मस्जिदीच्या बाहेर तो असाच दाढी खाजवत उभा होता. थोड्यावेळाने दुपारच्या नमाजची अजान झाली तसे तो उठला लगबगीने पाण्याच्या नळावर गेला आधीच घोट्यापर्यंत असलेली विजार वर ओढली व अल्लाहच्या पवित्र वातावरणात तो तल्लीन झाला व वझु केली, कोणीही नाव विचारले तर तोंडुन फ़क्त "यॅंव "यॅव" करायचा, हातात उर्दुत लिहिलेली चिठ्ठी...... "खुदावंत ,महाराजसाहेब हा आमचा मुरीद असुन लकव्याने बिचा~याचे वाचातंत्र अल्लाहला प्यारे झाले आहे, अमेरीकन बॉंबच्या आवाजाने ह्यांचे कान गेले आहेत, बदला आम्ही इन्शाल्लाह घेऊच , तुर्तास जर तुम्ही कलम्यात ह्या गरीबास रोटी तुकडा घातल्यास तुम्हाला झकात कलम्याचे पुण्य लागेल"...... मुका बहिरा असलेला हा सालस गोरा पठाण पाहुन पुढे पुढे लोकही हळहळु लागले जेव्हा आतल्याखोलीच्या बाहेर न पडणा~या मौलवींच्या कानावर ह्याची व्यथा गेली तेव्हा ह्यांनी त्याची नेमणुक त्यांची सरबराई करणारा म्हणुन केली होती, पेशावरच्या ह्या मशिदीत आतल्या खोलीत जे पाहुणे येतील त्यांची सोय करणे ह्याचे काम असे, त्याचे एकंदरीत बरे चालले होते.
मुंबईचे प्रसिद्ध रुग्णालय, होय, इथेच पंतप्रधान ऑपरेशन करवुन घेत, तिथे एका चेंबरवर "डॉ.गणेश पाटील" अशी पाटी, पुर्ण हॉस्पिटलात ह्या नावाचा दरारा होता हे कधीच ओ.टीला नसत पण "डायग्नॉस्टीशियन" म्हणुन ह्यांचे जबरदस्त नाव होते, जरा विक्षिप्तच म्हणुन असलेले हे महाशय अतिशय निष्णात होते, रोगाचे अचुक निदान करणे व संबधित तज्ञाकडे ती फ़ाईल वळती करणे हे ह्यांचे काम!!!!!.अनाथ म्हणुन वाढले म्हणुन विक्षिप्त आहेत हे असे लोक सांगत, ह्यांच्या दिमतीला फ़क्त प्रकाश काणे नावाचा एकच वॉर्डबॉय होता, फ़ायली ने आण करणे व फ़ावल्यावेळी त्यांच्या शिव्या व क्वचित प्रसंगी मार खाणे इतकेच त्याचे काम होते. मधे मधे त्यांना पक्याची दया आली की ते त्यास मस्त बियर प्यायला म्हणुन नेत, त्याच्या सुरस कथा पुर्ण हॉस्पिटल नंतर महिना दोन महिने ऐकत असे.
दिल्ली, सत्ता व ताकद ह्यांचे वेड असणार लोकांची गोड मनीची कळ!!!!!.... ज्याच्या गाडीचा बेकन लॅंप जितका मोठा त्याचा "रुतबा" तितका जास्त. चाणक्यपुरीतला एक भारी फ़्लॅट, पाकीस्तानी वकिलातीच्या बाहेरचे गेट इथुन दिसत असे, दोन पठाण संत्री इथे कायम असत, तिथे राहणा~याचे नाव बाहेर लिहिलेलं "मोहनिश मंडल" "एम.ए पीएच डी" हे महाशय "नॅशनल आर्काईव्ह्ज" चे क्युरेटर होते. "प्राचीन पांडूलिपियां हमारा दिमाग जगा देती है" असे म्हणत प्रेसक्लब रेस्टो ला सॅंडवीच खाणारी ह्यांची मुर्ती लोकांच्या मस्त परीचयाची होती, इतकी की ते गेल्या गेल्या ५ मिनिटात ग्रील चिज टोस्ट त्यांच्या टेबलावर असे, असा हा जवान खरेच जवान म्हणजे अगदी ३०-३१ चा असेल.
सगळ्याच्या पेक्षा वेगळे "ते" ऑफ़िस होते, बाहेर एकच पाटी.......... "शिवराम देशकर" सेक्रेटरी , विभागाचे नाव माहित नसल्यामुळे हे साहेब "सामान्य प्रशासन" चेच असावेत व आपले "सी.आर" ह्यांच्या हाती असणार म्हणुन पब्लिक ह्या पाटीला टरकुन असे, ह्यांचा संबंध कधी पी.एम सरांनी सॅलॅरी चेक्स मागवले किंवा बोलावले तरच येई, ह्यांना बलविंदर नावाचा एक दणकट ड्रायव्हर होता व मनस्वी बोस नावाची एक टपो~या डोळ्याची बंगाली पी.ए होती.
ग्रीन्वीच मीन टाईम नुसार टाईमझोन +५.३० तास, चेन्नई,मुंबई,कोलकाता, दिल्ली ह्या झोन मधे रात्रीचे बारा वाजले होते, थोडक्यात भारत पाक पुरते झोपेत होते, सीमेवरचे फ़ाकडे मुस्तैद होते, अदल्यारात्रीच मुका सेवक, जलालाबादला जाऊन कच्च्या बच्च्यांना भेटुन येतो म्हणुन परवानगी घेऊन निघाला होता, मौलवींनी त्याला वाटखर्चाला म्हणुन १०० रुपये दिले होते, तो कितीतरी वेळ त्या पाकी नोट ला हरखुन पाहत होता, जिनांचा फ़ोटो कौतुकाने न्याहाळत होता, साकीसाहेबाचे चेकपोस्ट जवळ येताच खाकी कपड्यातला पाक रेंजर पुढे आला,
"पासपोर्ट दिखाईएगा जनाबात, खवातीनात के वास्ते अलग से जनानी अफ़सरान है अंदर",
सगळे प्रवासी सावरुन बसले शेजा~यानेच मुरीदचा पासपोर्ट चेक करवला व
"साहेब हा मुका व बहीरा आहे ह्याला जलालाबाद ला जायचंय बायकामुलांना भेटणेस, तशी चिठ्ठी पण आहे त्याच्या खिशात पेशावरच्या बड्या इमाम साहेबांची"
असे सांगत कर्मकहाणी साहेबांस वदली होती, पेशावरचे बडे इमाम म्हणजे आपले जनरल साहेब नेहमी मुजाहीदिनांचे शिरोमणी म्हणतात तेच हे त्या रेंजर ने ताडले व
त्याने स्वतःच त्याला पासपोर्ट शिक्का मारुन आणुन दिला होता....
नाव मुरिद शाहिद,
राष्ट्रीयत्व अफ़गाण
पासपोर्ट क्रमांक **********,
पत्ता :- शिकोहागंज,
उत्तर तट,
काबुल नदीच्या तिस-या वळणाला,
काबुल
अफ़गाणिस्तान.
जलालाबाद फ़ाट्यावरुन बस पुढे निघाली तेव्हा मुरिद लघवीला म्हणुन उतरला ते कलटी मारुन कंदाहार च्या वाटेला लागला होता, दिड तासात अंदाजे रात्री १.२५ ला तो कंदहारच्या भारतीय वकिलातीबाहेर दाढी खाजवत होता, सी.आय.एस.एफ़ चा जवान रतन मिश्रा ड्युटीवर होता , खरेतर त्याची अफ़गाणिस्तानात यायची अजिबात इच्छा नव्हती घरी संतोष अवघडलेली, बाबाजी आजारी पण आपली प्यारी फ़ोर्स CISF चे नाव जपायचे ,प्रोफ़ेशनली जगायचे असे म्हणत इकडे आलेला, पण मागील वर्षी वकिलातीवर झालेला कार बॉंबिंग चा हल्ला आठवत जास्तच कडक झाला होता,सतर्क झाला होता झोपताना पण उशाला एक लोडेड झिट्टारा रायफ़ल नेहमी असायची त्याच्या, एकही अफ़गाण जर बाहेर पाच मिनिटे जास्त रेंगाळला तरी हा लोडेड झिट्टारा सरळ त्याच्यावर रोखायचा. मुरीद तिथे उभा दिसताच रतन रोखुन पाहु लागला.
गोळी घालायची म्हणुन त्याने स्टेशन इन्चार्ज कमांडंट अल्लारी वेंकय्या उर्फ़ एके ह्यांची परवानगी घ्यायची म्हणुन ,
त्याने वॉकी वर संदेश टाकला, "Tiger calling Den..... seeking clearence for hostile situation over"
अल्लारी उर्फ़ एके घड्याळ बघत घाई घाईत बोलला "Tiger this is Den, permission denied....., hold your magzine.... alpha is entering field..provide secondary backup"
रतन येडा झाला, एक अफ़गाण ठोकायचा म्हणुन कं. ए.के स्वतः कशाला येतोय, काय वेगळे आहे ह्या गबाळ्या अफ़गाणात ???? मरु दे "भैय्या यह तो हाय लेव्हल अफ़सरों के फ़ंडे है " असे स्वतःशीच म्हणत त्याने ड्युटीमेट्स अतिब मतीन व शंकर नायर ला उठवले,
"अन्ना आ रहा है, होस्टाईल अफ़गान है, मल्लु तु एल.एम.जी संभाल, भाईजान ग्रेनेड्स तयार , मै खुद स्नायपर पर हुं"
"Den we are all set, I repeat all set... Alpha is clear to hunt.... I repeat alpha is clear to hunt"
एके आला, त्याने मुरिद कडे हसुन पाहिले आणि
अहो आश्चर्यम मुरिद त्याच्याकडे पाहुन आधी हसला मग रोखुन बघत चक्क सावकाश आवाजात बोलला!!!!! "सौ रब दी....."
एके ढीला झाला, त्याने त्याच्या खिशात असलेल्या मॅग्नम .४५ पिस्तुलावरची पकड थोडी सैल केली व म्हणाला "सर्फ़रोष",
लगोलग तो वॉकी वर बोलला "alpha to pit, clear penetration ,surveivellence called off" ... अन आता रतन मिश्रा खरेच वेडा व्हायला आला एके ह्या अफ़गाणाच्या खांद्यावर मजेत हात टाकुन चक्क मराठी बोलत वकिलातीचे सिक्युरिटी कॅम बंद करवुन त्याला आत नेत होता.
अफ़गाण आत पोचताच, राजदुत दिपेश पटेल सामोरे आले ह्या आतल्या खोलीला सुभाषबाबूजी काबुल-कंदहार ला आल्याच्या आठवणीत "सुभाष एन्क्लेव्ह" असे नाव दिले होते सरकारने.
सर्वत्र पर्शियन नेव्ही ब्लु रंगाचे व्हेल्व्हेट (जी.ओ.आय चा ऑफ़िशियल रंग) लावलेले होते बाहेरच्या २ डिग्री तापमाना पेक्षा आत मस्त उबदार होते एका टोकाला राजदुतांचा मोठा शिसवी टेबल व डिप्लोमॅट्स चेअर, वजन होते त्या खुर्चीला........... १२१ कोटी भारतीयांचे अफ़गाणिस्तानातले रिप्रेसेंटेटीव्ह अशी जगाला त्या खुर्चीची ओळख होती म्हणुनच त्याचे वजन अजुन जाणवावे म्हणुन की काय मागे एक्मेकांकडे बघणारे दोन तिरंगे व त्यांच्या वर भारदस्त असे बर्मा टीक मधे कोरलेले अशोक चिन्ह अफ़गाण जरा लक्षच देऊन ते न्याहाळत होता तोच पटेल सर बोलले
"सो कॅप्टन समीर चितळे हाऊ आर यु??/"
"आय ऍम फ़ाईन सर"
"नक्की का रे समीर??? जरा स्ट्रेस्ड वाटतोयस??"
"थोडा आहे सर, तीन महिने आधी पोरगी झाली मला, अजुन बघितलेली नाही,बायकोला वाटतंय मी माझ्या रेगुलर बटालियन सोबत कुठेतरी पंजाबात आहे अन मला सुट्टी मिळत नाहीए, मॅरीड क्वार्टर्स मिळत नाही म्हणुन तिला कसे बसे थोपवले आहे नाही तर ती आता सोबत रहायला येते म्हणत होती,एवढा ससा हाती लागलाय पण तो काही बोलत नाही अन मी रोज मशिदीचे रांजण भरतोय!!!!!!!"
तिघेही हसले, "युवर चॉईस ऑफ़िसर????".... सम्याने निर्विकारपणे बाटल्या पाहील्या व म्हणाला
"स्कॉच व्हाईट एंड मॅके रॉक्स प्लिज सर"
"एके तुमचा रेग्युलरच का???"
"येस सर दॅट वुड बी काईंड ऑफ़ यु" इति एके
पटेल बाबूंनी त्यांच्या हातातले वायरलेस बेल चे बटन दाबले तसा पी.जी वोडहाऊस चा जीव्स वाटावा तसा श्रीधर पांडे ऑर्डरली आला
"एनीथिंग निडेड मिस्टर एंबेसेडर सर???"
"काय खाणार कॅप्टन???"
"सर ब्रेड ऑम्लेट विल डू"
पांडेजी लगेच तत्पर "स्पॅनीश ऑर फ़्रेंच इफ़ यु हॅव टू बी स्पेसिफ़िक सर???"
"स्पॅनिश विल डू पांडे जी थॅंक्स"
"एनीथिंग मोर सर??"
"नो पांडेजी धन्यवाद आपका और हां पांडेजी अगले हफ़्ते आनेवाले एयरफ़ोर्स डेलिगेशन से बात करके मैने आपके जाने का बंदोबस्त कर दिया है, रिप्लेस्मेंट भी उसी फ़्लाईट से आने वाला है, तब आप घर जा सकेंगे मैने छुट्टी सॅंक्शन करवा दी है" पटेल बाबूंनी समारोप केला
"बोहोत मेहेरबानीयां " असे मोजकेच बोलत पांडेजी अंतर्धान पावले
"पांडेजी रिटायर होतील नाही आता सर??? " समीर ने विचारले
"हो रे, तेच त दुखः आहे मित्रा. ट्रेंड माणुस होता वरतुन एक्स आयबी टोटल भरोश्याचा खरेतर आम्ही डीप्लोमॅटीक पार्टी थ्रो करतो ते फ़क्त सगळ्यांनी आपल्या वकिलातीत यावे म्हणुन ते इकडे आले की सर्व्हेवलंस इन्फ़ॉर्मेशन कलेक्शन ची कामे हे ऑर्डर्लीज फ़ार सफ़ाईने करतात बघ हातात ग्लासेस चेहरा निर्विकार पण तल्लख डोके" नकळत समीर च्या मनात पांडेजीचे वय अन काम ह्याच्या बद्दल एक अभिमानयुक्त आदर दाटून आला
थोड्याच वेळात नाश्ता आला व पांडेजी परत अंतर्धान पावले "अब आप सो जाईजे पांडेजी" असे सांगायला पटेलबाबू विसरले नाहीत नाश्ता झाला समीर जरा फ़्रेश झाला तेव्हा पटेल बाबू म्हणाले..."
."चला कॉन्फ़रन्स करु".
" ओके सर" बाकी दोघे म्हणाले.
.डॉ.गणेश पाटील क्लिनिकलाच होते रात्र फ़ार झाली होती पण आजचा दिवस महत्वाचा होता, पक्यापण सिरियस होऊन बसला होता,
गणेश कळवळुन बोलला" प्रकाश आज काही होईल का रे?"
प्रकाश "मला तर डॉक्टर व्हायला अजिबात आवडत नाही गणेश आधी बॅकग्राऊंड वर्क म्हणुन ३ महीने मेडीसीन चा अभ्यास करा तिच्यायला इतकीच खाज असती तर मेडीकल नसते का केले, आपण रॉ ला आहोत हेच साले कधी कधी विसरायला होते बघ!!!"
" झाले पाहीजे अजुन फ़क्त चार तासांसाठी........ मग आहेच डॉ.पाटील हे समुद्र सफ़रीवर गेले असता रॉयल क्रुझ शिप वरुन गायब झाले वगैरे प्रेस फ़ॉलोअप "
आता रात्रीचे २.३० झाले होते. आता प्रकाश ने त्याची सुटकेस उचलुन टेबलावर ठेवली वरकरणी भिकार दिसणारी ती मळकी VIP होती पण आत "भारत इलेक्ट्रॉनिक्स च्या अभियंत्यांनी कमाल करुन बनवलेले हार्डवेर अन डिफ़ेन्स च्या सॉफ़्टवेर इंजिनियर्स नी बनवलेले जबरदस्त सॉफ़्टवेर भरलेले होते" प्रकाश ने हॉस्पिटल चे नेटवर्क डीटॅच केले व ह्या सुटकेस रुपी सी.पी.यु ला टच स्क्रीन टर्मिनल कनेक्ट केले. युनिट ऑन केले
पाचच मिनिटात व्हेरीफ़िकेशन बीप झाला व दोघांनी आपापले डाव्याहाताचे पंजे टच स्क्रिन वर टेकले, हार्टबिट्स, घाम व फ़िंगरप्रिंट्स वरुन सिनियर एजंट्स प्रकाश काणे व गणेश पाटील व्हेरीफ़ाय झाले होते.
"दिल्ली आली काय?" सम्या इन्फ़ॉर्मलीविचारु लागला,
"थांब "गणेश काही म्हणायच्या आधीच कनेकशन एस्टॅब्लिश झाले होते.
देशकर साहेब बोलले, "वेल्कम एजंट्स जय हिंद"
"सर, ससा बोलला ते खरे आहे आम्ही समीरकडुन व्हेरीफ़ाय केले आहे"- पक्या
"तुम्ही सश्याला "क्लिनिकल ट्रायल्स ला " टाकले होते काय?- पटेल
"गरज पडली नाही सर, मागच्या वेळी "ट्रायल" पाहुन ससा भरुन पावला"
"लवकर आटपा रे, सश्याला बसवुन खाऊ घालणे आता आपल्या एजन्सीच्या बदनामीचा विषय झालाय"
"ओके सर, पण प्लिज कोर्ट कचेरी अन केसचा फ़ार्स चालु ठेवावा लागणार आम्हाला थोडा अजुन वेळ हवाय सर , प्लिज तुम्ही शेरशहा सोबत बोलुन घ्या" पक्या
"ते म्हणजे कसे सर एक नवे न्युरल सिरम इंजेक्ट केले आहे सश्याच्या ब्रेन मधे डायरेक्टली त्याचे सबकॉन्शस मेमरी लोब्स ऍक्टीव्हेट व्हायला अजुन २ दिवस जातील तरी आम्ही ते स्टेराईड्स देऊन देऊन एका दिवसावर आणलंय, अजुन खुप इन्फ़ो आहे सर त्याच्या डोक्यात ती मिळावी म्हणुन....., डी आर डी ओ च्या फ़ार्मासुटीकल टीम ला पण सिरम च्या परफ़ॉर्मन्स चे फ़ॉलोअप्स हवेत " गणेश चाचरत बोलला
" थांबा डॉक्टर, ससा मेला तर गजहब होईल जास्त रिस्क नको पण त्याच्या मेंदुतली पुर्ण माहीती पिळा बाकी काही नाही" देशकर साहेब
"साहेब, त्या घौरी च्या कोडचे काय झाले? मी तो मिळवला खरा पण डीकोड नाही करता आला मला तो" समीर
"समीर आपल्या आय.एस.आय च्या डबल एजंट नी ते एंडॉर्स केले आहेत. गुड जॉब"
"मी सोडवला आहे तो कोड सर,ते येडे अजुन जुनेच सायफ़र्स वापरतात,आपला एक माणुस चाणक्यपुरीत आहे त्याने ऍक्सेस कोड लॉजिक मॅनेज केले आहे होस्टाईल एंबसी मधुन त्याच्याच मदतीने हे झाले आहे, " (हा ड्रायव्हर व तो म्युझियम क्युरेटर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन चे संगणक अभियंता!!!!!)
"मंडल ने त्यांचे टोटल कम्युनिकेशन ट्रॅप केले आहे" सरदारजी कौतुकाने बोलले!!!!!.... तेवढ्यात मंडल पण कॉन्फ़रंस मधे आला देशकर सर आहेत हे विसरुन एकदम एक्साईट होऊन बोलला
"भैय्याजी आज तो पकडे ही जाते थे,अरे मी रोज होस्टाईल एंबसी पुढे काहीतरी कारणे काढुन रेंगाळायचो ना, आज एम.ई.ए ला मंथली रिपोर्ट द्यायला गेलो त तिथे तो नेहमीचा पठाण आला होता पाकीस्तानी डॉसियर घेऊन. मी बिचकलो होतो जरा. साला पिछे ही पड गया था, मला वाटले आता सिव्हिलियन पोलीस अलर्ट करावे लागतात ब्वा, पण मग माझेच खापर हलले हो, सरळ राजीव चौक मेट्रोस्टेशन च्या मुतारीत घुसलो, तिथे एकच आहे अन तिला पुढचे अन मागचे अशी दोन दारे आहेत, तरी बेट्या मागेच. मग सरळ सायलेंसर लाऊन शूट केला, प्रेत एन्क्लेव च्या मागच्या सर्व्हिस लाईन ला टाकलंय अंगावर दोन गांजाच्या पुड्या सोडल्यात त्याच्या ड्रग फ़ाईट वाटावी म्हणुन."
देशकर सर कौतुकाने बोलले "हा मंडल पाहीला की तरुणाइतले दिवस आठवतात मला, मी त्या एरीयाच्या डी.सीपी सोबत को-ऑर्डीनेट केले आहे मंडल. ड्रग्ज विकताना तो मारला गेला असे प्रेस बाउन्स करणार आहोत आपण, आता एंबसीला कळणार पण त्यांच्या, पण तो इश्यु नाही ते तसेही स्वतःच्याच सैनिकांची प्रेते ओळखत नाहीत अन ते आपल्याच पथ्यावर पडते बघ" ते पुढे म्हणाले
"पटेल साहेब तुम्ही अफ़गाण डायरी लवकर पुर्ण करा, इथला सी.आय.ए स्टेशन हेड रोज माझ्या ऑफ़िसात भिक्षांदेही करतोय."
"सर मी ते रिपोर्ट्स मेल केलेत तुम्हाला, स्पॅम बॉक्स मधे एरिक वाईझ ह्या नावाने आला असेल तो मेल तुमच्या, सिक्युर लाईन वरचा आहे, तुम्ही ऑफ़िस मेल वरच वाउन फ़ॉर्वर्ड करायला हरकत नाही.त्याचे काही हार्डलाईन फ़िक्सेशन आहे??"
"शिवाय दुसरा एक रस्ता आहे सर, उद्या त्यांच्या एका एजंट ला कुतुबमिनार ला यायला सांगा ऍज अ टूरिस्ट. पण व्यवस्थित ये म्हणाव, मागचा तर तिकडे पण सुट घालुन आला होता, प्रिस्क्राईब करा त्याला, रगर्स ची ३/४ लाल टीशर्ट अन टेनिस शुज, कॅमेरा विसरु नको म्हणाव लांब लेन्स लावलेला. तिकडे बलविंदर च्या हातुन तुम्ही ते हार्डकॉपी डीलिव्हर करुन टाका, त्यांना सांगा गो टू टूरिस्ट हेल्प सेंटर ऍट कुतुब ऍंड आस्क फ़ॉर गाईड बुक विथ सिरिज नंबर ४३,ती सिरिज लेटेस्ट आहे अन टूरिझम मिनिस्ट्री ने स्पेशल अमेरिकन पर्यटकांसाठी काढली आहे सो प्रोब्लेम होणार नाही शिवाय बलविंदर त्याला वैयक्तिक ओळखतो म्हणजे मिस्प्लेस होण्याचा पण चान्स नाही. पुढे त्यांची वकिलात अन त्यांची एजन्सी बघत बसे ते व्हाईट हाऊस किंवा लॅंग्ले पर्यंत कसे पोचवायचे ते"
"गुड आयडीया, बलविंदर कामाला लाग लगेच"
बलविंदर लगेच कामाला लागला रात्रीतंन त्याला २००० पानाचे चोपडे एडीट करुन सी.डी बर्न करुन ती टीम पिअर्सन ला उद्या द्यायची होती.
"आमच्या इकडे थोडे शांत झाले आहे, आजकाल हेरगिरी बद्दल आमच्यावर जास्त शंका नाही ही एक गुड न्युज मला माझ्या लोकल अफ़गाण लिड ने दिली आहे" एके.
"एके, तुम्ही एंबसी सिक्युरीटी चांगली मेंटेन केलीत, पण आता सिझन चालू होणार बर्फ़ वितळले की, ह्या सिझन च्या २५० टीप्स आहेत एकंदरीत २५ तरी खात्रीच्या आहेत, नुसते एंबसी पुरते मर्यादीत राहु नका, थोडे बाहेर सरका, काबुल, कंदहार, हेरात, हेलमंड, जलालाबादेत सिव्हिल कपड्यात तुमच्या आर्म्ड कोव्हर्ट टीम्स तैनात करा, वकिलातीवर प्लान झालेला हल्ला हा सोर्स लाच टर्मिनेट झालाच पाहीजे, ह्या वर्षी मला वकिलातीवर एक एकही रंगाचा टवका उडालेला दिसायला नकोय ओके??"
"ओके सर, बी अश्युअर्ड"
"तुम्ही गोळा केलेली माहीती असणारे फ़ॅक्स मला मिळाले आहेत, सुरक्षेच्या कारणास्तव हे सिग्नल माल्टा व सायप्रस इथुन कार्टोसॅट -३ ट्रान्स्पॉंडर जी वरुन राऊट केले आहेत" बलविंदर
"रॉजर दॅट" इतरेजन....
कॉन्फ़रन्स संपायला आले तसे देशकर बोलले
"पुढील ऍक्सेस चा कोड आहे बिंदुसार, अन सॅटेलाईट आहे रिसॅट, ओके??? ऍझिमथ्स तुम्हाला वेळेवर मिळतील "
"हा मॅसेज कोड मिळाल्यावर सेल्फ़ इन्सीनरेट होईल.... सोबत ह्या कॉन्फ़रन्स ची सगळी हिस्ट्री पण इरेज होईल ,फ़क्त हेडक्वार्टर च्या मेनफ़्रेम ला ही इन्फ़ो आहे, पुढच्या मिटींग चे एजंडा मी तिकडून जनरेट करुन घेईन"
देशकर बरेच समाधानी वाटत होते,
१० १५ सेकंदांची शांतता तोडत समीर म्हणाला, "सर मला स्वीच ऑफ़ कराल प्लिज"
"हो, ठीक आहे कॅप्टन,आय अग्री यु नीड अ ब्रेक नाऊ " देशकर बोलले,
"एके, ह्यांच्या अंगकाठीचा एखादा गोरा अफ़गाण हाणा व कपडे वस्तु ह्यांच्या सहित डी.एन.ए प्लांट करुन "मुरिद मारुन टाका ,I want murid shahid Dead in a northern alliance raid by tomorrow evening, clear?"
व्हिडीओ कॉन्फ़रंसींग संपताच ते शांत बसलेल्या मनस्वी कडे वळले, व शांत पणे बोलले,
"तु तयार आहेस मनस्वी?"
"हो सर"
"सिनियर केडर सगळे त्यांच्या ऑब्झर्वेशन मधे असतात म्हणुन, हे मोठे काम तुझे आहे, फ़्रेश आय.एफ़.एस कडे जास्त लक्ष नसते ओके बेटा?" हे म्हणत असतानाच त्यांनी एक पेनड्राईव्ह तिच्या हातात दिला व म्हणाले, पालम एयरपोर्ट ला सिक्युरीटी ला पेन ड्राईव्ह दाखव अन कोड सांग "जिजामाता" तुला डेटा कॅरी क्लियरंस मिळेल. जे.एफ़.के ला उतरली की तिकडच्या इमिग्रेशन ला पास करण्यासाठीचा कोड आहे "mattlock" बेटा एक वेळेस पुढचे २४ तास स्वतःचे नाव विसर पण हे शब्द विसरु नको. कळले तुला????
अतिशय शांत पण निश्चयी सुरात ती म्हणाली "ओके सर"
ती निघुन गेली, सकाळी ३ ला तिची फ़्लाईट होती व गेल्या गेल्या तिला आपल्या देशाची कैफ़ियत यु.एन मधे मांडायची होती
देशकरांनी नवा डेटा देऊन बलविंदर रवाना केला,
टेबला वरचा फ़ोन उचलुन एक कॉल केला.. अमेरिका भेटीवर जाणा~या पी.एम च्या "पुष्पक " ह्या विमानातल्या एक्झिक्युटीव्ह लाउंज मधे रिंग झाली व फ़ोन उचलला गेला,हे विमान म्हणजे मॉडीफ़ाय केलेलं बोईंग ड्रिमलायनर होते, एयरफ़ोर्स वन च्या तोडीचे जगातले फ़क्त दुसरे विमान होते ते म्हणजे हे, ह्याचा एयर कोड होता आस्क-एफ़ म्हणजे अशोका फ़्लाईंग,
दिल्लीतन देशकर साहेब बोलले "थिस इज कीड स्पिकिंग टू द आस्क-एफ़, रिक्वेस्टींग पर्मिशन टू कन्व्हर्स विथ शेरशहा.... अप्लिकेशन कोड इज कणाद"
"अप्लिकेशन कोड व्हेरीफ़ाईड कनेक्टींग सिक्युर लाईन टू शेरशहा...."
"जयहींद देशकर साहेब बोला, धिस इज पी.एम स्पिकिंग"
"सर, मेघदुत घेऊन यक्षिणी निघाली आहे, तुम्ही परदेशात बोलले तर कालिदासाच्या नावाचा बोलवाला होईल. ओव्हर"
"ठीक्, मी तुम्हाला रिलेव्हंट कोड्स अर्ध्यातासात पोचतील अशी सोय करतो, तुम्ही फ़ेडरल स्पेशल सर्व्हिस स्टेशन कोड ००46398 ला बोलुन घ्या ,आपला कोड आहे कोहीनुर. ओव्हर एँड आऊट"
तिकडुन परवानगी येताच देशकरांनी दुसरा फ़ोन उचलुन एक कोड दाबला, पलिकडुन आवाज आला
"This is Fedral special services station code 0046398 verify and go ahead"
"this is kohinoor , Meghdoot on its way, requesting fedral security cover over your land"
"request and code verified. permission and security granted"
त्या दिवशी संध्याकाळी न्युयॉर्क च्या यु.एन बिल्डिंग मधे सदस्य देश स्तब्ध बसले होते, पाकिस्तानी राजदुत शुन्यात बघत होते, व खणखणीत आवाजात मनस्वी डॉसियर वाचुन दाखवत होती"
दुस~या दिवशी पेपर मधे बातमी होती
"अतिशय वेगळ्या पद्धतीने भारताने आज पाक पुरस्कृत दहशतवादाचे पुरावे यु.एन समोर मांडले, जे कुठल्याही वरिष्ठ विदेशसेवा अधिका~याने न मांडता, नवख्या कु.मनस्वी बोस ह्यांनी मांडले!!!!!"
ह्या वेळी मनस्वी जेट्लॅग मुळे तिच्या ग्रॅंड कॉंटीनेंटल हॉटेलच्या खोलीत झोपी गेली होती
, समीर आपल्या मुली सोबत खेळत होता नवरा "बॉर्डर वरुन "आल्यामुळे मिसेस खुष होती,
गणेश-प्रकाश ने नवे सिरम देऊन ससा अजुनच बोलता केला होता व नव्या माहीतीवर खुष होते,
बलविंदर एका ईमेल इन्वेस्टीगेशन मधे मश्गुल होता.
मंडल, कनॉट प्लेस मधे पोरी छेडत जुन्या कॉलेजच्या मित्रांसोबत खिदळत होता
देशकर साहेब इंडीया इंटरनॅशनल ला बरेच दिवसांनी सहकुटुंब सहपरिवार जेवत होते.
अफ़गाणिस्तानातली भारतीय वकीलात साळसुद उभी होती,
पटेल -एके व्हिस्कीचे घोट घेत पश्तु भाषेतले विनोद समजवुन घेत होते,
रतन मिश्रा अजुनही बुचकळ्यातच पडलेला होता.
भारतीय गुप्तहेर संस्थेचा एक नॉर्मल २४ तासांचा दिवस संपला होता.
Mast. . . Enjoyed reading
Mast. . . Enjoyed reading
धन्यवाद आपले....
धन्यवाद आपले....
जबरी आहे.
जबरी आहे.
लेखन चांगले आहे.............
लेखन चांगले आहे............. फक्त खुप जास्त पात्र आल्यामुळे थोडा गोंधळ उडाला.
पु. ले. शु.
टोल्या.. विषय समजायला खूप
टोल्या.. विषय समजायला खूप अवघड गेला रे.. आणि पात्रे जास्त पण कथेची लांबी कमी त्यामुळे गोंधळही उडाला..
यावर किंवा अश्याच विषयावर अजून काहीतरी माझ्यासारख्यांनाही झेपेल असे लिहायला बघ ना.. वाचायला आवडेल.. कारण या विषयावर पुरेसे ज्ञान असल्याशिवाय कोणीही नाही लिहू शकत..
बाकी लिखाणशैली हेरकथेला साजेशीच होती यात एवढे नक्की.. वाचताना तो फील येत होता..
आवडेश
आवडेश
जे जे प्रसंग आहेत...
जे जे प्रसंग आहेत... त्यांच्या मधे एक लाईन आखा...... =================== अशी.. जेणे करुन एका प्रसंगातुन दुसर्या प्रसंगात जाण्यात मदत होईल........
.
.
आधी प्रसंग लिहा मग.... एका परिच्छेदामधुन त्याप्रसंगाची सरमिसळ करा................ म्हणजे वाचताना गोंधळ न होता... हळु हळु लिंक लागत जाईल ....
.
.
आपली कथा छान आहे..................
धन्यवाद सगळ्यांना मी पण आधी
धन्यवाद सगळ्यांना मी पण आधी कधी हेर कथा नाही लिहीलेली,थोडे थोडे संदर्भ नेट वरुन घेउन ट्राय केले आहे,हे सगळे सल्ले वापरुन लवकरच काहीतरी नवे घेऊन येईन.
टोल्या, मस्त कथा आहे. मला
टोल्या,
मस्त कथा आहे. मला वाटलं की शेवट एखाद्या मोहिमेत होईल की काय. पण नसला तरी कथा पकड घेते. नवीन प्रयोग आहे. अशी कथा अगोदर कोणी लिहिल्याचं आठवत नाही.
आ.न.,
-गा.पै.
अभारी आहे पैलवान..... हुरुप
अभारी आहे पैलवान..... हुरुप वाढवलात बघा तुम्ही....!!!
टाळ्या वाजवल्या मी अक्षरशः!
टाळ्या वाजवल्या मी अक्षरशः! मस्त कथा...
मस्त लिहिलिये कथा. आवडली.
मस्त लिहिलिये कथा. आवडली.
आभारी आहे टोकूरिका अन सस्मित
आभारी आहे टोकूरिका अन सस्मित
चांगला प्रयत्न...
चांगला प्रयत्न...
मस्त. जरा जास्त्च गोल गोल
मस्त. जरा जास्त्च गोल गोल फिरली कथा. पण ती गरज होती
अभारी आहे मंडळी...... गोल गोल
अभारी आहे मंडळी...... गोल गोल नाही फिरली तर ती हेरकथा कसली हो!!!! प्रायोगिक तत्वावर लिहुन पाहिली तेव्हा कळले इयान फ्लेमिंग ला किती घासावी लागली असेल ते!!!!!!!
झक्कास मस्त आपल्याला तर आवडली
झक्कास मस्त आपल्याला तर आवडली बुवा ..........
धन्यवाद शैलेशराव..... थोडा
धन्यवाद शैलेशराव..... थोडा बिचकतच केला होता प्रयोग.....
झक्कास मस्त आपल्याला तर आवडली
झक्कास मस्त आपल्याला तर आवडली बुवा .......... +१
आभारी आहे आपला.... माझा
आभारी आहे आपला.... माझा पहिलाच प्रयत्न आहे हा
कथा आवडली.
कथा आवडली.
आभार!!!!
आभार!!!!
मस्त कथा.. मधुन मधुन
मस्त कथा.. मधुन मधुन बाऊन्सर गेली पण तरीही आवडली..
धन्यवाद!!!!
धन्यवाद!!!!