एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उका महेशरावांना ए महेश अशी हाक मारतोय का?

भुंग्या, कुहूसाठी सुद्धा नाही फॉलो करत सिरियल तू??? कमाले तरीच ती हल्ली सुधारलिये कवितांच्या बाबतित. Lol

घना प्रत्येक वाक्यानंतर पॉझ घेउन सारख राधा ...अस मह्ण्तो का ??????????????
मला अस....... राधा.....मी काय ......राधा...,...अजुन काहीतरी शब्द ........ राधा....
अग बिग अस का नाही म्ह्णत तो Sad जरा जवळच वाटत ते Happy

आणि तो घना फक्त राधाशी बोलतानाच अडखळत बोलतो, इतरांशी सलग बोलतो, एवढं काये तिच्याशी अडखळत बोलण्यासारखं? Uhoh

भुंग्या Proud

मिलिंद फाटकसोबत तिने व्हाइट लिलि नाइट रायडर हा नवीनच यशस्वीपणे केला होता.>>>
अरे बरोबर. आणि एक हसीना थी या पिक्चरमधे उर्मिलाच्या आईचा रोल केला होता. खूपच भूमिका पाहिल्यात तिच्या. पण हा गिरीश जोशी मात्र माहिती नव्हता.

मला तर वाटलं काल मुंबईत खूप पाऊस पडला असावा.
कारण मानव पिवळा "रेनकोट" घालून आला होता हपिसात!

आणि एक हसीना थी या पिक्चरमधे उर्मिलाच्या आईचा रोल केला होता.>>>

नाही तुरुंगातल्या एक बाईचा भन्नाट रोल केला होता.

रच्याकने ती कोणतं गाणं ऐकत होती ते काय कळ्ळं नाय ब्वॉ >>> 'आजा नच ले' (माधुरीचा कम-बॅक सिनेमा), त्यातलं 'हलचल हुई, जरा शोर हुआ' हे गाणं होतं ते. सुनिधी चौहान-सोनू निगमने म्हटलंय. कोंकना-सेन-शर्मा आणि इरफान खानवर चित्रित झालंय. मस्त आहे ते गाणं. Happy

ओके ललिता Happy
आणि एक हसीना थी या पिक्चरमधे उर्मिलाच्या आईचा रोल केला होता.>>> आईचा नव्हे, तर तुरूंगातल्या दादागिरी करणार्‍या बाईचा रोल होता तिचा. उत्तम अभिनेत्री Happy

आईचा रोल केला होता>>>>>>>>> रसिका जोशी ने तुषार कपूरच्या 'गायब' सिनेमात त्याच्या आईचा रोल केलाय Happy

>>त्या मानवाला हद्दपार केला पाहिजे.

अहो, असं नका म्हणू....ते ह्युमन राईटस वाले तुमच्या मागे लागतील. मानवी हक्कांची पायमल्ली केल्याबद्दल Happy राधने झापलं का त्याला? बरंय. देर आये, दुरुस्त आये.

काल उकाची एन्ट्री झाली तेव्हा मला वाटलं की आता हे त्याचे केस वार्‍याने उडताना दाखवतात ('तू तिथेमी' मधली मंजिरी किंवा 'आभास' मधली आर्या स्टाईल) का आधी पायापासून सुरुवत करून मग चेहेरा दाखवतात (तू तिथे मी मधला सत्यजित स्टाईल). पण एन्ट्री बरी दाखवली. तरी पण चश्मा वगैरे दिल्यामुळे ज्ञानाचं अ‍ॅडव्हान्स्ड व्हर्जन वाटतोय.

राधाचे बाबा 'तो अमेरिकेतल्या नोकरीवर लाथ मारून आलाय' असं म्हणतात तेव्हा ती 'रेसेशनमुळे त्याला हाकललं असेल' असं म्हणाली तेव्हा जाम हसायला आलं.

रच्याकने, dreamgirl, रीया, Deepali Kate मी ही सिरियल रोज पहात नाही. मग काय लिहिणार? Happy

रसिकाचे सगळे हिंदी सिनेमे आठवताहेत का पब्लिकला? 'अगंबाई अरेच्चा!' विसरले का सगळे? Happy

पण गिरीष जोशी तिचा नवरा वाटत नै...>> Uhoh

काल माऊवैनीला दारात उभे राहुन ऐकताना पाहिल्यावर मी दचकलेच.. पण लगेच ..... Happy

घना राधाशी बोलताना अडखळतो कारण त्याला त्याच्या मनात काय चाललेय ते समजत नाहीय, वर त्याला एका मिनिटाला राधालाही तसेच वाटतेय असे वाटते तर पुढच्याच मिनिटाला राधा 'आपण हे काय वाहात चाललोय, घनाला थोडेच आपल्यासारखे वाटणार??' असे वाटुन स्वतःला जे वाटतेय ते आवरते घेते त्यामुळे त्याला गोंधळायला होतेय. सगळाच गोंधळ.. आता त्यात अभीर आल्यावर मुळ गोंधळींना आपला सुर सापडेल याची अपेक्षा..

बाकी मोडका हात घेऊन आत्ती आली की पुण्याहुन ढिगभर शॉपिंग करुन... गेलेली कधी हेच कळले नाही..

रच्याकने, हा अभीर म्हणजेच आत्याचा पुष्कर तर नव्हे? पण मग राधा त्याला ओळखत असणार म्हणा. महेशराव एवढ्या घाईघाईत त्याला घरी आणताहेत त्यामुळे शंकेला जागा आहे. राधा नसताना त्यांना मानवशी साथ होती आनंद लुटायला, आणि जरी राधाने आता मानवची हकालपट्टी केलीय तरी राधा परत गेल्यावर मानव परतु शकतो. त्यामुळे एकटे वाटतेय म्हणुन पेगे हे समर्थन थोडे लटके पडतेय. बिचारी राधा... मी गेल्यावर मानव परतु शकतो हे ती बोलू शकत नाही आणि मी जाणार नाही हेही बोलू शकत नाही....

मानवचा मेकओव्हर... तो ओट्सचं फेशिअल करून आलेला म्हणे... सॉनिया म्हणते चमकदार का दिसतोयस तेव्हा... तो चमकदार वगैरे कधीच वाटत नाही ओशटच वाटतो. आणि शारूक च्या क्क्क्क्क्क इस्टाईला दातावर दात हापटतो तेव्हा पूर्वीच्या काळी कांदापोह्याच्या प्रोग्रॅमला संकोचामुळे व बुजल्यामुळे नवख्या पोरीच्या हातातील कपबशी थाडथाड वाजावी तसा आवाज काढतो...

काल माई आज्जी बेश्टच! कसल्या कॉन्फीडेंटली सांगतात मी अजूनही तितकी आऊटडेटेड झालेली नाहीच्चे.

'हलचल हुई, गाणं तर अप्रतिमच आणि अनुसरून घनाचा त्रागा तर खासच!
राधाची ड्रेस स्टाईल चिवित्रच आहे... चित्रविचीत्र! टॉप खूप लांडा नी ढगळ आहे... वर ते प्रिंटेड पटियाले...! प्रिंटेड पतियाला व ओढणी चांगले आहेत त्यानुसार बर्‍या लांबीचे व काँट्रॅस्ट आसपास तरी जुळणारे कुडते घातले तर छान दिसेल.

सुकुमो ला काल लग्नी साडी बदलून छान निळी साडी दिलेली, जरा वेगळा पावसाळी रंग बघून फ्रेश वाटलं. हळदीकुंकवाच्या टिक्याने छान दिसत होती सुकुमो काल.

मोस्ट अवेटेड उकाची एन्ट्री झाली अखेर! बरी दाखवली, अगदी बॉलीवूड इश्टाईल नाही दाखवली ते लई ब्येस! त्याचं नाव अभीर आहे की अबीर - गुलाल वाला अबीर???? अभीर असेल तर काय बरं अर्थ?

रच्याकने, dreamgirl, रीया, Deepali Kate मी ही सिरियल रोज पहात नाही. मग काय लिहिणार?>> अगं स्वप्ना इथली चर्चा पुरेशी आहे, तुला आयत्या टिपण्या मिळताहेत खास बारकाव्यांसहीत! त्यावर तुझा खास मुलामा चढव हाकानाका!!!

तो ओट्सचं फेशिअल करून आलेला म्हणे>>>>>>>>> मला तो 'गोल्ड फेशियल' म्हणाला असं वाटत होतं आत्तापर्यंत Uhoh

तरी पण चश्मा वगैरे दिल्यामुळे ज्ञानाचं अ‍ॅडव्हान्स्ड व्हर्जन वाटतोय.>>>>>>>>>>>>>>>>बापरे एकच पचत नाही..दुसरा कशाला अजुन ?????

मला तो 'गोल्ड फेशियल' म्हणाला असं वाटत होतं आत्तापर्यंत <<<
गोल्डच म्हणाला.

अभिर नव्हे अबीरच आहे नाव.

पण गिरीष जोशी तिचा नवरा वाटत नै...
>>>>>>

टोकू, तसा मी पण कोणाचा नवरा नाही ग वाटत Proud पण काय करणार ..... असतं एकेकाचं नशीब Rofl Proud

(ज्यांच्या बायका चुकुनही मायबोली वाचत नाहीत असे नवरे काहीच्याकाही स्टेटमेंट करायला मोकळे आहेत...... इती अ‍ॅडमिनच्या हुकुमावरून Wink )

होय का??? सध्या आहाराबाबत जास्त कॉन्शस झाल्याने असं काहीबाही ऐकायला येतंय...
>>>
Rofl

भुंग्या Lol
Rofl

अरे देवा भुंग्या Proud
मला तर ब्वा राधाचे मिसमॅच ड्रेसेस फार्फार आवडतात. Happy निदान हिंदी किंवा इतर मराठी मालिकेतल्या बायकांसारखी नाही दाखवली ते बरय. काय ती कल्याणी Uhoh रात्री झोपतानासुद्धा साडी घालून झोपते. Uhoh
आणि हिंदी मालिकेत तर डोक्यावरून पदर्,अंगभर दागिने अशा असतात हिरविण्या. त्यापेक्षा राधा बरीये सोबर एकदम. Happy

Pages