'मिस' 'माया' 'दास'

Submitted by बेफ़िकीर on 12 June, 2012 - 07:45

"सर, मला दोन महिन्यांची रजा हवी होती"

काळेने आठ्या पाडत दासकडे पाहिले.

"यू नो दास? आय हॅवन्ट टेकन लीव्ह सिन्स लास्ट सिक्स मन्थ्स... इव्हन वन डे... तुझा नेमका काय प्रॉब्लेम चालू आहे ते सांगशील का? मला वाटते तुझे लक्षच तिसरीकडे आहे"

"सर... विषय अतिशय वेगळा आहे... सांगावा लागणारच आहे... पण... असा.. तुम्ही आत्ता इतके बिझी असताना सांगणे मला जरा... अयोग्य वाटत आहे.. "

"दास... सांगच सांग... नेमके काय झाले आहे???"

"सर... मी माझा सेक्स बदलून घेत आहे... आय वॉन्ट टू बी अ फिमेल...ती सर्जरी परदेशात करावी लागणार आहे.. तिकिटे बूक झालेली आहेत... रजा नाही मिळाली तरी मला जावे लागेल... दोन महिन्यांनी मी एक स्त्री म्हणून येथे पुन्हा रुजू होईन..."

डोळे फाडून काळे दासकडे बघत होता. गेली दहा वर्षे याच कंपनीत अतिशय व्यवस्थित काम करून असिस्टंट कोऑर्डिनेटर या पदापासून सिनियर ऑफीसर या पदापर्यंत दासची प्रगती झाली होती. त्याने लग्न केलेले नव्हते. तो नेमका कुठे राहतो हे कोणाला माहीत नव्हते. याचे कारण दास एकलकोंडा राहायचा. कामाशी काम. लोकांशी संबंध जवळपास पूर्णपणे व्यावसायिक. मात्र कोणा सहकार्‍याला कसली मदत लागली तर मात्र दासला सांगितल्यास दास आवर्जून धावायचा आणि जमेल ते करायचा. दासची इमिजिएट बॉस देवी ही सिनियर मॅनेजर होती आणि काळे हा तिचा बॉस होता. आज देवीने दासला सरळ काळेकडे पाठवलेले होते. कारण गेल्या दोन महिन्यांपासून दासने कामात असंख्य चुका केल्या होत्या. एका चुकीमुळे तर चक्क एक डीलरच काँपीटिटरकडे निघून गेलेला होता. हे असेच होत राहिले तर संकट येऊ शकेल हे डिपार्टमेंटला प्रत्येकाला समजलेले होते. देवी आणि काळेने दासला गेल्या दोन महिन्यांत किमान दहा वेळा जबरदस्त लेक्चर दिलेले होते. तरीही दास शून्यात वावरत असल्यासारखा वागत होता. इतकी वेळ आली होती की एकदा तर काळेने त्याला सांगितले होते की तू असेच करत राहिलास तर खरंच कंपनीला विचार करावा लागेल तुझ्याबाबतीत. पण दासवर परिणामच होत नव्हता.

दासकडे इतके पैसे नसावेत की अगदी सहज परदेशाचे तिकीट बूक करता येईल. नक्कीच त्याचे तिकडे कोणीतरी असणार होते. दोन महिने राहणार कुठे आणि ट्रीटमेंट कशी घेणार?

काळे हबकून दासकडे बघतच बसला होता. काहीही न सुचल्यामुळे त्याने देवीला आत बोलावले आणि फोन ठेवल्याठेवल्या त्याच्या डोक्यात हा विचार आला की हा विषय आपण आणि दास दोघेही असताना देवीशी काढण्यासारखा तरी आहे की नाही. पण तोवर देवी जागेवरून उठल्याचे काळेला काचेतून दिसलेले होते.

देवीला काळेचा फोन येताक्षणीच समजले होते की दासने आणखीन काहीतरी चमत्कार करून दाखवलेला असणार. आता काळे दाससकट आपल्यालाही झापणार हे तिच्या लक्षात आले. काहीशी चाचरत आणि काहीशी वैतागून ती नॉक करून आत आली.

काळेने तिला बसायला सांगितले आणि काही क्षण तो नुसताच समोरच्या लॅपटॉपकडे पाहात राहिला.

"येस सर??"

"देवी... वुई हॅव अ प्रॉब्लेम..."

दासला काळेचा हा डायलॉगच पटला नाही. काळे या प्रकाराकडे बघतच असा होता की हे काहीतरी फार चुकीचे आहे, ही बाब दासला आवडली नाही. आपल्याला बोलू दिले गेले की आपण आपली बाजू नीट आणि स्पष्टपणे मांडायची हे त्याने ठरवले.

"येस सर??"

"देवी... देअर इज सम इश्यू विथ धिस गाय... आय डोन्ट नो हाऊ टू टेल यू... पण .. ही वॉन्ट्स टू बिकम अ फिमेल"

"?????"

"दासला एक... स्त्री व्हायचे आहे... तो एक स्त्री होणार आहे... परदेशात जाऊन सर्जरी करून घेणार आहे..."

खाटकन देवीच्या चेहर्‍यावर स्त्रीसुलभ लज्जा, काहीसा संताप आणि अवघडलेपण यांचा मिलाफ निर्माण झाला आणि तिची नजर टेबलकडे झुकली. ते पाहून दास मात्र ताठ मानेने काळेंकडे पाहात राहिला आणि काळे लॅपटॉपच्या स्क्रीनकडे.

काही क्षणांनी देवीच्या तोंडातून एक प्रश्न बाहेर पडला. एकाक्षरी प्रश्न.

"का?"

या 'का' ला काळे उत्तर देऊ शकत नव्हता. या 'का' ला दास उत्तर देऊ शकत होता.

देवीने काळेकडे बघत हा प्रश्न विचारला आणि हळूहळू तिची मान दासकडे वळली. दासकडे बघताना तिच्या मनात वादळे उठली होती. हा माणूस तरुण मुलगा असताना आपल्याबरोबर काम करू लागला आणि गेली दहा वर्षे आपली टीम निर्विवादपणे एक एक्सलंट टीम म्हणून नावाजली गेलेली आहे आणि हा दास चांगला चक्क पुरुष असताना हे त्याच्या डोक्यात काय घुसलंय हे समजत नाही आहे. यापुढे त्याचे आणि आपले संबंध नेमके कसे राहतील हे लक्षात येत नाही आहे आणि मुख्य म्हणजे अशा अवस्थेत त्याला नोकरी करू दिली जाईल का, दिली जावी का आणि आपल्याच टीममध्ये त्याला ठेवले जावे का हे सगळे प्रश्न आहेतच. देवीच्या मनात हे सगळेच प्रश्न एकदम उठले होते. जणू दास आत्ताच स्त्री होऊन तिथे बसलेला असावा तसे.

'का' चे उत्तर दोघांनाही हवे होते, पण ऐकताना दासकडे बघावेसे वाटत नव्हते. दासने स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

"मला आपल्यात स्त्रीत्व असावे असे वाटते. मला पुरुषीपणा भावत नाही. मला हा बदल करून घेणे शक्य आहे हे समजल्यापासून आणि माझ्याकडे पुरेसे पैसे जमा झाल्यापासून आणि त्या लोकांशी माझा संपर्क होऊन सगळे ठरल्यापासून मला कुठेच लक्ष देता येत नाही आहे. आय वॉन्ट टू बिकम अ फिमेल. अ‍ॅन्ड आय अ‍ॅम शुअर.. दॅट.. आय पझेस राईट टू डिसाईड..."

दोघेही त्याचे बोलणे चालू असताना मात्र त्याच्याकडे रोखून बघत होते. काय बोलावे तेच समजत नव्हते. काळेने कोंडी फोडली.

"दास.. व्हाय आर यू डूईंग धिस अ‍ॅट ऑल??? तुला निसर्गाने पुरुष बनवलेले आहे... त्यात बदल करणे हे अनैसर्गीक ठरेल..आणि मुख्य म्हणजे... तुझ्या करीअरचे काय??? तू स्त्री कसा होशील??? तुझे पुरुषत्व नष्ट होईल हे ठीक आहे... होऊ शकेलही... पण तू स्त्री कसा होशील??? तू स्त्रीप्रमाणे एखाद्या जीवाला जन्म देऊ शकशील???"

"नाही देऊ शकणार... पण माझे बाह्य रूप स्त्रीप्रमाणे असेल... मला... मला ब्रेस्ट्स असतील... माझ्यात स्त्रीचे जननेंद्रिय असेल... कृत्रिम का होईनात.. मला स्त्रीसारखी फिगर मिळू शकेल... मी... मी एक पूर्ण स्त्री असेन... "

देवीला तिथून उठून जावेसे वाटत होते. काळेच्या ते लक्षात आले. त्याने देवीला 'आपण नंतर बोलू' असे सांगितले आणि ती निघून गेली.

काळे आता दासकडे स्पष्टपणे रोखून पाहात म्हणाला...

"दास... आय डोन्ट नो... अबाऊट लॉ अ‍ॅन्ड ऑल.. हे कदाचित कायद्याने तुला करता येत असेलही... हा सर्वस्वी तुझा निर्णय असेलही... पण प्रत्यक्ष आयुष्यात तू कसे काय निभावू शकशील??? ... दोन महिन्यात केवळ या सर्जरी आणि रेस्टमधून तू पूर्णपणे स्त्री कसा होशील??? स्त्री झाल्यानंतर काय करशील?? आय अ‍ॅम शुअर दास... या कंपनीतले तुझे करीअर तरी मला तितकेसे ब्राईट नाही वाटत आता हे ऐकल्यानंतर... येथे कित्येक स्त्रिया कामाला आहेत.. त्यांना माहीत आहे की तू पुरुष आहेस... एक स्त्री म्हणून तुला जगासाठीतरी त्यांच्याचमध्ये वावरावे लागणार... ही गोष्ट त्यांना अस्वस्थ करणार... एक आधीचा पुरुष म्हणून तू पुरुषांमध्ये वावरू शकणार नाहीस... त्यांनाही तुझे स्त्री म्हणून असलेले अस्तित्व अस्वस्थ करणार... समाजात तू एकटाही राहू शकणार नाहीस... तुझे आजूबाजूचे लोक.. नातेवाईक.. हे सगळे जण तुला कसे स्वीकारतील???.. मुळत हे असे सगळे... पौगंडावस्थेत प्रामुख्याने केले जाते... आत्ता तू माझ्यामते तीस वर्षाचा तरी असशीलच... तुझे शरीर पूर्णपणे स्त्री व्हायला किती महिने लागतील... त्यात पुन्हा... एका स्त्रीला पुरुष व्हावेसे वाटणे हे आपल्या संस्कृतीत मी जरा तरी समजू शकतो.. पुरुषालाच स्त्री व्हावेसे वाटत आहे हे ऐकलेलेच नाही या आपल्या जगात..कशासाठी हे करायचे??? मुळातच स्त्रीला एक कमी स्थान असलेल्या समाजातील पुरुषाने हा निर्णय का घ्यावा??"

"सर.. माझे नांव माया असेल.. मिस माया दास...कॅन आय हॅव द लीव्ह सर?"

"दास..लूक अ‍ॅट यूअरसेल्फ... तुला मिशा आहेत... तू रोज शेव्ह करतोस.. तुझे खांदे बघ कसे आहेत.. छाती बघ... मसल्स बघ.. यू वॉन्ट टू लूज स्ट्रेंथ.. फॉर व्हॉट??? ... एक स्त्री बनून आपल्या शरीराकडे दहा नजरा रोखल्या जाव्यात हा मूर्खपणा तू का करत आहेस??? मला वर बोलावे लागेल... आय डोन्ट थिंक यू कॅन वर्क हिअर..."

"इट्स ओक्के सर.. आय विल फाईंड अनादर जॉब... पण.. मी स्त्री होणार आहे..."

"दास मला एक सांग... आर यू इनकॅपेबल ऑफ... आय मीन.. आर यू.... आर यू नॉट अ कंप्लीट मेल??? आय अ‍ॅम सॉरी टू आस्क धिस.. पण त्याला ट्रीटमेन्ट्स आहेत...."

"आय अ‍ॅम अ मेअ सर... अ‍ॅन्ड आय वॉन्ट टू बीकम अ फिमेल..."

"दास... आय थिंक तू मला... एक ... एक अर्ज दे... आय विल फॉरवर्ड इट... "

"कामाला घेतलेल्या कर्मचार्‍याचे लिंग हा प्रॉब्लेम कसा काय होऊ शकतो???"

"नक्कीच होऊ शकतो... ते काम जर पुरुषानेच करण्यासारखे असेल... जसे सतत ट्रॅव्हलिंग.. ग्रामीण आणि कुठल्याही लांबलांबच्या गावात रात्री अपरात्री फिरणे.. श्रमाचे काम.. मजूरी... हमाली.. ड्रायव्हिंग... अशी कामे सहसा पुरुष करताना दिसतात कारण त्यांची शारिरीक ताकद स्त्रीच्या ताकदीपेक्षा अधिक असते... आणि मुख्य म्हणजे कामाला घेतलेल्या कर्मचार्‍याचे लिंग हा एकवेळ प्रॉब्लेम नसला तरीही लिंगबदल हा प्रॉब्लेम होणारच ना??"

"पण मी माझे काम करू शकेनच की सर?"

"हो पण.. मी म्हणालो त्याप्रमाणे तुझ्याबाबत इतरांचे जे विचार असतील... एकंदर डिपार्टमेंटमध्ये आणि कंपनीतच जी एक विचित्र अस्वस्थता निर्माण होईल त्याचे काय?"

"आपला समाज तितकासा उदारमतवादी आणि पुढारलेला दिसत नाही..."

"मला हे माहीत नाही दास की यात पुढारलेपण आहे किंवा नाही.. पण आपला समाज तितका उदार नाही हे मात्र खरे आहे.. "

"माझा निर्णय अंतिम आहे सर... पक्का आहे..."

"ठीक आहे दास... आज आपण इतकी वर्षे एकत्र काम करत आहोत... तुझ्या वागण्यात कधीही अ‍ॅबनॉर्मल असे काहीच आढळले नव्हते.. उलट तुझा परफॉर्मन्स उत्तम होता.. गेले काही महिने मात्र तू अस्वस्थ वाटत आहेस... तुला एकदोनदा हा निर्णय चुकीचा वाटत आहे असे मी सांगणे येथपर्यंत मी करू शकतो.. बाकी मला मर्यादा तर आहेतच.. पण तुला ते स्वातंत्र्य अधिक आहे हे खरे... पण एक नक्की.. की तू... या कंपनीत काम करू शकायचा नाहीस त्या केसमध्ये... येथे काम करणार्‍या स्त्रियांच्या मनातील विचारांची आणि अस्वस्थतेची काळजी घेणे हेही मॅनेजमेन्टचे एक कर्तव्य आहे... तू...तू लग्न करणार आहेस का पुरुषाशी वगैरे???"

"नाही सर... मी बहुतेक.. एखाद्या सामाजिक संस्थेत कामाला लागेन..."

"स्त्रियांसाठीच्या??"

" हो सर..."

"दास.. हा निर्णय तुला का घ्यावासा वाटला हे विचारू शकतो का?? तुला काही... म्हणजे.. पुरुषांबाबत आकर्षण वगैरे आहे का??? की... मुळातच.. सेक्स या विषयाबाबत तू उदासीन आहेस??? आय अ‍ॅम सॉरी... पण केवळ एक खूप जुना कलीग म्हणून हे विचारतो आहे मी... आजवर आपण इतके जवळून काम केलेले आहे.. तुझ्या मनात असे काही विचार असतील असे मला वाटतच नव्हते... म्हणजे कोणालाच वाटत नव्हते... त्यामुळे कुतुहल म्हणून हे विचारावे लागत आहे.. खरे तर... हे इतर कोणाला सांगितलेस तर लोक हासतीलच तुला..."

"नाही सर.. मी एक पुरुष आहे.. स्त्रीबाबत मला तेच आकर्षण आहे.. एक स्त्री बनून ते आकर्षण आणि कुतुहल शमवायचीही माझी इच्छा नाही आहे... इन फॅक्ट या सर्जरीनंतर माझ्या शरीरात हार्मोन्सही स्त्रीचे असतील.. "

"मग???"

"सर.. मला पुरुषाचे स्त्री होणे हे कमीपणाचे आहे असे वाटत नाही.. "

"हो पण कशासाठी व्हायचे??? निसर्गाने दिलेले लिंग का नाकारायचे??"

"नाही सांगू शकणार सर मी..."

"अ‍ॅज यू विश दास... जस्ट गिव्ह मी अ नोट.. आय अ‍ॅम रिअली सॉरी.. पण हे असे... मॅनेजमेन्टला नाही चालणार"

"मल पूर्ण कल्पना आहे सर मॅनेजमेन्टच्या विचारधारेची.. मला अपेक्षाही हीच होती... ठीक आहे.. मी अर्ज देतो.. निघू???"

"हं... पण दास... तू आता घरीच जा... "

"म्हणजे... या क्षणापासून???"

"आय अ‍ॅम सॉरी दास... पण हा निर्णय आता देवीला समजलेला आहे.. ती फिमेल कलीग्जशी बोलणारच.. याच क्षणापासून... फक्त सेटलमेंटपुरता अ‍ॅडमीनला ये शेवटच्या दिवशी... आणि नोटमध्ये सेक्सचेंज वगैरे लिहू नकोस... बेटर प्रॉस्पेक्ट्ससाठी नोकरी सोडतोय असे लिही.. "

"खरेही बोलायचे नाही का???"

"इट्स फनी दास... हे असे खरे लिहून तिला काय मोठे मिळणार आहे?? परिणाम तोच... ना???"

"ओक्के सर.. "

"द कंपनी विल लूज वन ऑफ इट्स गूड परफॉर्मर्स..."

"व्हॉट टू से सर.. द कंपनी, आय फील.. इज लुझिंग अ थिंग ऑफ प्राईड... दॅट इट अ‍ॅक्सेप्ट्स दीज चेंजेस"

खाडकन दार आपटून दास स्वतःच्या खुर्चीकडे गेला आणि कागद आवरू लागला. नजरेच्या कोपर्‍यातून देवी त्याच्याकडे बघत होती.

यापुढे हे सगळे लोक असेच कधी दिसतील हे माहीत नव्हते. त्यामुळे दास प्रत्येकाच्या टेबलापाशी जाऊन 'काय कसे काय' म्हणत हसत हॅन्डशेक करू लागला. लोकांना कळेना मधेच हा असा का वागतोय. त्याचे ते विचित्र वागणेही हास्यास्पदच ठरले आणि लोक हसू लागले. अनेक स्त्री सहकार्‍यांच्या टेबलपाशी जाऊन दासने त्यांना नुसतेच विश केले आणि शेवटी.... देवी.. देवीच्या टेबलपाशी आला.. तिच्यासमोर मात्र सरळ बसलाच..

"येस दास????"

"आय अ‍ॅम लीव्हिंग.. लीव्हिंग धिस जॉब..."

देवीने तिचा महागडा चष्मा काढला आणि दासच्या डोळ्यात डोळे गुंतवत म्हणाली..

" चक्रमपणा करतोयस तू... असे वाटत नाही तुला?? हा जॉब सोडावा लागतोय तुला... हे कसले मूर्ख खुळ??"

"मॅम.. तुम्ही मला आजवर इतकी वर्षे सांभाळून घेतलंत.. तुमचे उपकार नाही विसरता येणार मला..."

"दास.. खरं सांगू?? मला खदखदून हसू येतंय... हा.. हा कसला बावळटपणाचा निर्णय आहे..."

"हसा मॅम.. नो प्रॉब्लेम.. "

"तू एक... स्त्री का होतोयस??? खरं सांगतोयस का काहीतरी फेकतोयस???"

"खरं सांगतोय.. "

"आय कान्ट बिलीव्ह धिस दास..."

"आय कॅन... आय स्ट्राँगली बिलीव्ह दॅट देअर इज अ फिमेल इन मी"

खरंच देवीच्या तोंडावर एक थट्टेखोर हसू आले. त्या हासण्यात 'एक पुरुष स्त्रीइतकाच दुबळा आहे होय' ही टीकात्मक भावना होती. कुठेतरी 'मी स्त्री आहे आणि हा पुरुष असूनही स्त्रीइतकाच किरकोळ आहे' हे समाधान होते.

"आय अ‍ॅम लीव्हिंग मॅम... "

आता मात्र देवीला खरंच वाईट वाटले. एक चांगला सहकारी मूर्खपणा करून निघून चाललेला होता.

"माझी एक मैत्रीण कौन्सेलर आहे दास... डॉ. सुनयना भारती... मी तुला नंबर देते... तिला प्लीज भेट.. नंतर हा निणय घेशील???"

"माझे ठरलेले आहे मॅम.. "

"बावळटा तू एक स्त्री कसा होशील??? मी सांगते... सुनयनाला भेट... तिच्याशी डिस्कस करून मग ठरव"

"नको.. आय अ‍ॅम ओके विथ धिस डिसीजन... या निर्णयापासून परावृत्त करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला भेटायची मला इच्छा नाही आहे मॅम..."

"दास तुझ्याघरी कोणीही नाही आहे हे मला माहीत आहे.. यू हॅव नो वन इन धिस वर्ल्ड... आय नो.. म्हणून एक जुनी कलीग म्हणून मी अधिकाराने सांगतीय तुला.. हवे तर.. हवे तर मी आणि काळे सरही येऊ त्या सेशनला.. मला अ‍ॅक्च्युअली हे समजून घ्यायचंय की तू असा निर्णय घेतलासच का???"

"त्यासाठी फक्त तुम्ही आणि मीही भेटू शकतो मॅम... पाहिजे तर काळे साहेबही.. त्या कौन्सेलर कशाला?"

देवीने थोडा वेळ विचार केला. तिलाही पटले की आपल्या या इतक्या जुन्या सहकार्‍याचे नेमके म्हणणे काय आहे ते आपण आधी समजून घ्यायला हवे. नंतर पुढचे बघता येईल.

थोडा विचार करून देवी आत गेली आणि काळेशी काही बोलली. बाहेर येऊन दासला म्हणाली.

"आपण तिघे आज सेंट्रलला भेटू. आठ वाजता. काळे इज ऑफरिंग अ डिनर. सुनयनाला तेथे बोलावू का?"

"मॅम.. आपण तिघेच भेटलो तर नाही का चालणार? मुळात एक लक्षात घ्या मॅम... माझा निर्णय अंतिम आहे.. त्यात बदल व्हावा असा जर उद्देश असेल भेटण्याचा तर...माझ्यामते त्यात काही अर्थ नाही..."

"दास एक लिसनर म्हणून तिला बोलवायला काय हरकत आहे??? शी विल जस्ट लिसन... अं???"

"शी विल नॉट से अ वर्ड??"

"नॉट अ वर्ड दास...आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी..."

"पण मग.. त्यांच्या तिथे येण्यात पॉईंट काय आहे???"

"जस्ट टू अंडरस्टँड यूअर व्हिव्ह्ज.... नथिंग एल्स..."

".... अं... ओक्के... नो इश्यूज... "

"एट ओ क्लॉक... सेंट्रल..... दावत रेस्टौरंट..."

"डन..."

===================================

"शी इज डॉ. सुनयना भारती... धिस इज दास..."

देवीने ओळख करून दिली आणि काळे सगळ्यांकडे बघत असताना सुनयनाने दासच्या हातात हात मिळवला.

दासने पुरुषी पकडीत तो नाजूक हार धरून मैत्रीच्या दृष्टीने किंचित दाबून सोडला. सुनयनाला तो स्पर्श एका 'अस्खलीत' पुरुषाचा असल्याचे जाणवले. क्षणभर मिटलेल्या पापण्यांमध्ये तिने एक विचार दडपला. हा पुरुष स्त्री होणे कालत्रयी शक्य नाही. त्याचे जीन्स पुरुषाचे आहेत.

"ही इज वन ऑफ अवर स्टार परफॉर्मर्स"

काळेने उगाचच स्तुती करत सुनयनाला माहिती पुरवली. वास्तविक सर्वांत ज्येष्ठ काळे असला तरी आत्ता जणू सूत्रेच सुनयनाकडे असल्यासारखे हे दोघे उगाचच वागत होते.

"व्हॉट यू विल हॅव दास??? ज्यूस???"

"स्वीट लाईम..."

देवी दासकडे बघत मंद हासली. आजवर दासने कंपनीच्या पार्टीत बीअरशिवाय काही घेतलेले नव्हते. काळे मात्र ड्रिंक घेण्याच्या विचारात होता. त्याने दासला विचारले.

"दास... लेका बीअर तरी घे???"

"सर तुम्हाला मी आत्ताच स्त्री झालो आहे असे वाटत आहे का???"

दास अगाध होता. विषयाला इतक्या मिश्कीलपणे त्याने हात घातला होता की डॉ. सुनयनाही खदखदून हासली.

"बायका बीअर घेत नाहीत असे कुठे आहे???" - देवीने खेळकरपणे विचारले...

"चला.. बीअर तर बीअर..."

"दोन कार्ल्सबर्ग... चार ग्लासेस...."

काळेची ऑर्डर घेऊन वेटर सटकला आणि सुनयनाने हासत हासतच दासला विचारले...

"मिस माया दास???... तुम्हाला स्त्री का व्हायचे आहे???"

वातावरणात एकंदर मिश्कीली अवतरण्यामागे दासचाच हात होता. पण आत मिश्कीली अवतरल्यामुळे सुनयनाने तोंडही उघडू नये ही अट दासला मागे घ्यावीच लागली. तो अपमानही ठरला असता तिचा.

वातावरण नॉनऑफिशियलही झालेले होते. तसाही दास जॉब सोडतच होता. काळे आणि देवीचे प्रेशर घेण्याची आता दासला गरज नव्हती. पण आजवरची रिलेशन्स बघता तो काही उगाच अपमानास्पद बोलला नसताच.

"डॉक्टर.. तुम्हाला तुमचे स्त्री असणे आवडते???"

"हो? आवडते की?"

"मला माझे पुरुष असणे आवडत नाही..."

"का?"

"कारण.. हे शरीर पुरुषासारखे असावे असे वाटत नाही..."

"कधीपासून????"

"एक साधारण... आठ महिन्यांपासून... "

"का??? आठ महिन्यांपूर्वी काय झाले होते??"

"लता चतुर्वेदीने जॉब सोडला आठ महिन्यांपूर्वी...."

डॉ. सुनयना भारती ब्लँक! काळे आणि देवी उडालेले. डोळे फाडून दासकडे बघतायत.

वेटरचे आगमन. बीअर सर्व्ह झाली. चीअर्स म्हणण्यासारखी अवस्था नव्हती ती. वेटर निघून गेल्यावर देवीने खाडकन विचारले.

"लताने जॉब सोडल्यापासून म्हणजे????"

दासने शांतपणे बीअरचा ग्लास हातात घेऊण प्रत्येकाकडे आळीपाळीने बघत सांगितले.

"आय हॅड रेप्ड लता.... मी लताचा रेप केला होता..."

लॉ! कायदा! ज्यात फक्त कायद्याने पडावे अशी बाब होती ही. एखाद्या मानसशास्त्रीय कांउंसेलरने यात पडावे याची शून्य आवश्यकता होती.

लता चतुर्वेदीने खरंच आठ महिन्यांपूर्वी जॉब सोडलेला होता. तीन वर्षे त्याच डिपार्टमेंटला काम करून तिने अचानक जॉब सोडताना नवर्‍याची चेन्नईला ट्रान्स्फर झाल्याचे कारण सांगितले होते. त्यानंतर तिने डिपार्टमेंटमधील कोणाशीही एका अक्षराचाही संबंध ठेवलेला नव्हता. उलट लोकांनाच इतके आश्चर्य वाटत होते की काय बाई आहे, नोकरी सोडून गेल्यापासून एक साधा फोनही नाही?????. तिला केलेल्या फोनला नो रिप्लाय होता.तिला केलेल्या एसेमेसेसना काहीही उत्तर नव्हते.

लता चतुर्वेदी हा पुरुषांच्या गप्पांत वारंवार येणारा 'सेक्सबाँब' होता. कारण नसताना 'वखवखवेल अशी' वेशभुषा करून येणारी लता चतुर्वेदी सगळ्या कंपनीच्याच नजरा झेलत मेसला जेवायला जायची यायची.

दासचा शांतपणा वादळे आणणारा होता.

काळेला पहिले तोंड फुटले.

"दास.. आर यू इन सेन्सेस???"

"अ‍ॅबसोल्यूटली.... लता चतुर्वेदीचा मी रेप केला होता..."

"धिस इज अ पूलिस केस दास?????"

काळे अजूनही बीअरला न शिवता दासकडे संतापाने बघत असताना दास शांतपणे बीअर घेत होता.

"इट कान्ट बी अ पूलिस केस सर... शी नेव्हर मेड एनी कंप्लेंट..."

"बट आय कॅन... आय कॅन रजिस्टर अ केस राईट नाऊ दास???"

"नो यूझ सर... शी विल नॉट सपोर्ट इट..."

"हू???"

"लता"

"हो पण... बेसिकली कंपनीच केस करेल दास तुझ्यावर??? तू एक राक्षस आहेस???? तुला लाज वाटत नाही हे सांगायला???"

सुनयना भारतीचा तर चेहराच पडलेला होता. देवीला सांगून येथून उठून निघून जावे असे तिला वाटत होते. देवीच्याही मनात अगदी तेच विचार होते. या केसमध्ये गुंतायची दोघींचीही इच्छा नव्हती.

"कंपनी काय केस करणार सर??? आज या गोष्टीला आठ महिने झाले. फिर्यादी पक्ष इच्छुकच नाहीये केस करायला.. कंपनी काय केस करणार??? कोणाकडे काही पुरावा आहे का??? मी तर स्पष्ट नकार देईन असे काही केल्याचा.. अगदी त्या लताला पोलिसांनी हॅरॅस करून तिच्याकडून उत्तर काढायचा प्रयत्न केला तरी माझा वकील तिच्या फिर्यादीच्या कोर्टात चिंध्या उडवेल... कंपनी कसली केस करणार??? आय अ‍ॅम नॉट अ राक्षस बिक्षस सर... हे मी तुम्हाला आज सांगतोय म्हणून समजले तरी... नाहीतर मी नुसताच जॉब सोडला असता तर तुम्हाला कधीच कळले नसते..."

आता मात्र सुनयना उसळली.

"मिस्टर काळे... या नराधमाची आत्ताच्या आत्ता तक्रार दाखल करा... मी येथून निघाले आहे देवी.. मला वाटते तूही उठावेस..."

दास भडकला. भडकला असला तरी सार्वजनिक जागा आहे हे पाहून दबलेल्याच स्वरात म्हणाला...

"मिस डॉक्टर... या देवी गुंदेचा आणि मी दहा वर्षे एकत्र काम करतो... आजवर आम्ही तीन आऊट स्टेशन ट्रिप्सही केलेल्या आहेत बरोबर...रात्री अकरा अकरा वाजेस्तोवर ऑफीसमध्ये कोणीही दुसरे नसताना कामही केलेले आहे... तुम्ही येथून उठून जाण्याइतपत आत्ता तर काही घडलेले नाहीच आहे... पण यानंतरही काही घडणार नाही आहे... तुम्हाला काय धोका आहे माझ्यापासून??? इथे तर साहेब स्वतः आहेत... इतके लोक आहेत आजूबाजूला... जी गोष्ट मी आठ महिने लपवली होती.. ती गोष्ट त्या आठ महिन्यात समजलेली नसल्याने या देवी मॅम माझ्याशी नेहमीसारख्याच वागत होत्या ना??? मग मीच ती गोष्ट सांगितल्यावर एकदम मी गुन्हेगार, राक्षस आणि नराधम ठरतो हे कसे काय????"

"नो इन्टरेस्ट मिस्टर दास... मला तुमच्याशी एक शब्द बोलायचा नाही आहे.. या काळ्यांनी तक्रार केली नाही तर मी चाललीय आत्ताच्या आत्ता तक्रार करायला..."

"कोणत्या बेसिसवर तक्रार करणार आहात डॉक्टर???.. रेप तुमचा झालाय का???? जिचा झालाय ती तर अदृष्यच झालेली आहे... या इथे मी तुम्हाला तिघांना बोलावलेले नव्हते... तुम्ही मला बोलावले आहेत.. फक्त तुम्ही तिघे शांत बसलात तर तुम्हाला सगळे नीट समजेल.. आता तुम्हा दोघींना तर काहीच धोका नाही आहे... त्यात पुन्हा इथून... माझं सगळं ऐकून निघून गेल्यानंतर तुम्ही रीतसर तक्रार दाखल करू शकताच... ते स्वातंत्र्य कुठे कोण हिरावून घेतंय तुमच्यापासून??? पण मीच उघड केलेल्या बाबीवरून मलाच नराधम म्हणून निघून जायच्या ऐवजी नुसत्याच थांबलात तर इतरही काही उलगडे होतील.. "

देवी फारच कौटुंबिक वातावरणातील स्त्री होती. तिला हे झेपतच नव्हते. पण सुनयना हजारो केसेस पाहिलेली तज्ञ होती. तिला निदान 'दास' ही एक केस म्हणून तरी थांबणे शक्य होते. पण काळेंनी धीर दिल्यामुळे दोघींनीही ठरवले की थांबायचे. हळू आवाजात बोलायचे. मुख्य म्हणजे या निर्णयामागे दासचे आजवरचे अनेक वर्षांचे खणखणीत सभ्य वर्तन होते.

दोघीही मान खाली घालून बसल्या. बीअर पिण्यातला देवीचा इन्टरेस्टच संपला.

"दास.. आय वॉन्ट टू नो ईच अ‍ॅन्ड एव्हरीथिंग दॅट हॅपन्ड"

"शुअर सर.. "

वेटर येऊन काही स्टार्टर्स ठेवून निघून जायला लागला तेव्हा दासने त्याला स्पष्टपणे 'बोलावल्याशिवय आता येऊ नका' असे सांगितले. मान तुकवून तो निघून गेला.

दास बीअरचा ग्लास न्याहाळत बोलू लागला.

==================================

"लता वॉज अ बेड पार्टनर.. नथिंग एल्स.. या देवी मॅमही शपथेवर सांगतील.. नको ते अवयव दाखवण्याचा तिला सोसच फार... मग आम्ही पुरुष तर काय??? वासावरची कुत्रीच.... काही दिसले की रोखून बघायचे... वळून बघायचे... सारखे सारखे तिथेच बघायचे... ते लक्षात आले की ती चिडल्यासारखे आणि वैतागल्यासारखे करत काहीतरी सावरल्यासारखे दाखवणार आणि पुन्हा थोड्या वेळाने पदर तरी सरकणार नाही तर आतले कपडे तरी बाहेर दिसायला लागणार... कंपनीच्या नियमात नागडे येऊ नका हेसुद्धा नाहीये... विचित्र कपडे घालून येऊ नका असा हल्ली नियम असतो अनेक ठिकाणी.... पण या नियमाची व्याप्ती किती??? नेमकी किती??? .. काय नियमबाह्य आहे आणि काय नाही हे कसे आणि कोण आणि कुठे ठरवलेले आहे???? स्त्रीचे शरीर किती प्रमाणात आणि कोणत्या अवयवापुरते दिसले तर ते वैध आहे याचा नियम कोणता???"

"मी लताकडे ढुंकून बघायचो नाही.... असे वागणे मला चीप वाटते वगैरे म्हणून नव्हे.. घाला काय घालायचे ते.. पण आव आणू नका... कमेंट झाल्या तर बोंबलू नका... बाकीच्या बायका काय सांभाळत वागतात तेही तपासा... नाहीतर सगळ्याच कपडे काढून फिरा... फक्किंग थ्री फोर्थ... कोपरापर्यंत हात झाकून पाठ आणि गळा उघडे टाकायचे.... भारतीय पुरुषाची मानसिकता हे सगळे पाहण्याच्या बाबतीत जितक्या वेगाने बदलत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने या स्त्रियांचे प्रदर्शन वाढत आहे... तेही ठीक आहे... आम्ही साले सभ्य... आपले सप्लायर्स सभ्य... ड्रायव्हर्स सभ्य... कस्टमर्स सभ्य... प्यून्स सभ्य... प्रत्येकाच्या घरी बायकापोरे... प्रत्येकजण पाहून मनातल्या मनात 'काय च्यायला बाई आहे' म्हणून पुढे जाणार... लता चतुर्वेदीचा नवरा तिच्याबरोबर झोपतही नसेल असे मानणार... मीच काय... डिपार्टमेंटमधील प्रत्येकजणाच्या मनात हेच विचार... सगळेच गांडू.... सभ्य... चांगलंय की... सभ्यच असायला हवे..."

"काळे साहेब तुम्ही लता चतुर्वेदीला तीन वर्षात कमीतकमी वीस वेळा प्रत्यक्ष स्वतःहून झापलेले आहेत.. इनामदार रोज झापायचा ते वेगळंच... पण बायकांना वाटेल तसे झापताही येत नाही साला... लगेच रुमाल घेऊन नाकं पुसत डोळ्यातून पाणी काढून कामाला लागल्याचे दाखवणार... आपल्यालाच वाटते.. च्यायला आपल्या बहिणीसारखी आहे... हिला आपण उगीच झापले.. पुढेपुढे करायला आणि कंपनीच्या पार्टीत ही सगळ्यात पुढे... ज्याला जसं वागायचं तसं वागूदेत की??? हेही आहेच म्हणा... पण मग आम्हाला जसं वागायचं तसं का वागू दिलं जात नाही???? मेहेंदळेने तिच्यासमोर ती ड्रिंक घेत असताना कमेंट केली की लताबाईंची वेशभुषा म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचे भूषण आहे... तर ती चिडलीही नाही... खदाखदा हासली... ही टीका आहे... थट्टा आहे... हेही तिने ध्यानात येऊनही ध्यानात घेतले नाही... डिपार्टमेंटच्या कोणत्याही स्त्रीपेक्षा तिची अधिक मैत्री साळवीबरोबर... का तर साळवी मुळचाच श्रीमंत.. देखणा आणि त्याचा पाचगणीला स्वतःचा तीन खोल्यांचा बंगला म्हणून.... त्याला सगळ्यांसमोर टाळ्या देऊन हासत हासत चिडवण्यात ही पुढे... देवी मॅम तुमच्यासारख्यांनी लाजेने मान खाली घालावी असे लताचे वर्तन होते... आय रेप्ड हर... येस आय रेप्ड हर.... बट फॉर अ व्हेरी व्हेरी डिफरंट रीझन... "

"डोळे माणसाला काय बघायला दिले आहेत??? सौंदर्य की कुरुपता??? जिभेचा उपयोग काय??? साखरेचे पदार्थ खाणे की जहर खाणे??? प्रत्येक व्यक्ती आपल्या इंद्रियांचा वापर सर्वात सुंदर पद्धतीने होईल हेच बघत असते काळे साहेब... मीही तेच बघितले..."

"मी हे बघितले की माझ्या डोळ्यांचा वापर... डोळे या इंद्रियाचा वापर हा कुरुपता बघण्यासाठी होऊ नये... कंपनीत जॉईन होताना आम्ही दिसतो कसे हे नाही बघितले जात... आम्ही काम कसे करतो हे बघितले जाते... लता चतुर्वेदीचे काम फालतू होते... मी ते नाही बघितले..... तिचे ते तथाकथित सौंदर्य अंगावर येणारे असे... लाऊड असे होते... मी तेही नाही बघितले... मी तिच्याकडे बघायचोच नाही...."

"स्वतः सगळे अंग झाकून घेणार्‍या आया मुलींना त्यांना हव्या त्या पोषाखात पाहताना काय विचार करत असतात??? की निदान हिला स्वातंत्र्य मिळतंय... हिला कंफर्टेबल वाटतंय आणि हिला जगाप्रमाणेच वागायचंय तर वागूदेत... है की नै??? अगदी बरोबर निर्णय आहे हा..."

" स्त्रीचे शरीर असतेच तसे... वळणदार... नाजूक.. सर्वत्र सौंदर्याच्या खाणाखुणा... त्यात पुन्हा सजावट... तीही थोडीथोडकी नाही तर प्रत्येक अवयव खुलून दिसेल अशी.... पुरुष म्हणजे राकटपणा.. धड प्रमाणबद्धता नाही.. रूप नाही... बेढब... ओंगळवाणा...आणि याच दोन लिंगात आकर्षणही असते... "

"आज लता कोणत्या पोषाखात येणार हा डिपार्टमेंटमध्ये पुरुषात थट्टेचा विषय झाला होता..... त्यावरून आपापसात कमेंट्स होऊ लागल्या होत्या... मी त्यातही नव्हतो... "

नंतर नंतर असे व्हायला लागले की त्यातलाही रस गेला... ही रोजच अशी वावरते म्हंटल्यावर कोण काय म्हणणार... बहुधा डिपार्टमेंटमधल्या बायकांचीही कुजबूज हळूहळू थांबलेलीच असावी... एकंदर लताला आणि तिच्या वर्तनाला स्वीकृतीची पावती मिळाली... प्रश्न मिटले... आता तिचा कामातील परफॉर्मन्स आणि सातत्य एवढेच विषय महत्वाचे राहिले... लोकांच्या नजरा निवळल्या... चर्चा आटल्या... विषय संपला..."

"पण लता तेवढीच नव्हती... देहप्रदर्शन इतकाच भाग असता तर फार तर काय काही दिवस हॉट इश्यू ठरून नंतर तो निवळलाही असता... लता त्या बाहेर होती... हल्लीच्या मुली काहीही घालताना दिसतात... अडाणी, न शिकलेले आणि टपोरी लोक ते पाहात बसतात... चांगल्या घरातले पाहून न पाहिल्यासारखे करतात.. बाकीचे उरलेले जे किंचित सज्जन म्हणवतात ते तोंड वाकडे करतात किंवा दुर्लक्ष करतात... काही वेळा काही जण असेही असतात की त्यांच्या नजरा पूर्वीच मेलेल्या असतात... स्त्रीने किती दाखवावे हा स्त्रीचा प्रश्न असला तरी समाजाची एकंदर जडणघडण व समाजमनाची बदल स्वीकारण्याची क्षमता सध्या कोणत्या टप्प्यावर पोचलेली आहे यानुसार स्त्रीचा पोशाख असावा हेही काही अनुचित नव्हे... तसे तर काय, बुरखा घातला तरी पुरुषांची प्रवृत्ती तीच राहील... भडकावू पोषाख यातील भडकावू हा शब्द पुरुषांच्या प्रवृत्तीचेच वर्णन करतो, स्त्रीच्या दृष्टीने तो पोशाख 'नॉर्मल' असतो.... किती आणि कसे घातले तर ते भडकावू ठरणार नाही याबाबत कायदाही नसतो आणि त्याला काही निकषही असू शकत नाहीत... तसे पाहायला गेले तर स्त्रीही काही अगदीच अभूतपूर्व पोषाख वगैरे घालते असेही नाहीच... एकंदर आजूबाजूला 'म्हणण्यापुरते तरी' सुरक्षित वातावरण असले तर स्त्री स्वतःच्या पोशाखात थोडे मर्जीनुसार बदल करू शकते.... 'भडकणारे' पुरुष जिभल्या चाटत गप्प बसतात... समाज असाच चाललेला आहे... जे काय आहे ते आहे... पण यात एक प्रॉब्लेम आहे.. जे प्रामुख्याने झाकले जाते ते दिसायला लागले की पुरुषांच्या 'टेस्ट'मध्ये सावकाश बदल होऊ शकतात.... या प्रोसेसमध्ये काही वेळा गुन्हे घडतात... काही वेळा घडलेले गुन्हे रजिस्टरच होत नाहीत... काही वेळा नुसतेच वादविवाद होतात... अपेक्षा वाढतात... हे सगळे आपोआप घडत राहते... पण एकदा बदल समाजमनाने स्वीकारला की नंतर ती संबंधीत स्त्री थोडी अधिक सैल वागू शकते... हे काही वेळा तिच्याही ध्यानात येत नाही... पण म्हणून ती दोषी नसते.. "

"पुरुषांचा दोष संपून स्त्रीचा दोष सुरू होतो तो टप्पा अतिशय महत्वाचा मानायला हवा... हा तो टप्पा आहे जेथे स्त्री असे गृहीत धरते की सगळेच पुरुष आपल्या वावरण्याला स्वीकारत आहेत... कोणाच्याच मनात काही वावगे नाही आहे.. मग अशी स्त्री कोठेही तशीच वागू लागते.... एखाद्या विशिष्ट प्रादेशीक व सांस्कृतीक जनसमुदायात याबाबतचे विचार किती मोठ्या स्पॅनवर रेंगाळलेले आहेत हे ती बघत नाही... जेथे पाश्चात्य संस्कृती वर्षानुवर्षे जवळून पाहिलेले असतात तेथेच आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या वर असलेल्या थरातील स्त्रिया आता आधुनिकतेच्या नावाखाली अंगप्रदर्शन करत आहेत हे पाहून वेड लागणारेही असतात... प्रसंगाला आणि ठिकाणाला साजेसे वागणे याचाही विचार होत नाही... आणि मग शेवटी समाजाच्या दृष्टीने आक्षेपार्ह असे वावरणेही 'आम्ही हवे ते करू, तुमच्याच मनात पाप आहे' या आवरणाखाली झाकले जाते... "

"लता फक्त 'तशी वावरणारी'च होती असे नाही... त्याहीपेक्षा तिचे वर्तन अधिक होते... ती फक्त पुरुषांशीच सलगी करायची... ऑफीसच्या कामात मागे पडायची... मात्र ऑफीसच्या इव्हेन्ट्समध्ये सर्वात पुढे असायची... हेही ठीक आहे जोवर इनामदार किंवा काळेसाहेबांना इतका प्रॉब्लेम नव्हता की अगदी तिला हाकलून द्यावे... पण ... एकदा तिला इनामदारने खूप झापून 'आजच्याआज हे काम करून मगच घरी जायचे' असे सुनावले. चेहरा पाडून आणि बहुतेक मनातल्या मनात इनामदारला शिव्या घालून ती काम करायला बसली. मी अनेकदा रात्री आठ आठ वाजेपर्यंत थांबायचोच... मीही त्या दिवशी थांबलेलो होतो... मी एकटाच आहे हे पाहून तिने इनामदारला प्रचंड शिव्या देऊन घेतल्या... ऑफिसमधील इतरांनाही शिव्या देऊन घेतल्या... हेही ठीक आहे.. गॉसिपिंग किंवा राग म्हणता येईल... पुढे काय??? तर आजूबाजूला कोणी नाही हे पाहून इनामदारवर सरळ आरोपच केला.. म्हणे त्याची नजर चांगली नाही... मी भडकलो... इनामदार आज सिनियर असला तरी आम्ही जुने मित्र आहोत... झापलं मी तिला... गप्प बसली... दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मला इनामदारने थांबायला सांगितले.. सगळे गेल्यावर म्हणाला तू लताला काही वावगं बोललास का?? का तर म्हणे दास असेल तेव्हा मला थांबवत जाऊ नका म्हणाली त्याला... मी इनामदारला जुन्या मैत्रीचा हवाला देऊन जे काही झाले ते सांगितले.. नंतर एकदा मला साळवी म्हणाला होता... बाई म्हणतीय तिला पाचगणीचं घर कधी दाखवणार... हेही मी सोडून दिलं... पण देवी मॅम... मध्यंतरी एकदा शांभवी मला विचारत होती... तुमचं आणि लताचं काय झालं??? ... मी दहा दहावेळा खोदून विचारल्यावर कुठे म्हणाली... ती तुमच्यासंदर्भात काहीतरी विचित्रच बोलत होती आम्हा बायकांत... मग मात्र मी खरंच ऑफ झालो काळे साहेब... एकदा पुन्हा इनामदारने तिला थांबवल्याचे मला समजले... मी मुद्दाम जोरात देवीमॅमकडे बघत सगळ्यांना ऐकू येईल अशा पद्धतीने सांगितले.. मॅम... मी आत्ता चाललोय आणि उद्या औरंगाबादला आहे.. लता चतुर्वेदी थांबली होती... मी साडे सातला पुन्हा गेटपास घेऊन डिपार्टमेंटला आलो... मला पाहून चरकलीच... मग कोणीनाही हे पाहून मी तिला फैलावर घेतलं... तर म्हणते मी तुझी तक्रार केली तर नोकरीला मुकशील...म्हंटलं तक्रार करण्यासारखं मटेरिअल तर प्रोव्हाईड करतो तुला... आणि मी तिला हात लावला.. काळे साहेब... दॅट वॉज सच अ बिग शॉक फॉर मी... मला वाटलं ती पळत सुटेल... आरडा ओरडा करेल.. आणि कोणी आलं की मी खिशातून चिठ्ठी काढून त्या माणसाला दाखवेन.. त्या चिठ्ठीवर मी लिहिलं होतं की कंपनीच्या कामाला फाट्यावर मारून ही नखरेल चतुर्वेदी बाई ऑफीसमधील वातावरण आणि सहकार्‍यांचा एकमेकांवर असलेला विश्वास नासवत आहे.. खरंच काळे साहेब... मी हे कोणाला तरी बरोबर घेऊन जाऊनही करू शकलो असतो... पण हे असे काही करायला कोणीही माझी साथ दिली नसती...प्रत्येकाला आपली नोकरी प्यारी... आश्चर्याचा धक्का म्हणजे ही बाई अजिबात पळाली नाही... उलट हासत म्हणाली... हे करण्यासाठी ऑफीस ही काय जागा आहे का??? म्हंटलं का हो बाई??? म्हणे इथे काय बेड आहे का काय??? बेड तर म्हणे काळ्यांच्या केबीनमध्ये आहे ... तो जाडजूड सोफा... माझीच पळून जायची वेळ आली... मी हात सोडला तर म्हणाली गेटपास काढला आहेत ना???... माझ्या लक्षात आलं...उद्या हिने लेखी तक्रार दिली तर मी आणि माझी अब्रू संपली... मी म्हंटलं आर या पार... तिला ओढण्याआधी डिपार्टमेंटचे लाईट बंद केले... सिक्युरिटी सात वाजता येऊन गेल्यावर दहाशिवाय येत नाही हे माहीत होतं.... मी लता चतुर्वेदीवर आईल्सवरच्या गालिच्यावर रेप केला.... इट वॉज हर रेप फॉर मी.... बट इट वॉज अ ग्रेट प्लेझर फॉर हर.. जिचा घोर अपमान व्हावा म्हणून मी शुद्ध सोडून हे कृत्य केले तिच्यासाठी ती शरीर संबंध ठेवण्याची सर्वात नावीन्यपूर्ण कल्पना ठरली... त्यावेळी सिक्युरिटी आला असता तर आम्ही दोघेही बाहेर झालो असतो... "

"बाजूला झाल्यावर मी तिला भीती वाटेल असे समजून उगाचच दरडावून म्हणालो..."

'याबाबत बोललीस तर वाईट होईल'... मला म्हणाली... वन मोर टाईम.. मला ते शक्यच नव्हते.. सिक्युरिटी येईल अशी भीती वाढायला लागली होती.. मी निघालो... शेवटचे अस्त्र वापरून पाहिले... तिच्याकडे बघत खिजवत हासत म्हणालो... 'साळवीपण आलाय खाली.. त्यानेच मला आधी वर पाठवले...'... तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.. ताडकन उठून बसत ती भेसूर चेहर्‍याने पाहू लागली.... मला म्हणाली यू हॅव रुईन्ड मी... म्हंटलं एक लागला तर प्रेम आणि दोघे लागले तर सत्यानाश का??? हमसून हमसून रडू लागली... मी आणखीनच धमकावले साळवीला पाठवतो म्हणून.. म्हणाली मी जिन्याने खाली जातीय तो लिफ्टने येईल म्हणून... प्लीज सोडा ... म्हंटलं पळ... आणि उद्यापासून येऊ नकोस... पुन्हा तोंड दाखवलंस तर डिपार्टमेन्टचे सगळे यायला लागतील... पळत सुटली.. "

"काळे साहेब.... रेप करताना मी जणू माझा रेप होतोय अशा भावनेने करत होतो आणि ती जणू माझा करतीय अशा भावनेने.. त्या बाईचा रेप झाल्याची खंत तेव्हा वाटत नव्हती... पण मी उठून तिला धमकी दिली साळवी येत असल्याची... पुढची धमकी दिली की डिपार्टमेन्टचे सगळे पुरुष असेच आहेत याची... आणि त्यावेळी तिचा जो चेहरा झाला होता काळे साहेब... मी माझ्या मेलेल्या आईची हजार वेळा माफी मागीतली... मला आत्महत्या करावीशी वाटली.. हिम्मत नाही झाली... ही बया खरंच उद्या आली आणि झाला प्रकार कुणाला सांगितला तर आपण गजाआड जाऊ असे वाटायला लागले.. दुसर्‍या दिवशी मी ऑफीसला आलोच नाही... कोणाचातरी पहिला फोन येईल आणि तू हे केलेस का अशी विचारणा होईल तेव्हा आपण या गावातून निघून जायचे हे मी ठरवले होते... पण च्यायला कोणाचाच फोन नाही.... मी औरंगाबादलाही गेलो नाही.. मीच अकरा वाजता फोन केला.. सहज पारखीला विचारले काय बाई आज आली की नाही?? म्हणाला नाही आली... तिचा फोन आला होता की तिच्या मिस्टरांची चेन्नईला ट्रान्स्फर झालेली आहे आणि तिने हा जॉब सोडलेला आहे... इनामदार भडकलाय म्हणे.. "

"आठ महिने... आठ महिन्यात साधी सेटलमेंटसाठीही आली नाही ती.. एखादी घरंदाज स्त्रीही आली नसती... पण हिच्या न येण्यामागची भूमिका वेगळीच होती.. ही आली नाही कारण भांडे फुटल्याचे सगळ्यांना कळले असेल म्हणून... मी समजायचे ते समजलो... बाहेरून खूप चौकशी केली... डिपार्टमेन्टचे एकंदर दोघे तिच्याघरी अचानक जाऊन आले होते... तेव्हा ती तिथे नव्हती... जे कोण होते त्यांनी ती चेन्नईला असल्याचे सांगितले... मला समजले की ही पळून गेलेली असणार.. "

"नंतर एक भयानक टप्पा सुरू झाला सर... ती त्या नोकरीवर किती अवलंबून होती हेही न पाहता मी माझ्या कृत्यामुळे तिच्यावर ते संकट आणले होते... एक चालेल पण दोघे नकोत या भावनेच्या प्रदर्शनाच्यावेळी तिच्या चेहर्‍यावर मला अपार दु:ख दिसले होते.. प्रत्यक्षात साळवी किंवा कोणालाच काहीच माहीत नसताना ती मात्र तेव्हापासून असे जगत आहे की जणू आपल्या कंपनीत हे सगळ्यांना माहीत आहे की ती डिपार्टमेन्टपैकी कोणालाही उपलब्ध असते... तिच्या अब्रूचे दिवाळे वाजले.. नोकरी गेली.. घालवायला लागली तिला...माझ्याबरोबर आलेले जबरदस्तीचे संबंध प्रत्यक्षात गोड मानणारी लता चतुर्वेदी आज मात्र वेश्येहून अधिक बदनाम मानत आहे स्वतःला.. ती आहे कुठे हे समजले तरी मी जाऊन माफी मागेन.. पण ती सापडत नाही... आता तर तिचा तो नंबरही उपलब्ध नाही आहे... मी चौकशी खूप केली... ती सापडत नाही... असेही असेल की जिथे असेल तिथल्या शेजारपाजार्‍यांना नादीही लावत असेल.. असेही असेल की येथील नोकरी गेल्यामुळे तिचे काही फार बिघडलेले नसेल... पण मी?????? आय अ‍ॅम अ रेपिस्ट... मी एक बलात्कारी पुरुष आहे... कायद्याकडे मी स्वतः गेलो तर मला शिक्षा नक्की मिळेल.... पण लता चतुर्वेदीचीही साक्ष निघेल.. डिपार्टमेंटच्या इतरही स्त्रियांची साक्ष निघेल.. लता त्यातून अधिक बदनाम होईल... आत्तापर्यंत फक्त तिलाच वाटत असेल की ती बदनाम झाली आहे... त्यावेळी मात्र ती प्रत्यक्षात बदनाम होईल... आज आमच्या दोघांच्याही मेडिकल्स होऊ शकत नाहीत... फक्त एकाचवेळी आम्ही कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये होतो इतकेच सिद्ध होऊ शकेल... सेलफोनवर कोणतेच रेकॉर्ड नसेल.. मी निर्दोष सुटेनही... पण... मी मला कसा निर्दोष सोडू???"

"मी फारच वेगळी शिक्षा घेणार आहे... आय अ‍ॅम गोईन्ग टू लिव्ह लाईक अ फिमेल हिअर ऑन... आय अ‍ॅम गोइन्ग टू बी अ फिमेल अ‍ॅक्च्युअली... आय मे गेट रेप्ड... आय मे हॅव टू टॉलरेट ऑल दॅट अ फिमेल हॅज टू... हे माझे वयही नाही सेक्स चेंज करण्याचे... माझ्या शरीरावर आणि मनावर घातक परिणाम होणार हे नक्की आहे.. पण तरीही मी ते करणार आहे.. बिकॉज आय वॉन्ट टू गो थ्रू ऑल दॅट लता हॅड गॉन थ्रू... हे खरे पौरुषत्व ठरेल.. जगातल्या कोणत्याही कायद्यात नसलेली पण सर्वात अचूक शिक्षा हीच आहे देवी मॅम... मी एकटा आहे.. बायकापोरे नाहीत.. कोणाला माझ्या या कृत्यामुळे मनस्ताप व्हावा असे जगात कोणीही नाही... मी सेक्स चेंज झाल्यावर वेगळ्या गावात जाऊन एक स्त्री म्हणून नोकरी धरेन.. जबरदस्तीचा शरीर संबंध म्हणजे काय हे अनुभवल्याशिवाय मला शिक्षा मिळणार नाही.. मला अनुभवायचे आहे की पुरुषांच्या बदनाम झालेल्या नजरा नेमक्या कशा असतात.. घुसमट कशी होते.. हे सगळे आपल्याच डिपार्टमेन्टला राहून करणे तुम्हाला कोणालाच मान्य नाही आहे.. मला कायद्याने शिक्षा देणे तुमच्याच काय माझ्याही हातात नाही आहे.. कारण माझा वकील ते नक्कीच माझ्याबाजूने फिरवणार... ही विल सर्टनली वॉन्ट टू विन द केस.. दो आय मे नॉट.. जीव का द्यायचा??मी जीव घेतलेलाच नाही.. "

"अ‍ॅक्च्युअली इट्स थ्रिलिंग काळे साहेब... टू चेंज वनसेल्फ एन्टायरली... आय अ‍ॅम थ्रिल्ड... मी स्त्री म्हणून कसा असेन, कसा वागेन, याची कमालीच्या बाहेर उत्सुकता आहे मला... समाज माझ्याबाबत काय विचार करतो हे बघायचे प्रचंड कुतुहल आहे.. स्वतःहून पुरुषार्थाचा त्याग हाही पुरुषार्थच की.. अ‍ॅन्ड यू नो?? आय डोन्ट हॅव टू अ‍ॅन्सर एनीवन फॉर दॅट... इझन्ट इट?? मी सांगत राहीन तुम्हाला काळे साहेब.. की 'मिस' 'माया' 'दास' कशी जगत आहे...

======================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मजा येत होती वाचताना... शेवटाकडचा तो प्रवास असला तरी शेवट वाचायला आणि त्याची कल्पना करायला नाही आवडले.. बाकी तुम्हाला कुठून कुठून काय सुचेल काही सांगता येत नाही..

कथा वाहून झाल्यावर नेमकं काय वाट्टयं तेच कळेना माला! Sad

बाकी तुम्हाला कुठून कुठून काय सुचेल काही सांगता येत नाही..
>>> +१००!

पण दासने रेप केलाच नाही ना???
कारण रेप हा इच्छेविरुद्ध असतो, ती त्याला म्हणाली वन मोर टाइम.
अर्थात त्याने लताचा वाइट प्रकारे अपमान केला हे पण खरे ,पण स्वतः स्त्री होउन स्वतःवर जबरदस्ती करुन घेणे एकदम पर्व्हर्स वाटते. हा तर जास्तच अपमान आहे स्त्रीत्वाचा.
नंतर तर तो म्हणतो
"अ‍ॅक्च्युअली इट्स थ्रिलिंग काळे साहेब"
मला तर हा दास/दासी मानसिक रुग्ण वाटतो/वाटते.

बाकी तुम्हाला कुठून कुठून काय सुचेल काही सांगता येत नाही..
>>> +२००!

पेशव्यांशी सहमत.. एका संवेदनशील विषयावर अगदीच असंवेदनशील कथा लिहीली गेलीये. संवाद अजिबातच नैसर्गिक नाहीत. पात्रांचं वागणंही लेखकाच्या मर्जीनुसार. एका उदात्त हेतूने केलेल्या रेपबद्दल स्त्री होण्याची शिक्षा घेणा-या दासला एक सांगावंसं वाटतं..

सेक्स चेंजसाठी इतकं काही करायची गरज नाही. माबोवर किंवा फेसबुकवर स्त्री होण्याची सुविधा उपलब्ध आहे कि.. अगदी विनातोडफोड , बिनखर्चाची आणि इन्स्टंट Proud Biggrin )

लेखकाने सेक्स चेंज शस्त्रक्रियेबद्दल काही गैरसमज करून घेतले आहेत असं वाटतंय.

वाचताना असं वाटलं कि दासने पाश्चिमात्य देशात जाऊन शस्त्रक्रिया करून घेण्याचं ठरवलं आहे. तिथे ही शस्त्रक्रिया इतकी सोपी नाही. कायदे अत्यंत कडक आहे. तुम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे असा फॉर्म भरून दिल्यानंतर तुमची संपूर्ण चौकशी केली जाते. तुमच्यामधे खरीच एक स्त्री असेल आणि काही कारणाने पुरूष शरीराचे असेल त्या केस मधे योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यावर शस्त्रक्रिया केली जाते.

पुरूषाला स्त्री किंवा स्त्री ला पुरूष व्हायचे असल्यास पंधरा वर्षे किंवा कितीही काळ थांबावे लागते ( प्रत्येक देशाचा हा काळ वेगळा आहे). या कालावधीत मानसोपचार तज्ञाकडे अनेक सेशन्स करावी लागतात. ही सेशन्स केल्यानंतर आणि कालावधी पार पाडल्यानंतरही शस्त्रक्रिया करण्याबाबत अनुकूलता दाखवण्यात येते. डिस्कव्हरी वर याबाबत एक चांगली फिल्म दाखवण्यात आली होती.

यावर उपाय म्हणून लोक सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया या देशात जाऊन शस्त्रक्रिया करून घेतात. इथे मानसोपचार ऑप्शनल आहेत आणि आहेत ते फारसे त्रासदायक नाहीत. कालावधी देखील तीन वर्षाचा असल्याने जास्त वाट पहावी लागत नाही. पैसे अर्थातच कमी लागतात. काही हॉस्पिटल्स याच कामासाठी लोकप्रिय झालेली आहेत. कायद्याचं याबाबत काही म्हणणं नाही.

पण कुठल्याही परिस्थितीत आठ महिन्यात ..नो वे !

'काहीच्या काही कथा' असा विभाग इथे नाही का?

सेक्स चेंज करण्याची शस्त्रक्रिया वर लिहीलय त्याप्रमाणे परदेशातही सोपी नाहीय. अलिकडेच जवळच्या ओळखीत ही शस्त्रक्रिया झाली आहे. ज्या व्यक्तिला ही शस्त्रक्रिया करायची आहे त्याच्याशिवाय त्याच्या आजुबाजुच्या लोकांनाही समुपदेशन देतात. बराच मोठा प्रवास आहे तो!

सर्वांचे आभार

(टीप - सेक्स चेंज हा विषय असा आहे की मला तांत्रिक माहिती नसल्याने अनेक संदर्भ, लिंक्स वगैरे वाचावे लागले. ते सर्व वाचून वरील कथेत उल्लेख केलेले आहेत. माझे त्याबाबत गैरसमज नाहीत हे कन्फर्म झाल्यावरच ते संदर्भ कथेत घेतले आहेत. ते फार सोपे आहे, दुकानात गेले की करून मिळते असा दावा कथेत केलेला नाही)

(टीप - सेक्स चेंज हा विषय असा आहे की मला तांत्रिक माहिती नसल्याने अनेक संदर्भ, लिंक्स वगैरे वाचावे लागले. ते सर्व वाचून वरील कथेत उल्लेख केलेले आहेत. माझे त्याबाबत गैरसमज नाहीत हे कन्फर्म झाल्यावरच ते संदर्भ कथेत घेतले आहेत. ते फार सोपे आहे, दुकानात गेले की करून मिळते असा दावा कथेत केलेला नाही)

नो इश्युज. गै.न. Happy

एवढी जागरुकता पुरुषात येत असेल तर ........ कल्पनाच आहे ही. प्रत्यक्ष ..... नाही होणार असे... खरे तर व्हायला हवे.

असे दास समाजात निर्माण होणे कठीण.

बेफी,

तुम्ही रामगोपाल वर्माच्या मार्गावर का चाललाय Uhoh Light 1

कल्पना वेगळी आली डोक्यात तुमच्या पण जसं कॅरॅक्टर उभं झालय दासचं त्यावरून त्याने स्त्री व्हायच्या घेतलेल्या निर्णयाला ठोस कारण मिळण्यापेक्षा तो लताबाबतीत घडलेल्या त्या प्रसंगामुळे मनोरुग्ण झाल्याचंच जास्त वाटतेय. त्याला खरंच "डॉ. सुनयना भारतीच्या" ट्रिटमेंटची गरज आहे.

शिवाय दासने शेवटचे सगळे भडभडून एकसूरी बोलावे म्हणून तुम्ही इतर तिघांना पार गप्प करून टाकलेत ते खटकले....... काही ना काही संवाद इतर तिघे करणारच.

डॉ. सुनयना ची रिअ‍ॅक्शनही खटकली. Sad एक मानसोपचारतज्ञ अश्या पध्दतीने रिअ‍ॅक्ट नाही होणार हे माझे वैयक्तिक मत.

चु.भू.द्या.घ्या.

(किरणने लिंक पाठवल्याने आज बर्‍याच दिवसांनी तुमची कथा वाचली... धन्यवाद किरण. नाहीतर सहसा "कथा" वाचायची वेळ येत नाही Happy )

मिलिंद ला अनुमोदन.
स्त्री होण्याचं दासचं कारण ही अगदी गुळमुळित आहे.
कथा गंडली आहे. Sad सॉरी टू से...

मला शिर्षकावरुन वाट्ले ?/२४ आहे कि काय ?
सेक्स चेंज नन्तर काय करणार माया ?
>>>>

पुढची कथा येणार विबासं बद्दल ....माझ्या आयुष्यातील संवेदनशील स्त्री (पुरूष ??)...माया दास.....

दिवे घ्या Happy

चीप.

बेफी,
कथा गंडली आहे असा रिमार्क दिला खरा, पण एक वाक्य खूप आवडलेलं ते लिहायचं राहून गेलं.

>>"व्हॉट टू से सर.. द कंपनी, आय फील.. इज लुझिंग अ थिंग ऑफ प्राईड... दॅट इट अ‍ॅक्सेप्ट्स दीज चेंजेस">>>>

पण भुक्कड कुठे गेला ?????????<<<

भुक्कड गेलाय सेक्स चेंज शस्त्रक्रिया करायला. Happy

Pages

Back to top