प्रतापगडावर अफजलखानाच्या वधानंतर महाराजानी दक्षिण मोहीम उघडली. अवघ्या अठरा दिवसात पन्हाळ्या पर्यंतचा मुलुख काबीज करुन, महाराजानी मिरजेच्या किल्ल्याला वेढा दिला. विजापूर दरबारात अफजलखानाच्या मृत्युची बातमी पोहचताच, दरबारात एकच शोककळा पसरली. अदिलशाही मुलखात सर्वत्र चाललेली लुटालूट, जाळपोळ या बातम्यानी अलीअदिलशाह आणखीनच त्रस्त झाला. त्यातच शिवाजी महाराज विजापूरवर स्वारी करुन तेथे दुसरा सुलतान नेमणार या बातमीने अलीअदिलशाहाचे धाबे धणाणले मदतीसाठी त्याने कुर्नुलचा पराक्रमी सरदार सिद्दी जोहरकडे धाव घेतली. सिद्दी जोहरहा युध्द निशाण्त, धाडसी आणि राजकारण जाणणारा कुशाग्र बुध्दीचा सरदार होता. त्याला सलाबतखान हा खिताब देवून, त्याबरोबर ४० हजार सैन्य दिले. या सैन्यात अनेक विजापूरी व मराठा सरदार होते. सैन्य घेवून सिद्दी जोहर स्वराज्यात दाखल झाला. या वेळी राजे मिरजेच्या वेढयावर होते.त्याना ही बातमी कळताच. सिद्दी जोहर सारख्या पराक्रमी सरदाराला थोपिविण्याची ताकद फक्त पन्हाळ्यातच आहे. हे ओळखून ते टाकोटाक पन्हाळ्यावर येऊन दाखल झाले. पुढे चाळीस दिवस हा वेढा चालू होता. येणार्या प्रत्येक संकटाला तोंड देत सिद्दी जोहर किल्ल्याला वेढा घालून बसला होता. संपूर्ण शरणागती या शिवाय दुसर्या कोणत्याही तहाला सिद्दी मान्यता देत नव्हता. आणि या पेचप्रसंगातून सुटण्यासाठी महाराजानी एक धाडसी योजना आखली.
दिनांक १३ जुलै १६६० च्या मध्यरात्री आषाढातल्या घनघोर वादळ-वार्यातून आणि पावसातून पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजाकडून ३०० मावळ्यांनसह राजे वेढा फोडून बाहेर पडले. आता लक्ष होते ते एकच, शत्रुला राजे गडावरुन निसटल्याची बातमी कळायच्या आत पन्हाळ्यापासून १४ कोस दुर असलेला 'खेळणा' गाठणे.
राजांच्या बरोबर बाजीप्रभु देशपांडे त्यांचा भाऊ फुलाजी आणि तीनशे बांदल आणि तितकेच भोइ मिळून ६०० आत माणुस बळ.
इकडे स्वत:चे कौतुक करुन घेत बसलेला मसुद आपण पकडून आणलेला 'शिवाजी' हा खोटा शिवाजी आहे हे कळताच हताश झाला संतापाने त्याने पुन्हा फौज बांधली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळगडाच्या वाटेला लागला.
तिकडे विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती. पालखिचे भोई रात्रभर धावत होते. धावता-धावता भोई पालखीचा खांदा बदलत होते आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून महाराजांचे डोळे पाण्याने भरून आले होते.
विशाळगड अजूनही खुप लांब होता. सर्वस्व पणाला लावून पालखीने गजापूरची घोडखिंड गाठली. गनिम दृष्टीपथात येताच बाजी प्रभुनी भोयांना पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली, राजे बाहेर येताच बाजी त्यांना म्हणाले, राजे तुम्ही पूढे व्हा! आणि खेळण्यावर पोहचा. "कितीही वेळ लागो एक गनिम या खिडीतून पुढे जाऊ देणार नाही".आणी पुढील इतिहास सर्वांना ठाऊकच आहे.
तर या घोडखिंडीतील ऐतिहासिक लढाईवर आधारीत असलेला, लेखक शैलेश निले आणि निर्माता सनद माने यांचा "वीर बाजीप्रभु देशपांडे" हा सिनेमा आता लवकरच आपल्या समोर येत आहे. या सिनेमात आतापर्यंत मराठी सिनेमात कधीही न पाहीलेले स्पेशल इफेक्टस, वापरले आहेत.
लिवोनिडास या ग्रीक वीराच्या थर्मपिलाय खिंडीतील पराक्रमी युद्धावर आधारीत असलेला '३००' हा सिनेमा.आपण पाहीला असेलच.
या सिनेमातील स्पेशल इफेक्टसवर ज्या तंत्रज्ञानी काम केलेय तीच टीम याही सिनेमावर काम करत आहे. आणि मला वाटत हा मराठीतील पहीला सिनेमा असावा जो जगभरात एकाच दिवशी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत रिलीज होणार आहे.
आता हा सिनेमा कसा असेल हे तो प्रदर्शित होईल तेंव्हाच कळेल.
वाह खुप काळानंतर ऐतिहासिक
वाह खुप काळानंतर ऐतिहासिक चित्रपट आणि तो सुद्धा आधुनिक तंत्रात.
>>पण आजवर मराठीमध्ये बनलेले अनेक ऐतिहासिक चित्रपट अगदिच सुमार होते.
या वाक्याशी असहमत, तसेच तिव्र निषेध. कारण हे चित्रपट ज्या काळात निर्माण झाले, त्या काळात निर्मात्यांना शक्य असणार्या प्रकारे त्यांनी ते बनविले होते. त्याचे कौतुक करायचे नसले तर करू नका, पण निदान अशी नावे तरी ठेवू नका.
महेश +१
महेश +१
महेश +१ परिचय छान करुन दिलाय
महेश +१
परिचय छान करुन दिलाय पण. चित्रपट पाहण्यास खूपच उत्सुक.
या चित्रपटाचे स्वागत करुच.
या चित्रपटाचे स्वागत करुच. आनंदही आहे.
पण भालजींना त्यांचे श्रेय द्यावेच लागेल.
अरे वा... बघायलाच हवा..
अरे वा... बघायलाच हवा..
छान तोंड ओळख. आल्यावर पहणार
छान तोंड ओळख. आल्यावर पहणार नक्की.
सहीच... नक्की पाहणार.
सहीच... नक्की पाहणार.
विजय, धन्यवाद !
विजय, धन्यवाद !
पाहणारच हा चित्रपट
पाहणारच हा चित्रपट
नक्किच पाहाणार .
नक्किच पाहाणार .
कधी येणार?
कधी येणार?
अरे वा, बाजी प्रभूंवर चित्रपट
अरे वा, बाजी प्रभूंवर चित्रपट - तो ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ......
असेच चित्रपट छत्रपती शिवराय व थोरले बाजीराव यांच्यावर काढले गेले पाहिजेत......
इतिहासातील प्रमुख
इतिहासातील प्रमुख व्यक्तिरेखांवर जवळपास सर्वच भारतीय भाषांतून जे चित्रपट निघाले ते त्या त्या काळात पाहताना तंत्रापेक्षा 'नायका' कडे पाहूनच तत्कालिक प्रेक्षकांनी पाहिले होते आणि त्यांची त्यापलिकडे जादाची कसली अपेक्षाही नसायची. (महेश यानी या संदर्भात मांडलेला मुद्दा तंतोतंत पटला आहे.....बहुधा विजयरावांनाही तो पटला असल्याने मूळ लेखातून 'तो' उल्लेख संपादित केल्याचे दिसत्ये, ते छान झाले.)
पण आता तंत्रविज्ञानाने कमालीचे बदल घडवून आणले आहेत जगभराच्या चित्रपटसृष्टीत, किंबहुना प्रेक्षकांना कथानक आकर्षित करते की स्पेशल इफेक्ट्स हाच मुद्दा होऊ पाहात आहे. [वर विजयरावांनी '३००' चे उदाहरण दिले आहे तेच या मुद्द्याशी सहमती दर्शविते].
पण ज्यावेळी विशिष्ट कालातील 'प्रमुख' व्यक्तीरेखेच्या कर्तृत्वाला मोलाचे योगदान दिलेल्या साथीदारांला केन्द्रीभूत धरून एखादी टीम तीवर चित्रपट तयार करण्याचा मानस व्यक्त करते त्यावेळी ती नक्कीच अभिनंदनीय गोष्ट बनते. मराठा इतिहासात तर बाजी प्रभु देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, संताजी-धनाजी आदी अनेक रत्ने आहेत की ज्यांचा जीवनपट तितकाच थरारक जितका थोरल्या राजांचा.
आगामी 'वीर बाजी प्रभु देशपांडे' चित्रपटासंदर्भात श्री.विजय आंग्रे यानी करून दिलेली तितकीच प्रभावी ओळख आवडली. चित्रपटाबाबत उत्सुकता जागृत केली आहे असेच म्हणावे लागेल.
(काहीसे अवांतर : चित्रपटाच्या शीर्षकात निर्मात्यांनी 'वीर' चे प्रयोजन कशासाठी केले आहे ते समजून येत नाही. खरेतर त्याची बिलकुल आवश्यकता नाही. 'बाजी प्रभु देशपांडे' हे केवळ नावच उच्चारताच प्रत्येक मराठी मनावर अभिमानाचे रोमांच उभे राहतात. 'वीर' हा उपसर्ग अकारण तिथे घेतला गेला आहे असे वाटते.)
अशोक पाटील
वा, छान. बाजिप्रभु आजही
वा, छान. बाजिप्रभु आजही प्रेरणादायी आहेत.
अशोकजी, अवांतराला थोडे
अशोकजी,
अवांतराला थोडे अवांतरः
प्रिफिक्स अन सफिक्स : prefix vs. suffix. उपसर्ग म्हणजे सफिक्स ना हो?
डॉक्टर ~ Prefix = उपसर्ग आणि
डॉक्टर ~
Prefix = उपसर्ग आणि Suffix = अंत्यविकरण.
दोन्हीही Verb Transitive आहेत; आणि "उप" हा Pre समवेत सांगड घालतो, तर "अंत्य" नामाप्रमाणेच Suf ची सोबत करतो.
अशोक पाटील
वीर बाजीप्रभु देशपांडे या
वीर बाजीप्रभु देशपांडे या मराठी सिनेमात 'बाजीप्रभु देशपांडे' यांची मुख्य भुमिका अजय देवगन करणार आहे असे या टाईम्सच्या बातमीत लिहलय.
कसा दिसेल अजय बाजींच्या वेषात.
----
It has been learnt through sources that Bollywood actor Ajay Devgn will be playing the iconic historical character of Baji Prabhu Deshpande in director Shailesh Nile's 50-crore Marathi project, Veer Baji Prabhu Deshpande.
देवगणचा अभिनय काजोलशी लग्न
देवगणचा अभिनय काजोलशी लग्न झाल्यापासुन बराच चांगला झालाय. असो, टीपिकल फिल्मबाजी डॉयलॉग नसतील अशी अपेक्षा आहे... अर्थात मराठीत तसं होत नाही, हा भाग वेगळा... उत्सुकता आहेच...
असेच चित्रपट छत्रपती शिवराय व थोरले बाजीराव यांच्यावर काढले गेले पाहिजेत......>>>> +१०००
खरं तर एका एका प्रसंगावर पुर्ण चित्रपट बनु शकेल....
nakki baghanar. phakt ya
nakki baghanar.
phakt ya vishayavaracha cinema changla asava hi apeksha
येस्स, बघायलाच हवा हा
येस्स, बघायलाच हवा हा चित्रपट. इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
>>>> 'वीर' हा उपसर्ग अकारण
>>>> 'वीर' हा उपसर्ग अकारण तिथे घेतला गेला आहे असे वाटते. <<<< सहमत.
पण गेल्या पाचपन्चवीस वर्षातिल ती फ्याशन बनलीये व कॉम्रेड या संज्ञेपासुन स्फुर्ती घेउन निरनिराळी विशेषणे जुनी अथवा नव्याने तयार करुन वापरली जातात.
काही घासुन गुळगुळीत झालेली ही विशेषणे (की उपसर्ग?) "ज्येष्ठ/ समाजवादी/ विचारवंत/ कॉम्रेड/ नामवंत / अमुकतमुकरावजी वगैरे वगैरे. मला वाटते की काकदृष्टीने बघत गेल्यास मायबोलीवर अशा निरर्थक व्यक्तिगुणविशयक ओढुनताणून चिकटवलेल्या विशेषणान्चा एक धागा बनु शकेल.
मस्त असेल हा सिनेमा.
मस्त असेल हा सिनेमा.