Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माफ करा पण इथे मायबोलीवर
माफ करा पण इथे मायबोलीवर असणारे सगळे ब्राह्मण सुसंस्कृत, विचारी आहेत त्यामुळे ते ऑनर किलिंग करणार नाहीत.
हा धागा ब्राह्मणांनी कुणाशी लग्न करावं आणि कुणाशी करू नये यासाठी नाहीये.
प्रत्येक जातीतल्या व्यक्तीसाठी हा संदेश आहे तेंव्हा ती चर्चा झाली तर बरं होईल.
त्यातला दाढीवाला मला ओळखीचा
त्यातला दाढीवाला मला ओळखीचा वाटला. मात्र, काही केल्या संदर्भ लक्षात येईना..<<
मला वाटलं मलाच उगाच वाटलं
माबोवरील "खाप पंचायत"
माबोवरील "खाप पंचायत"
जातीचा उल्लेख टाळावा हे मान्य
जातीचा उल्लेख टाळावा हे मान्य आहे. माझी देखील एक नम्र विनंती आहे जी आमीरच्या यापूर्वीच्या धाग्यावर केली होती.
जे काही म्हणायचं आहे ते एकाच आयडीने म्हणा. उलटसुलट विधानं टाळली तर गांभीर्य राहील. ही विनंती आहे अर्थातच..
@ इब्लिस.... डॉक्टर....त्या
@ इब्लिस....
डॉक्टर....त्या संदर्भातील 'अॅडिशन्स' आणि "डिलेशन" संकलनाच्या टेबलवर करण्यापूर्वी आमीर टीमने प्राप्त स्थितीचा निश्चितच अभ्यास केला असला पाहिजे यात शंका नाही. आज 'सत्यमेव जयते' मुळे आमीर लाईमलाईटमध्ये आहे, हे खरे; पण उद्या ही मालिका संपल्यानंतर 'अभिनेता आमीर खान', 'चित्रपट निर्माता आमीर खान' नव्याने त्या प्रांगणात जाणार आहे (आजही आहेच म्हणा), त्याच्या नावावर शेकडो कोटींची त्या धंद्यात उलाढाल होईल आणि अशावेळी चित्रपट निर्मितीच्या ठेकेदारांनी आमीर खानने देशातील विशिष्ट भागाचा 'रोष' ओढावून घेऊ नये असे वाटणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने सावधगिरीचे पाऊल मानले गेले तर मग 'खाप' कम्युनिटीला कुठल्या मर्यादेपर्यंत डिवचायचे हे व्यावसायिक गणित त्याने आणि त्याच्या सल्लागारांनी पेपरवर मांडले असणारच.
त्यामुळेच डॉक्टर मंडळींना ज्या रोखठोकपणे तो सामोरे गेला त्या प्रमाणात खाप दुढ्ढाचार्यांशी तो बोलला नाही, हे प्रकर्षाने जाणवले.
अशोक पाटील
अशोकजी शहाण्याला शब्दाचा मार
अशोकजी
शहाण्याला शब्दाचा मार आणि गाढवापुढे वाचली गीता या दोन म्हणी या दोन एपिसोडसना लागू होतात का पहा
नीधप
कळ्या
किरण... "शहाण्याला शब्दाचा
किरण...
"शहाण्याला शब्दाचा मार आणि गाढवापुढे वाचली गीता....."
~ येप्प, परफेक्टली. यू सेड इट.
फरक असलाच तर 'शहाणा' हा शहाणा असल्याने त्याला शब्दाचा मार समजेल आणि मुकाट बसेल, पण 'गाढवा' ला त्याचे गाढव असणे हेच जर मान्य नसेल तर गीता वाचा वा न वाचा, त्याच्या कातड्यावर कसले परिणाम होणार ?
आमीरलादेखील हेच उमजले असेल.
बरोबर किरण . हा एपिसोड काही
बरोबर किरण . हा एपिसोड काही केवळ आंतर्जातीय किंवाआंतर्धर्मियविवाहाचा. पूरस्कार करण्यासाठी नव्हता तर एकंदर प्रेमविवाह आणि व्यक्तीस्वातंत्र्य असा होता.
<<.वाढत्या आंतरजातीय
<<.वाढत्या आंतरजातीय विवाहामुळेचं आज ब्राह्मण उपवर मुलांना मुली मिळणे अतिशय मुश्कील झाले आहे >>

अख्खा प्रतिसादच विनोदी आहे.
कारण आजकाल खरे प्रेम कुणीच
कारण आजकाल खरे प्रेम कुणीच करत नाही ,असते ती फक्त वासना ! अहो, उगाच काहिही काय बोलता
अनुभवाशिवाय? एवढा विरोध सहन करून जेव्हा प्रेमविवाह केला जातो तेव्हा वासनेपेक्षा नक्किच पुढचा विचारही केला जातो . बाकि विवाहाने कामवासना तृप्त करणे हे अजिबात महत्वाचे नाहि असे फक्त दाम्भिक लोकच म्हणू शकतात .
साती, गंभीरपणे कुठलीही
साती, गंभीरपणे कुठलीही प्रतिक्रिया द्यायच्या लायकीचे उद्गार नाहीयेत ते. कैच्याकै! वरती म्हणलंय तसं - सरळ दुर्लक्ष कर.
वरदा हे इथल्या नव्हे
वरदा हे इथल्या नव्हे कार्यक्र्मातल्या खाप पंचायत्वाल्यांचे शब्द आहेत. कार्यक्रमाचा तो भाग बघ. तो माणूसच म्हणाला असं. खरे प्रेम कुणीच करत नाही ,असते ती फक्त वासना !
हा एपिसोड काही केवळ
हा एपिसोड काही केवळ आंतर्जातीय किंवाआंतर्धर्मियविवाहाचा. पूरस्कार करण्यासाठी नव्हता तर एकंदर प्रेमविवाह आणि व्यक्तीस्वातंत्र्य असा होता.>>>>>
पण तरी ऑनर किलिंग चा जर विषय असेल तर त्यात प्रेमविवाहा केला आहे या पेक्षा त्याने तो प्रेमविवाह कोणाशी केला आहे हे जास्त अधोरेखित केलेले असते नाही का?
म्हणजे निदान मला तरी असे वाटते, एखाद्या रजपुत मुलाने एखद्या रजपुत मुलीशी (गोत्र, जात, धर्म वगैरे सारखे) प्रेमविवाह केला तर कदाचित इतकी राळ नाही उडविली जाणार, पण तोच विवाह जर रजपुत मुलगा/मुलगी आणि चांभार मुलगी/ मुलगा (अनुक्रमे
) असा झाला तर त्या वेळेस हे सगळे प्रश्न उद्भवतात.
अगं इथेपण वरती कुणीतरी असंच
अगं इथेपण वरती कुणीतरी असंच लिहिलेलं वाचलं.
अतरंगी, खाप प्रश्नातले सर्व
अतरंगी, खाप प्रश्नातले सर्व विवाह सजातीय होते.त्याम्ना सगोत्र विवाह मान्य नाहीत.
जून्या काळातले हिंदि सिनेमे
जून्या काळातले हिंदि सिनेमे पाहिले नाही का? जात वैगेरे प्रश्न नसायचे अमिरी गरिबी, पुश्तैनी दुष्मनी हे इश्यु असायचे.
> ते लोकही चेह-यावरून बेरकी
> ते लोकही चेह-यावरून बेरकी दिसत होतेच.
चेहर्यावरून कही ठरवू नका!
पून्हा एकदा चांगले प्रकरण. या आणि आधीच्याही काही प्रकरणांमधे पोलिसांचा उल्लेख आहे. त्या कायदारक्षकांचे जेंव्हा डोळे उघडतील तेंव्हा प्रगति सुलभ होईल. त्यादृष्टीने आपण काय करु शकतो?
लोकांचा केवळ वयामुळे आदर करायला नको हे सतत बोलुन सांगून सर्वांच्या मनावर ठसवायला पाहिजे.
एखाद्या जातिचे ९९.९% लोक एका प्रकारचे असतात म्हणून सगळेच तसे असतील असे गृहित धरायला नको हे ही ठसवायला हवे (१ कोटीचा ०.१ टक्का म्हणजे सुद्धा १०००० लोक!)
लव्ह कमांडोजचा म्होरक्या आवडला. चंदिगढच्या अॅडव्होकेट नवकिरणने सांगितलेल्या गोष्टीही महत्वाच्या आहेत.
<< कारण आजकाल खरे प्रेम कुणीच
<< कारण आजकाल खरे प्रेम कुणीच करत नाही ,असते ती फक्त वासना >>
खाप पंचायतीच्या लोकांनीही हेच म्हटले होते.
आश्चिग इंग्लंडची राज्यघटना
आश्चिग
इंग्लंडची राज्यघटना ज्या लोकांना माहीत आहे त्यांना भारताच्या कायदेसंस्थेविषयी माहिती नसावी हे बेरकीपणाचं नाही तर कसलं लक्षण आहे ? अद्याप कुठल्याही खाप पंचायतीने आंतरजातीय विवाह, सगोत्र विवाहा संदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचं मला ठाऊक नाही. असल्यास स्वागत करू..
<<अशा लेखनावर इथे बहिष्कार
<<अशा लेखनावर इथे बहिष्कार टाकूया.
प्रतिसादच द्यायचा नाही.
मायबोलिकरहो --- मंजूर??>>
हा सुद्धा नवीन प्रकारचा विटाळ का हो?
एखाद्या प्रश्नाची दुसरी बाजू कुणी मांडण्याचा प्रयत्न केला कि झालं ..........घाला बहिष्कार
मी माझे नाव-पत्ता माबो वर
मी माझे नाव-पत्ता माबो वर स्पष्ट दिलेलं आहे
किरण, मी फक्त केवळ
किरण, मी फक्त केवळ चेहर्यावरून बेरकी म्हणण्याबाबत बोलत होतो. बाकी पूर्ण सहमत आहे.
@ छोटा भीम तुम्ही ब्राह्मण
@ छोटा भीम
तुम्ही ब्राह्मण असाल तर भावना पोहोचल्या इतकंच म्हणेन मी. पण कुठलीही ब्राह्मण व्यक्ती अशा प्रकारचं स्टेटमेंट जाहीर फोरम वर करील यावर विश्वास बसणे कठीण आहे. दुस-या जातीचा आहे असं भासवून कुणाकडूनही वादग्रस्त लिखाण होऊ नये यावर आपणही सहमत असालच.. बाकि, अॅडमिन सर्वज्ञ आहेत :).
<त्या तीन राज्यातील ग्रामीण
<त्या तीन राज्यातील ग्रामीण भागातील असा हा 'अजब न्यायनिवाडा' महाराष्ट्रासारख्या राज्यात रुजला नाही हे या राज्यातील ग्रामीण जनतेचे सुदैवच म्हणावे लागेल>
महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या मांदियाळीबद्दल कृतज्ञ राहण्याचे आणखी एक कारण.
एका बाजूला सगोत्र विवाह केला
एका बाजूला सगोत्र विवाह केला म्हणून शिक्षा आणि दुसरीकडे कुठूनही मुली विकत आणायच्या हा अतिविरोधाभास आहे. हा प्रश्न सामजिक आहेच पण त्या ही पेक्षा जास्त 'कायदा-सुव्यवस्था' या प्रकारचा जास्त आहे असे वाटले. पोलिसांनी योग्य जागी चार दंडुके हाणले तर बहुतेक विरोध मावळेल.
पुर्वांचल राज्यात असे प्रकार घडत नाहीत हे ऐकून आश्चर्य वाटले, आणि आपण त्यांना मागास-आदिवासी म्हणून पाहतो!
सगोत्र विवाहाचे धोके 'सान्गणारे' इथे आले नाहीत अजून?
महाराष्ट्रात एका विशिष्ठ
महाराष्ट्रात एका विशिष्ठ समाजातही, भावकी असा प्रकार असतो. घरातले वाद त्यांच्यासमोर मांडले जातात. ती मंडळी न्यायनिवाडा करतातही. थोडाफार बहिष्काराचा पण भाग आहे. पण आंतरजातीय विवाहांना हरकत घेताना ते सहसा दिसत नाही.
माझ्या नवऱ्याच्या ग्रूप
माझ्या नवऱ्याच्या ग्रूप मधल्या एका मित्राकडे अजूनही काही इशू झाला तर पंचायती समोर सोडवतात, कोर्टात जात नाहीत. मित्र CA आहे आणि मुंबईत राहतो . इथे मुंबईत पण त्यांची पंचायत भरते आणि ही शिकलेली मुले पण पंचायतीचा निर्णय मानतात. मित्र साउथ इंडिअन आहे.
दिनेशदा आपल्या महाराष्ट्रात
दिनेशदा आपल्या महाराष्ट्रात पण पूर्वी वाळीत टाकणे वैगरे असे प्रकार व्हायचे ना?
खूप पुस्तकातून असे संदर्भ वाचले आहेत.
कालच्या कार्यक्रमात पण हा
कालच्या कार्यक्रमात पण हा मुद्दा आला होता. वयस्कर लोकांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आदर ठेवणे वाईट नाही,
पण त्या लोकांनी देखील, नवीन बदलांचा, प्रवाहाचा आढावा घेत राहिले पाहिजे.
शिवाय, न्यायालयीन क्लिष्ट प्रक्रीयेला तो एक चांगला पर्याय देखील होऊ शकतो. अर्थातच त्यांना भारतीय
घटनेच्या, कायद्याच्या विरुद्ध निर्णय घेता येणार नाहीत.
--------
सामी वाळीत टाकणे, हे सध्याच्या काळात, धार्मिक विधीसाठी आमंत्रण न देणॅ किंवा विवाहप्रस्ताव न देणे, इतपतच आहेत. दुकानदाराने माल न विकणे, सार्वजनिक वाहनात चढू न देणे, असे प्रकार नाहीत.
(याचा प्रत्यक्ष अनुभव आहे, म्हणून लिहितोय. प्रत्यक्ष म्हणजे माझ्या बाबतीत नाही, एका परीचित व्यक्तीबाबत.)
आनंदयात्री, आधीचे कोणतेच भाग
आनंदयात्री,
आधीचे कोणतेच भाग न पाहिल्याने काहीच माहीत नव्हते. त्यावरील प्रतिसाद आणि याही धाग्यातील पूर्ण प्रतिसाद नाही वाचता आले. पण हा भाग थोडासा पाहिला. म्हणून माझे मत देत आहे.
मला हा भाग अतिशय सामान्य वाटला. हा विषय अनेकदा आलेला आहे. (विशेषतः क्राईम पेट्रोल दस्तक मधील या विषयांवरचे काही भाग अतिशय प्रभावी आहेत. तुलनेचा हेतू नाही).
आमीर खानने रडणे नाटकी वाटले. मुळात हे करताना त्याने मुस्लिम कुटुंबियांना बोलावणे यात मला तरी एक उगाचच छुपा अजेंडा वाटला.
एखाद्या धर्माचा प्रभाव पाडणे ही कामे अशीच, अत्यंत नकळतपणे आणि तरीही प्रभावीपणे होत असतात हे काही सिरिअल्स, पुस्तके वगैरे पाहून ज्ञात झालेले आहे म्हणून वरील वाक्य
धन्यवाद
-'बेफिकीर'!
Pages