सत्यमेव जयते
भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. सत्य हे नाम आहे आणि जयचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे.
सत्य म्हणजे काय? सत्य भूतकाळात असतं कारण ’एखादी घटना घडली’, हे सत्य ती घटना घडल्यावरच अस्तित्वात येते.
वर्तमानात सत्य घडत असतं. सत्याचा भविष्यकाळाशी काही संबंध नसतो कारण जे घडलंच नाही ते सत्य कसे काय असू शकते?
आपण कथा/कादंबऱ्या, नाटक/सिनेमांमध्ये ’माझी सत्याची बाजू आहे म्हणून माझाच विजय होणार’, अशा प्रकारचे संवाद वाचले/ऐकले आहेत. ’सत्याची बाजू’ म्हणजे काय? गेल्या वर्षी भारताने क्रिकेटचा ’वर्ल्ड कप’ जिंकला, हे सत्य आहे पण म्हणून त्यानंतरच्या सर्व मॅचेस भारत जिंकेल, असे नाही. आम्ही ’चॅम्पिअन’ आहोत म्हणून आम्ही जिंकणार, असे होणाऱ्या मॅचच्या आधी म्हणणे, हा विश्वासाचा भाग असू शकतो पण त्या म्हणण्याचा घडणाऱ्या सत्याशी काहीही संबंध नसतो.
न्यायपालिका पुराव्यावर चालते. पुराव्याअभावी सत्य असत्यात परिवर्तित होऊ शकते.
सत्यमेव जयतेचा खरा अर्थ आहे ’जे जिंकतं ते सत्य आहे’. ’जो जिता वोही सिकंदर’ या म्हणीच्च्या अर्थाशी जुळणारं हे संस्कृत वचन आहे. इंग्रजीमध्ये होईल ’व्हॉट प्रिव्हेल्स इज द टृथ’.
काही घटना पुन:पुन्हा तशाच प्रकारे घडतात. सूर्य पूर्वेला उगवतो. रात्री साडेनऊ वाजता मराठी बातम्या प्रसारित होतात. वगैरे!
सूर्याचं पहाना! तो दररोज बरोब्बर पूर्वेला उगवत नाही, हे वैज्ञानिक ’सत्य’ आहे. उत्तर भारतातच काय पण मकरवृत्ताच्या उत्तरेला राहणाऱ्या जगातल्या सर्वच लोकांसाठी सूर्य पूर्वेच्या दक्षिणेकडे उगवतो. धृव तारा उत्तर दिशेला दिसतो, हे फक्त पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सत्य आहे. मॉन्सूनचा पाऊस महाराष्ट्रात नैऋत्येकडून येतो. तर बिहारमध्ये त्यालाच ’पुरवय्या’ म्हणजे पूर्वेकडून येणारा म्हंटले जाते. तमिलनाडूमध्ये तर हिवाळी मौसमी पाऊस इशान्येकडून येतो. भुगोलामुळे सत्य कसे बदलते, त्याची ही उदाहरणे आहेत.
चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे सत्यसुद्धा मानवाला आत्ता आत्तापर्यंत माहित नव्हते. ठोकळ मानाने निसर्गही नियमात बांधलेला असतो, हे सत्य आहे. नियमांना अपवाद असतात पण म्हणून सत्य असत्य होत नाही.
सूर्याचा प्रकाश कमी होऊ लागला की संध्याकाळ होते, या सवयीमुळे खग्रास सूर्यग्रहणात पक्षी घरट्याकडे परततांना दिसतात. अशाच समजुतीचा फायदा श्रीकृष्णाने अर्जुनाला वाचविण्यासाठी केल्याचे आपल्याला माहित असेलच.
थोडक्यात म्हणजे ’सत्य’ विशिष्ट संदर्भात सत्य असतं, हे लक्षात ठेवले पाहिजे. सत्याचा कीस काढत गेलो तर हाती भुगाच मिळणार, नाही का!
सत्यमेव जयते
Submitted by SuhasPhanse on 3 May, 2012 - 23:55
गुलमोहर:
शेअर करा
उत्तर भारतातच काय पण
उत्तर भारतातच काय पण मकरवृत्ताच्या उत्तरेला राहणाऱ्या जगातल्या सर्वच लोकांसाठी सूर्य पूर्वेच्या दक्षिणेकडे उगवतो>>
यातील पूर्वेच्या दक्षिणेकडे हे समजले नाही
मी भारताच्या संदर्भात लिहिले
मी भारताच्या संदर्भात लिहिले आहे पण ब्लॉग लिहितांना ’ग्लोबल ’ संदर्भ द्यायला पाहिजे होता.
मकरवृत्त व कर्कवृत्त यामधल्या अक्षांशात राहणाऱ्यांसाठी सूर्य ज्या दिवशी डोक्यावर असतो फक्त त्या दिवशी तो पूर्व दिशेला उगवतो. इतर दिवशी तो त्या ठिकाणच्या पूर्वेच्या दक्षिणेला किंवा उत्तरेला उगवत असतो.
ब्लॉग चा मुख्य आषय ’ संदर्भाप्रमाणे सत्य बदलते’ असा होता.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
निव्वळ शाब्दीक खल... निरर्थक
निव्वळ शाब्दीक खल... निरर्थक लेख
शब्दछल..... राम शेवाळकरांची
शब्दछल..... राम शेवाळकरांची जागा नक्कीच घेऊ शकाल... शुभेच्छा
लय
लय भारी..............................
.
.
.
.
.
.
.
.
जरा जास्तच इस्कटला ... गोळा करा जरा.........
लेखक महाशय तुम्हाला मुद्दा
लेखक महाशय तुम्हाला मुद्दा समजला नाहि सत्याबद्दल . हरकत नाहि, मुद्दा न समजणारे बरेच आहेत माबोवर!
सूर्याचं पहाना! तो दररोज बरोब्बर पूर्वेला उगवत नाही, हे वैज्ञानिक ’सत्य’ आहे. >>> सुर्य कोठेच उगवत नाहि.
लेख आवडला... अजुन थोडा
लेख आवडला... अजुन थोडा विस्तार केला तर वाचकांच्या सत्याबद्दलच्या कल्पना वास्तवाकडे झुकतील.
कीस पाडू नका हा बोध योग्य
कीस पाडू नका हा बोध योग्य आहे, पण तो लोकांपर्यंत पोचावा या दृष्टीने लेख पुरेसा नाही. त्याबद्दल थोडे वाढवायला हवे. दिशा योग्य आहे.
> ठोकळ मानाने निसर्गही नियमात बांधलेला असतो, हे सत्य आहे. नियमांना अपवाद असतात पण म्हणून सत्य असत्य होत नाही.
There is a theory which states that if ever anybody discovers exactly what the Universe is for and why it is here, it will instantly disappear and be replaced by something even more bizarre and inexplicable. There is another theory which states that this has already happened.
Douglas Adams in HHGTTG
"There is no Absolute truth"
"There is no Absolute truth" एवढेच म्हणायचे असेल तर मी या आशयाशी सहमत आहे.
बरोबर. अंतीम सत्य असे नसतेच,
बरोबर. अंतीम सत्य असे नसतेच, कोणतीच गोष्ट बरोबर वा चूक नसते (सर्व सापेक्ष असते, माझ्या पहिल्या 'बरोबर' सहीत).
पण त्याच बरोबर जर सबसेट्स विचारात घेतले तर मात्र त्यांची स्वतःची तत्वे असु शकतात. लोक अनेकदा त्याचाच विचार करुन आपल्या भिंती ठरवतात (विचाराच्या, आणि थडग्याच्या).
सत्यमेव जयतेचाच विचार करायचा झाल्यासः
(१) स्त्री भृण हत्या - सर्व जीव सारखे आहेत का? मुलगा आणि मुलगी सारखे आहेत का? याप्रश्नांच्या उत्तरावरून पालकांचे आचार ठरणार. डॉक्टर्स करता वेगळे प्रश्न (यांच्या व्यतिरीक्त).
(२) अब्युझ - दूसर्याचे जिवन किती महत्वाचे आहे, तुमच तुमच्या मुलांवर किती विश्वास आहे ई.
(३) पैसा किती महत्वाचा आहे ...
(४) दूसर्याचे जिवन किती महत्वाचे आहे, त्यांचा पैसा ..
हे ही वरवरचे प्रश्न झाले ...