बॉसने दिलेला fax पाहून सायलीला थोडेसे आश्चर्यच वाटले. Fax चा पत्ता स्वित्झर्लंडचा होता आणि त्यावर फक्त एकच लाईन लिहिलेली होती. "Sorry I could not keep the appointment on 26 October ". तारीख होती २७ ऑक्टोबर, २००६ आणि पत्ता होता मिल्टन जोन्स, स्वित्झर्लंड. म्हणजे? बॉस मिल्टन जोन्सला भेटायला झुरीचला गेला आणि त्याला न भेटताच परत आला? हे कस शक्य आहे? पण बॉसला त्याबद्दल विचारणा करायची तिची हिम्मत झाली नाही. ते काहीही असो, एक गोष्ट तिच्या नजरेतून सुटली नाही - स्वित्झर्लंडला जायच्या आधीपासून बॉस चांगलाच अस्वस्थ होता आणि तिथून आल्यावरही. सायलीला हि गोष्ट कधिएकदा संजयला सांगीन असे झाले होते.
होय - संजय, सायली आणि राज. तिघांनी मिळून साधारण ८ वर्षापूर्वी हि "Dynamic IT Services " नावाची कंपनी चालू केली होती. राज खरा कंपनीचा संस्थापक. त्यानेच धडपड करून कंपनी वाढविली. त्यामुळे संजय आणि सायली त्याला आदराने बॉस म्हणत. आरंभीच्या काही अवघड कालानंतर आता त्यांची कंपनी चांगलीच नावारूपास आली होती. आणि गेल्या ३-४ वर्षापासून तर कंपनी आंतरराष्ट्रीय कामेपण मिळवू लागली होती. त्यानिमित्ताने राजला बरच भारताबाहेर जावे लागायचे. स्वित्झर्लंडचे हे मिल्टन जोन्सचे (MJ) काम पण राजनेच मिळवले होते.
त्यादिवशी सायली तशीच काहीशा द्विधा अवस्थेत घरी गेली. रात्री थोडेफार खाण्याचे सोपस्कार केले आणि तशीच झोपी गेली. अस्वस्थ मनाने झोपलेली सायली मध्यरात्री कधीतरी खडबडून जागी झाली - काय? बॉस मागच्या वर्षीपण स्वित्झर्लंडला गेला होता? आणि त्याने असाच fax पाठवायला तिला दिला होता? सायलीची झोप पार उडाली. सकाळी उठून सारे आवरून तिने थेट ऑफिस गाठले ते केवळ एकाच इराद्याने - मागच्या वर्षीच्या बॉसच्या फोरेन ट्रिप्स ची फाइल धुंडाळण्याच्या इराद्याने.
आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिचा कयास बरोबर होता. बॉसने बरोबर ह्याच मजकुराचा fax सायलीला करायला दिला होता. " Sorry I could not keep the appointment on 26 October ". त्यावर पत्ता होता मिल्टन जोन्स, स्वित्झर्लंड. आणि तारीख? तारीख पाहून सायलीच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. कारण तारीख होती एका वर्षापूर्वीची तीच, म्हणजे २७ ऑक्टोबर, २००५! म्हणजे? म्हणजे बॉस मागच्या वर्षी सुध्दा मिल्टन जोन्स यांना न भेटताच परत आला होता? आणि तेहि २७ ऑक्टोबर लाच? आता मात्र संजयची भेट घेणे जरुरीचे होते. तिने थेट finance ला फोन लावला
आणि त्याला कॅन्टीन मध्ये ९ वाजता यायला सांगितले. पण अस्वस्थ सायली १० मिनिटे आधीच कॅन्टीनला पोहोचली. संजय आल्यावर सारी बातमी तिने त्याला सांगितली. संजयला सुधा या साऱ्या गोष्टीचे आश्चर्य वाटले.
"म्हणजे बॉस स्वीत्झार्लान्डला गेला आणि MJ ला न भेटतच परत आला?" संजयने विचारले.
"होय, असच दिसतंय" सायली म्हणाली.
"ते काहीही असो, बॉस काहीतरी अडचणीत दिसतोय. तू मला एक गोष्ट सांग - तू बॉसच Facebook अकौंट पाहिलास का?"
"Facebook अकौंट? नाही, का?"
"नाहि, आपला बॉस Facebook भक्त आहे हे विसरलीस वाटते!"
समोरच्या कॉम्प्युटरवर दोघांनी लगेच बॉसच Facebook अकौंट पाहिलं आणि त्यांना परत आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याच्या अकौंटवर मेसेज होता "राज shares his information only with near ones "
"अरे, बॉस स्वीत्झार्लान्डला जाई पर्यंत हा मेसेज नव्हता! हे नवीनच दिसतंय!" संजय म्हणाला. "पण मला एक शक्यता निश्चित वाटते आहे - ती म्हणजे जर बॉस स्वित्झर्लंडची वारी गेली दोन वर्ष करतोय म्हणजे कदाचित तो हि वारी पुढील वर्षीसुद्धा कदाचित करेल!"
ते बोलणे तिथेच संपले. आणि पाहता पाहता दिवसाचे आठवडे गेले आणि आठवड्याचे महिने! तारीख होती २ ऑक्टोबर २००७. राजने सायलीला केबिन मध्ये बोलावले आणि म्हणाला "सायली, २५ ऑक्टोबरच माझ झुरीचच तिकीट बुक कर आणि MJ बरोबर २७ ऑक्टोबर ची मिटिंग फिक्स कर. आणि हो, हॉटेल ब्लुमिंगटन मध्ये एक खोली २६-२८ ऑक्टोबर या दिवसां करिता बुक कर."
तिला आठवले - संजयने म्हटलेले अगदी तंतोतंत खरे होते! बॉस पुन्हा स्वित्झर्लंडची वार्षिक वारी करायला निघाला होता! सायलीने संजयला ताबडतोब बोलावून जे झाले ते सांगितले. दोघेही हे सारे पाहून अवाक झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायली ऑफिस मध्ये पोहोचली तेव्हा बॉस आधीच त्याच्या केबिन मध्ये पोहोचला होता. अस्वस्थ वाटत होता. तेवढ्यात सायलीचा फोन खणाणला.
"मी संजय बोलतोय"
"हं, बोल"
"बॉस काय म्हणतोय?"
"अस्वस्थ दिसतोय"
"मला वाटतंय सायली, आपण या प्रॉब्लेमच्या मुळाशी जायला हवे"
"म्हणजे?"
"बॉस झुरीचला कधी चाललाय?"
"२५ ऑक्टोबरला. आणि २८ ऑक्टोबरला परत"
"मग माझेहि झुरिचचे तिकीट बुक कर! पण जाताना २४ ऑक्टोबरच आणि येताना २९ ऑक्टोबरच! पण एक गोष्ट लक्षात ठेव - बॉसला मी त्याच्या मागावर आहे हे अजिबात समजता कामा नये!"
सायलीने संजयने सांगितले तसे केले. आणि संजयकरिता एक खोली हॉटेल ब्लुमिंगटन मध्ये बुक केली.
संजय जेव्हा २५ ऑक्टोबरला झुरीचला हॉटेल ब्लुमिंगटन मध्ये पोहोचला तेव्हा त्याने आपली रूम बॉसच्या समोरच्या विंग मध्ये बुक केली कि ज्यायोगे राजच्या रूममध्ये काय चालले आहे याची पुरेपूर कल्पना त्याला येईल. सार सेट झाल - राजची रूम होती ११० आणि संजयची २२०, अगदी समोरच, वरच्या मजल्यावर.
२६ ऑक्टोबर, राज ठरल्या प्रमाणे हॉटेल ब्लुमिंगटनला आला. संजयच्या ते लक्षात आले. संजयचे सारे लक्ष खोली नंबर ११० कडे होते. पण २६ ऑक्टोबरला रात्री काहीच झाले नाही. २७ ऑक्टोबर उजाडला. MJ बरोबर आज बॉसची मिटिंग होती. संजय सकाळपासून आतुरतेने बॉसच्या खोलीकडे डोळे लावून बसला होता. सकाळ तशीच गेली, १२ वाजले, १ वाजला, २ वाजले. पण राजच्या रूम मध्ये काहीच हालचाल नव्हती. दुपारचे ४ वाजले. रूम ११० मध्ये हालचाल झालेली संजयच्या लक्षात आली. राज बाहेर पडत होता. अंगात कोट आणि डोक्यावर हेट. संजय याच क्षणाची वाट पहात होता. संजयचा पोशाख सुद्धा काहीसा राजसारखाच होता. ओळखता न येण्याजोगा. संजय निघाला राजच्या मागावर.
दुपारी साधारण ४ ची वेळ. पण ऑक्टोबर एंड असल्याने हवा काहींशी थंडच होती. अंधार पडत होता. रस्त्यावर चिटपाखरू पण नव्हते. राज चालत होता. साधारण अर्धा किलोमीटर दूर अंडरग्राउंड रेल्वे स्टेशन होत: "रुदेशहेमर प्लात्झ." राज एस्कलेटरने खाली गेला. आणि प्लाटफॉर्म वर साधारण मध्यभागी असलेल्या बाकावर जाऊन बसला. तो ट्रेनची वाट बघत असावा. पुढची ट्रेन ४-४० ला होती. गाडी बरोबर वेळेवर आली. थांबली. राज क्षणभर उठून उभा राहिला आणि परत मटकन खाली बसला. संजय त्याला दुरून न्याहाळत होता. गाडी मिनिटभर थांबली. आणि मग ट्रेनची दारे बंद होऊ लागली. संजयला वाटल राज गाडीत चढेल - पण नाही. राज तसाच बसून राहिला. गाडी सुटली. राज डोक्याला हात लाऊन तसाच शून्यात नजर लाऊन बसला होता. साधारण १ तास भर! तसाच! मग तो उठला आणि लगबगीने चालू लागला हॉटेल ब्लुमिंगटनच्या दिशेने! आणि मग पुन्हा त्याच्या रूम मध्ये हालचाल नव्हती. राज MJ ला भेटायला गेलाच नव्हता!
राजची परतीची फ्लाईट २८ ऑक्टोबर, म्हणजे उद्याच्या रात्रीची होती. २८ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता राज पुन्हा रुदेशहेमर प्लात्झला जायला निघाला अन संजय त्याच्या मागावर. संजयने वेष हुबेहूब राजसारखाच केला होता - अंगात कोट आणि डोक्यावर हेट. संजयने राजचा २ मिनिटे पाठलाग केला. राज रुदेशहेमर प्लात्झला चाललाय याची खात्री करून घेतली. आणि तो पुन्हा हॉटेल ब्लुमिंगटनकडे वळला. हॉटेल रिसेप्शनला त्याने चावी मागितली - "रूम नंबर ११० प्लीज". आणि रिसेप्शनिस्टने रूम नंबर ११० ची चावी संजयच्या हातात ठेवली. दोघांचे पोषाख सारखे असल्याचा परिणाम!
संजय धडक बॉसच्या रूमकडे निघाला. राज आता २ तास तरी परत येणार नव्हता याची जाणीव संजयला पूर्णपणे होती. रूम उघडून तो आत पोहोचला. रूमचे पडदे लाऊन घेतल्याने आत अंधार होता. संजयने दिवे लावले. रूम न्याहाळून पाहिली. बाथरूम मध्ये डोकावून पाहिले. काहीच संशयास्पद दिसले नाही. तेवढ्यात त्याचे लक्ष समोरच्या टेबलवर गेलं. समोर राज चा कॉम्प्युटर चालू होता - आणि पाहतो तर काय! राजच फेसबुक अकौंट ओपन होतं ! एक वर्षापूर्वी संजयला ओपेन करता न आलेले राज चे फेसबुक अकौंट आज त्याच्या समोर ओपन होतं !! संजय राजच्या फेसबुक wall वरील मजकूर वाचू लागला.
२७ ऑक्टोबर २००५. माझी MJ बरोबरची मिटिंग चांगली झाली. आमच्या कंपनीला MJ च contract मिळाले. मिटिंग नंतर मी MJ ला विचारले: "can you drop me at हॉटेल ?"
"होय, निश्चितच! तुम्हाला येथील खाणाखुणा माहिती नसतील कदाचित. आपण अस करूयात - आपण अंडरग्राउंड ट्रेनने जाऊ. आणि हो, माझ्या मुलाला, Tom ला आपण घेऊन जाऊ." MJ म्हणाला.
"ठीक आहे!" मी म्हणालो.
आम्ही ४-१० ची ट्रेन घेतली. गाडी रुदेशहेमर प्लात्झला ४-४० ला पोहोचली. गाडी प्लाटफॉर्मवर थांबली. ट्रेन ची दारे हळूहळू उघडली. आम्ही सर्वजण खाली उतरलो. पण मला वाटल, Tom च ट्रेनमध्ये काहीतरी राहिले असावे. Tom, ८ वर्षाचा Tom मागे फिरला. आणि खाली उतरताना - जे नको होते तेच झाल. ते भयानक दृश्य. दोन दारांमध्ये Tom च अडकणे - आणि, आणि - संजय वाचत होता. आणि खाली लिहिले होतं - "Tom च्या मृत्यूस मीच जबाबदार नाही का? मीच MJ ला सोबत येण्याची विनंती केली - म्हणूनच सगळ झाल."
संजय मटकन खाली बसला. पण राजच्या ओपन Facebook अकौंटन संजयचं काम केल होत. त्याला राजच गुपित समजल होत. २७ ऑक्टोबर २००५ ला एक भीषण घटना घडली होती. MJ 's son Tom had died in a train accident . आणि मुख्य म्हणजे त्या घटनेला आपणच जबाबदार आहोत अस राज मानत होता. संजयला समजल - राजला MJ ला sorry म्हणायचं होत. पण MJ ला राज सामोरी जाऊ शकत नव्हता.
त्या दिवशी राज मुंबईला परतला आणि दुसऱ्या दिवशी संजय. पुन्हा पाहता पाहता वर्ष उलटल. २ ऑक्टोबर २००९ उजाडला. संजयला माहिती होत कि राज पुन्हा झुरीचची वारी करणार.
संजयने ठरविले - MJ ला भेटायचे. आणि तो २ दिवस आधीच झुरिचला पोहोचला. MJ ला भेटला आणि सारी गोष्ट सांगितली. Tom च्या मृत्यूबद्दल राज स्वतःलाच कस जबाबदार धरतो आहे याची कल्पना त्याने MJ ला दिली. MJ म्हणाला: "लेट मी सी व्हाट आय कॅन डू"
२७ ऑक्टोबर २००९ उजाडला. दुपारचे ४ वाजले. राज निघाला रुदेशहेमर प्लात्झला जायला. राज पाठोपाठ संजयहि निघाला. रुदेशहेमर प्लात्झच्या मध्यभागी असलेल्या बाकावर राज बसला. ४-४० ला ट्रेन आली. राज आ करून पाहत होता. आणि पाहतो तर काय - समोर गाडीतून MJ आणि Tom खाली उतरले. राज आश्चर्यचकित झाला.
"हेलो Mr. राज. How are you? Meet my son Tom!"
"But I thought he is no more. That train accident?"
"Of course - Tom survived!"
राजच्या आनंदाला पारावर उरला नाही. एक मोठे ओझे त्याच्या मनावरून उतरले होते. राजचे guilty feeling पार पळाले होते. त्याला नवजीवन मिळाले होते.
२८ ऑक्टोबर च्या रात्रीच्या flight ने राज परतला. संजयची flight २९ ऑक्टोबरला रात्री होती. २९ ऑक्टोबरला सकाळी संजय थेट पोहोचला ते MJ च्या ऑफिसात त्याचे आभार मानायला.
"Thank you MJ - for all you did for Raj" संजय म्हणाला.
"That's all right."
"Raj is relieved!"
"Yes. By the way, meet my son John!" MJ म्हणाला.
"John? or Tom?"
"No, John"
"and Tom?"
"Tom was John's twin brother." MJ म्हणाला.
"Where is Tom then?" संजयने विचारले.
"He is no more" MJ म्हणाला.
"What?" संजयने अवाक होऊन विचारले.
"Yes, Tom died in a train accident on 27 October 2005"
ग्रेट स्टोरी
ग्रेट स्टोरी .................मस्तच !!!!!!!!!!!
टचिंग!
टचिंग!
सही!
सही!
chan
chan
छान आणि वेगळी !
छान आणि वेगळी !
मस्तच !........
मस्तच !........
सुरेख!!!
सुरेख!!!
फारच रोमान्चक कथा आहे !
फारच रोमान्चक कथा आहे ! अक्ष्ररशः !!
क्या बात है बिनधास्त ..
क्या बात है बिनधास्त ..
सर्वाना: कथा आवडल्या बद्दल
सर्वाना: कथा आवडल्या बद्दल आणि अभिप्राया बद्दल धन्यवाद!
छान आहे ही सुद्धा पुलेशु
छान आहे ही सुद्धा पुलेशु
मस्त आहे कथा !!!
मस्त आहे कथा !!!
सुरेख................. अप्रति
सुरेख.................
अप्रतिम..............!
आवडेश.
मस्त आहे कथा. आवडली.
मस्त आहे कथा. आवडली.
छान
छान
ह्र्दय स्पर्शी ..............
ह्र्दय स्पर्शी .............. खुप छान
छान....... वाचायला मजा आली
छान....... वाचायला मजा आली
आवडली.
आवडली.
छान
छान
प्रिय Harshalc , कंसराज,
प्रिय Harshalc , कंसराज, तृष्णा, मामी, जाई.साहित्ययात्री, सोनु सोना, विनार्च, शिल्पा_के आणि सुन्या,
आपणा सर्वांच्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
- बिनधास्त
छान
छान
Writing on the Wall म्हणजे
Writing on the Wall म्हणजे काय? काही फ्रेज आहे का ?
आवडली.. MJ चं मन मोठं असणार
आवडली..
MJ चं मन मोठं असणार फार
शेळीताई आणि प्रज्ञासा, आपल्या
शेळीताई आणि प्रज्ञासा, आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
शेळीताई:
'Writing on the Wall' या फ्रेज चा अर्थ 'imminent doom or misfortune' असा आहे (पुढील लिंक पहा: http://en.wikipedia.org/wiki/The_writing_on_the_wall). मराठीत त्याचा अर्थ 'होऊ घातलेली दुर्घटना' असा होऊ शकेल.
मस्तच ! आवडली..
मस्तच ! आवडली..
छान आवड्ली
छान आवड्ली
सुरेख रेखाटली आहेत मनाची
सुरेख रेखाटली आहेत मनाची आंदोलनं .
खूपच छान..... धन्यवाद......
खूपच छान.....
धन्यवाद......
खुप छान कथा.. अन जरा हटके..
खुप छान कथा.. अन जरा हटके..
प्रिय सुजित, दिलीप, सुप्रिया,
प्रिय सुजित, दिलीप, सुप्रिया, विद्यासुत आणि भावना,
आपल्या प्रतिसाद बद्दल आणि कथा आवडल्या बद्दल धन्यवाद!