Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफी
बेफी
<मुळात हे करताना त्याने
<मुळात हे करताना त्याने मुस्लिम कुटुंबियांना बोलावणे यात मला तरी एक उगाचच छुपा अजेंडा वाटला.
एखाद्या धर्माचा प्रभाव पाडणे ही कामे अशीच, अत्यंत नकळतपणे आणि तरीही प्रभावीपणे होत असतात हे काही सिरिअल्स, पुस्तके वगैरे पाहून ज्ञात झालेले आहे म्हणून वरील वाक्य>
यात धर्माचा प्रभाव पाडण्याचा अजेंडा तुम्हांला कुठे दिसला? कार्यक्रमाची सुरुवात आंतरधर्मीय लग्नांपासून झाल्यावर त्यात वेगवेगळ्या धर्मांचे लोक येणारच. कारण दुर्दैवाने भारत फक्त हिंदूंना आंदण दिलेला नाही.
यात धर्माचा प्रभाव पाडण्याचा
यात धर्माचा प्रभाव पाडण्याचा अजेंडा तुम्हांला कुठे दिसला? कार्यक्रमाची सुरुवात आंतरधर्मीय लग्नांपासून झाल्यावर त्यात वेगवेगळ्या धर्मांचे लोक येणारच. कारण दुर्दैवाने भारत फक्त हिंदूंना आंदण दिलेला नाही.
>>>
प्रियांकाच्या घरच्यांनाही बोलावले होते का मुलाखतीला? मी सगळे पाहिले नाही. त्यांना बोलावले असल्यास माझे वाक्य परत घेतो. नसल्यास ते वाक्य तसेच ठेवतो.
भारत हिंदूंना आंदण न देणे हे आपल्याला दुर्दैवी का वाटत आहे माहीत नाही. मला ते काहीच वाटत नाही.
प्रियांका पण मृत्युमुखी पडली
प्रियांका पण मृत्युमुखी पडली का त्या अपघातात ?
जिवंत माणसांची बाजू ऐकायला
जिवंत माणसांची बाजू ऐकायला हरकत नसावी
प्रियांकाचे वडील म्हणजे लक्स
प्रियांकाचे वडील म्हणजे लक्स होजियरी ग्रुपाचे मालक अशोक तोडी. कलकत्ता हायकोर्टात त्यांच्यावर खटला सुरू आहे. खुनाचा आरोप त्यांच्यावर आहे. जनतेच्या रोषामुळे शाहरुख खानने त्यांच्याशी केलेला करार रद्द केला. कृपया संपूर्ण प्रकरण काय होते, ते आधी जाणून घ्या, म्हणजे रिझवानूर रेहमानच्या आईला का बोलावलं, हे कळेल.
प्रियांकाचे वडील म्हणजे लक्स
प्रियांकाचे वडील म्हणजे लक्स होजियरी ग्रुपाचे मालक अशोक तोडी. कृपया संपूर्ण प्रकरण काय होते, ते आधी जाणून घ्या, म्हणजे रिझवानूर रेहमानच्या आईला का बोलावलं, हे कळेल.
>>>
ओके, जाणून घेइतोवर थांबतो
वरकरणी तरी मला असे वाटत नाही की त्यात काही फार तथ्य असेल, पण माहीत नसताना लिहिणे अयोग्यच
बेफिकीर, रिझ्वानुर रहमानच
बेफिकीर, रिझ्वानुर रहमानच अपमृत्यू ही राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरील बातमी होती. पोलिसही अशा वेळी कसे वागतात याचे हे एक जळजळीत उदाहरण आहे. जर ती केस चर्चेला आली नसती त कार्यक्रम अपूर्णच राहिला असता.
पहिल्या केसमधील मुलगी मुस्लिम व तिचा नवरा हिंदू असावा असे नावावरून वाटले.
या दोन केसेस सोडल्या तर बाकीच्या सगळ्या सगोत्र किंवा आंतरजातीय विवाहांच्या होत्या. ऑनर किलिंग हा प्रकारही काही एका धर्मापुरता मर्यादित नाही.
जमल्यास संपूर्ण कार्यक्रम पुन्हा मोकळ्या मनाने पहा.
प्रियांकाच्या घरच्यांनाही
प्रियांकाच्या घरच्यांनाही बोलावले होते का मुलाखतीला? मी सगळे पाहिले नाही. त्यांना बोलावले असल्यास माझे वाक्य परत घेतो. नसल्यास ते वाक्य तसेच ठेवतो. <<<
केस कोर्टात चालू आहे त्यामुळे प्रियांकाची आयडेन्टिटि उघड करणे म्हणजेच जाहिरपणे अमुक लोकांनी हा गुन्हा केला हे कार्यक्रमाने जाहिर केल्यासारखे होते. हे कोर्टाचे अधिकार हातात घेणे आहे. आणि प्रियांकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तिने आपली ओळख जाहिर करण्यास नकार दिला असू शकतो. तो तिचा अधिकार आहे.
आत्तापर्यंतच्या सगळ्याच एपिसोडसमधे कुठल्याही कोर्टात चालू असलेल्या केसमधल्या आरोपीचे नाव उघड करण्यात आलेले नाही.
> वयस्कर लोकांच्या अनुभवाचा,
> वयस्कर लोकांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आदर ठेवणे वाईट नाही,
पण त्या लोकांनी देखील, नवीन बदलांचा, प्रवाहाचा आढावा घेत राहिले पाहिजे.
शिवाय, न्यायालयीन क्लिष्ट प्रक्रीयेला तो एक चांगला पर्याय देखील होऊ शकतो.
वय लक्षात न घेता लोकांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आदर ठेवणे योग्य.
कोणतीच व्यवस्था न्यायालयीन प्रक्रीयेला पर्याय व्हायला नको. न्यायालयीन प्रक्रीया क्लिष्ट असल्यास (ती आहे) त्याबद्दल सगळ्यांनी काही करायला हवे - एकजुटीने, सातत्याने.
> प्रियांकाच्या घरच्यांनाही बोलावले होते का मुलाखतीला?
बोलावले असावे, पण त्यांचे न येणे मी समजु शकतो. काय म्हणतील ते येऊन? सगळीकडे छुपे अजेंडे शोधायची गरज नसावी.
प्रियांकाचे वडील म्हणजे लक्स
प्रियांकाचे वडील म्हणजे लक्स होजियरी ग्रुपाचे मालक अशोक तोडी. कलकत्ता हायकोर्टात त्यांच्यावर खटला सुरू आहे. खुनाचा आरोप त्यांच्यावर आहे. जनतेच्या रोषामुळे शाहरुख खानने त्यांच्याशी केलेला करार रद्द केला. कृपया संपूर्ण प्रकरण काय होते, ते आधी जाणून घ्या, म्हणजे रिझवानूर रेहमानच्या आईला का बोलावलं, हे कळेल>>>
हे संपादीन करून लिहिलंत म्हणून पुन्हा प्रतिसादः
खुनाचा आरोप गंभीरच, मान्य. पण ऑनर किलिंग एवढाच विषय आहे ना? की इन्डस्ट्रियालिस्टच्या घरी हे झाले किंवा मुस्लिम कुटुंबियांबाबत हे झाले म्हणून याला अधिक महत्व द्यायला हवे? (पुन्हा लव्ह जिहाद हा वेगळा विषय आहेच). (राजस्थानात हिंदू हिंदूंमध्येही हे होते व मोठ्या प्रमाणावर होते, त्यालाही वाव मिळू शकला असता). आता कोणते प्रकरण घ्यायचे त्यावर कशाला चर्चा हेही म्हणता येईल. पण आमीर खानचे रडणे बालीश आणि मुस्लिमांना अधिक दया दाखवणारे वाटले ही माझी पहिली रिअॅक्शन आहे. तो माझ्यावर झालेल्या संस्कारांचा भाग म्हंटला तरीही 'लव्ह जिहादवर' हे सद्गृहस्थ काही दाखवणार आहेत का असे आपले विचारावेसे वाटले.
धन्यवाद
मुस्लिम कुटुंबाबाबत झाले
मुस्लिम कुटुंबाबाबत झाले म्हणून नेटक्राय पाहण्यात आलेला नाही अद्याप.
बेफिकीर आपली इच्छा असल्यास
बेफिकीर आपली इच्छा असल्यास कार्यक्रम अधिकृत साईटवर पुन्हा पाहू शकता. चार पाच उदाहरणे घेतली होती . पहिले उदाहरण मुस्लिम मुलगी हिंदू मुलगा असे होते. मुलीच्या घरच्यांनी मुलाचे पाय
तोडले होते. मुलगी पूर्ण हिंदू सुवासिनिच्या वेशात होती. दुसर्या भागात मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू होती. नंतरची उदाहरणे उत्तर भारतातिल एकाच जाट जातीतील सगोत्र विवाहाविरोधी खाप पंचायतीविषयि होते.
ओके, पूर्ण माहीत नसताना
ओके, पूर्ण माहीत नसताना लिहिल्याबद्दल क्षमस्व
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Rizwanur_Rahman
>>> महाराष्ट्रात एका विशिष्ठ
>>> महाराष्ट्रात एका विशिष्ठ समाजातही, भावकी असा प्रकार असतो. घरातले वाद त्यांच्यासमोर मांडले जातात. ती मंडळी न्यायनिवाडा करतातही.
महाराष्ट्रात नंदीवाले, कोल्हाटी, धनगर इ. भटक्या जमातीत जातपंचायत अत्यंत प्रबळ आहे.
>>> प्रियांकाचे वडील म्हणजे लक्स होजियरी ग्रुपाचे मालक अशोक तोडी. कलकत्ता हायकोर्टात त्यांच्यावर खटला सुरू आहे. खुनाचा आरोप त्यांच्यावर आहे.
हा प्रकार २-३ वर्षांपूर्वी झाला होता. या मुलीने घरच्यांच्या मर्जीविरूद्ध पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर काही दिवसात तिच्या मुस्लिम नवर्याचा मृतदेह रेल्वेरूळांवर सापडला होता. याबद्दल एकूण ३ थिअरी आहेत.
(१) तिच्या वडीलांनी पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांच्या दडपणामुळे व त्यांच्या छळाला घाबरून त्याने आत्महत्या केली.
(२) या मुलीच्या घरच्यांनी सुपारी देऊन त्याचा खून केला.
(३) या मुलाने या मुलीसाठी धर्मबदल करून हिंदू होण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे चिडून जाऊन त्याच्या भाऊबंदांनीच त्याचा खून केला.
एकंदरीत हा खून किंवा आत्महत्या असावी. अपघात घडल्याचे वाटत नाही. हा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे.
गुजरातेतल्या एका सधन
गुजरातेतल्या एका सधन उच्चवर्णिय मुलीने एका मागास कि मुस्लीम मुलाशी विवाह केला होता. तिला महाराष्ट्रातून उचलून नेलं होतं आणि त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना अनेक खोट्या केसेस मधे अडकवण्यात आलं होतं... चार पाच वर्षांपूर्वीचीच आहे ना ही केस ?
तिचं लग्नही लावून देण्यात आलंय आणि आता तो मुलगाही मिसिंग आहे. ( नेमकं लक्षात नाही. चुकभूल देणे घेणे )
या पोस्टीनंतर एकही पोस्ट न
या पोस्टीनंतर एकही पोस्ट न टाकण्याचं वचन देऊन - खुप विचार करुनही उत्तर न मिळाल्यामुळे शेवटी हा प्रश्न विचारतेय - अफकोअर्स... कुणाच्या भितीमुळे नाही तर... मायबोली वेबसाईटवर असणार्या प्रेमापोटी... या संकेतस्थळाला माझ्या आयुष्यात असलेल्या स्थानासाठी... ईथे मिळालेल्या मित्र-मैत्रीणींसाठी... उलटसुलट चर्चेतुन स्वतःच्या मनाला ठेस पोहचु नये म्हणुन ही खबरदारी घेणारेय मी माझ्यापुरती...
आमिरचे मुस्लिम असणे खटकते का त्याचे यशस्वी असणे खटकते... (आमिर आणि सगळेच मुस्लिम आणि अमुस्लिम यशस्वी स्त्री पुरूष असे वाचावे)...
लाडकी, कलाकारांच्या बाबतीत मी
लाडकी,
कलाकारांच्या बाबतीत मी धर्माचा विचार करत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत आंतरधर्मीय विवाह यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. शशि कपूर, तबस्सुम, नर्गिस, शाहरुख खान, ह्रुतिक रोशन, फराह खान..
पण शक्यतो चर्चा, याच मुद्द्यावर रेंगाळू नये, असे वाटते.
भ्रमर कोई कुमुदिनीपर मचल बॅठा
भ्रमर कोई कुमुदिनीपर मचल बॅठा तो हंगामा
हमारे दिल मे कोई ख्याब पल बॅठा तो हंगामा
अभी तक डुबकर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का
मै किस्से को हकिगत में बदल बॅठा तो हंगामा
मुलीच्या घरच्यांनी मुलाचे पाय
मुलीच्या घरच्यांनी मुलाचे पाय तोडले होते. >>>> साती, त्या मुलाचे पाय मुलीच्या घरच्यांनी नव्हता तोडला. तो आधीच पांगळा झाला होता आणि त्यानंतर ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली होती.
आमिर ला दोन्ही बाजु
आमिर ला दोन्ही बाजु सांभाळाव्या लागतात........ एकतर यांना चाबुक दाखवायचे... वर यांना दुखवायचे सुध्दा नाही.......... कारण नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा दिल्यावर त्याच्या चित्रपटाला गुजरात मधे बंदी घातलेली.. असे परत होउ नये म्हणुन बहुतेक तो मधला मार्ग काढतोय.. .
.
मटा ऑनलाइन वृत्त । गोवाहाटी '
मटा ऑनलाइन वृत्त । गोवाहाटी
' प्रेमासाठी वाट्टेल ते... ' असं म्हटलं जातं. परंतु याची अनोखी प्रचिती आसामच्या बराक व्हॅली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सध्या अनुभवयाला मिळते आहे. या मतदारसंघाच्या आमदार रुमी नाथ (वय ३३) यांचे फेसबुकवर एका बांग्लादेशी तरुणाशी प्रेम जुळले आणि विवाहित असलेल्या आमदारबाईंनी गुप्तपणे देशाच्या सीमा ओलांडून बांग्लादेशात जाऊन गुपचूप लग्न केल्याची घटना घडली आहे. गेले अनेक दिवस भूमिगत असलेल्या आमदार रुमी आणि तिचा ' फेसबुक लव्हर ' जाकीर हुसेन शनिवारी बांग्लादेशच्या करिमगंज शहरात प्रकटले. आम्ही दोघांनी लग्न केले असल्याचे त्यांनी जाहीर केले. पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेता दुसरे लग्न करून मी कोणतीही चूक केली नसल्याचा निर्वाळा या आमदार बाईंनी स्वतःच देऊन टाकला. विशेष म्हणजे रुमी नाथ हिने धर्मांतर करून राबिया सुल्ताना असे नवे नाव धारण केले आहे.
कॉंग्रेस आमदार असलेल्या रुमी नाथ हिचा पहिला पती राकेश कुमार याने रुमीविरुद्ध पोलिसांमध्ये एफआयार दाखल केला आहे. तर, बराक व्हॅली मतदारसंघातील वकिलांनी रुमी नाथच्या या ' धाडसा ' चा धीक्कार करत आसाम विधानसभेतून तिला निलंबित करण्याची मागणी केली आहे. रुमी आणि राकेशचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे.
>>>> आमिरचे मुस्लिम असणे
>>>> आमिरचे मुस्लिम असणे खटकते का त्याचे यशस्वी असणे खटकते... <<<<
लाडकी, या धाग्यावर काहिच लिहायचे नाही असेच ठरविले असल्याने, खर तर तुझी पोस्ट अन हा प्रश्न माझ्याकरता नाहीच्चे. पण तरीही, हा प्रश्न माझ्या परिचयातील आवडत्या मायबोलिकर "लाडकी" या आयडीने लिहीलेला असल्याने प्रश्नाबद्दल, अन अर्थातच ओघानेच धाग्याच्या विषयाबाबत माझे मत/उत्तर मान्डतोय.
मला अमिरचे मुस्लिम असणेही खटकत नाही, व त्याचे यशस्वी असणे तर त्याहुनही खटकत नाही.
मात्र मी हा कार्यक्रमच बघणे सोडून दिलय. कारणे अनेक. इथे दिलिच पाहिजेत असे नाही.
वरील कार्यक्रमातील उदाहरणापुरते म्हणले, तर मी बेफिकिर यान्च्या बहुतेक पोस्टिन्शी सहमत आहे. किम्बहुना, अमिरही (ब्रुट्स यू टू या चालीवर) लोकान्च्या भावनान्ना हात घालुन हेलकावयाला लावण्याच्या त्याच त्या धोकादायक खेळात सहभागी हे बघुन वैषम्य वाटले.
काय कारण? का वाटावे?
तर हिन्दु ऋषिमुनिन्च्या नावे असलेल्या गोत्रान्मधे, "सगोत्र विवाह निषिद्ध" ही हिन्दू चाल, हिन्दूतील सर्व जातीन्मधे आहे. मात्र त्यासन्दर्भात कुणी कुणाच्या "जीवावर उठणे हे देखिल चूकीचेच, पण अपवदात्मक घडलेली घटना घेऊन तीच सार्वत्रिक परिस्थिती आहे अशागत प्रचारी भूमिका मिडीयाने घेणे हे मला नवल नसले तरी तिथे तसेच उदाहरण घेऊन अमिरही असणे हे धक्कादायक होते. हिन्दू धर्मियातिल केवळ ही "खुनाची घटना घेतलेली नव्हती" तर हिन्दू धर्मियातील "सगोत्र विवाह निषिद्ध" या चालीविरोधातही सूक्षपणे व पर्यायाने कोणतेच धार्मिक बन्धन पाळु नये इथवर सन्देश देऊ शकणारे अपवादात्मक उदाहरण का? अन हे तेव्हा, जेव्हा मुस्लिमान्मधे चुलतभावाबरोबरील विवाह ग्राह्य धरला जातो, जो हिन्दूमधे अमान्य आहे (सगोत्र म्हणून). मुस्लिमामधे विधवा भावजयीबरोबरील पुनर्विवाह मान्य आहे जो हिन्दून्मधे नाही, कारण भावाची लग्न होऊन आलेली बायको केवळ सगोत्रीच नव्हे तर मातेसमान मानायचा रिवाज आहे. किम्बहुना, सगोत्री विवाह हा "भावा बहिणीमधिल" विवाह अशाच प्रकारे मानला जातो. मग हिन्दून्नी मुसलमानान्चे ते तसे अनुकरण करावे हा छूपा पण अध्यार्हुत सन्देश पाळावा का? वरील बर्याच पोस्ट मधे तसेच "वागावे" असे बहुतेकान्चे मत दिसते आहे. म्हणजे चुलतभाऊ/विधवाभावजय/सोगोत्र विवाह करावेत अशाच मताचे सुधारक मायबोलीकर दिसताहेत मला वर, अमिरच्या या यशस्वितेबद्दल त्याचे अभिनन्दनच करायला हवे नाही का?
आता असे सगोत्री विवाह एकुण हिन्दुस्तानात किती झालेत? अगदी पळून जाऊन असतील वा कुटुम्बियान्चे सम्मतीने? त्यात एकुण बळी किती गेलेत? ही सन्ख्या, बळीन्ची नव्हे, सगोत्री विवाहान्ची म्हणतोय मी, एका हाताचे बोटान्वर मोजायला देखिल पुरणार नाही. अन तरी केवळ बुद्धिभेदाकरता वा बेफिकिरनी वा अन्य कोणी व्यक्त केलेल्या शन्केला जागा येईल इतपत चूकीचे, धादान्त अस्थानी उदाहरण अमिरने का निवडावे? हे धक्कादायकच वाटते. अन म्हणून पुन्हा सान्गतो, अमिरचे मुस्लिमपण वा यशस्वीपण खटकत नाही, तर अत्यन्त चूकीच्या जागी चूकीच्या पद्धतीने "अत्यन्त घातक सूप्त सन्देश व उद्देश प्रसुत होतील" अशा शन्केला जागा ठेवत अशा विषयान्ना अमिरने हात घालण्यामागची त्याची "मजबुरी" मला खटकते आहे.
नक्कीच!
(वि.सूचना: माझे वरील मत जे आहे ते आहे, पण ते तसे आहे म्हणूनच ही सूचना देखिल देऊन ठेवतो की मी असल्या कोणत्याही निमित्ताने कुणाचीही हत्या करण्याच्या/करणार्याच्या विरोधातच आहे, सगोत्रविवाह उदाहरणात वा अन्य कोणत्याही उदाहरणात झालेल्या हत्यान्चा/अत्याचारान्चा मी निषेधच करतो, अन वरील मजकुर हा अशा हत्येच्या समर्थनार्थ रचला आहे असा "सोईस्कर गैरसमज" करुन कान्गावा करण्याचे व्यक्तिस्वातन्त्र्य कुणि उपभोगू पहात असेल्/पाहिल तर त्याला माझा नाईलाज असेल.
तसेच, याबद्दल म्हणजे सगोत्र विवाहाबद्दल हिन्दूविषयक स्वतन्त्रभारताचे कायदेकानुन "नेमके काय म्हणतात" याबद्दलही मी अनभिज्ञ आहे. सबब, ये देशीचे कायद्याबद्दल मी टिपण्णी करीत नाहीये. त्याबद्दल कायदेविषयक जाणकारान्नाच बोलूदे!)
सगोत्र म्हणजे काय?
सगोत्र म्हणजे काय? महाराष्ट्रात काहि समाजात आत्येभाऊ आणि मामेबहिणिशी लग्न केलेलं चालतं , ते सगोत्र आहे का?
>>पहिल्या पतीपासून घटस्फोट न
>>पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेता दुसरे लग्न करून मी कोणतीही चूक केली नसल्याचा निर्वाळा या आमदार बाईंनी स्वतःच देऊन टाकला.
आंतरराष्ट्रीय विबासं
मुस्लिमामधे विधवा
मुस्लिमामधे विधवा भावजयीबरोबरील पुनर्विवाह मान्य आहे जो हिन्दून्मधे नाही, कारण भावाची लग्न होऊन आलेली बायको केवळ सगोत्रीच नव्हे तर मातेसमान मानायचा रिवाज आहे. किम्बहुना, सगोत्री विवाह हा "भावा बहिणीमधिल" विवाह अशाच प्रकारे मानला जातो.
>> पंजाब हरयाणामधे चद्दर ओढना म्हणून एक प्रकार असतो. त्यामधे विधवा भावजयीचे लग्न लहान दीरासोबत लावून देतात. (हा प्रकार हिंदूमधला आहे)
लाडकी, आमिर यशस्वी आहेच आहे. त्याच्याबद्दल कुणाचेच दुमत नसावे. मात्र इथे वारंवार तो "मुस्लिम" आहे हे मात्र काही जणांना खटकते. अर्थात ते का खटकत असावे ते तुला आणि मला चांगलंच ठाऊक आहे. दुर्लक्ष करणे हा उत्तम उपाय. स्वतः एपिसोड पूर्ण न बघता सरळ "हा भाग खूप सामान्य वाटला, क्राईम पेट्रोलमधे येऊन गेले आहे" असला प्रतिसाद वाचून करमणूक होते.
बहुतेकांची अपेक्षा आमिर खान दरवेळेला नविन समस्या जादूगारासारखी घेऊन येणार, आणि मग आपण लगेच "अरे बाप्रे हे माहितच नव्हतं" टाईप प्रतिक्रिया द्यायची, अशी आहे की काय न कळे. त्याने आजवर घेतलेल्या सर्व समस्या आपल्या आजूबाजूला थोड्याफार प्रमाणात असतात. त्यामुळे दर वेळेला त्याने काहीतरी ओळखीचं सांगितल्यावर "हॅ! हे तर माहितीये की आमाला. आमी पायलय आधी टीव्हीवर" असं म्ह्टलं की हसावे का रडावे ते कळत नाही.
आमिर इथे मुळात समस्येवरती उपाय शोधन्यासाठी कार्यक्रम करतच नाही, त्याचा कार्यक्रम लोकाना फक्त "इथे समस्या आहे" हे बघा इतपतच आहे. त्यापुढे काय करायचे ते आपलं आपण ठरवावं.
लिंबूकाका, संपूर्ण अनुमोदन.
लिंबूकाका, संपूर्ण अनुमोदन.
आमिर इथे मुळात समस्येवरती
आमिर इथे मुळात समस्येवरती उपाय शोधन्यासाठी कार्यक्रम करतच नाही, त्याचा कार्यक्रम लोकाना फक्त "इथे समस्या आहे" हे बघा इतपतच आहे. त्यापुढे काय करायचे ते आपलं आपण ठरवावं.
>> +१
आपल्याला असे कार्यक्रम का आणि
आपल्याला असे कार्यक्रम का आणि कशासाठी असतात याचं बेसिकच पहिल्यापासून घोटून घ्यावं लागत असेल तर दक्षिणेतून कुणी शायरन नामक तरूण येईल आणि त्याच्या नावाखाली भारत संपूर्ण जगावर राज्य करील अशीच स्वप्ने पाहण्याची आपली लायकी आहे असं नमूद करावंसं वाटतं..
ज्यांना झेपत नाही त्यांच्यासाठी सनसनी, इंडिया टीव्ही आणि तत्सम कार्यक्रम आहेतच कि
Pages