प्रोजेक्टचे काम
आनंद निधान
त्यावीण का दाम?
विचारो नये || २ ||
रोज येथे यावे
कष्ट ते करावे
सेकंदे का मरावे?
विचारो नये || ३ ||
पिता पिता चहा
मॉनिटरकडे पहा
होऊ का रिलॅक्स?
विचारो नये || ४ ||
परवाचे उद्या अन्
उद्याचे आजच करा
आजचे काल करू का?
(कर की मेल्या...)
विचारो नये || ५ ||
सरदार गोमटा
उगारी डेडलाईनचा सोटा
आव का तो मोठा?
विचारो नये || ६ ||
क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ ||
साम दाम दंड
आली फीडबॅकची झुंड
कामात कधी खंड?
विचारो नये || ८ ||
आज यांचे काम
उद्या यांचे काम
पण आमुचे 'काम'?
विचारो नये || ९ ||
मोडली आमुची मान
उरले नाही त्राण
हरपले का भान?
विचारो नये || १० ||
आठवडा खपला
विकेंडही मेला
आराम कसला?
विचारो नये || ११ ||
असे आमुचे प्रोजेक्ट
सांगितले तुम्हांस फॅक्ट
काय करावे एग्झॅक्ट?
विचारो नये || समाप्त ||
--------------------------------------------------------------------------------
तळटीप:
प्रोजेक्ट, मॉनिटर, रिलॅक्स, फीडबॅक, व्हेंडर, क्लायंट वगैरे शब्द काही विशिष्ठ संदर्भ असल्याने
मराठी भाषांतर न करता मुद्दामून तसेच वापरले आहेत.
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
छान आहे ( हा मंदार जोशी तरी
छान आहे
( हा मंदार जोशी तरी गगोकारच ना ? मंदार जोशी च्या ऐवजी मंदार-जोशी असा आयडी दिसतोय. )
बिल्कुल फुरसत नाही वाचावयास
बिल्कुल फुरसत नाही
वाचावयास वेळ्ही नाही
प्रतिसाद का नाही
विचारो नये ||.....||
गिरिश
गिरिश
विचारतच नाही जा
विचारतच नाही जा ........................:)
मस्त जमलेय
ग्री
मस्त
मस्त
(No subject)
अगदी राहवले नाही "वाहवा!" न
अगदी राहवले नाही
"वाहवा!" न म्हणता काही
मात्र, 'गगोवरी का येत नाही?'
विचारो नये! ||.....||
मंदार, मस्त रे गिरी, गुण
मंदार, मस्त रे
गिरी, गुण लागला कि रे.
प्रोजेक्टचे काम करा
प्रोजेक्टचे काम
करा निदान
त्यावीण दाम?
विचारता कसे ||
माहिती आम्हास
नेटता आठ तास
जास्तीचे तास
लावता कसे ||
ऑफिसच्या वेळात
कविता पाडता
एक्स्ट्रा वर्कींग केले
बोंबलता कसे ||
http://www.maayboli.com/node/10846
हे बॉसचे उत्तर
आणी हे मी तुझ्या नावेतली आहे म्हणुन
http://www.maayboli.com/node/20043
वर्षा
वर्षा
सगळेच
सगळेच
काय मंदार ...खुप कांम आहे
काय मंदार ...खुप कांम आहे वाटत ? ( मा यबोलि, फे स बुक वर थोडा वेळ बाकि खुप कांम आहे ...बरो बर ना ??? )
आजचे काल करू का? (कर की
आजचे काल करू का?
(कर की मेल्या...)
मस्तचं!
रोज येथे यावे,
मर्-मर मरावे,
इनक्रिमेंट्चे परसेंटेज
विचारो नये !
दा आहेस कोठे भेटतंही
दा आहेस कोठे
भेटतंही नाहीस
रीप्लाय का नाही
विचारो नये...
नाय बा ईचारत....
कविता मस्तच, कवितेवरचे
कविता मस्तच, कवितेवरचे प्रतिसाद भन्नाट आहेत..
छान!
छान!
सारु +१
सारु +१
(No subject)
प्रोजेक्ट, मॉनिटर, रिलॅक्स,
प्रोजेक्ट, मॉनिटर, रिलॅक्स, फीडबॅक, व्हेंडर, क्लायंट वगैरे शब्द काही विशिष्ठ संदर्भ असल्याने
मराठी भाषांतर न करता मुद्दामून तसेच वापरले आहेत. >>>>>>>>>> जाहीर निषेध.....
मंदार कोरडे पाषाण ....
चांगली आहे !
चांगली आहे !
(कर की मेल्या...) विचारो नये
(कर की मेल्या...)
विचारो नये >>>
मंदार आणि गिरिश व वर्षे,
गिरी कडे लक्षच नव्हते माझे
गिरी कडे लक्षच नव्हते माझे
मंदार, मस्त आहे का.का.क.
मंदार, मस्त आहे का.का.क.
(No subject)
सॉल्लिड जमली आहे. प्रिन्टआऊट
सॉल्लिड जमली आहे. प्रिन्टआऊट घेऊन वर्कस्टेशनच्या वर लावावी का ह्या विचारात आहे
ऑफिस माबोकर युसर्स कडून जाहीर
ऑफिस माबोकर युसर्स कडून जाहीर पाठींबा
हापिसात कविता नेटवर
हापिसात कविता
नेटवर पडीक
तरीही काम काम
सारखे करिता का?
विचारो नये!!
<<क्लायंट तो पेटे व्हेंडर
<<क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ || <<
भारीये मंद्या!! आज पाहिली ही कविता!
मालक
मालक
सुरेख!
सुरेख!
Pages