकर.. on 29 June, 2012 - 01:54

काय सांगू तुला सखी नवल आज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

तहानलेल्या उन्हामध्ये पावसाची सर,
अमृताची धार जणू सुजल पाजते.

दुर गेले सूर तुझ्या पायांसवे तरी,
धावतात भास मजल दरमजल आज ते.

जीवाशी या खेळतात खेळ रांगडा,
रुणूझुणू सूर तुझे दगलबाज ते.

जुने ग तू टाक आता नवे ऋतू आले,
शृंगाराचे तुझ्या सखी बदल साज ते.
gazal_0.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्यवाद बेफिकीरजी आपले खुप खुप आभार Happy

-----------------------------------------------------------

सर्व वाचक मित्रांना नम्र विंनंती :- गझल आवडल्यास, माझी याच शिर्षकाची कविता - कविता विभागात वचावी. व आपले मत मांडावे.

..................................................ऑर्फिअस..!

छान आहे......... Happy

दुर गेले सूर तुझ्या पायांसवे तरी,
धावतात भास मजल दरमजल आज ते.

जीवाशी या खेळतात खेळ रांगडा,
रुणूझुणू सूर तुझे दगलबाज ते.

हे खयाल आवडले .......... Happy