झाडे लावा .. झाडे जगवा ... सानिकाचे चित्र - आर्बर डे प्रदर्शन

Submitted by maitreyee on 5 June, 2012 - 08:45

आमच्या गावात दर वर्षी आर्बर डे निमित्त झाडे , माझं आवडतं झाड, वनीकरण, झाडे जगवा इ. विषयांवर आधारित कला प्रदर्शन भरतं. यावर्षी सानिकाने त्यासाठी हे चित्र काढून पाठवले होते. चित्राची कल्पना, रेखाटन, रंगकाम सगळे तिचेच! Happy

sanikaarborday.jpg

गुलमोहर: 

सुरेख कल्पना! डिटेलिंग मस्त. झाडाच्या फांद्या, पानं देखणी आली आहेत.
मला ती ऐटीत उभं राहून झाडांना पाणी घालणारी मुलगी एकदम आवडली Happy

मस्त चित्र. Happy झाडाच्या पानांजवळ पक्षी आहे ना? मुले अन मिशाळ माणूस भारी काढलाय. संदेश व्यवस्थित पोचतोय. कीप इट अप सानिका. शाब्बास Happy

सुरेखच. कॉन्सेप्ट आणि त्याचं execution दोन्ही मस्त जमलय Happy
मी चित्रकला चॅलेन्ज्ड असल्याने मला चित्रकला येणार्‍यांचं जाम कौतुक वाटतं!

सगळ्यांना खूप खूप थॅन्क्स! सानिका जाम खूष झाली इतके रिप्लाय वाचून दाखवल्यावर! तिने चित्र पाठवले खरे पण ते अ‍ॅक्चुअल प्रदर्शन होते तेव्हा आम्ही सुट्टीला बाहेर गेलो होतो नेमके. त्यामुळे चित्राला प्रतिसाद अन कौतुके तिला मिळालीच नव्हती. त्यामुळे जरा नाराजच होती आधी , आता खूष झाली Happy

वाह

व्वा, शाब्बास सानिका. फारच आवडलं चित्र Happy डिटेलिंग किती छान केलंय. एकीकडे हिरवंगार, एकीकडे उजाड, मिशाळ बुवा, मुलं, झाड, पक्षी, घरटं सगळंच मस्त.

Pages