Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुलीचा बाप या भुमिकेतून कालचा
मुलीचा बाप या भुमिकेतून कालचा कार्यक्रम बघीतला आणि तो अजिबातच पटला नाही. नक्की काय दाखवायचे आहे याचा गोंधळ होता. म्हणजे कायद्याची परवानगी आहे म्हणून आंतरजातीय विवाह करावेत असं सांगायचं होतं की कायद्यानुसार वयाची अट पुर्ण असली तर कुणीही कुणाशीही लग्न करावं याचा पुरस्कार करायचा होता ? दुसरा मुद्दा असेल तर खाप पंचायतीचा भाग दाखवण्याची काय गरज होती ? कारण त्या तर जातीचंच राजकारण करतात.
पंजाब हरयाणामधे चद्दर ओढना
पंजाब हरयाणामधे चद्दर ओढना म्हणून एक प्रकार असतो. त्यामधे विधवा भावजयीचे लग्न लहान दीरासोबत लावून देतात. (हा प्रकार हिंदूमधला आहे)
हो. याच्यावर षिणेमा आला होता. एक चादर मैली सी. http://en.wikipedia.org/wiki/Ek_Chadar_Maili_Si
कालचा कार्यक्रम चांगला सादर
कालचा कार्यक्रम चांगला सादर केला. खरतर कार्यक्रम पाहून धक्काच बसला. लग्न पसंत नाही म्हणून संबध तोडणे इथपर्यंत ऐकले होते पण खून??. एक वकिल आले होते, त्यांनी प्रोटेक्शन हाउस मधे येणार्यांचा का कोर्टमधे प्रोटेक्शन साठी अर्ज करणार्यांचा आकडा सांगितला ते पाहून आणखी धक्का बसला. दर दिवशी २५. हा खूपच मोठा आकडा आहे.
गलिच्छ सामाजिक मानसिकता. स्व:ताच्या खोट्या इज्जतीसाठी कोणाचा तरी खून करायचा, कशानेच जस्टिफाय न करु शकणारे हे कृत्य आहे.
कार्यक्रम चालू असतानाच एक आयटी कंपनीमधिल खरी घटना समजली. हरीयाणामधील मुलगी होती. मुंबईमध्ये नोकरीला, अचानक आठवडाभरापासून ऑफिसला येणे बंद झाले. चौकशी केल्यावर 'ऑनर किलींग' ची घटना असे समजले. कोणी आईवडिल आपल्या मुलांचा असा खून कसे करु शकतात हे समजत नाही. वर समाजही त्या गोष्टीला मान्यता देतो?
मध्यंतरी यूपीमधल्या डीआयजींचे ऑनर किलींगला सपोर्ट करणारे वक्तव्य वाचले होते.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-05-09/india/31640982_1_...
सगोत्र विवाह आणि उत्क्रांती
http://www.esakal.com/esakal/20100528/5573002214101746191.htm
लिंबू, जवळच्या नातेवाईकांमधे
लिंबू,
जवळच्या नातेवाईकांमधे विवाह झाल्यास संततीवर परिणाम होतो, हे विज्ञानाला माहित आहे. असे विवाह
कायद्यानेच, अमान्य केले आहेत. सगोत्र विवाहाबाबत देखील जर असे पुरावे मांडता आले तर ती कॅटेगरी, कायदा करुन अमान्य करता येईल. पण त्यासाठी अर्थातच, पुरेसे दस्ताऐवज सादर करावे लागतील. (तसा मुद्दा स्पष्टपणे कार्यक्रमात होता.)
पण माझे मुद्दे : गोत्र अगदी नेमकेपणाने सांगता येते का ? ते बहुतेक एखाद्या ऋषींचे असते. आणि तसे असेल,
तर इतक्या पिढ्यांनंतर ते तितकेच काटेकोर राहिलेय का ? राहिले असले आणि नसले तरी, त्यातून जन्माला
येणारी संतती, सदोष असेल का ? याबाबत कुठे काही लेखन झालेय का ? आपल्याकडेही एका ठराविक काळानंतरच ही प्रथा पडली, अर्थात ती निरिक्षण / अनुभवानंतरच पडली असावी. त्यापुर्वी ती अर्थातच नव्हती.
इजिप्त मधे अशी बंधने नव्हती. क्लिओपात्राचे लग्न, तिच्या भावाशीच झाले होते. ग्रीक संकृतीतही अशी उदाहरणे, वाचल्यासारखी वाटताहेत.
>>>> पंजाब हरयाणामधे चद्दर
>>>> पंजाब हरयाणामधे चद्दर ओढना म्हणून एक प्रकार असतो. त्यामधे विधवा भावजयीचे लग्न लहान दीरासोबत लावून देतात. (हा प्रकार हिंदूमधला आहे) <<<<
>>>> हो. याच्यावर षिणेमा आला होता. एक चादर मैली सी. <<<<
यानन्तर कुणी सम्भावित आयडी "द्रौपदीचे" उदाहरण घेऊन आली की मगच परिपूर्णता येईल असे वाटते.
अपेक्षेप्रमाणे 'नेहमीचे
अपेक्षेप्रमाणे 'नेहमीचे यशस्वी' कलाकार मनोरंजन करत आहेत. धन्यवाद.
बेफिकीरसुद्धा या खेळात सामिल झालेले पाहून आश्चर्य वाटले.
असो.
जे हा कार्यक्रम पाहत नाहीत
जे हा कार्यक्रम पाहत नाहीत त्यांना आमीरखान तर्फे मी कळकळीची विनंती करतो कि आपण हा कार्यक्रम पहावा. या कार्यक्रमावरच आमीरचे पोट अवलंबून असल्याने तुमच्या शो पाहण्याने त्याच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होईल.
किरण्या
किरण्या
@टवाळ- म्हणजे कायद्याची
@टवाळ-
म्हणजे कायद्याची परवानगी आहे म्हणून आंतरजातीय विवाह करावेत असं सांगायचं होतं की कायद्यानुसार वयाची अट पुर्ण असली तर कुणीही कुणाशीही लग्न करावं याचा पुरस्कार करायचा होता?
मला वाटतं, दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर सहमतीने विवाह करण्याचे ठरवले तर कायद्यानुसार इतरांना त्यास आक्षेप घेता येणार नाही, हे यानिमित्ताने अधोरेखित केले. (बाकी अपहरण, मारहाण, खून वगैरे तर एरवीही गुन्हेच आहेत.) कोणी कोणाशी लग्न करावे हा खाजगी मामला आहे, त्यावर कार्यक्रमाने काहीच टिप्पणी केलेली नाही.
तुमच्या प्रतिसादातले 'मुलीचा बाप म्हणून..' हे वाक्य विचारात पाडते आहे. ही असुरक्षितता कशासाठी? तुम्हाला मुलगी नसती तर हा भाग आवडला/पटला असता काय?
अमिरखान हे का करतोय...मला
अमिरखान हे का करतोय...मला वाटतं की हे फक्त एकट्या अमिरलाच माहीत असेल.

बाकीच्यांनी आपले अंदाज व्यक्त करण्याचा आनंद लुटावा.
' हे वाक्य विचारात पाडते आहे.
' हे वाक्य विचारात पाडते आहे. ही असुरक्षितता कशासाठी? तुम्हाला मुलगी नसती तर हा भाग आवडला/पटला असता काय?>>>
ह्याचा जास्त खोलात जाऊन विचार करावा....
सुपातल्यांनी जात्यातल्यांना हसू नये....
कोणताही वाईट प्रसंग....ह्यात वाईट ह्या व्याख्येत बसणारे सगळे प्रसंग गृहित धरा....जोवर आपल्यावर येत नाही तोवर..पुलंच्या भाषेत...कुत्ता जाने,चमडा जाने..अशी वृत्ती असते आणि प्रतिक्रियाही त्या पद्धतीच्याच असतात.
नेहमीचे नेटभगवे आले.
नेहमीचे नेटभगवे आले.
ज्ञानेश | 4 June, 2012 -
ज्ञानेश | 4 June, 2012 - 14:42 नवीन
अपेक्षेप्रमाणे 'नेहमीचे यशस्वी' कलाकार मनोरंजन करत आहेत. धन्यवाद.
बेफिकीरसुद्धा या खेळात सामिल झालेले पाहून आश्चर्य वाटले.
असो.
>>>
ज्ञानेशराव, मला जे म्हणायचे ते मी म्हणालो आणि पूर्ण कार्यक्रम बघितलेला नाही हा दोष मान्य करून क्षमा मागून चर्चेतून बाहेर पडलो. पुन्हा एकदा तुम्ही ऑनर किलिंगविरुद्ध दोन चार सिरियल्स निर्माण केल्याच्या थाटात प्रतिसाद देत आहात. असो, हे मा शे पो
पहिल्या दोन तीन कार्यक्रमांत
पहिल्या दोन तीन कार्यक्रमांत भासमान झालेला प्रामाणिकपणा आता धूसर होताना दिसतो आहे.
इथे वाचावे तर "आमिर खान हा कार्यक्रम करतो आहे ना मग सगळे जण 'आ' वासून टीव्ही पुढे बसा आणि तो म्हणतोय त्या सगळ्यालाच पाठींबा द्या नाही तर........." अशा स्वरूपाचे प्रतिसाद 'नेहमीचे यशस्वी' कलाकार देताना बघून प्रचंड करमणूक होते आहे.
मुद्दा सगोत्र विवाह असावा की
मुद्दा सगोत्र विवाह असावा की नसावा हा नसून सज्ञान झालेल्या मुलामुलींनी स्वतःच्या मर्जीने जर विवाह केला तर तो तोडण्याकरता कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही असा आहे.
बाकी ज्या खापवाल्यांना सगोत्र विवाह पसंत नाही त्यांना मुलाने अथवा मुलीने बाहेरच्या जातीत लग्न केले तरीही मान्य नाहीच की. त्यांचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. हातातून अधिकार जाऊ नयेत म्हणून स्वतःच्या समाजात दहशत बसवण्याचा त्यांचा मूळ हेतू आहे. या हेतूला मग संस्कृतीरक्षण असा चकचकीत मुलामा चढवला की भलेभलेही ठगतात.
मामी, बाहेरून विकत आणलेल्या
मामी, बाहेरून विकत आणलेल्या मुली चालतात त्यांना ! अगदी खरी परिस्थिती आहे ही.
म्हणजे त्यांच्या लॉजिकमध्ये
म्हणजे त्यांच्या लॉजिकमध्ये किती गोंधळ आहे बघा!
दक्षिणेतून कुणी शायरन नामक
दक्षिणेतून कुणी शायरन नामक तरूण येईल आणि त्याच्या नावाखाली भारत संपूर्ण जगावर राज्य करील अशीच स्वप्ने पाहण्याची आपली लायकी आहे असं नमूद करावंसं वाटतं.. >>> सणसणीत रे!!!
@प्रमोद देव- ह्याचा जास्त
@प्रमोद देव-
ह्याचा जास्त खोलात जाऊन विचार करावा....
सुपातल्यांनी जात्यातल्यांना हसू नये....
मी त्यांना अत्यंत गांभीर्याने सदर प्रश्न विचारला आहे. माझ्या माहितीतल्या कित्येक मुली असलेल्या कुटुंबांना हा भाग आवडल्याचे पाहिले आहे.
त्यातून मी त्यांचे किंवा अन्य कोणाचेही वाईट कशाला चिंतू ?
---------
@बेफिकीर-
पुन्हा एकदा तुम्ही ऑनर किलिंगविरुद्ध दोन चार सिरियल्स निर्माण केल्याच्या थाटात..
हाहाहा.
आता आम्हाला आश्चर्यही वाटू नये की काय? तुमचा प्रॉब्लेम काय आहे काही कळत नाही. साधे सरळ विधान आहे ते. तुमच्या आजवरच्या (मी वाचलेल्या) लिखाणात न दिसलेली काही मते इथे दिसली, आश्चर्य वाटले, संपला विषय ! चूक, बरोबर, अज्ञान, क्षमा वगैरेचा संबंध काय?
मागच्या वेळी केले तसे हे विधान तुमच्या मताप्रमाणे एडिट करणार नाही. समजायचे ते खुशाल समजा.
प्रमोद देव,
प्रमोद देव, तुम्हीसुद्धा?
दिनेशदा, ते भावकीचे प्रस्थ आमच्या माहेरिही फार आहे.रादर कोंकणातल्या सगळ्याच जातींत असावे.
माझ्या चुलतभावांनी लागोपाठ आंतर्जातीय विवाह केल्यानंतर असेच हे पंचायतवाले 'मग आमच्या मुलींची लग्नं कशी व्हावी?' असा प्रश्न घेऊन घरी आले होते. भर पंचायतीत घरच्यांनी सांगितले की तुमच्या मुलींना दुसरं कोणी पसंत असेल तर सरळ लावून द्या लग्नं.
यावर बघू तुमच्या मुलींची लग्नं कशी जमवता ते अश्या कॉमेंट काहीजणांकडून आल्याही.
प्रत्यक्षात वेळ आल्यावर माझे लग्न घरच्यांनी अगदी आंतर्जातीय/धर्मीय/भाषिय/राज्यिय असे असले तरी वाजतगाजत लावून दिले.
त्यानंतर एका तिसर्याच जातीच्या माणसाने माझ्या आईला 'काय हो,तुमची मोठी पळून गेली ना?' असा विनोदी प्रश्न विचारला. आई म्हणाली पळून कुठे,विधीवत लग्न लावून दिलेय. तर हा अतिशहाणा म्हणतो 'अहो आंतर्जातीय लग्नाला मुलगी पळून गेली असंच म्हणायचं असतं.
'अहो आंतर्जातीय लग्नाला मुलगी
'अहो आंतर्जातीय लग्नाला मुलगी पळून गेली असंच म्हणायचं असतं. >>>>>>>>>>
सगोत्र लग्नाचंच लॉजिक लावायचं
सगोत्र लग्नाचंच लॉजिक लावायचं असेल तर आणखी मोठ्या कॅनव्हास वर विचार करून सजातीय विवाहाला देखील बंदी आणायला काय हरकत आहे ? एरव्ही तो बिचारा हिंदू असतो.. फक्त जरा तेव्हढं लग्न सोडून बोलायचं !
किरण
किरण
>>अहो आंतर्जातीय लग्नाला
>>अहो आंतर्जातीय लग्नाला मुलगी पळून गेली असंच म्हणायचं असतं

साती, सकाळी सकाळी इतके हसवल्याबद्दल धन्यवाद.
सज्ञान मुलामुलींनी कोणाशी लग्न करावे हे त्यांचे त्यांना ठरवू द्यावे. सख्ख्या नात्यात लग्न करणे कायद्याने शक्य नाही. बाकी भावा_समान_, माते_समान_ वगैरे भासमान संकेत ज्यांच्या मनात आहेत त्यांनी ते ज्यांच्या मनात नाहीत त्यांच्यावर लादू नयेत.
बाकी आंतर्जातीय, धर्मीय, राज्यीय, देशीय वगैरे विवाह केल्यास जेनेटिक पूल एकदम लांबचा असल्याने पुढच्या पिढीच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरावे.
आमिर इथे मुळात समस्येवरती
आमिर इथे मुळात समस्येवरती उपाय शोधन्यासाठी कार्यक्रम करतच नाही, त्याचा कार्यक्रम लोकाना फक्त "इथे समस्या आहे" हे बघा इतपतच आहे. त्यापुढे काय करायचे ते आपलं आपण ठरवावं.>> +++१०००० नंदिनीच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन!
मुलीचा बाप या भुमिकेतून कालचा
मुलीचा बाप या भुमिकेतून कालचा कार्यक्रम बघीतला आणि तो अजिबातच पटला नाही. नक्की काय दाखवायचे आहे याचा गोंधळ होता. म्हणजे कायद्याची परवानगी आहे म्हणून आंतरजातीय विवाह करावेत असं सांगायचं होतं की कायद्यानुसार वयाची अट पुर्ण असली तर कुणीही कुणाशीही लग्न करावं याचा पुरस्कार करायचा होता ? दुसरा मुद्दा असेल तर खाप पंचायतीचा भाग दाखवण्याची काय गरज होती ? कारण त्या तर जातीचंच राजकारण करतात.>> कालच कार्यक्रम सज्ञान तरूण्-तरूणींना स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा हक्क असून तो डावलला जातोय प्रसंगी आयुष्याची किंमत मोजून.... यावर होता. इतकी वर्ष मुलांच्या सुखांचा विचार करणारे आईबाप सडनली घरानेकी इज्जत वगैरे करत पोरांच्या जीवावर उठतात तेव्हा त्यांची कीव येते...
बाकी ज्या खापवाल्यांना सगोत्र विवाह पसंत नाही त्यांना मुलाने अथवा मुलीने बाहेरच्या जातीत लग्न केले तरीही मान्य नाहीच की. त्यांचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. हातातून अधिकार जाऊ नयेत म्हणून स्वतःच्या समाजात दहशत बसवण्याचा त्यांचा मूळ हेतू आहे. या हेतूला मग संस्कृतीरक्षण असा चकचकीत मुलामा चढवला की भलेभलेही ठगतात.>> मामी अगदी अगदी!
गोत्र अगदी नेमकेपणाने सांगता
गोत्र अगदी नेमकेपणाने सांगता येते का ? ते बहुतेक एखाद्या ऋषींचे असते. आणि तसे असेल,
तर इतक्या पिढ्यांनंतर ते तितकेच काटेकोर राहिलेय का ? राहिले असले आणि नसले तरी, त्यातून जन्माला
येणारी संतती, सदोष असेल का ? याबाबत कुठे काही लेखन झालेय का ? आपल्याकडेही एका ठराविक काळानंतरच ही प्रथा पडली, अर्थात ती निरिक्षण / अनुभवानंतरच पडली असावी. त्यापुर्वी ती अर्थातच नव्हती.>> दिनेशदा १००००००००००००००% अनुमोदन!
बाकी आंतर्जातीय, धर्मीय,
बाकी आंतर्जातीय, धर्मीय, राज्यीय, देशीय वगैरे विवाह केल्यास जेनेटिक पूल एकदम लांबचा असल्याने पुढच्या पिढीच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरावे.
अगदी हेच आमचे बायॉलॉजीचे सर जेनेटिक शिकवताना सांगायचे. मी किती मनापासून ऐकलंय बघा.

बाकी सगोत्र विवाहाबाबत आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने जे काँसँग्विनस म्यारेज करू नये असे सांगितले जाते त्यातले सेकंड आणि थर्ड डिग्रि हिंदु धर्मात सर्रास होतात. आणि त्याची फळे म्हणजे जेनेटिकली बाधित संतती आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये नेहमी बघतो. (दुसर्या २ धर्मांत हिंदूंपेक्षाही जास्त हे जेनेटिक दोष सदोष विवाहपद्धतींमुळे आढळतात हे इथेच नमूद करते.)
साती, आपापल्या मुला-मुलींच्या
साती, आपापल्या मुला-मुलींच्या भविष्याबद्दलचा उचित निर्णय घेतांना पालकांना कधी कधी कठोर व्हावे लागणे हे नैसर्गिक मानतो मी..मात्र कोणत्याही प्रकारच्या हत्येला,क्रौर्याला माझा विरोधच आहे...त्याचे मी समर्थन करूच शकत नाही.
तारूण्याच्या नशेत भावनातिरेकाने बरेचदा चुकीचे निर्णय घेतले जातात/घेण्याची शक्यता असते...अशा वेळी वास्तवाचे भान करून देणे हे घरातल्यांचे कर्तव्यच असते....
प्रेम वगैरे जे म्हटलं जातं..ते बर्याचदा उच्छृंखलपणा असतं...एकदा ते संपलं की मग वास्तवातले चटके सहन करण्याची त्या तरूणांची मानसिक तयारी नसते...म्हणूनच वडीलधारी मंडळी आपापल्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न करतात....मला तरी हे अनैसर्गिक वाटत नाही.
कोणत्याही प्रकारचा विवाह असो...प्रेमविवाह अथवा ठरवून केलेला....त्यात मुलीलाच जास्तीत जास्त त्रास भोगावे लागतात...एका घरातून दुसर्या घरात....आंतरजातीय असल्यास..परजातीत....आंतरधर्मीय असल्यास...परधर्मात...वधू म्हणून जातांना जो काही त्रास भोगावा लागतो, ज्या स्थित्यंतरातून जावे लागते....ते सगळं स्त्रीलाच सहन करावे लागते..म्हणूनच मुलीच्या मातापित्यांना तिची विशेष काळजी असणे हेही नैसर्गिकच आहे.....
तेव्हा वडीलधारे जे काही करतात ते सदहेतूनेच करत असतात हे मान्य करावेच लागेल.....नियमाला अपवाद असतोच त्याप्रमाणे काही स्वार्थी आई-बापही असतील....पण म्हणून सगळ्यांना एकाच तागडीत तोलले जाऊ नये.
माझ्या जवळच्या नात्यातही असे आंतर्जातीय विवाह झालेले आहेत आणि ते किती यशस्वी/अयशस्वी ठरलेत ते मला माहीत आहे....माझ्या एका भाचेसुनेने(जी दुसर्या जातीतून आलेय...भाच्याबरोबर प्रेमविवाह आहे) मला स्पष्ट सांगितलं...की प्रमोदकाका, माझं चुकलं...पण तुम्ही तुमच्या मुलीला परजातीतल्या मुलाशी लग्न करू देऊ नका...कारण सून म्हणून तिच्या प्रत्येक कृत्याला जातीच्या नजरेतूनच तोललं जाईल....मी स्वत: हे अनुभवतेय...इथल्या लोकांसाठी मी स्वत:ला किती बदललं(हे वास्तव आहे...खरच गुणी आहे ती) हे तुम्ही पाहताय..पण मला इथे काडीचीही किंमत नाहीये.
मी आंतरजातीय विवाहाविरुद्ध नाही...पण त्या बाजूचाही नाही...मिया-बिबी राजी तो क्या करेगा काजी?
पण तरीही मुलीला ज्या वेगळ्या वातावरणात जाऊन रुजावं लागतं, तिला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं...हे पाहिलं की शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्या घरात द्यावं असं मला वाटतं...तिथेही ती रूजेलच असं खात्रीने नाही सांगता येत..पण रुजण्याची शक्यता जास्त असू शकते इतकंच.
असो...सगळंच शब्दातून व्यक्त करता येणार नाही आणि एकेका शब्दाचे वेगवेगळे अर्थ घेऊन त्यावरही लोक तर्ककुतर्क करतच राहणार हे मला माहीत आहे..म्हणून इथेच थांबतो.
देवकाका
देवकाका
Pages