"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि आम्ही सहा वर्षे घालून शिकून, खेड्यात वीस तीस रुपये मिळवत बसतो >>>>>> त्यानंतर आयुष्यभर ते सहा महिने भरुन काढण्याचे निमित्त करत पेशंटच्या मढ्यावरचे लोणी खात बसतो! Sad लोक चार वर्षाचे इंजीनियरचे कौर्स करुन कंपनी देइल तोच पगार घेतात. इखाद्या इंजीनियरने भ्रष्टाचार केला आणी ते टिव्हि वर दाखवले म्हणुन सर्व इंजिनियर एकत्र येउन बहिष्कार नाहि टाकत वा कोणी असा आरोप करत नाहि की तुम्हि सर्व इंजीनियरचा अपमान करताय!

या एपिसोडशी संबधित मला ( मला का पाठवली हे कळले नाही) आलेली मेल
Respected Aamir Khan Ji I watched with shock and despair the Satyamev Jayate program of May 27, 2012. I am responding since you referred to me although you do not know me. I am the Nephrologist that you referred to while conversing with Mr. Rai. Mr. Ra...i has been making false and fabricated allegations for the past 2 years. While talking to you, in addition to providing you with false information, he also withheld crucial facts.Over the past 2 years, Mr. Rai has been harassing the Transplant surgeon and myself (Nephrologist) and the Hospital by filing multiple and concurrent complaints at various fora whether or not they have any role on his complaints. With his manipulations, he has succeeded to a great extent in bringing to a standstill transplant surgeries at the the Hospital which has caused a great deal of hardship to several patients. In addition, he has also caused immense damage to the noble field of cadaver transplantation in Karnataka State.Once you are aware of the actual facts, I have no doubt that you will express regret for having given platform to a sophisticated lier with immense theatrical and manipulative skills.Here are some facts that shed light on the truth. 1. Mr. Rai never informed you that Mrs. Seema Rai underwent cadaver donor transplantation and was registered for a cadaver transplantation more than one year prior to surgery. The phone call on the night of admission was made because a suitable cadaver donor had been identified by ZCCK (Government body that allocates cadaver organs) and not by the doctors or the Hospital. Cadaver transplantation has to be done emergently, otherwise the organ(s) will decay within hours and become useless. That is why the patient was admitted on Saturday night (1 May 2010). The patient and her family were all informed about risks and benefits of transplantation for more than 2 years (since June 2008). In fact, whenever the patient consulted me she was eager to get kidney transplant so that she could stop the misery of undergoing dialysis. You can ask any dialysis patient, they will inform that they do not want dialysis but prefer transplantation. 2. Mr. Rai, Mrs. Rai and Abha Rai all were again counseled for more than 1 hour on the night of admission about kidney and pancreas transplantation. Subsequently they also discussed with their relative in New York. Then on the night of 1 May itself Mr. Rai personally informed me and other doctors to proceed with kidney + pancreas transplantation. The Informed Consent form was signed on the night of 1 May itself and handed over the ward doctor. These facts have been documented by the nurse as well as the ward resident doctor. The State Medical Council as well as the National Law School of India have investigated the Informed Consent issue and clearly stated that Informed Consent was indeed taken prior to surgery. In fact, if the Informed Consent was not given on the night of 1 May, the cadaver organ would have been allocated to the next patient on the waiting list for cadaver transplantation who was also admitted to another Hospital on the same night for possible transplant surgery. (Whenever a cadaver donor is available, several patients on the waiting list such as Seema Rai are called and advised to get admitted so that the cadaver organ does not get wasted in case one or more patients are found to be unfit or do not want surgery.) If Mrs. Rai and her family had not consented for the surgery on the night of 1 May, then a surgeon from another Hospital would have proceeded to retrieve the cadaver organ on the night of 1 May. The surgeon from our hospital would have gone home. The very fact that our surgeon traveled on the midnight hours of Saturday to the donor Hospital and brought back the cadaver organs by about 5.30 AM on a Sunday morning suggests that the patient and family indeed had agreed for the surgery. 3. Mr. Rai also concealed from you the fact that he had telephoned the Nephrologist several times on the night of 1 May to seek help to arrange for a special medicine (Simulect) that was to be given to the patient in the Operating Theater before the transplant procedure. The Nephrologist had personally called the Pharmaceutical company on Saturday night to help Mr. Rai to procure the medicine. The Nephrologist had given personal surety to the Company since Mr. Rai told him that he did not have cash to purchase the medicine in the middle of the night. In fact, Mr. Rai procured the medicine at about 7.30 AM on 2 May (Sunday) and handed the same to the Operating theater staff. If the patient and Mr. Rai had not consented for the surgery, why would he purchase the medicine and hand it over to the Hospital staff? 3. Mr. Rai never asked the doctors or any other Hospital staff not to proceed with the surgery at any time. He was plainly lying when he made a statement to that effect to you. If in fact, the patient and her family had not consented for the surgery, that would have been Mr. Rai's first and major complaint when he filed an FIR with the police on 30 May 2010 accusing the doctors of murder. In his initial complaint to the police as well as to the State Medical Council, Mr. Rai never complained that he or the patient had not consented for the surgery. This fabricated allegation is clearly an afterthought on Mr. Rai's part. 4. The patient did not receive 119 units of blood, i.e., 60 liters of blood. She received 33 units of blood over 4 days which is about 13 liters of blood since she had developed a massive bleeding condition called Disseminated Intravascular Coagulation (DIC). She also received platelets, FFP and other blood products to correct DIC. The doctors never told Mr. Rai and his family that 390 cc of blood would be required. No doctor can predict the exact amount of blood loss in a given patient who undergoes surgery. Besides, the large requirement of blood in this patient was due to the fact she developed a medical complication called DIC which can happen after any major surgery or major trauma. Normally in transplant surgeries, we do not transfuse any blood at all. 5. The transplant surgeon is highly qualified to conduct pancreatic transplantation as well as kidney transplantation. He is trained at well known Hospitals in the United States where he had conducted numerous multi-organ transplantation surgeries. All relevant documents were reviewed by the Health Department before the Hospital was granted registration for multi-organ transplant surgeries in March 2010. 6. Mr. Rai was again lying when he stated that the doctors had switched off their phone on 6 May after the patient's death. In fact, Mr. Rai spoke to the doctors several times after the patient's death. This can be easily verified by looking at Mr. Rai's phone records. 7. The Hospital was registered for multi-organ transplantation. There was a clerical error in the Certificate which was acknowledged by the Health Department. The Health Department have clearly stated in their report that registration for liver includes pancreas as well (since the skill required for transplantation of both these organs is one and the same). 8. Mr. Rai also withheld from you that the Karnataka Medical Council has thoroughly investigated the case and found no evidence of any negligence on the part of the doctors. 9. Mr. Rai also withheld the fact the Hospital bill was not for the surgery alone. Most of the cost was due the use of blood and blood products and other medicines which was necessitated by the development of DIC and infection. If the patient had not developed DIC, the bill for a transplant surgery would have been about Rs. 3.5 lakhs. In fact, there was no additional charge for pancreas at all. Whether the patient received cadaver kidney or cadaver kidney + pancreas, the bill would have been the same. There was absolutely no financial motive in recommending the combined surgery. The surgeon recommended combined surgery because diabetic kidney failure patients do much better with combined cadaver kidney + pancreas surgery than cadaver kidney transplant alone. This has been well established in the medical literature. The surgeon made the recommendation with the best interest of the patient in mind. Even todate Mr. Rai has not produced any scientific evidence or professional opinion to contradict the recommendation of the transplant surgeon. All transplant specialists who have reviewed the case (from AIIMS-New Delhi, PGI-Chandigarh, Chennai, Bangalore, and USA) have unanimously opined that the patient received the best possible treatment and that her death, although very unfortunate, was not due to any negligence on the part of the doctors or the Hospital. 10. Mr. Rai also did not inform you on the Air that he has filed a complaint with the Consumer Forum seeking compensation of Rs. 84,55,933/-. I am sure Mr. Rai has used his theatrical skills to convince you and your team about his false allegations. I am also confident that you will realize the lapse your research team has done once all the facts become apparent. I am enclosing a detailed Medical History as well and other documents that shed light on true facts.After my medical college, I studied and then worked in the United States for nearly 16 years. I came back with a dream to serve my countrymen. However, now after going through the mental trauma caused by a reckless individual who is inadvertently abetted by a corrupt officialdom and a thoughtless media, I am beginning to wonder if I made a mistake in returning to India. Perhaps, I should also go back to the United States like the doctor that you showed in the opening sequence of your program who returned to the UK because of the corrupt system in India. I invite you and your team to visit the Hospital, meet other patients who have undergone/undergoing dialysis, patients who have had transplant surgery, and meet the Transplant surgeon so that you can clarify all the facts for yourself.Please do not hesitate to contact me if you need any clarifications. -Dr. R. Sreedhara +91-98801-50813

कुठलेही ऑर्ग ट्रान्सप्लाम्ट अचानक करता येत नाही... नातेवाइकाना याबाबत कल्पना दिलेली असतेच.. सहा महिने वर्ष अशी वाट पाहिल्यानंतर ग्राफ्ट मिळाला की अशा सर्जरी होतात.. त्याच्या मॅचीम्गसाठी पेश्म्तच्याही अनेक तपासण्या कराव्या लागतात.. जेंव्हा ग्राफ्ट सूट होईल हे समजते तेंव्हाच पेशंतल अ‍ॅड्मिट केले जाते. त्यामुळे अचानक कल्पना न देता किडनी बदलायची सर्जरी केली हे हास्यास्पद आहे. किडनी म्हणजे काही कांदा बटाटा नव्हे, असा अचानक बाजारात मिळायला.

मंदार कागलकर, मी तुम्हाला दिलेली सुचना तुम्हि फारच सिरियसपणे घेतली याबद्दल अभिनंदन! आता नावहि बदला! Biggrin

LAST NAIL IN THE COFFIN- डॉ अरुण गद्रे
'सत्यमेव जयते' ही आमिर खानची मालिका सध्या गाजतेय...चर्चेचा विषय ठरतेय...तेरा भागांच्या या मालिकेत दर आठवड्याला एका ज्वलंत समस्येला तो हात घालतोय...तिचे विविध पैलू समाजासमोर मांडतोय...गेल्या आठवड्यात त्यानं उलगडला वैद्यकीय क्षेत्रातला अनाचार...हा भाग पाहून काही डॉक्‍टर-मंडळी चिडली-संतापली..."आमिर खाननं माफी मागावी' अशी जोरदार मागणी त्यांनी केली... या पार्श्‍वभूमीवर एका डॉक्‍टरांनीच त्यांच्या व्यावसायिक मित्र-मैत्रिणींशी साधलेला हा संवाद...

प्रिय डॉक्‍टर सहकारी मित्र-मैत्रिणींनो,
आपल्या डॉक्‍टर-मंडळींकडून आमीर खानच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमाविरुद्ध गरळ ओकलं जात आहे, हे पाहून मला थोडा खेद वाटला आणि माझी थोडी करमणूकही झाली; तरी मला त्याचं आश्‍चर्य अजिबातच वाटलं नाही.

डॉक्‍टरांच्या गैरव्यवहारांचा असा जाहीर पंचनामा करायला आमीर खान कसा "नालायक' आहे आणि आम्हाला नैतिकतेचे डोस पाजायला असा हा कोण "टिकोजीराव' लागून गेला आहे, हे दाखवून देण्यासाठी "फेसबुक'सारख्या सोशल मीडियात अक्षरशः पत्रांचा रतीब सुरू आहे!

अमर्त्य सेन यांनी आम्हा भारतीयांना "वाद घालणारे' असं संबोधल आहे (ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स) व गौतम अधिकारी यांनी आपल्या सर्वाना संबोधले आहे "असहिष्णू' (इनटॉलरन्ट). आपल्याला हे असं संबोधलं जाण्यात नवल काहीच नाही. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा पायाच मुळी "बहुमतवाद' हा आहे. अर्थातच एक पक्की समान फूटपट्टी नाहीच आपल्याजवळ अन्‌ "वादे वादे' सत्य समजतं अशी आपली धारणा! त्यामुळं "सत्यमेव जयते' म्हणताना "सत्य म्हणजे काय?' हा प्रश्‍न महत्त्वाचा अन्‌ त्यामुळं आमिर खान कोण लागून गेला आपली फूटपट्टी आम्हाला लावणारा, असा तारस्वरातला कोलाहलही समजण्यासारखा आहे; म्हणून मी काही वादात पडत नाही.

मला फक्त एवढंच निदर्शनात आणून द्यायच आहे, की आमिर खाननं आपल्यापुढं केवळ एक आरसा ठेवला आहे. बस्स.
आमिर खान नवं आणि काहीतरी धक्कादायक सांगतोय, असंही नाहीए. आपल्या वैद्यकीय क्षेत्रात ही चर्चा प्रत्येक मीटिंगमध्ये अनेक वर्षं होत आलेली आहे. आमिर खानमुळं घडल आहे इतकंच, की ही आपली खासगी चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे!

आरसा कधी खोट बोलू शकत नाही; पण जेव्हा आपली सद्‌सद्विवेक बुद्धी आपण खूप खोलवर गाडून टाकलेली असते, तेव्हा आरसा जे काही दाखवतोय, ते पाहणं सोपं नसतं.
आपला वैद्यकीय व्यवसाय दिवसेंदिवस; निदान गेल्या वीस वर्षात तरी; किती रसातळाला चालला आहे, हे एक स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून जवळपास 25 वर्षं व्यवसाय करताना मी पाहत आलोय आणि मला त्याच्या अत्यंत वेदना झालेल्या आहेत. अर्थात अनेक सन्माननीय या सर्व घसरणीला अपवाद होते, आहेत व यापुढंही असतील; परंतु दुर्दैवानं ही संख्या खूपच थोडी आहे अन्‌ दिवसेंदिवस ही संख्या घटतही आहे... आणि कटू असलं तरी हेही वास्तव आहे की, आम्ही निर्ढावलेले झालो आहोत.

आमच्याच रुग्णालयातून औषधं खरेदी केली जावीत, अशी सक्तीच आम्ही रुग्णांवर करत आहोत. अर्ध्या किमतीत मिळालेली "सॅम्पल'ही आम्ही शेजारच्या दुकानदाराला किंवा रुग्णाला विकतो.

आम्ही महाग, ब्रॅंडेड औषधं प्रिस्क्राईब करतो...मात्र, या ब्रॅंडना इतर काही स्वस्त ब्रॅंड वा जेनेरिक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचीही तसदी आम्ही घेत नाही. आम्ही औषध कंपन्यांच्या पैशावर देशात व परदेशांत कॉन्फरन्सना जातो व मजा मारतो. छोट्या-मोठ्या भेटी तर आम्हाला सतत मिळतच असतात. शेजारचा केमिस्ट, आम्ही व औषध कंपन्या यांच्या संगनमतानं आम्ही काही महाग औषधांचा मारा आमच्या रुग्णांवर करत असतो; कारण याला "स्कीम' असते. हो, अन्‌ या औषध कंपन्या आमच्यासाठी वेळोवेळी "प्रशिक्षणासाठीच्या "मीटिंग' आयोजित करत असतात अन्‌ त्यात आमच्यातलेच काहीजण "फुकट मिळतेय' म्हणून इतकी ढोसतात, की त्यांना उचलून कारमध्ये ठेवावं लागतं!

आम्ही सहजपणे "सीयूटी' घेतो/ देतो. "कमिशन'साठीचा हा आमचा लाडका शब्द! आम्ही जर "जीपी' असू; तर आम्हाला या वाढत्या स्पर्धेत व महागाईत असे रुग्ण पाठवणारं "कुरिअर सेंटर' बनावंच लागतं. आम्ही घासाघीस करत, जो कमिशन जास्त देईल त्याच्याकडं रुग्णांना- गरज असो वा नसो- पाठवतो. बदल्यात "पाकीट' मिळतं. आम्ही जर "कंन्सल्टंट' असू वा "हॉस्पिटल' वा "कॉर्पोरेट हॉस्पिटल' असू, तर आमचे "पीआरओ' फिरत असतात सर्वत्र "मांडवली' करत! आणि हो, आम्ही चढत्या क्रमानं "कमिशन' देत असतो. हल्ली "कॉर्पोरेट हॉस्पिटल'पुढं सामान्य "हॉस्पिटल' तग धरूच शकत नाही. यात रुग्णाचा विचार "एक बकरा' असाच असतो! आम्हाला इतर सर्वांसारखंच झटकन मालामाल व्हायचं आहे. आम्हीही या सडत जाणाऱ्या भारतीय समाजातच वाढलो आहोत अन्‌ आम्हालाही इतरांएवढंच भ्रष्ट असण्याचा (भारतात जन्म घेतल्यामुळं) जन्मसिद्ध अधिकार आहे अन्‌ आम्ही तो बजावणारच!
आम्ही अजिबात जीनिअस वगैरे नाही. आम्ही खरं पाहता "सुदैवी गाढव' आहोत! कारण, परीक्षेत पाठ करण्याची क्षमता आहे व पूर्वसुरींनी जे ज्ञान आमच्यासाठी ठेवलंय ते आम्ही पाठीवर वाहत असतो!

नवे शोध लागत आहेत... आम्ही हातात फावडं घेऊन तयारच आहोत नवंनव्या औषधांचा, तंत्रज्ञानाचा अन्‌ शस्त्रक्रीयांचा वापर रुग्ण नावाच्या "बकऱ्या'वर करायला; मग त्याची गरज असो अगर नसो! अन्‌ ह्या सगळ्या "रुग्णरूपी मूर्ख गाई'सुद्धा "कसाया'लाच धार्जिण्या आहेत! तेच तर आमचे भांडवल आहे.
आम्हाला दर महिन्याला पगार मिळावा अन्‌ प्रायव्हेट प्रॅक्‍टिसही करायला मिळावी, यासाठीच आम्ही सरकारी नोकरी वा सरकारी हॉस्पिटलमध्ये "ऍटॅचमेंट' घेतो; तीही भरपूर लाच देऊन! अन्‌ सरकार ती परवानगी देते, तर कुणाच्या पोटात का दुखावं? आम्ही तर सर्वांमध्ये "लूट' वाटून खातो; म्हणजे रिक्षावला, आयाबाई, वॉर्डबॉय ते आरएमओ हे सर्व बांधून घेतलेले असतात. सरकारी यंत्रणा कशी बिघडत जाईल, हेही आम्ही पाहतो. म्हणजे नैतिक अधिकारानं आम्हाला रुग्णाला घाबरवता येतं, की "बघ बुवा, इथं मरशील, त्यापेक्षा माझ्या "प्रायव्हेट'मध्ये चल!' अर्थात सरकारी हॉस्पिटल कुणासाठी आहेत? गरीब काय करेल? हे प्रश्‍न आम्ही विचारतच नाही.

सोनोग्राफीनं स्त्री-गर्भ ओळखून तो मारण्यात आम्ही वाकबगार आहोत, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. पूर्वी आम्ही स्पेशल गाड्यांमध्ये बाया बसवून गुजरातमध्ये घेऊन जायचो... पोटातलं पाणी काढून ते तपासायला... हल्ली सोनोग्राफीनं खूप सोपं केलंय! लोक हातात पैशाच्या थप्प्या घेऊन आमच्या मागं येतात. हे खरं आहे, की आम्ही कुणीच असे गर्भपात केले नाहीत, तर असं काही होऊच शकणार नाही; पण जर आम्ही आरोग्यसेवा विकायलाच बसलेले असू, तर त्यात वावगं काय?

एक छान पॅकेज शोधलं आहे आम्ही सर्व चाचण्यांचं; मग त्यांना काहीही शास्त्रीय आधार असो वा नसो. आम्ही त्यातल्या बारीक बारीक कमी-जास्त निकालांवर बोट ठेवतो अन्‌ रुग्णाला गरज नसलेल्या पुढच्या चाचण्या, प्रोसिजर अन्‌ शस्त्रक्रियांमध्ये अडकवतो. आता रुग्णाचा खर्च इतका वाढला आहे, की अगदी नवश्रीमंतसुद्धा घाबरलेले असतात येणाऱ्या आजारपणाला!

आमच्यातली काही "थोर' मंडळी तर मृत शरीरसुद्धा "आयसीयू'मध्ये "ऍडमिट' करतात! त्याला व्हेंटिलेटर लावतात! हे फक्त "हिमनगाचं टोक' आहे.
मित्र-मैत्रिणींनो, तुमच्यासाठी यातलं काहीही नवीन नाही नि धक्कादायकही नाही; मग आमिर खानचा आरसा का बरं नकोसा वाटावा आपल्या सगळ्यांना?
त्यामागं येशू ख्रिस्ताच्या त्या प्रसिद्ध गोष्टीतल्यासारखा प्रकार आहे. धर्मपुढाऱ्यांनी जेव्हा एका व्यभिचारी स्त्रीला न्यायदानासाठी ख्रिस्ताकडं आणलं तेव्हा ख्रिस्तानं नव्हतं का त्यांना विचारलं, "ज्यानं कुणी पाप केलं नाही, त्यानं या व्यभिचारी स्त्रीला प्रथम धोंडा मारावा...' हे ऐकून सगळ्यांनीच तिथून काढता पाय घेतला...

आज ही आमिर खानला नेमका याच पद्धतीनं विरोध होताना दिसत आहे. म्हणजे आम्ही डॉक्‍टर जरी या गोष्टीतली "व्यभिचारी स्त्री' असलो, तरी आमिर खान (या गोष्टीतला धर्मपुढारी) - ज्यानं स्वत: सहचारिणीला सोडून दिलं आहे दुसऱ्या स्त्री साठी, जो स्वत: या आमच्या न्यायदानाची मागणी करताना कोट्यवधी रुपये कमावणार आहे- अशा आमिर खाननं आमच्यावर मुळात आरोपच का ठेवावा? किंबहुना आज आम्हा वैद्यकीय व्यावसायिकांवर धोंडा मारायचा अधिकारच कुणाचा आहे, या समाजात? असा प्रश्‍न आम्ही विचारतो आहोत. आमच्या या प्रश्‍नात जरूर तथ्य आहे.

या गोष्टीत ख्रिस्त पुढं त्या स्त्रीला म्हणतो, "जा, मीही तुला दोषमुक्त केलं आहे...' मात्र, एवढ्यावरच ती गोष्ट संपत नाही. त्या स्त्रीला माफ केल्यावर ख्रिस्त पुढं तिला काय म्हणाला हेही आम्हाला ठाऊक नाही नि ते जाणून घ्यायचीही आमची इच्छा नाही. गोंधळ आहे, तो तिथं आहे!
ख्रिस्त त्या स्त्रीला पुढं म्हणाला होता, "जा. पुन्हा पाप करू नको!'

"पुन्हा पाप करू नको,' या अटीवर ही माफी आहे. ही अट मान्य असेल तरच ही गोष्ट अर्थपूर्ण आहे. आम्ही जर पुढं सतत पाप करतच रहाणार असू, तर आमिर खानविरुद्धच्या आमच्या कोणत्याच आक्षेपाला, वादावादीला, तक्रारीला काहीही नैतिक अधिकार नाही.
आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण सर्वजण उभे आहोत. जर आमचे मार्ग आम्ही बदलले नाहीत, तर पुढं फक्त अनर्थ आहे. आज फक्त आरसाच उभा आहे; पण आत्ताच मार्ग काढला नाही, तर पुढं येईल चीड, वैफल्य व संताप यांचा झंझावात!

आमची, आम्हा सर्वांची - म्हणजे रुग्णांची, सरकारी धोरणांची अन्‌ वैद्यकीय व्यवसायाच्या धोरणांची - मुख्य चूक झालेली आहे ती ही, की "आरोग्य व आरोग्यसेवा ही एक ग्राहकानं खरेदी करण्याची वस्तू' असं आम्ही मान्य केलं आहे. या गेल्या 20 वर्षांत जागतिकीकरण, उदारीकरण व चंगळवादाचा झंझावात आम्हाला सतत हे बजावत आहे, की "आरोग्य व आरोग्यसेवा ही विक्रीची गोष्ट आहे, एखाद्या साबणासारखी/दारूसारखी!'
पण तसं अजिबात नाहीए ते. "जगण्याचा हक्क' हा माणसाचा मूलभूत मानवी हक्क आहे. आरोग्य आणि आरोग्यसेवा या माणसाला जगण्यासाठी आवश्‍यक आहेत. म्हणून आरोग्य व आरोग्यसेवा हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. गरीब वा श्रीमंत अशा सर्वांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळणं हा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे.

नेमका रुग्णाच्या या अधिकाराच्या दृष्टिकोनाचाच रुग्णासह आम्हा सर्वांना विसर पडला आहे. "आरोग्य ही एक उपभोग्य विक्रीची गोष्ट,' अशा धोरणांमुळं हा हाहाकार उडाला आहे. यामुळं भारतात 25 टक्के लहान बालकं कुपोषित आहेत. 80 टक्के आरोग्यसेवा ही खासगी क्षेत्राच्या अखत्यारीत आहे. सरकारी आरोग्य सेवा मरू घातलेली, कुपोषित, भ्रष्ट व संवेदनाहीन आहे. खासगी सेवा या मनमानी फी घेणाऱ्या, काहीही उत्तरदायित्व नसणाऱ्या, रुग्णाचा अधिकार विचारात न घेणाऱ्या व काहीही "ट्रीटमेंट प्रोटोकॉल' अस्तित्वातच नसणाऱ्या आहेत. सगळी अनागोंदी आहे. भरीला रुग्णांच्या नातलगांकडून केले जाणारे हल्ले अन्‌ राजकीय नेत्यांचं "वसुली सत्र'! रुग्ण दाद मागू शकेल, अशी एकही कार्यक्षम यंत्रणा नाही. नुसतं "जंगलराज' आहे.

आमिर खानचा "आरसा' आम्हाला हेच सांगतोय. ही वेळ आता वादविवादाची नाही; चिखलफेकीची नाही. ही वेळ आहे आपली स्वत:ची या सडक्‍या व्यवस्थेतली जबाबदारी मान्य करण्याची; प्रामाणिक कबुलीजबाब देण्याची व सर्वांना बरोबर घेऊन काही मार्ग शोधण्याची.
मार्ग नक्कीच आहे. आरोग्यसेवा यथायोग्य किमतीत, गुणवत्तेनं सर्वत्र, सर्वांना, गरिबांना व श्रीमंताना, सरकारी व खासगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये ठरवलेल्या "ट्रीटमेंट प्रोटोकॉल'सह देता येतील... या व्यवस्था किमानपक्षी उत्तरदायी असतील... रुग्ण दाद मागेल, अशी एक यंत्रणा असेल.... हे सगळं घडू शकेल. अनेक देशांमध्ये ही अशी पद्धत आहे. कॅनडामध्ये अशी व्यवस्था 1960 मध्ये सुरू झालेली आहे. युरोपमध्येही ती आहे. विकसनशील देशांतदेखील थायलंड, मलेशिया, ब्राझील, कोरिया व श्रीलंका या सर्व देशांनी त्यांची आरोग्यव्यवस्था ही "रुग्णाचा मूलभूत हक्क' म्हणून मान्य केलेली आहे. तिला "व्यापारी गिधाडां'च्या झडपेतून मुक्त केलेलं आहे.

"सर्वांसाठी आरोग्यसेवा' म्हणजेच "युनिव्हर्सल हेल्थ केअर' (यूएचसी) ही आरोग्यसेवेची पद्धत तिथं अस्तित्वात आहे. तीत "डायरेक्‍ट टॅक्‍स'मधून व "सोशल इन्शुरन्स'नं रुग्णाचा खर्च भागवला जातो. स्वतःच्या खिशातून रुग्णाला एक नवा पैसाही द्यावा लागत नाही. केंद्रपातळीवर असा मोबदला देणारी व्यवस्था असल्यामुळं अर्थातच वर सांगितलेलं सर्व नियंत्रण शक्‍य होतं.

"तुम्हाला ट्रीटमेंट परवडणार आहे का?' हा प्रश्‍न आलेल्या रुग्णाला विचारावा न लागणं,यात किती सुख आहे, ते मित्र-मैत्रिणींनो, मला वाटतं तुम्हा सर्वांनाच समजत असेल. आपण डॉक्‍टरही अखेर माणसंच आहोत अन्‌ शेवटी प्रत्येक रुग्णावर उपचार करता येणं यासारखा दुसरा आनंद नाही!
हे सगळं स्वप्नवत्‌ व अशक्‍य वाटतंय, हे खरं आहे; पण जर पुढचा हाहाकार टाळायचा असेल, तर समाज म्हणून आपल्याला रुग्णाचा हक्क जपणारी ही व्यवस्था आणण्यासाठीचे प्रयत्न करावेच लागतील. हे नक्कीच घडेल. त्यासाठी आता डॉक्‍टरांनीच पुढाकार घ्यायला हवा.
सामान्य माणसांचं मोल लोकशाहीप्रणालीत राजकीय नेते जाणून असतात. जर मागणी करण्यात आली तर किंवा जर नेत्यांना या अशा व्यवस्थेतले राजकीय फायदे समजले, तर मला खात्री आहे, की प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात हे आश्‍वासन नक्की असेल!
काहीच अशक्‍य नाही. कारण शेवटी सत्यच जिंकतं!
सत्यमेव जयते!!

या पेक्षा आणखी काय बोलायचे??

कालांतराने लोकसत्तेच्या लिंका मरतात. हे आहे रविवारचे संजय उवाच

पुढे मुद्दाम डकवतो आहे.>>

संजय उवाच : तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म? Bookmark and Share Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार,१० जून २०१२
काय झालंय नेमकं माझ्या लाडक्या वैद्यकीय व्यवसायाला? सत्यमेव जयते म्हणायचं आणि संपूर्ण व्यवसाय हा जणू असत्य आणि अनीतीने बरबटला आहे, असे दाखवायचे? वैद्यकात जर अधर्म असेल तर त्याचे सवंग; बाजारू; पिटातल्या प्रेक्षकांसाठी प्रदर्शन करणे हा कोणता धर्म ठरतो? रथाचं चाक जमिनीत रुतल्यावर, ‘थांब पार्था’ म्हणणाऱ्या कर्णाच्या हतबलतेला सडेतोड उत्तर देताना- ‘तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’ हा प्रश्न विचारणाऱ्या कृष्णाच्या भूमिकेत संजय आज शिरतो आहे. फरक एवढाच आहे की, पार्थाच्या हाती गांडीव होते, कृष्णाच्या हाती सारथ्य तर माझ्या हाती लेखणी आहे.
वैद्यकाचा व्यवसाय झाला आहे हे जितके सत्य आहे तितकेच या व्यवसायालाही कायद्याचे; नियमांचे; नीतीचे कुंपण आहे हेही पूर्णसत्य आहे. इंद्रिय-रोपण शस्त्रक्रिया राज्य स्तरावरील समितीने संमती दिल्याशिवाय देशात करता येत नाही. अशा रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार असते. जेव्हा एखादा मेंदू-मृत (Cadaver)) रुग्ण दाता म्हणून मिळतो, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता रुग्णालयाची प्रशासकीय व्यवस्था संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून शस्त्रक्रियेला अनुमती देते. या शस्त्रक्रिया अतितातडीच्या गणल्या जातात. कारण प्रत्येक क्षणाचा विलंब रोपित करावयाच्या इंद्रियांचा ऱ्हास करतो. अशा रुग्णाच्या नातेवाईकांना आपल्याला आपल्या रुग्णाला कोणत्याही क्षणी दाखल करावे लागेल याची मानसिक; शारीरिक आणि आर्थिक तयारी ठेवावीच लागते. तेव्हा या शस्त्रक्रिया नातेवाईकांच्या संमतीशिवाय (Informed Consent) होतील हे शक्य नाही. या ऑपरेशन्सची व्याप्ती एवढी मोठी असते की ३०+ बाटल्या रक्त ही नित्याचीच गोष्ट आहे. ब्लड बँक या संपूर्ण रोपण कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग बनते, ती त्याचमुळे. थोडक्यात काय नखं कापल्यासारखे यकृत कापता येत नाही आणि जयपूर फूट बसविल्यासारखे रोपण करता येत नाही. झालंय काय, की अपयश स्वीकारायला अजून समाज प्रगल्भ झालेला नाही. पैशाने प्रयत्न विकत घेता येतील, पण परिणाम खरेदी होत नाहीत. पूर्वी आम्ही अनिश्चिततेला Glorious Uncertainty म्हणायचो आता त्याची गणना Breach of trust मध्ये होते आहे. वैद्यक क्षेत्रासमोरचा संभ्रम असा आहे की, कोणता रुग्ण कधी तुमच्यावर असंतोष, अविश्वास आणि आरोप व्यक्त करेल, याचा आताशा अंदाज येत नाही. याचे दोन दुष्परिणाम संभवतात. एक तर डॉक्टर मंडळी मोजूनमापून सुरक्षित वैद्यक (Defensive medicine) प्रॅक्टिस करू लागतील आणि रुग्णाचे आणि संशोधनकार्याचे नुकसान होईल आणि दुसरे म्हणजे रुग्ण डॉक्टरकडे संशयास्पद दृष्टीने पाहू लागेल. संशयपिशाच्च मानगुटीवर बसले की, त्याचा परिणाम रुग्ण लवकर बरा न होण्यावर होईल. वैद्यक क्षेत्रातील कट्स-कमिशन हा विषय गेली ३० वर्षे चघळला जातो आहे. मला याचा तिटकारा आहे. हे जमणार नाही, म्हणूनच मी महानगरपालिकेच्या सेवेत आहे, हे जसे सत्य आहे तसेच खासगी व्यवसाय प्रामाणिकपणे करणारे; रुग्णांकडे पैशाचा तगादा न लावणारेही अनेक खाजगी व्यावसायिक आहेत, हेही सत्य आहे. मग या कमिशन्सना चाप लावण्यासाठी पळवाटा बुजविलेले कठोर कायदे करून ते राबविणे किंवा त्या ‘रेफिरग डॉक्टर्सना’ रुग्णाच्या प्रत्यक्ष शुश्रूषेत सहभागी करून घेऊन त्या ३० टक्क्य़ांच्या सेवा-मोल म्हणून अधिकृतता देणे हे दोन करण्याजोगे पर्याय मला दिसतात. मी कटची भलामण करीत नाही, पण भस्मासुराला शांतविण्याचा मार्ग शोधतो आहे आणि सुजाण समाजानेही अंतर्मुख व्हावे, ही प्रार्थना.
‘बेसिन टेस्ट’ म्हणून रुग्णाचे रक्त काढून बेसिनमध्ये फेकून देण्याचा अघोरी प्रकार डॉक्टर करत असतील, यावर माझा विश्वास नाही. उलट रुग्णाचे गोळा केलेले रक्त भरलेल्या छोटय़ा सॅम्पल बाटलीला धक्का लागून ते सांडले तर उदास होऊन दिवसभर स्वत:ला उपाशी ठेवणारे माझे रेसिडेंट डॉक्टर मी पाहिले आहेत. प्रश्न हा आहे की, तुम्ही समाजात डॉक्टरचे रूप काय म्हणून रंगविता आहात? आम्ही देवदूत नाही, तसेच दैत्यही नाही. विघ्नहर्ते नाही तर कर्मकर्ते आहोत. संकटमोचक हनुमान नाही तर आरोग्यवर्धक अश्विनीकुमार आहोत. ऊन-सावल्या आम्हालाही लाभल्या आहेत आणि कधी कधी काळवंडलेली सावली प्रत्यक्ष मूर्तीपेक्षा अधिक लांबलचक पडते, त्यातला हा प्रकार आहे. मंद, स्निग्ध प्रकाश देणाऱ्या वैद्यक नंदादीपाच्या पायाशी पडलेला हा क्षणक अंधार आहे. तेव्हा ऊठसूट वैद्यक सत्तेला झोडपायचे उद्योग बंद व्हायलाच हवेच. आज विज्ञान युगात कोणत्याही आजाराची लक्षणे; उपचार; अंदाजे किंमत या साऱ्या गोष्टी इंटरनेटच्या बटणावर आहेत. सेकंड ओपिनिअनच काय फेसबुकवर गेलात तर तुमच्या मनातल्या शंकेला शंभर उत्तरं काही क्षणांत मिळती आहेत. मग अविश्वास दाखवून डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, स्वत:ची बाजू मांडण्याची संधीही न देण्याचा प्रयत्न हा ‘सत्यमेव जयते’च्या सदरात सादर झाला तरी सत्यापासून फारकत घेता झाला हेच म्हणावे लागेल.
समाजात अनेक गोष्टी न रुचणाऱ्या घडतात; त्या आपल्याला कष्टी करतात. तेव्हा आपण मूग गिळून गप्प बसतो. Times have changed असे म्हणून अप्रत्यक्षपणे संमतीची मोहोर उठवितो. आज माझे जीवन ज्याच्याशी १०० टक्के एकरूप झाले आहे, अशा वैद्यकावर बेफाम आरोप झाल्यावर मी शांत राहू इच्छित नाही तर आरोप करणाऱ्या; अनेक अल्पमती जीवांना विचारू इच्छितो..
‘तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’

'सत्यमेव जयते' ही आमिर खानची मालिका सध्या गाजतेय...चर्चेचा विषय ठरतेय...तेरा भागांच्या या मालिकेत दर आठवड्याला एका ज्वलंत समस्येला तो हात घालतोय...तिचे विविध पैलू समाजासमोर मांडतोय...गेल्या आठवड्यात त्यानं उलगडला वैद्यकीय क्षेत्रातला अनाचार...हा भाग पाहून काही डॉक्‍टर-मंडळी चिडली-संतापली..."आमिर खाननं माफी मागावी' अशी जोरदार मागणी त्यांनी केली... या पार्श्‍वभूमीवर एका डॉक्‍टरांनीच त्यांच्या व्यावसायिक मित्र-मैत्रिणींशी साधलेला हा संवाद...

प्रिय डॉक्‍टर सहकारी मित्र-मैत्रिणींनो,
आपल्या डॉक्‍टर-मंडळींकडून आमीर खानच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमाविरुद्ध गरळ ओकलं जात आहे, हे पाहून मला थोडा खेद वाटला आणि माझी थोडी करमणूकही झाली; तरी मला त्याचं आश्‍चर्य अजिबातच वाटलं नाही.

डॉक्‍टरांच्या गैरव्यवहारांचा असा जाहीर पंचनामा करायला आमीर खान कसा "नालायक' आहे आणि आम्हाला नैतिकतेचे डोस पाजायला असा हा कोण "टिकोजीराव' लागून गेला आहे, हे दाखवून देण्यासाठी "फेसबुक'सारख्या सोशल मीडियात अक्षरशः पत्रांचा रतीब सुरू आहे!

अमर्त्य सेन यांनी आम्हा भारतीयांना "वाद घालणारे' असं संबोधल आहे (ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स) व गौतम अधिकारी यांनी आपल्या सर्वाना संबोधले आहे "असहिष्णू' (इनटॉलरन्ट). आपल्याला हे असं संबोधलं जाण्यात नवल काहीच नाही. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा पायाच मुळी "बहुमतवाद' हा आहे. अर्थातच एक पक्की समान फूटपट्टी नाहीच आपल्याजवळ अन्‌ "वादे वादे' सत्य समजतं अशी आपली धारणा! त्यामुळं "सत्यमेव जयते' म्हणताना "सत्य म्हणजे काय?' हा प्रश्‍न महत्त्वाचा अन्‌ त्यामुळं आमिर खान कोण लागून गेला आपली फूटपट्टी आम्हाला लावणारा, असा तारस्वरातला कोलाहलही समजण्यासारखा आहे; म्हणून मी काही वादात पडत नाही.

मला फक्त एवढंच निदर्शनात आणून द्यायच आहे, की आमिर खाननं आपल्यापुढं केवळ एक आरसा ठेवला आहे. बस्स.
आमिर खान नवं आणि काहीतरी धक्कादायक सांगतोय, असंही नाहीए. आपल्या वैद्यकीय क्षेत्रात ही चर्चा प्रत्येक मीटिंगमध्ये अनेक वर्षं होत आलेली आहे. आमिर खानमुळं घडल आहे इतकंच, की ही आपली खासगी चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे!

आरसा कधी खोट बोलू शकत नाही; पण जेव्हा आपली सद्‌सद्विवेक बुद्धी आपण खूप खोलवर गाडून टाकलेली असते, तेव्हा आरसा जे काही दाखवतोय, ते पाहणं सोपं नसतं.
आपला वैद्यकीय व्यवसाय दिवसेंदिवस; निदान गेल्या वीस वर्षात तरी; किती रसातळाला चालला आहे, हे एक स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून जवळपास 25 वर्षं व्यवसाय करताना मी पाहत आलोय आणि मला त्याच्या अत्यंत वेदना झालेल्या आहेत. अर्थात अनेक सन्माननीय या सर्व घसरणीला अपवाद होते, आहेत व यापुढंही असतील; परंतु दुर्दैवानं ही संख्या खूपच थोडी आहे अन्‌ दिवसेंदिवस ही संख्या घटतही आहे... आणि कटू असलं तरी हेही वास्तव आहे की, आम्ही निर्ढावलेले झालो आहोत.

आमच्याच रुग्णालयातून औषधं खरेदी केली जावीत, अशी सक्तीच आम्ही रुग्णांवर करत आहोत. अर्ध्या किमतीत मिळालेली "सॅम्पल'ही आम्ही शेजारच्या दुकानदाराला किंवा रुग्णाला विकतो.

आम्ही महाग, ब्रॅंडेड औषधं प्रिस्क्राईब करतो...मात्र, या ब्रॅंडना इतर काही स्वस्त ब्रॅंड वा जेनेरिक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचीही तसदी आम्ही घेत नाही. आम्ही औषध कंपन्यांच्या पैशावर देशात व परदेशांत कॉन्फरन्सना जातो व मजा मारतो. छोट्या-मोठ्या भेटी तर आम्हाला सतत मिळतच असतात. शेजारचा केमिस्ट, आम्ही व औषध कंपन्या यांच्या संगनमतानं आम्ही काही महाग औषधांचा मारा आमच्या रुग्णांवर करत असतो; कारण याला "स्कीम' असते. हो, अन्‌ या औषध कंपन्या आमच्यासाठी वेळोवेळी "प्रशिक्षणासाठीच्या "मीटिंग' आयोजित करत असतात अन्‌ त्यात आमच्यातलेच काहीजण "फुकट मिळतेय' म्हणून इतकी ढोसतात, की त्यांना उचलून कारमध्ये ठेवावं लागतं!

आम्ही सहजपणे "सीयूटी' घेतो/ देतो. "कमिशन'साठीचा हा आमचा लाडका शब्द! आम्ही जर "जीपी' असू; तर आम्हाला या वाढत्या स्पर्धेत व महागाईत असे रुग्ण पाठवणारं "कुरिअर सेंटर' बनावंच लागतं. आम्ही घासाघीस करत, जो कमिशन जास्त देईल त्याच्याकडं रुग्णांना- गरज असो वा नसो- पाठवतो. बदल्यात "पाकीट' मिळतं. आम्ही जर "कंन्सल्टंट' असू वा "हॉस्पिटल' वा "कॉर्पोरेट हॉस्पिटल' असू, तर आमचे "पीआरओ' फिरत असतात सर्वत्र "मांडवली' करत! आणि हो, आम्ही चढत्या क्रमानं "कमिशन' देत असतो. हल्ली "कॉर्पोरेट हॉस्पिटल'पुढं सामान्य "हॉस्पिटल' तग धरूच शकत नाही. यात रुग्णाचा विचार "एक बकरा' असाच असतो! आम्हाला इतर सर्वांसारखंच झटकन मालामाल व्हायचं आहे. आम्हीही या सडत जाणाऱ्या भारतीय समाजातच वाढलो आहोत अन्‌ आम्हालाही इतरांएवढंच भ्रष्ट असण्याचा (भारतात जन्म घेतल्यामुळं) जन्मसिद्ध अधिकार आहे अन्‌ आम्ही तो बजावणारच!
आम्ही अजिबात जीनिअस वगैरे नाही. आम्ही खरं पाहता "सुदैवी गाढव' आहोत! कारण, परीक्षेत पाठ करण्याची क्षमता आहे व पूर्वसुरींनी जे ज्ञान आमच्यासाठी ठेवलंय ते आम्ही पाठीवर वाहत असतो!

नवे शोध लागत आहेत... आम्ही हातात फावडं घेऊन तयारच आहोत नवंनव्या औषधांचा, तंत्रज्ञानाचा अन्‌ शस्त्रक्रीयांचा वापर रुग्ण नावाच्या "बकऱ्या'वर करायला; मग त्याची गरज असो अगर नसो! अन्‌ ह्या सगळ्या "रुग्णरूपी मूर्ख गाई'सुद्धा "कसाया'लाच धार्जिण्या आहेत! तेच तर आमचे भांडवल आहे.
आम्हाला दर महिन्याला पगार मिळावा अन्‌ प्रायव्हेट प्रॅक्‍टिसही करायला मिळावी, यासाठीच आम्ही सरकारी नोकरी वा सरकारी हॉस्पिटलमध्ये "ऍटॅचमेंट' घेतो; तीही भरपूर लाच देऊन! अन्‌ सरकार ती परवानगी देते, तर कुणाच्या पोटात का दुखावं? आम्ही तर सर्वांमध्ये "लूट' वाटून खातो; म्हणजे रिक्षावला, आयाबाई, वॉर्डबॉय ते आरएमओ हे सर्व बांधून घेतलेले असतात. सरकारी यंत्रणा कशी बिघडत जाईल, हेही आम्ही पाहतो. म्हणजे नैतिक अधिकारानं आम्हाला रुग्णाला घाबरवता येतं, की "बघ बुवा, इथं मरशील, त्यापेक्षा माझ्या "प्रायव्हेट'मध्ये चल!' अर्थात सरकारी हॉस्पिटल कुणासाठी आहेत? गरीब काय करेल? हे प्रश्‍न आम्ही विचारतच नाही.

सोनोग्राफीनं स्त्री-गर्भ ओळखून तो मारण्यात आम्ही वाकबगार आहोत, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. पूर्वी आम्ही स्पेशल गाड्यांमध्ये बाया बसवून गुजरातमध्ये घेऊन जायचो... पोटातलं पाणी काढून ते तपासायला... हल्ली सोनोग्राफीनं खूप सोपं केलंय! लोक हातात पैशाच्या थप्प्या घेऊन आमच्या मागं येतात. हे खरं आहे, की आम्ही कुणीच असे गर्भपात केले नाहीत, तर असं काही होऊच शकणार नाही; पण जर आम्ही आरोग्यसेवा विकायलाच बसलेले असू, तर त्यात वावगं काय?

एक छान पॅकेज शोधलं आहे आम्ही सर्व चाचण्यांचं; मग त्यांना काहीही शास्त्रीय आधार असो वा नसो. आम्ही त्यातल्या बारीक बारीक कमी-जास्त निकालांवर बोट ठेवतो अन्‌ रुग्णाला गरज नसलेल्या पुढच्या चाचण्या, प्रोसिजर अन्‌ शस्त्रक्रियांमध्ये अडकवतो. आता रुग्णाचा खर्च इतका वाढला आहे, की अगदी नवश्रीमंतसुद्धा घाबरलेले असतात येणाऱ्या आजारपणाला!

आमच्यातली काही "थोर' मंडळी तर मृत शरीरसुद्धा "आयसीयू'मध्ये "ऍडमिट' करतात! त्याला व्हेंटिलेटर लावतात! हे फक्त "हिमनगाचं टोक' आहे.
मित्र-मैत्रिणींनो, तुमच्यासाठी यातलं काहीही नवीन नाही नि धक्कादायकही नाही; मग आमिर खानचा आरसा का बरं नकोसा वाटावा आपल्या सगळ्यांना?
त्यामागं येशू ख्रिस्ताच्या त्या प्रसिद्ध गोष्टीतल्यासारखा प्रकार आहे. धर्मपुढाऱ्यांनी जेव्हा एका व्यभिचारी स्त्रीला न्यायदानासाठी ख्रिस्ताकडं आणलं तेव्हा ख्रिस्तानं नव्हतं का त्यांना विचारलं, "ज्यानं कुणी पाप केलं नाही, त्यानं या व्यभिचारी स्त्रीला प्रथम धोंडा मारावा...' हे ऐकून सगळ्यांनीच तिथून काढता पाय घेतला...

आज ही आमिर खानला नेमका याच पद्धतीनं विरोध होताना दिसत आहे. म्हणजे आम्ही डॉक्‍टर जरी या गोष्टीतली "व्यभिचारी स्त्री' असलो, तरी आमिर खान (या गोष्टीतला धर्मपुढारी) - ज्यानं स्वत: सहचारिणीला सोडून दिलं आहे दुसऱ्या स्त्री साठी, जो स्वत: या आमच्या न्यायदानाची मागणी करताना कोट्यवधी रुपये कमावणार आहे- अशा आमिर खाननं आमच्यावर मुळात आरोपच का ठेवावा? किंबहुना आज आम्हा वैद्यकीय व्यावसायिकांवर धोंडा मारायचा अधिकारच कुणाचा आहे, या समाजात? असा प्रश्‍न आम्ही विचारतो आहोत. आमच्या या प्रश्‍नात जरूर तथ्य आहे.

या गोष्टीत ख्रिस्त पुढं त्या स्त्रीला म्हणतो, "जा, मीही तुला दोषमुक्त केलं आहे...' मात्र, एवढ्यावरच ती गोष्ट संपत नाही. त्या स्त्रीला माफ केल्यावर ख्रिस्त पुढं तिला काय म्हणाला हेही आम्हाला ठाऊक नाही नि ते जाणून घ्यायचीही आमची इच्छा नाही. गोंधळ आहे, तो तिथं आहे!
ख्रिस्त त्या स्त्रीला पुढं म्हणाला होता, "जा. पुन्हा पाप करू नको!'

"पुन्हा पाप करू नको,' या अटीवर ही माफी आहे. ही अट मान्य असेल तरच ही गोष्ट अर्थपूर्ण आहे. आम्ही जर पुढं सतत पाप करतच रहाणार असू, तर आमिर खानविरुद्धच्या आमच्या कोणत्याच आक्षेपाला, वादावादीला, तक्रारीला काहीही नैतिक अधिकार नाही.
आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण सर्वजण उभे आहोत. जर आमचे मार्ग आम्ही बदलले नाहीत, तर पुढं फक्त अनर्थ आहे. आज फक्त आरसाच उभा आहे; पण आत्ताच मार्ग काढला नाही, तर पुढं येईल चीड, वैफल्य व संताप यांचा झंझावात!

आमची, आम्हा सर्वांची - म्हणजे रुग्णांची, सरकारी धोरणांची अन्‌ वैद्यकीय व्यवसायाच्या धोरणांची - मुख्य चूक झालेली आहे ती ही, की "आरोग्य व आरोग्यसेवा ही एक ग्राहकानं खरेदी करण्याची वस्तू' असं आम्ही मान्य केलं आहे. या गेल्या 20 वर्षांत जागतिकीकरण, उदारीकरण व चंगळवादाचा झंझावात आम्हाला सतत हे बजावत आहे, की "आरोग्य व आरोग्यसेवा ही विक्रीची गोष्ट आहे, एखाद्या साबणासारखी/दारूसारखी!'
पण तसं अजिबात नाहीए ते. "जगण्याचा हक्क' हा माणसाचा मूलभूत मानवी हक्क आहे. आरोग्य आणि आरोग्यसेवा या माणसाला जगण्यासाठी आवश्‍यक आहेत. म्हणून आरोग्य व आरोग्यसेवा हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. गरीब वा श्रीमंत अशा सर्वांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळणं हा रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे.

नेमका रुग्णाच्या या अधिकाराच्या दृष्टिकोनाचाच रुग्णासह आम्हा सर्वांना विसर पडला आहे. "आरोग्य ही एक उपभोग्य विक्रीची गोष्ट,' अशा धोरणांमुळं हा हाहाकार उडाला आहे. यामुळं भारतात 25 टक्के लहान बालकं कुपोषित आहेत. 80 टक्के आरोग्यसेवा ही खासगी क्षेत्राच्या अखत्यारीत आहे. सरकारी आरोग्य सेवा मरू घातलेली, कुपोषित, भ्रष्ट व संवेदनाहीन आहे. खासगी सेवा या मनमानी फी घेणाऱ्या, काहीही उत्तरदायित्व नसणाऱ्या, रुग्णाचा अधिकार विचारात न घेणाऱ्या व काहीही "ट्रीटमेंट प्रोटोकॉल' अस्तित्वातच नसणाऱ्या आहेत. सगळी अनागोंदी आहे. भरीला रुग्णांच्या नातलगांकडून केले जाणारे हल्ले अन्‌ राजकीय नेत्यांचं "वसुली सत्र'! रुग्ण दाद मागू शकेल, अशी एकही कार्यक्षम यंत्रणा नाही. नुसतं "जंगलराज' आहे.

आमिर खानचा "आरसा' आम्हाला हेच सांगतोय. ही वेळ आता वादविवादाची नाही; चिखलफेकीची नाही. ही वेळ आहे आपली स्वत:ची या सडक्‍या व्यवस्थेतली जबाबदारी मान्य करण्याची; प्रामाणिक कबुलीजबाब देण्याची व सर्वांना बरोबर घेऊन काही मार्ग शोधण्याची.
मार्ग नक्कीच आहे. आरोग्यसेवा यथायोग्य किमतीत, गुणवत्तेनं सर्वत्र, सर्वांना, गरिबांना व श्रीमंताना, सरकारी व खासगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये ठरवलेल्या "ट्रीटमेंट प्रोटोकॉल'सह देता येतील... या व्यवस्था किमानपक्षी उत्तरदायी असतील... रुग्ण दाद मागेल, अशी एक यंत्रणा असेल.... हे सगळं घडू शकेल. अनेक देशांमध्ये ही अशी पद्धत आहे. कॅनडामध्ये अशी व्यवस्था 1960 मध्ये सुरू झालेली आहे. युरोपमध्येही ती आहे. विकसनशील देशांतदेखील थायलंड, मलेशिया, ब्राझील, कोरिया व श्रीलंका या सर्व देशांनी त्यांची आरोग्यव्यवस्था ही "रुग्णाचा मूलभूत हक्क' म्हणून मान्य केलेली आहे. तिला "व्यापारी गिधाडां'च्या झडपेतून मुक्त केलेलं आहे.

"सर्वांसाठी आरोग्यसेवा' म्हणजेच "युनिव्हर्सल हेल्थ केअर' (यूएचसी) ही आरोग्यसेवेची पद्धत तिथं अस्तित्वात आहे. तीत "डायरेक्‍ट टॅक्‍स'मधून व "सोशल इन्शुरन्स'नं रुग्णाचा खर्च भागवला जातो. स्वतःच्या खिशातून रुग्णाला एक नवा पैसाही द्यावा लागत नाही. केंद्रपातळीवर असा मोबदला देणारी व्यवस्था असल्यामुळं अर्थातच वर सांगितलेलं सर्व नियंत्रण शक्‍य होतं.

"तुम्हाला ट्रीटमेंट परवडणार आहे का?' हा प्रश्‍न आलेल्या रुग्णाला विचारावा न लागणं,यात किती सुख आहे, ते मित्र-मैत्रिणींनो, मला वाटतं तुम्हा सर्वांनाच समजत असेल. आपण डॉक्‍टरही अखेर माणसंच आहोत अन्‌ शेवटी प्रत्येक रुग्णावर उपचार करता येणं यासारखा दुसरा आनंद नाही!
हे सगळं स्वप्नवत्‌ व अशक्‍य वाटतंय, हे खरं आहे; पण जर पुढचा हाहाकार टाळायचा असेल, तर समाज म्हणून आपल्याला रुग्णाचा हक्क जपणारी ही व्यवस्था आणण्यासाठीचे प्रयत्न करावेच लागतील. हे नक्कीच घडेल. त्यासाठी आता डॉक्‍टरांनीच पुढाकार घ्यायला हवा.
सामान्य माणसांचं मोल लोकशाहीप्रणालीत राजकीय नेते जाणून असतात. जर मागणी करण्यात आली तर किंवा जर नेत्यांना या अशा व्यवस्थेतले राजकीय फायदे समजले, तर मला खात्री आहे, की प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात हे आश्‍वासन नक्की असेल!
काहीच अशक्‍य नाही. कारण शेवटी सत्यच जिंकतं!
सत्यमेव जयते!!

या पेक्षा आणखी काय बोलायचे??

कळत नाहि म्हणुन परत परत बोलायचे !

हेच, संजय उवाच, मागल्या रविवारचे वाचा.
"संजय उवाच : सामाजिक भान"
वैद्यकिय पेशातील वाईटाबद्दल चिंतन आहे..
पण याही माणसाला (यांचा करिक्युलम व्हिटे वाचा) तुमचा व्हॅक्यूम क्लीनर डिलिवरि स्पेशाळिस्ट आयायटी ट्रेण्ड आमीर 'टोचला'.. विद्ध करून गेला..

संजय ओक कोण आहेत, त्यांचे स्टँडिंग काय आहे हे आधी वाचा. कुणीही आयुर्वेदिक वैद्य नावापुढे 'डॉक्टर' लिहितो आजकाल.. असले स्टँडिंग अरूण गद्रेंचे सापडले नाही. सापडले ते हे..

डॉक्टरानी किती पैसा घ्यायचा हे आमीर खान कोण ठरवनार? एक तासाच्या अँकरिंगला लाख रुपये घेणारे असतात तसेच तीन कोट घेणारेही असतात... एक तासाच्या अँकरिंगला आमीर ला तीन कोटी मिळतात... त्यामानाने मोठ मोठ्या सर्जरी ६-७ तास उभे राहून करणार्‍या सर्जनना २-४ लाख मिळत असतील तर ते कमीच आहेत नै का?

डॉ गद्रे गायनॅक, ग्रामिण भागात काम करणरे, सामाजिक दृष्टीकोन असणारे, लेखकही आहेत. त्यानी म्हटलंय तसे डॉक्टर नसतात असे नाही पण फक्त तसेच असतात असेही नाही. Happy

एक विनंती.
हा धागा सार्वजनिक आहे. या ग्रुपची, धागा वाचणार्‍या आणि चर्चेत सहभागी होणार्‍या सदस्यांची संख्या दोनपेक्षा (बरीच) जास्त आहे. त्यामुळे इथे जे काही म्हणणे मांडले जाते ते व्यासपीठावरून मांडले जाते आहे, एकास एक संभाषणात नव्हे, हे लक्षात घ्यावे . सगळ्या सदस्यांना वाचावेसे वाटेल असे लिहावे. धुळवडीच्या धुरळ्यामुळे मूळ विषयाशी संबंधित महत्व्वाची चर्चा थांबली आहे हे लक्षात घ्यावे.

या प्रतिसादानंतर मला 'तिसरा' करण्याचा प्रयत्न झाला तर तो अजिबात यशस्वी होणार नाही याची खात्री धरावी.

विषयाशी संबंध नसलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांप्रती क्षमस्व.

मयेकरांना अनुमोदन!
सर्वसामान्यांच्या मनात फक्त या एपिसोडमुळे वैद्यकपेशाबद्दल राग, अविश्वास इ.इ. निर्माण होईल/होतो आहे असे जर डॉ.ओकांना सुचवायचे असेल तर तो फारच भाबडेपणा ठरेल. हा राग आणि अविश्वास गेले कित्येक वर्षे आहे आणि तो सातत्याने वाढतो आहे. त्याची दखल त्यांच्या 'वैद्यकसत्ते'ने याआधी घेतल्याचे मला तरी आठवत नाही.
आता जेंव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'एकांगी' झोड उठल्याने निदान लोकांच्या मनात खदखदणारा राग उफाळून वर आला आहे. त्यामुळे 'तेंव्हा कुठे गेला होता' हा प्रश्न डॉक्टरांनी स्वतःलाही विचारुन पहावा.
मंद, स्निग्ध प्रकाश देणाऱ्या वैद्यक नंदादीपाच्या पायाशी पडलेला हा क्षणक अंधार आहे. >>> हे एवढेच आहे असे जर डो.ओकांसारख्या विचारी व्यक्तीला वाटत असेल तर भविष्य अवघड आहे.

भरत मयेकरांना अनुमोदन. वादाचे मुद्दे विपुमधे मांडावेत आणि शंका दूर करून घ्याव्यात. हा विषय कुस्तीचा आखाडा होण्यासारखा नाहीच.

डॉ संजय ओक यांचं म्हणणं पटलं. डॉ अरूण गद्रेंनी ही तळमळीने लिहीले आहे.

रुग्ण दगावल्यावर होणारे हल्ले हा समर्थनाचा विषय नाही. ९९ टक्के केसेस मधे पेशंटस हल्ले करत नाहीत. या बाजूबद्दल का बोललं जात नाही ? डॉक्टरांच्या मजबुरीबद्दल जितकं बोललं जातं तितकं पेशंटच्या समजुतदार पणाबद्दल का बोललं जात नाही ? मी स्वतः मला अनुभव येऊन देखील तक्रार करत नाही. खूप जण करत नाहीत. मुळात पेशंटला विश्वासात घेतलं कि ही भीती उरतच नाही. मग कायद्याचा बाऊ कशासाठी ? कुठलं असं क्षेत्र आहे ज्याला कायदे लागू नाहीत ? समस्या तेव्हां निर्माण होते जेव्हां डॉक्टरांना पेशंटच्या नातेवाईकांशी बोलायचं सुद्धा नसतं. फक्त फॉर्मवर सही घ्यायला सिस्टर येते. ऑपरेशन झाल्यावर सर्जन कधी निघून जातात हे समजतही नाही. पेशंट जर लब्धप्रतिष्ठित व्यक्ती असेल तर मात्र सर्जन आवर्जून थांबून इंग्लीश मधे माहीती देतो. काय झालं हे समजायला कधी कधी ज्या डॉक्टरांच्या मार्फत ही ट्रीटमेंट चालू आहे ते यायची वाट अहावी लागते. अशा वेळी जर काही विपरीत घडलं तर संशय निर्माण होणं स्वाभाविक नाही का ? माझ्या पुतणीचं हार्टचं ऑपरेशन झालं. डॉक्टर बाहेर येण्याची मी वाट पाहत होतो. ते बाहेर आल्याबरोबर मी प्रश्नार्थक बोट करून भेटायची विनंती केली. चार तास ऑपरेशन केल्यावर एकदम भेटणं योग्य वाटलं नाही. सकाळी देखील त्यांनी दुसरीकडे दोन शस्त्रक्रिया केल्या होत्या. पण त्यांनी खूण केल्याबरोबर इतरही पेशंट्सचे नातेवाईक तिथं आले. अचानक गर्दी झाल्याने डॉक्टर माझ्यावर डाफरले आणि निघून गेले. या पेशंट्सचा वास्तविक या सर्जनशी काहीच संबंध नव्हता. त्यांच्या अज्ञानामुळे ते तिथं आले. डॉक्टरांचं वागणं समजण्यासारखं होतं. पण माझ्या नात्यातले एक अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं आल्यावर मात्र हेच सर्जनसाहेब त्यांना सगळी माहिती देऊ लागले. पुढे या पो. साहेबांनी मला माझ्या पुतणीची माहिती दिली. हे मला आयुष्यभर खटकणार नाही का ?

राजकिय क्षेत्रातल्या व्यक्तींच्या बाबतीत मात्र डोक्टरांवर अन्याय होतो हे सर्वांन माहीत आहे. त्याला उपाय काय ? सगळेच पीडीत आहे त्यांच्याकडून. त्यांच खापर सगळ्या पेशंटसवर फोडण्यात अर्थ नाही. हा सामना डॉक्टर वि पेशंट्स असा रंगवण्यात तर अजिबातच अर्थ नाही.

हे कायदे हल्लीच बनवले गेले. ते बनवायची गरज का पडली याबद्दल माहिती दिली गेली पाहीजे. किडनी ट्रान्स्पान्टच्या रॅकेटचं एक प्रकरण काही काळापूर्वी खूप गाजलं होतं. जे जे हॉस्पीटलमधे बनावट औषधांमुळे रुग्ण दगावण्याचं प्रकरणही गाजलं होतं. गरीबांना फसवून किडनी काढण्याचे प्रकारही उघडकीस आले होते. किती डॉक्टरांनी पुढे येऊन या प्रकाराचा निषेध केला ? आयएमए ने त्या वेळी अशा घटनांमुळे वैद्यकिय व्यवसाय बदनाम होतो आहे म्हणून या डॉक्टरांच्या याद्या प्रसिद्ध करून त्यांचा बहिष्कार का केला नाही ? आता प्रामाणिक डॉक्टर्सची गरज या दोषी डॉक्टरांना वाटते आहे. या प्रामाणिक लोकांच्या पुण्याईवर त्यांच्या बहिष्काराच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. प्रामाणिक पणे व्यवसाय करणा-यांना आमीरखानचा हा एपिसोड पटला नसल्यास त्यांनी त्याचा निषेध जरूर करावा, न्यायालयातही खेचावे पण ज्यांच्यामुळे शिंतोडे उडताहेत त्यांना मोकाट का सोडावे ?

<< त्यानी म्हटलंय तसे डॉक्टर नसतात असे नाही, पण फक्त तसेच असतात असेही नाही.>> एक्झॅक्टली साती ! ह्या वाक्यातील दोन्ही भाग सारखेच महत्वाचे आहेत.

भरत मयेकर, आगाऊ आणि किरण ह्यांना अनुमोदन.

<< मंद, स्निग्ध प्रकाश देणाऱ्या वैद्यक नंदादीपाच्या पायाशी पडलेला हा क्षणक अंधार आहे. >>> हे एवढेच आहे असे जर डो.ओकांसारख्या विचारी व्यक्तीला वाटत असेल तर भविष्य अवघड आहे.>> आगाऊ, +१

सत्यपरिस्थिती मान्य केल्याशिवाय मार्ग सापडणं शक्यच नाही. प्रामाणिकपणे काम करणार्‍या डॉक्टर्सनी ही जबाबदारी उचलायला हवी. सुरूवातीला कठीण जाईल, कदाचित बराच वेळ लागेल....पण बदलेल परिस्थिती.

<< .. सांगायचंय ते एवढंच की, शतके उलटतात, संवत्सरे बदलतात; पण मूळ मुद्दा तसाच राहतो. वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक भान न सोडलेलेच बरे ! >> हे वाक्य डॉ. संजय ओकांच्याच "सामाजिक भान" ह्या लेखातील आहे. लिन्क - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229966:2012-06-01-12-07-00&catid=373:2012-01-02-08-22-20&Itemid=381

<< ऑपरेशन झाल्यावर सर्जन कधी निघून जातात हे समजतही नाही. पेशंट जर लब्धप्रतिष्ठित व्यक्ती असेल तर मात्र सर्जन आवर्जून थांबून इंग्लीश मधे माहीती देतो.>>
अगदी बरोब्बर.
माझा अनुभव सागते. इथे मालदीवमध्ये काम करायला सुरूवात केली तेव्हा माझ्या सवयीप्रमाणे सिझेरियननंतर सगळी परिस्थिती सांगण्यासाठी "बाळाच्या वडिलांना रिकव्हरी रूममध्ये बोलवा" असे मी नर्सला सांगितले.

ऑपरेशन अगदी साधं-सरळ झालं होतं. कसलीही गुंतागुंत झाली नव्हती. ती नर्स माझ्याकडे इतक्या विचित्र पद्धतीने बघायला लागली....." बाळाच्या वडिलांना काय सांगणार ? कशाला ? त्याची काय गरज ? आधीचे डॉक्टर्स असं करत नव्हते. इथे तशी पद्धत नाही " ..... बराच वेळ वाद घातला तिने.
(मालदीवमध्ये Hierarchy नाही. त्यामुळे कुणीही कुणाशीही कुठल्याही विषयावर वाद घालू शकतं !....बर्‍याच भारतीयांना हे आवडत नाही. मला आवडतं.)

पण माझं ठाम मत आहे की पेशंटच्या बाबत जे काही घडत आहे, गुंतागुंत होवो अथवा न होवो, ते पेशंटच्या नातेवाईकांना वरचेवर अपडेट करत राहणं, हा उपचारांचा आवश्यक भाग असायला हवा.

(अर्थात इथे थोडं तारतम्य पेशंटच्या नातेवाईकांनी सुद्धा दाखवायलाच हवं. नवरा/बायको, आई/वडील अशा फर्स्ट डिग्री रिलेटिव्हजना सगळं समजावून सांगितलेलं असताना दर दहा मिनिटांनी एक दूरचा काका, मग मामा, मग कुठली तरी मावशी असे एकेकजण येत राहिले तर प्रत्येकवेळी सगळी परिस्थिती तितक्याच सविस्तरपणे सांगणं कुठल्याच डॉक्टरला शक्य नाही!)

डॉक्टर्सवर असलेला एकूण वर्कलोड कमी करणं, सगळ्या वैद्यकीय व्यवसायात काही प्रमाणात तरी स्टॅण्डर्डायझेशन आणणं, सामान्य जनतेला सर्व आजारांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध करून देणं...अशा काही उपायांनी परिस्थिती बदलायला मदत होईल.

<< किती डॉक्टरांनी पुढे येऊन या प्रकाराचा निषेध केला ? आयएमए ने त्या वेळी अशा घटनांमुळे वैद्यकिय व्यवसाय बदनाम होतो आहे म्हणून या डॉक्टरांच्या याद्या प्रसिद्ध करून त्यांचा बहिष्कार का केला नाही ?>> +१

<< ज्यांच्यामुळे शिंतोडे उडताहेत त्यांना मोकाट का सोडावे ?>> +१००००

रुणुझुणु

अतिशय संयत आणि सुंदर प्रतिसाद. मनापासून आभार. प्रत्येक बाफवर अशा प्रकारच्या सहमतीने आणि खेळीमेळीने चर्चा झाल्या तर ५० च्या वर पोष्टी जातील का याबाबत शंकाच आहे Proud

फेबुवरुन साभार..

चोरटय़ाला रोखण्याची तरुणीला शिक्षा

चोरटय़ास रोखण्याच्या प्रयत्नात पाय गमवावा लागत असताना तिला मदत करण्याऐवजी रेल्वे यंत्रणा, विमान कंपन्या, अँम्ब्युलन्स सेवेतून आलेल्या दारुण अनुभवाने भिवंडीतील मेहता कुटुंबीय व्यथित झाले आहेत. अंबाला येथे एक्स्प्रेसमध्ये चोरटय़ास रोखताना रुळाखाली भाविकास पाय गमवावा लागला, मात्र माणुसकीच्या भावनेतून भाविकास तत्काळ मदत करण्याऐवजी नियमांवर बोट ठेवत लुटालुटीचा डाव रंगवण्यात सार्‍या यंत्रणा दंग झाल्या होत्या .

भाविकासह मेहता कुटुंबीयांतील 31 सदस्य काश्मीरमध्ये गेले होते. परतताना अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराचे दर्शन घेऊन 4 जून रोजी ते गोल्डन टेम्पल एक्स्प्रेसमध्ये बसून परतीच्या मार्गावर आले. रात्री झोपण्यावेळी भाविकाने डोक्याखाली पर्स घेतली. मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरटय़ाने ही पर्स खेचून पोबारा केला. तेव्हा जाग आलेल्या भाविकाने पाठलाग करत चोरटय़ास दरवाजाजवळ गाठले. तिथे दोघांची झटापट झाली. तेव्हाच एक्स्प्रेसने वेग घेतला आणि चोराने भाविकास खेचले. यात तोल गेलेल्या भाविकाचा डावा पाय दुर्दैवाने रुळांखाली आला आणि तिला पाय गमावण्याची वेळ आली .

तोपर्यंत भाविकाचे वडील किरण ( 52 ), भाऊ राहुल यांनी तिला वाचवण्यासाठी स्टेशनवर उडी टाकली आणि ते दोघेही जखमी झाले. यानंतर मेहता कुटुंबीयांतील काहींनी तिघांना अंबालातील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथेच भाविकाचा डावा पाय कापावा लागेल, हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर भाविकास रेल्वेने चंदिगडला नेण्यात आले. मुंबईत चांगल्या उपचारांसाठी नेण्यासाठी तिच्या काही नातेवाइकांनी तिकिटासाठी चंदिगड रेल्वे अधिकार्‍यांशी संपर्क साधला. तिला मुंबईला नेणे आवश्यक असल्याने तिकिटांची व्यवस्था करण्याची विनंती केली, मात्र सरकारी बाबूंनी नियमात बसत नसल्याचे सांगून त्यांची तिथून अक्षरश: बोळवण केली. नाउमेद होत त्यांनी विमान कंपन्यांकडे धाव घेतली. तिथेही, आमच्या पॅनेलचे डॉक्टर तिला तपासतील, या तिकिटांसाठी 72 तास अगोदर आरक्षण करावे लागते, असे सांगितले. त्याशिवाय, अपघातग्रस्त व्यक्तीसाठी विमानात विशेष आसन असले तरी तिच्यासोबत अन्य तिघांना नेण्याच्या सुविधेसाठी 2 लाख रुपये खर्च येईल, असे कळवून टाकले. इथेही माणुसकीचा लवलेश नसल्याचे पाहून त्यांनी खाजगी अँम्ब्युलन्सकडे चौकशी केली. तिथेही अँम्ब्युलन्स मालकाने सेवा देण्यासाठी चक्क 90 हजारांची मागणी केली. अडला हरी.. म्हणत ही अँम्ब्युलन्स घेत भाविकास मुलुंडमधील राज हॉस्पिटलमध्ये दाखल केले . त्याचवेळी, टेम्पल एक्स्प्रेसमध्ये वेगळेच नाटय़ घडले. सर्वाची तिकिटे किरण मेहतांकडे होती. त्याचा फायदा तिथल्या टीसीने घेतला. इतर सदस्यांकडे तिकीट नसल्याचा गैरफायदा घेत टीसीने पाच हजार रुपये मागितले आणि काहींना एक्स्प्रेसमधून उतरवले. आपत्कालीन स्थितीत मदत करण्याऐवजी या सर्व यंत्रणांनी आम्हाला लुटण्याचा चालवलेला प्रयत्न वाईट आणि उद्विग्न करणारा असल्याची प्रतिक्रिया भाविकाने व्यक्त केली आहे, तर भाविकाने दाखवलेल्या धाडसाची किंमत अशी मोजावी लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, ही तिच्या कुटुंबीयांची व्यथा आहे .

सोमवार 11 जूनच्या 'महाराष्ट्र टाइम्स' या दैनिकात छापून आलेली ही बातमी आहे. यात भाविका व तिच्या कुटुंबीयांना यमयातना देण्यात कुठे कोणी डॉक्टर किंवा औषध कंपनी सहभागी नाही ना? भाविका मेहता आणि तिच्या कुटुंबाला जो अनुभव आला तो वैद्यकीय समस्येशीच संबंधित आहे. एका मुलीला पाय गमवावे लागले आहेत. तिच्या वडील व भावाला जखमी व्हावे लागले आहे. त्यात वास्तविक रेल्वेतील असुरक्षित प्रवासामुळे तिच्यावर हा प्रसंग ओढवला आहे; पण तिला वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी जी धडपड व धावपळ चालू होती, त्यात वैद्यक व औषध उत्पादक सोडून अन्य सेवांनी, यंत्रणांनी कसा प्रतिसाद दिला? भले ते वैद्यक क्षेत्राशी संबंधित नव्हते; पण एका जीवाशी प्रत्येक जण खेळत होता ना? आणि जो अनुभव भाविका व मेहता कुटुंबीयांना आला तोच अनुभव राणे, सावंत, पाटील वा पटेल, चोप्रा किंवा सुब्रह्ममण्यम असते तरी आला असता. कारण सवाल नावाचा नाही तर अशा अवस्थेत अडकलेले व फसलेलेले असतात, त्यांना माणुसकीने मदत करण्याच्या उपजत प्रवृत्तीचा आहे. ती असती तर भाविकावर ही वेळ आली नसती; पण तशी वेळ आली व येते. कारण आपण माणुसकीच गमावून बसलो आहोत. आपण कमालीचे असंवेदनाशील व बधीर होऊन गेलो आहोत. तसे नसते तर या वेळी कित्येक लोकांनी भाविकाच्या मदतीला धाव घ्यायला हवी होती; पण तसे झाले नाही. ज्यांनी मदत करावी ते बेपर्वा वागले किंवा त्यांनी जीवावर बेतले होते त्यांच्या अगतिकतेचा लाभ उठवायचा प्रयत्न केला.

यापैकी पाच पन्नास लोकांनी तरी सत्यमेव जयते नक्कीच बघितलेला असणार; पण त्यातले किती लोक प्रसंग ओढवला तेव्हा भाविकाच्या मदतीला धावले? नसतील तर का नाही धावले? ज्यांनी त्या अगतिकतेचा व लाचारीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला त्यात डॉक्टरी पेशाचा कोणीच नाही ना? म्हणजेच मुद्दा इतकाच, की फक्त डॉक्टरच लोकांच्या आजाराचा लाभ उठवतात, लोकांची लूट करतात व त्यांच्या जीवाशी खेळतात हा दावा अर्धवट सत्य आहे ना? फक्त डॉक्टर नव्हे तर ज्याला ज्याला तशी संधी आहे त्याला दुसर्‍याला लुटायचे आहे. मग ती लूट करताना कोणाच्या जीवाशी खेळायचा प्रसंग आला तरी बेहत्तर. याचीच साक्ष ही घटना देते ना? मी आमिरच्या सत्यमेव जयतेमधील ज्या त्रुटी व अर्धसत्य समोर आणायचा प्रयत्न केल्यामुळे जे वाचक विचलित झाले, त्यांच्यासाठीच हा खुलासा आहे. सवाल फक्त डॉक्टरी पेशाचा नाही. कुठल्याही क्षेत्रात जा, प्रत्येक जण दुसर्‍याला लुबाडायला उत्सुक आहे. ती लूट करताना आपण कोणाच्या जीवाशी खेळतोय याची फिकीर कोणाला राहिलेली नाही. अशा समाजात आपण जगत असताना डॉक्टर देखील त्याचेच एक घटक आहेत. ते त्या पाशवी मनोवृत्तीला अपवाद असतील, अशी अपेक्षा करता येईल काय? मग होते असे की ज्याला अशी संधी नाही तो आपण त्यातले नाही, असे साळसूदपणे सांगू पाहतो. आमिरच्या एकू्णच कार्यक्रमातील ही दिशाभूल आहे. ठरावीक पेशा किंवा मंडळी सोडली तर बाकी सगळे चांगले आहे असा जो गैरसमज त्यातून तो निर्माण करतो, तो धोकादायक आहे. त्यातून मोठे लोकप्रबोधन होते, जनजागृती होते, असे मला काही

वाचकांनी आग्रहपूर्वक सांगितले.

त्यात किती तथ्य आहे?

सत्यमेव जयतेचा दुसरा भाग 13 मे रोजी प्रक्षेपित झाला. त्यात त्याने बालकांना अत्याचार होत असेल तर ओरडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. इथे भाविका ओरडतच चोरामागे धावली होती. त्या रेल्वे डब्यात किमान 80 प्रवासी झोपले होते. त्यापैकी किती तिच्या मदतीला धावले? तिचा अपघात झाल्यावरही किती तास तिला साधी उपचाराला नेण्याची धावपळ होऊ शकली नाही? रेल्वे, विमान वा अन्य यंत्रणा व सेवा इतक्या अमानुष का होत्या? का तशा वागल्या? त्यापैकी कोणीच आमिरचा कार्यक्रम बघत नाही असे म्हणायचे काय? त्याने केलेल्या प्रबोधनाचे काय? प्रबोधन झाले असते तर भाविकाच्या मदतीला आसपासचे लोक का आले नाहीत? कारण अशा वेळी मदतीला धावणे त्रासदायक व कष्टाचे काम आहे. त्यापेक्षा आमिरला एसएमएस पाठवणे खूप सोपे व स्वस्त आहे. आमिरच्या सत्यमेव जयतेने भारावलेले किती लोक अशा प्रसंगी धाव घेतील? एकजणही धाव घेत नसेल तर आमिरका असर म्हणजे काय? आमिरने प्रबोधन व जागृती केली म्हणजे नेमके काय केले वा झाले आहे? हे जनजागृतीचे दावे खरे असतील तर भाविकावर अशी दुर्दैवी वेळ आली असती का? त्या गोल्डन टेम्पल गाडीतल्या प्रवाशांपासून रेल्वे, विमान, अँम्ब्युलन्स अशा सर्वच सेवेतील लोक सत्यमेव जयतेकडे पाठ फिरवून बसले आहेत असेच म्हणायचे काय? जे कोणी आवेशात आमिरच्या असर विषयी बोलत असतात, त्यापैकी एकही अशा कसोटीच्या प्रसंगी भाविकाच्या वाटय़ाला का आला नाही? तसे झाले असते तर तिचे पाय शाबूत राहिले असते. तिच्या कुटुंबीयांना अशा नरकयातनांमधून जाण्याची वेळ आली नसती. सत्यमेव जयतेच्या पाच भागांच्या प्रक्षेपणानंतर महिनाभराने ही घटना 4 जूनला घडलेली आहे. तेवढय़ा काळात किमान एक कोटी एसएमएस आमिरला आले असतील; पण त्यापैकी एकही हरीचा लाल भाविकाच्या मदतीला जाऊ शकला नाही. उलट तिच्या वाटय़ाला आले ते सगळेच डॉक्टर नसलेले पण यमराजाचे सहोदर आप्तस्वकीयच होते ना?

साती.... हा फक्त एक वेगळा दृष्टीकोन आहे.... सहमत मी सुद्धा नाही.... शेअर करावासा वाटला म्हणून केला.....

वरील घटनेतील दोषी व्यक्तींच्या वागण्याचं कुणी समर्थन करू शकेल असं वाटतं का ?

>>वरील घटनेतील दोषी व्यक्तींच्या वागण्याचं कुणी समर्थन करू शकेल असं वाटतं का ?

नाही Sad

<< आपण कमालीचे असंवेदनाशील व बधीर होऊन गेलो आहोत.>> आख्ख्या पोस्टीतलं एवढं एकच वाक्य मनापासून पटलं. Happy

एकमेकांना दोष देण्यामध्ये आपण सगळेच ( डॉक्टर्स आणि जे डॉक्टर्स नाहीत ते सुद्धा ) स्वतःवरची जबाबदारी झटकतो आहोत का ?

Kiran..
इथे वाचण्याआधीच विपू वाचून तुम्हाला उत्तर लिहिलेले आहे.
धन्यवाद.

मयेकरजी,
सार्वजनिक व्यासपीठ व एकास-एक प्रत्युत्तरांबद्दलचे आपले म्हणणे समजले.
थोडा 'हेयर ट्रिगर' प्रतिसाद देत होतो, ते चुकलेच. पुनः अशी वागणूक होवू नये याची काळजी घेण्याचा संपूर्ण प्रयत्न करीन.
धन्यवाद.

श्री. आगाऊ जी,

>>हे एवढेच आहे असे जर डो.ओकांसारख्या विचारी व्यक्तीला वाटत असेल तर भविष्य अवघड आहे.<<
इतकेच म्हणतो, की सदर एपिसोडनंतर १५ दिवस उलटसुलट जे काय समाजात चालले आहे, त्याच्या अवलोकनानंतर त्यांनी हे मांडले आहे. कार्यक्रमानंतरच्या पहिल्या रविवारची त्यांची प्रतिक्रीयाही डॉक्टरांनी चांगले वागलेच पाहिजे अशा अर्थाच्या आत्मपरिक्षणाचीच होती..

चाणक्य
तुम्ही दिलेली मेल मी थोडे टप्पे वर टाकली होती
कदाचित दोघानीही एकाच वेळेस पाठविल्याने दोन्ही आल्या
Happy

सत्यमेव जयतेचा भाग प्रदर्शित झाल्यावर फेसबुकवर एक लांबलचक पत्र नजरेस पडले.

प्रिय आमीर खान,

"सर्वच डॉक्टर हावरट नसतात"
"कोणताही व्यवसाय संपूर्णतः स्वच्छ नसतो."
"डॉक्टरी पेशा (निवडणे) ही पसंती आहे, सक्ती नव्हे"

माननीय महोदय,

मी तुमच्या अभिनयाचा चाहता आहे. मी सत्यमेव जयतेचाही चाहता आहे परंतु २७ मे, २०१२ चा भाग पाहून मला धक्का बसला. हा भाग टाकण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार आणि गृहपाठ करणे आवश्यक होते. तुमच्या चित्रपट उद्योगात तुम्ही आणि अमिताभ बच्चन या दोनच व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सुसंस्कृत समाज गांभीर्याने पाहतो. त्यामुळे तुम्ही असे एकांगी आणि दूषित कथानक पुढे करता तेव्हा दु:खाने असे म्हणावेसे वाटाते की व्यावसायिक चॅनेलवर अशा प्रकारचे कार्यक्रम करणे अयोग्य आहे. (मला वाटते तुम्ही या कार्यक्रमासाठी मोठी रक्कम घेतली असावी, दानधर्म आणि परोपकार फक्त डॉक्टरांनी करायचे असतात, ऍक्टरांनी नाहीत!!! बरोबर!)

या पुढे मांडलेले मुद्दे थोडक्यात आणि माझ्या शब्दांत देत आहे. - धूमकेतू.

१. खाजगी कॉलेजात मेडिकलची कॅपिटेशन फी ४०-५० लाख असते असे तुम्ही कार्यक्रमात सांगितले. अशीच कथा तुम्ही इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, एमबीए कॉलेजबद्दल का सांगितली नाही? फक्त डॉक्टर्सना लक्ष्य का केले?

2. कार्यक्रमात सांगितले गेले २००१ नंतर ३१ सरकारी मेडिकल कॉलेजे आणि १०६ खाजगी कॉलेजे उघडण्यात आली. आज भारताट १८१ खाजगी आणि १५२ सरकारी कॉलेजे आहेत. आकडा तुम्ही सांगितला तेवढा वाईट नाही. तेव्हा तुमच्या कार्यक्रमाला पोषक असे मुद्दे मांडू नका.

खाजगी कॉलेजांपैकी ९५% कॉलेजे राजकारण्यांची आहेत आणि एमसीआयशी त्यांची हातमिळवणी आहे. भ्रष्टाचारासाठी राजकारण्यांन दोषी धरा, डॉक्टरांना नाही.

3. कार्यक्रमातील एक पाहुणे (डॉ. गुल्हाटी) म्हणाले की औषधे लिहून देण्यासठी फार्मा कंपन्या ३०% कमिशन डॉक्टरांना देतात. या विधानाला काहीही अर्थ नसून त्या संबंधी कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत.

4. कार्यक्रमादरम्यान तुम्ही इंग्लंड आणि भारतातील डॉक्टरी परवाने रद्द झाल्या विषयी आकडे सांगितले पण भारतात किती डॉक्टरांना गुंडांकडून मार खावा लागतो, स्टायपेन्डच्या नावाखाली त्यांना किती क्षुल्लक पगार मिळतो, राहण्या-खाण्याच्या गैरसोयी वगैरेंविषयी काहीच बोलणे नव्हते.

5. कार्यक्रमादरम्यान तुम्ही म्हणालात की हा व्यवसाय फक्त परोपकारासाठी निवडावा, पैसे कमावण्यासाठी नाही. असे का? डॉक्टरांना चांगले सुखासीन आयुष्य कंठित करण्याची परवानगी नाही? इथे साम्राज्यवाद दिसतो. आधी डॉक्टर होण्यासाठी काय काय करावे लागते ते जाणून घ्या आणि मग हे गीता-ज्ञान इतरांना द्या.

साडेपाच वर्ष एम.बी.बी.एस. आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी १५ ते २० हजार रु. प्रति महिना मिळतात. (इतर क्षेत्रातील मुले याच्या दुप्पट पगार आधीच मिळवतात) पुढे शिकले नाही तर २०-२२००० पगार मिळतो.

पोस्ट ग्रॅज्युएशननंतर सक्तीने खेडेगावात १ वर्ष नोकरी करावी लागते किंवा २५ लाख रुपयांचा बाँड द्यावा लागतो.

6. फक्त डॉक्टरांना खेडेगावात आणि सरकारी हॉस्पिटलांत नोकरी करण्याची सक्ती का? फक्त डॉक्टरांना सरकारला पैसे का द्यावे लागतात? इंजिनिअर्स, वकील, सीए, एमबीए यांना अशी सक्ती का नाही?

आता सरकार डॉक्टरांना परदेशी स्थायिक होण्यास प्रतिबंध करण्याविषयी विचाराधीन आहे. का? असाच प्रतिबंध आयआयटी/ आयआयएम विद्यार्थ्यांना का नाही? समाज आणि सरकारने डॉक्टरांसाठी काय केले आहे की डॉक्टरांनी फक्त परोपकार करत राहावे?

7. तुम्ही कार्यक्रमादरम्यान सांगितले की डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात. औषधांच्या किंमतींवर नियंत्रण आणणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी डॉक्टरांना दोषी धरू नये.

महोदय, दुसर्‍यांकडे बोटे दाखवणे सोपे असते. सर्व काही आलबेल आहे असे सांगण्याचा आमचा प्रयत्न नाही पण सर्व काही कोठेच आलबेल नाही. भ्रूणहत्या आणि हुंड्यावर कार्यक्रम करणे वेगळे आणि अशा गुंतागुंतीच्या विषयावर फारसे संशोधन न करता कार्यक्रम करणे वेगळे.

या कार्यक्रमातून तुम्ही डॉक्टरांची प्रतिमा डागाळली आहे. १० वाईट डॉक्टरांमागे १००० चांगले डॉक्टरही असतात. तुम्ही याबाबत माफी मागणे गरजेचे आहे.

आम्ही असे ऐकतो की आमीर खान एका भागासाठी ३ करोड रुपये घेतात. आम्ही डॉक्टर समाजसेवा कमी करत असू पण जी समाजसेवा करतो त्याचा मोबदला मागत नाही.

---

हे पत्र एका मेडिकल विद्यार्थ्याचे आहे आणि फेसबुकवर सर्वत्र झळकत आहे.

छान

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी काल घोषणा केली की महाराष्ट्रात जेनेरिक मेडिसीनची स्टोअर उघडण्यात येतील.

Pages