भूल..........!

Submitted by सुधाकर.. on 19 June, 2012 - 09:53

मंद पावसाचा
रुणुझुणू ताल,
नाद पैंजणाचा
तुझे मित बोल.

मनास ही माझ्या
पडे कशी भुल,
तुझ्या लोचनात
किती जावे खोल.

आभाळात माझ्या
चांदण्याची झुल,
लख्ख त्यात तू ही
एक चंद्र फुल.

स्पर्श चंदनाचा
भाव ते मलुल,
श्वास गंधकाचा
सांडतो विपुल.

वेडावले मन
फिरे गोल गोल,
जशी पाखराला
पडे रानभुल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान

कविता अतिशय सुंदर. 'गंधक' सारखा शब्द थोडा अडवतो. सल्फरची आठवण येते. "श्वास गंधनाचा" असे म्हटले तरी चुकीचे नाही व्हायचे. "किती जावे खोल" ऐवजी "किती जाउ खोल" अधिक चपखल बसेल.
आपण माझ्याहून खूपच अधिक जाणकार आहात. सूचनांबद्दल रागावू नये. आधीच सुंदर असलेली कविता अधिक सुंदर, परीपूर्ण व्हावी हीच इच्छा.

वा वा !

गझल करताना तुमचा अस्सा अन्दाज-ए- बयान असेल तर मज्जा येईल.........

अक्षरछन्द (६ अक्षरे) मस्त हाताळलात

यमके चपखलच बसली आहेत (एखाद्या गझलेत नक्कीच खपवता येतील ....)

अप्रतीमच

वा वा !!!

बाकी प्रतिसादकान्नी केलेले मार्गदर्शन मौलिक आहे