पश्चिम किनारपट्टी वरिल पोर्तुगिजांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी मराठे १७३७ मधे कल्याण मार्गे उत्तर कोकणात उतरले. उत्तर ते दक्षिण कोकण परिसरात वसईचा किल्ला हा भौगोलिक दृष्ट्या फार महत्वाचा होता. पश्चिम किनारपट्टी वरिल मुंबई ते दमण पर्यंतच्या परिसरावर या किल्ल्या मुळे वचक ठेवणे शक्य होते. वसई बंदरात उतरलेला माल कल्याण मार्गे जुन्नरला जात असे, त्यामुळे या किल्ल्याला व्यापारी महत्वही प्रात्प झाले होते. १७३९ मधे चिमाजी आप्पांच्या मराठी सैन्याने पराक्रमाची शर्थ करुन वसईचा किल्ला काबिज केला. चिमाजी आप्पांनी श्री वज्रेश्वरी देवीला नवस केला, की जर तुझ्या कृपेमुळे मी किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधिन.
भल्या पहाटे गेल्यामुळे देवी दर्शन होऊ शकले नाही.
प्रचि १ वज्रेश्वरी मंदिर
प्रचि २ प्रवेशद्वार
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६ प्रार्थना मंडप
किल्ल्याच्या बहुतांश बांधकामावर पोर्तुगिजांची छाप दिसते. दशकोनी आकाराच्या किल्ल्यावर प्रत्येक कोपर्य़ावर एक बुरुज असून तटबंदी मजबूत स्थीतीत आहे. किल्ल्यातील उंच आणि रुंद बुरुजांना बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. एक समुद्राकडून तर दुसरा जमिनीवरून आहे.
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७ तटबंदी मधिल जंग्या
प्रचि १८
प्रचि १९ वसईची खाडी
प्रचि २० चिमाजी आप्पांचे स्मारक
पश्विम रेल्वेच्या वसई स्टेशनवरुन एस्टी, रिक्षा किंवा खाजगी वाहनाने १५ मिनिटांत किल्ल्या पर्यंत पोहचता येते. पुर्ण किल्ला फिरायला तीन - चार तासांचा अवधी हाताशी ठेवावा.
सुंदर प्रकाशचित्रे आणि
सुंदर प्रकाशचित्रे आणि माहीती.
-------------------------------------------------------------
छान माहिती आणि प्रचि
छान माहिती आणि प्रचि
इंद्रा ,, भारी प्रचि आणि
इंद्रा ,, भारी प्रचि आणि माहितीपण ,, आता जायला कधी जमतं ते बघायचं.
माहिती आणि प्रचि सह्हीच रे
माहिती आणि प्रचि सह्हीच रे
प्रचि १९ अजुन चांगला येऊ शकला असता.
वसईच्या किल्ल्याचे फोटो पाहून
वसईच्या किल्ल्याचे फोटो पाहून डोळे सुखावले. या किल्ल्याची माहिती मी
उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई दिली होती. त्याचा दुवा येथे देते.
फोटोंबद्दल विशेष धन्यवाद.
मस्त रे इंद्र
मस्त रे इंद्र
मस्त!
मस्त!
खरंच एकदम मस्त प्रचि आहेत..
खरंच एकदम मस्त प्रचि आहेत.. लेख विस्तृत कां नाही केलास??
वसई किल्ला बघायला जाता
वसई किल्ला बघायला जाता तेंव्हा मला सांगत जा रे म्हणजे मी श्रीदत्तला सांगत जाईन. श्रीदत्त राउत म्हणजे वसई किल्ला आणि वसई मोहिमेचा चालता-बोलता ईतिहास आहे. गेली ५ वर्ष तो दर रविवारी तो किल्ल्यातच असतो.
इंद्रा मस्त प्रचि आणि माहीती
इंद्रा मस्त प्रचि आणि माहीती
प्रचि ८,९,११,१९ खासच. कधी गेला होतास..
प्रियाली - छान माहीती.
छान माहीती आणि
छान माहीती आणि प्रकाशचित्रे.
धन्यवाद!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
'श्रीचे सुदर्शन धर्मद्वेष्ठे यांच्या मस्तकी वज्रप्रहार होऊन टोपीकर म्लानवत् जाहले. अन्यथा वसई होती व फिरंगी आगीचा पुतळा होता.' -- चिमाजी अप्पा.