Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाग सुरू झाला आणि नेमके लाईट
भाग सुरू झाला आणि नेमके लाईट गेलेत...
आता रीपीट पहावा लागेल...
ओके
ओके
ऑनर किलिंगचा विषय आहे. आजच्या
ऑनर किलिंगचा विषय आहे.
आजच्या भागाचा विषय पटला नाही. असो.
कार्यक्रम सुरू झाला तेव्हा
कार्यक्रम सुरू झाला तेव्हा खाप पंचायतीच्या विषयाला आमीर हात घालतो कि बगल देतो याची उत्सुकता होती. पण खाप पंचायतीच्या प्रतिनिधींना कार्यक्रमात बोलावून त्याने त्यांना भारताच्या कायद्याची जाणीव दिली हे कौतुकास्पद आहे. या विषयाचा आवाका पाहता केवळ तासा दीडतासात प्रभावी सादरकीरण करणे शक्य नाही याची जाणीव आहे. या विषयावर याआधीही बोलले गेले आहे.
क्या बात है! आजचा भाग
क्या बात है! आजचा भाग कायदेशीर नातेवाईकांसोबत बसून बघायला जाम भारी वाटलं.
उत्तम भाग परत एकदा! अतिशय
उत्तम भाग परत एकदा! अतिशय संयत !
कोणत्याही जातपातीची किंवा धर्माची नावे न घेता, भडक न करता योग्य मुद्दे मांडले गेले !
आमिरने अजुन एक सणसणीत चपराक दिली या वेळेस खाप पंचायतीला जशी मागच्या वेळेस वैद्यकिय व्यावसायिकांना आणी तलवारना दिली होती!
आजच्या भागाचा विषय पटला नाही. असो. >>>>> पहिल्या दोन केसेस पाहता याहुन काय वेगळी अपेक्षा करणार तुमच्याकडुन! पालथ्या घड्यावर पाणी!
चाणक्य, गांधींचे नाव घेऊन
चाणक्य, गांधींचे नाव घेऊन दगडफेकीची भाषा करणार्या तुमच्यासारख्यांकडून अशाच प्रतिसादांची अपेक्षा आहे
सॉलिड विषय आणि तुफान
सॉलिड विषय आणि तुफान सादरीकरण.
माझ्या माहितीत तरी 'खाप' च्या शहाण्यांना पहिल्यांदाच असे समोर बोलवून, त्यांची जागा दाखवून असे जाहीर वस्त्रहरण केले गेले आहे.
थ्री चिअर्स फॉर आमिर !!
इंग्लंडमधे लिखित संविधान नाही वगैरे कैच्याकै मुद्दे ऐकून मला असंख्य नेटभगव्यांच्यी तीव्रतेने आठवण झाली. विषय सोडून भलतीकडे गाडी रेटण्याची तीच ती जुनी खोड !
मायबोलीवरच्या खापछाप पब्लिकला पण असे एकदा 'जाहीर' मैदानात घेण्याची गरज आहे.
एका अत्यंत महत्त्वाच्या, ज्वलंत विषयाला हात घालून देशव्यापी मंथन घडवून आणल्याबद्दल 'सत्यमेव जयते' च्या टीमचे अभिनंदन आणि कौतुक.
बाकी हा धागा वाचायला मजा येणारे जाम !!
आजचा भाग आवडला. <माझ्या
आजचा भाग आवडला.
<माझ्या माहितीत तरी 'खाप' च्या शहाण्यांना पहिल्यांदाच असे समोर बोलवून, त्यांची जागा दाखवून असे जाहीर वस्त्रहरण केले गेले आहे.>
एनडीटीव्हीवरच्या 'वी द पीपल' या कार्यक्रमात बरखा दत्तने हे काम यापेक्षा कितीतरी अधिक प्रभावीपणे दोनेक वर्षांपूर्वीच केलं आहे. खाप पंचायतीची बाजू घेणार्या खा. नवीन जिंदाल यांनाही तिने सोडलं नव्हतं.
विनोद दुआ यांनीही एनडिटीव्हीवर या विषयावर एक कार्यक्रम सादर केला होता.
आमीर खानमुळे हा विषय लोकांना अधिक भावेल, हे मान्य.
बबलीचा किस्सा घडला होता,
बबलीचा किस्सा घडला होता, त्यावेळी ती बातमी वाचूनच अंगावर शहारा आला होता. असा विषय इतका महत्वाचा मानणे आणि त्याला, या कार्यक्रमात स्थान देणे हे महत्वाचे वाटले मला. सादरीकरण,
अत्यंत उत्तम.
हरयाणा मधली तरुण पिढी पण याच खुळचट जोखडाखाली वावरते, हे निदान एका उदाहरणावरुन तरी मला वाटते. एरवी माझा मित्र असलेल्या या तरुणाला, माझ्या ओळखीतला कुठल्याही मुलीला, तूझे स्थळ सुचवणार नाही, असे मी सांगितले आहे.
महाराष्ट्रात तरी हा प्रश्न तितका तीव्र नाही, म्हणजे रुसवा, परत तूझे तोंड बघणार नाही, या धमक्या असतात. पण एखादे मूल झाल्यावर सहसा राग धरला जात नाही.
मायबोलीवरच्या (एका लग्नात मी मुलीचा मामा म्हणून ऊभा राहिलो होतो) आणि इतरही मित्रमैत्रिणींमधे, मी अनेकांची साथ दिली, आणि आज त्या दोन्ही घराण्यात, चांगले संबंध आहेत.
नेटभगवा शब्द आवडला.
नेटभगवा शब्द आवडला.
एनडीटीव्हीवरच्या 'वी द पीपल'
एनडीटीव्हीवरच्या 'वी द पीपल' या कार्यक्रमात बरखा दत्तने हे काम यापेक्षा कितीतरी अधिक प्रभावीपणे दोनेक वर्षांपूर्वीच केलं आहे.
धन्यवाद चिनुक्स. एनडीटीव्हीवरचे ते भाग मी पाहिलेले नाहीत.
यू ट्युब वगैरेवर मिळाले तर बघतो.
लव्ह कमांडो नावाची संस्था
लव्ह कमांडो नावाची संस्था चालवणा-या त्या महोदयांनी वाचाळवीरांच्या आवाजात दबलेली तमाम अव्यक्त भारताची भावना बोलून दाखवली असं वाटतं..
सोशली/पोलिटिकली सेन्सिटिव्ह
सोशली/पोलिटिकली सेन्सिटिव्ह विषय निवडून आमीरने माझा कयास चुकविला.
दिनेशदा, मुंबईच्या विस्तारित उपनगरांत ऑनर किलिंगचे एक प्रकरण झाले आहे. महाराष्ट्रातही २०१२ मध्ये असे प्रकरण झाले आहे.
अशा जोडप्यांसाठी आश्रयगृहे असतात हे वाचून छान वाटले. सतत ठावठिकाणा बदलताना त्या पहिल्या जोडप्याचा उदरनिर्वाह कसा चालत असेल?
महाराष्ट्रात तरी हा प्रश्न
महाराष्ट्रात तरी हा प्रश्न तितका तीव्र नाही, म्हणजे रुसवा, परत तूझे तोंड बघणार नाही, या धमक्या असतात. पण एखादे मूल झाल्यावर सहसा राग धरला जात नाही.>> दिनेशदा, कार्यक्रम बघतानाच मनात चटकन हेच वाक्य आलं!!
आमिरने अजुन एक सणसणीत चपराक दिली या वेळेस खाप पंचायतीला जशी मागच्या वेळेस वैद्यकिय व्यावसायिकांना आणी तलवारना दिली होती! >> अनुमोदन!
व्ही चॅनेल वर गुमराह- एन्ड ऑफ इनोसन्स हा कार्यक्रम असतो. एका भागात हाच विषय हाताळला होता. लग्नात विवाहयोग्य तरूण तरूणीची ओळख होते, ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग चोरून लग्नात! तरूणीच्या मोठ्या बहीणीचा नवरा त्या मुलीला व तिच्या नवर्याला गाडीत टाकून घेऊन जातो... आता या नवर्याची बहीण फेसबूक वरून एका तरूणाच्या प्रेमात पडते, पण आपलीसुद्धा अशीच गत होईल या भितीने पछाडलेली असते. शेवटी प्रियकराने "आपल्याला जगायचं असेल तर या सगळ्यांना मारायला हवं" असं कन्विंस केल्यावर घरातील सर्वांना विष देऊन मारते व पळून जाते...
हा काहीसा जिहाद सारखाच मामला असावा... घरातील ज्येष्ठांनी परंपरांचं जोखड सांभाळत स्वतः जगायचं, पुढच्या युवा पिढीला ते विरासतमध्ये द्यायचं आणि मग ती पिढी 'जणू काही सर्व कम्युनिटीच्या संस्कार, परंपरांची जपणूक करण्याची कामगिरी स्वतःच्या शिरावर' असल्यासारखी वागते... आणि स्वतःच निर्णय घेऊन शिक्षा वगैरे ठोठावते... आणि त्याबद्दल त्यांना तसूमात्रही पश्चाताप वगैरे नसतो उलट ते या वागणूकीचे समर्थनच करतात हे जास्त भयानक!!
या विषयाच्या कार्यक्रमातील महत्वाबद्दल... सुरूवातीला माझ्याही मनात येऊन गेलं, यापेक्षा वेगळा विषय घेतला असता तर... पण महाराष्ट्रात अशा घटनांचे प्रमाण खूप नगण्य आहे पण बाकी राज्यांमध्ये घराने की इज्जत म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न! त्यासाठी मृत्यूदंडापेक्षा दुसरी शिक्षा असूच शकत नाही! पण ज्या देशाचं सरकार निवडण्याचा अधिकार युवा पिढीला आहे त्यांना स्वतःचं आयुष्य कोणाबरोबर काढायचं हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही? आणि त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यायचा अधिकार या सो कॉल्ड समाजरक्षकांना कोणी दिला? आमीरच्या या कार्यक्रमामध्ये "आयुष्य हे अनमोल आहे, त्याची जपणूक व्हावी" हा बेसिक संदेश असावा. आणि तसं असेल तर पुढचा विषय त्याने 'शेतकर्यांच्या आत्महत्या' हाच घ्यावा... हा अतिशय गंभीर विषय आहे!!!
आमीरखान ने आपल्या सत्यमेव
आमीरखान ने आपल्या सत्यमेव जयते कार्यक्रमात Humanity Trust या ट्रस्ट ला डोनेशन द्यायला सांगितले आहे ,परंतु या ट्रस्ट ची पार्श्वभूमी संशयास्पद असून देश-विदेशातील मदरश्या नां आर्थिक पाठबळ देणारी ही संस्था असून दहशतवादी संघटना शी ही या संस्थेचे लागेबांधे असल्याच्या बातम्या आहेत .यास्तव सावधान!
फक्त अमीर संगतो म्हणून कोणत्याही संस्थेला दान देऊ नका !!!!!!!!!!!!!!!!!!!
http://www.satyamevjayate.in/
http://www.satyamevjayate.in/issue04/donate/
Humanity Trust has started Humanity Hospital in 1996, in a small village named Hanspukur in West Bengal, with the aim of providing medical care to those with no access to it, and especially to those who could not afford it.
http://www.humanityhospital.org/
ह्युमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्ट
ह्युमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्ट स्थापन करणार्या सुभाषिणी मिस्त्री यांना सीएनएन-आयबीएन हीरो सन्मान मिळाला होता. त्या निमित्ताने त्यांच्यावर केलेला कार्यक्रम अतिशय सुरेख होता. गूगल केल्यावर मला कुठेही या ट्रस्टविषयी संशय निर्माण होईल, अशी बातमी सापडली नाही. उलट त्यांनाच आर्थिक मदतीची गरज असल्याच्या बातम्या सर्व संकेतस्थळांवर दिसल्या.
कात्रे,
तुम्ही जे विधान केलंत, त्याबद्दल अधिक माहिती देणार का?
अशी विधानं करत राहणं गरजेचं
अशी विधानं करत राहणं गरजेचं आहे. या अशा विधानांमुळेच हा द्वेषमूलक प्रचार गुळमुळीत होत जाईल आणि काही दिवसांनी आपोआपच त्याचं हसं होईल.
हे कुजबूज आघाडीचे काम
हे कुजबूज आघाडीचे काम असावे.
https://twitter.com/AmiSri/statuses/209187950490161152
Aamir Khan must clarify his links with 'Humanity Trust' & "Masjid Construction asst" activity http://bit.ly/JJTveN not faking with hospital
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
आमीरचा आणि लव्ह जिहाद चा
आमीरचा आणि लव्ह जिहाद चा संबंध कसा जोडला नाही अजून ?
आमिरने अजुन एक सणसणीत चपराक
आमिरने अजुन एक सणसणीत चपराक दिली या वेळेस खाप पंचायतीला जशी मागच्या वेळेस वैद्यकिय व्यावसायिकांना आणी तलवारना दिली होती! >> अनुमोदन
भरत, मी वाचली नव्हती बातमी
भरत, मी वाचली नव्हती बातमी ती. मराठी समाजात झाले होते का ?
आणि याला ऑनर किलींग का म्हणायचे ? कुणाचा मान राखला जातो यात ?
णक्य, गांधींचे नाव घेऊन
णक्य, गांधींचे नाव घेऊन दगडफेकीची भाषा करणार्या तुमच्यासारख्यांकडून अशाच प्रतिसादांची अपेक्षा आहे >>>>> दगडफेकिची भाषा तुमची , आमची नव्हे . दगडफेकच काय , तुम्हि तर गोळ्या घालायलाहि तयार आहात धर्माच्या नावावर! जुने धागे शोधा . त्यात तुमचे महान प्रतिसाद आहेत. तुमच्यात आणी खाप पंचायतीत काहि फरक नाहिये!
<<<<<<<< मंदार_जोशी | 3 June, 2012 - 08:04
आमिरने अजुन एक सणसणीत चपराक दिली या वेळेस खाप पंचायतीला जशी मागच्या वेळेस वैद्यकिय व्यावसायिकांना आणी तलवारना दिली होती! >> अनुमोदन >>>>>>>>>>>
ते वाक्य माझे आहे. तुम्हि चुकुन अनुमोदन दिले असावे. तुम्हि माझ्या वाक्याला अनुमोद्नन दिले याबद्दल मी धन्य झालो.
चाणक्या........... तुला
चाणक्या........... तुला अनुमोदन... मायबोली अॅडमिन देखील खाप पंचायतच आहे.. जोशी आणि बुडबुडा की जामोप्या दोघानीही एकमेकाना मूर्ख असे शब्द वापरले होते.. जोशी तसेच राहिले, बुडबुडा / जामोप्या मात्र बुडाले
मायबोली अॅडमिन देखील खाप
मायबोली अॅडमिन देखील खाप पंचायतच आहे. >>>>>
तुम्हि हे वाक्य लिहिले म्हणुन तुमच्यावर आणी मी त्यावर फिदिफिदि हसलो म्हणुन माझ्यावर ते जन्मभर बहिष्कार टाकतील आणी आपल्याला गावाच्या (माबोच्या) बाहेर काढतील
(No subject)
हा धागा फारसा चालणार नाही, या
हा धागा फारसा चालणार नाही, या विषयावर आधी धागे आलेले अहेत.
Pages