प्रोजेक्ट

Submitted by मंदार-जोशी on 24 June, 2012 - 21:23

प्रोजेक्टचे काम
आनंद निधान
त्यावीण का दाम?
विचारो नये || २ ||

रोज येथे यावे
कष्ट ते करावे
सेकंदे का मरावे?
विचारो नये || ३ ||

पिता पिता चहा
मॉनिटरकडे पहा
होऊ का रिलॅक्स?
विचारो नये || ४ ||

परवाचे उद्या अन्
उद्याचे आजच करा
आजचे काल करू का?
(कर की मेल्या...)
विचारो नये || ५ ||

सरदार गोमटा
उगारी डेडलाईनचा सोटा
आव का तो मोठा?
विचारो नये || ६ ||

क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ ||

साम दाम दंड
आली फीडबॅकची झुंड
कामात कधी खंड?
विचारो नये || ८ ||

आज यांचे काम
उद्या यांचे काम
पण आमुचे 'काम'?
विचारो नये || ९ ||

मोडली आमुची मान
उरले नाही त्राण
हरपले का भान?
विचारो नये || १० ||

आठवडा खपला
विकेंडही मेला
आराम कसला?
विचारो नये || ११ ||

असे आमुचे प्रोजेक्ट
सांगितले तुम्हांस फॅक्ट
काय करावे एग्झॅक्ट?
विचारो नये || समाप्त ||

--------------------------------------------------------------------------------

तळटीप:
प्रोजेक्ट, मॉनिटर, रिलॅक्स, फीडबॅक, व्हेंडर, क्लायंट वगैरे शब्द काही विशिष्ठ संदर्भ असल्याने
मराठी भाषांतर न करता मुद्दामून तसेच वापरले आहेत.

-------------------------------------------------------------------------------

माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित.

-------------------------------------------------------------------------------

प्रोजेक्टचे काम
करा निदान
त्यावीण दाम?
विचारता कसे ||

माहिती आम्हास
नेटता आठ तास
जास्तीचे तास
लावता कसे ||

ऑफिसच्या वेळात
कविता पाडता
एक्स्ट्रा वर्कींग केले
बोंबलता कसे ||

http://www.maayboli.com/node/10846

हे बॉसचे उत्तर Happy

आणी हे मी तुझ्या नावेतली आहे म्हणुन Proud
http://www.maayboli.com/node/20043

काय मंदार ...खुप कांम आहे वाटत ? ( मा यबोलि, फे स बुक वर थोडा वेळ बाकि खुप कांम आहे ...बरो बर ना ??? )

आजचे काल करू का?
(कर की मेल्या...)

Happy
मस्तचं!

रोज येथे यावे,
मर्-मर मरावे,
इनक्रिमेंट्चे परसेंटेज
विचारो नये !

छान!

प्रोजेक्ट, मॉनिटर, रिलॅक्स, फीडबॅक, व्हेंडर, क्लायंट वगैरे शब्द काही विशिष्ठ संदर्भ असल्याने
मराठी भाषांतर न करता मुद्दामून तसेच वापरले आहेत. >>>>>>>>>> जाहीर निषेध..... Lol
मंदार कोरडे पाषाण ....

<<क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ || <<

Rofl
भारीये मंद्या!! आज पाहिली ही कविता!

Pages

Back to top