माणसाच्या मनात ज्या अनेक प्राणिमात्रांची भिती दाटलेली आहे ना ! त्यात सगळ्यात वरच्या काही नंबरात साप कायम स्थान टिकवुन आहे.
एक सर्पमित्र म्हणुन मी काहीकाळ सापांच्या मागे धावलोय, ते ही आगदी शब्दशः त्यावेळी अनेकदा गंमती जंमती घडायच्या त्यावेळचे काही आठवतील तितके किस्से मी लिहून काढायचा प्रयत्न केला. आणि नक्की कुठे पोस्टायच्या ते न कळल्याने कथेत पोष्टतोय.
१] संध्याकाळची वेळ म्हणजे आमच्या कुचाळक्या रंगात आलेल्या असायच्या अश्या या मंगलसमयी एक निरोप आला. त्या अमक्यांच्या घरात साप शिरलाय तुम्हाला लगेच बोलावलेय मी आगदी रुबाबात बाकी मित्र मंडळींकडे पहात त्या निरोप्याच्या मागे रवाना,
घरात शिरलो तर घरातली माणसे जे काही उंच मिळेल त्यावर चढून बसली होती. नेमके वर्णन करायचे तर श्री. टिपॉयवर बसले होते, सौ., खुर्चीवर पाय अखडून, दोन्ही मुले गडबडीत खिडकीवर चढून बसली होती आणि सतत सांधेदुखीचे रडगाणे गाण्यार्या आज्जी (म्हणजे बोलायला आज्जी हं वय जास्त नव्हत काही) टि.व्ही च्या टेबलावर शक्य तितक्या अकुंचन पावत बसल्या होत्या.
" का हो ? साप कुठाय? " मी आल्या आल्या प्रश्न केला. हातातली स्टिक मिरवत हं.
" तो? तिकडे किचन मधे " आज्जी चिरकलेल्या आवाजात.
" मग तुम्ही इकडे असे का बसलात?"
"अरे ! तो इकडे आला तर?" श्रींची शक्कल
" आहो मग बाहेर जायचे ना !" मी सोपा मार्ग सुचवला.
" आणि तो कुठे जाउन लपुन बसला म्हणजे?" ही मुक्ताफ़ळे अर्थात श्रींच्या सौ. ची.
" बरं ठीक आहे पहातो मी"
मारे वाघाच्या शिकारीला निघाल्यासारखा हातातली स्टीक समोर धरत किचनमधे शोधाशोध सुरु केली. जास्त शोधायची वेळ आलीच नाही ओट्याखालची जागा साप लोकांची आवडती असते तिथे नाही सापडला तर बहूधा तो फ़्रीज खाली सापडतो. तसा मला तो सापडला मी मारे अलगद शिकवलेल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी आठवत एकदाचा त्या सापाला पकडला आणि हाय रे देवा तो साप म्हणजे `नानेटी 'होती की. अत्यंत निरुपद्रवी आणि बिनविषारी. आणि या बयेला घाबरुन बाहेर लहानसा गिर्यारोहणाचा कार्यक्रम चालु होता.
म्हंटल चला आहे त्यावर भाव खाउन घेउ. अलगद त्या नानेटिला पकडुन मी बाहेर आणली. आनि बाहेरच्या त्या आदिमानवांची नक्कल करु पहाणार्या प्रेक्षकवर्गाला दाखवली.
" काका, ही नानेटी आहे आजीबात विषारी नाही"
" अरे बापरे ! आता तु जाउ नको पाठोपाठ सात नानेट्या येतील आता" टिपॉय वरुन पाय खाली सोडायच्या तयारीतले काका पुन्हा मुळ मुद्रेत जात म्हणाले.
" आहो नाही, तसे काही नसते ते चुकुन कधी घडले असेल ( खरे काय असते ते सांगायचे आता जिवावर आले ) नाही येणार आणखी नानेट्या.
" नाही कश्या? माझ्या दिराने एकदा मारली होतीन नानेटी आल्या की हो सात तिच्या मागे ! " आज्जींकडे प्रत्येक गोष्टीचे पुर्वानुभव असतातच.
कशीबशी सगळ्या कुटुंबाची समजुत घालुन मी बाहेर उभ्या मित्रांजवळ आलो आणि जरा आभिमानानेच 'नानेटी' या सापाची माहीती द्यायला लागलो. त्यांच्या चेहर्यावर एव्हाना कौतुकाची छटा दिसायला लागलीच होती की मागुन आवाज आला
" अय्याऽऽऽ, चिंट्या! बघ काकांनी केवढा मोठा गांडूळ पकडलाय" आणि पुढच्या हास्यकल्लोळात माझा रुबाब पार उतरला.
२] एकदा असाच भरदुपारी घरी असताना कुणीतरी बाहेरुनच हाका मारत होते. गॅलरीतुन डोकाउन पाहीले तर आमचे जरा दुरचेच शेजारी.
" येता का जरा ? माझा मेव्हणा आलाय आणि त्याला साप चावलाय.
"आहो मग त्यांना दवाखान्यात न्या की !"
"तिकडे नेलेच आहे पण डॉक्टर म्हणतात तो साप आणला असतात तर बरं झाल असतं, आणि साप बसलाय तिकडे जिन्याच्या खाली कोपर्यात लपुन"
"तुम्हाला कसे माहीत ? "
"मीच, आत्तापर्यंत लक्षठेउन होतो ना ! आता हिचा मोठा भाउ पण आलाय त्याला तिथे बसवुन आलोय "
जास्त वेळ घेण्यात अर्थ नव्हता. डॉक्टरांनी साप का बघायला मागितला असेल याचा अंदाज आलाच होता.
सर्पदंशाच्या बर्याच केसेस मधे बहुधा हुशार डॉक्टर दंशाच्या खुणांवरुन सापाची जात ओळखतात पण क्वचीत प्रसंगी जर गोंधळ उडालाच तर ते असे म्हणतात. सहसा मारलेला का होईना साप असतोच. कारण आपण माणसे सुड घेण्यात चित्रपटातल्या नागीणीपेक्षा जास्त खुनशी ना !
तसलाच काही प्रकार असावा असे समजुन मी धडपडत गेलो. आणि त्याने दाखवलेल्या ठिकाणी पाहीले आणि कपाळावर हात मारुन घ्यायचा बाकी राहीलो. साधे 'दिवड' होते ते. हा पाणसाप चावतो कडकडून पण विषारी नसतो अजिबात.
खरी हकीकत दुसर्यादिवशी कळली ती अशी:
हे मेव्हणे महोदय `डिस्कवरी' वर साप पकडताना पाहून प्रभावीत झालेले. त्यात घरात असाच माझा विषय निघालेला. तो अमका ( म्हणजे मीच ) कसा सापाची शेपटी धरुन अलगद उचलतो ( त्यासाठी किती रक्त आटवलेय आणि गोठवलेय माझे मलाच ठाउक ) वगैरे वगैरे. आणि दुसर्या दिवशी तो रस्ता चुकलेला 'दिवड' घरात शिरायचा प्रयत्न करताना त्यानेच पाहीला. आपले देखीव ( ऐकीव असते ना तसे ! ) नॉलेज पणाला लावुन कशीबशी एकदाची शेपटी पकडली त्याने दिवडाची ( अर्थात या साठी सुध्दा खुप तयारी लागते मनाची ) आणि नेमके पुढे काय करायचे ते न सुचल्याने बहाद्दराने त्याला तसाच लोंबकाळत वर उचलला. अश्यावेळी साप गडबडतो, आणि काहीतरी अनपेक्षीत हलचाल करतो तसेच झाले आणि साप चावला तो मांडीलाच. तो ही दोनवेळा मग मात्र डोळे फ़िरवले गड्याने आणि दवखानावारी करुन आला.
३] एकदा मात्र हद्द झाली असेच बोलावले म्हणुन गेलो. मारे पोटमाळ्यावरुन `घोणस' शोधुन काढला त्याला घेउन खाली उतरतो तो समोर ज्या काकुनी बोलावले त्यांचे नवरोबा हातात कोयता घेउन आम्हाला सामोरे !
" धरुन ठेव रे निट " कोयता उगारत काका म्हणाले.
" काका तुम्ही खाणार आहात का साप, मारल्यावर ?"
"काही तरी बोलु नको साप का कुणी खातं मेले आम्ही काय चिनी आहोत ?" काकुंनी तोंड सोडलच.
" मग मारता कशाला ?"
" तु काय घरात नेउन पाळणारेस ?"
"नाही, रानात नेउन सोडणार."
" मग सोडतो कशाला" काकु दणक्यात म्हणाल्या तसेही हत्यार आपल्या बाजुचे असले की भांडणार्याला जोर येतोच.
" काकु तुम्ही मला साप पकडायला बोलावलत मग आता मारायला का निघालात होता तिथेच मारायचा ना ! " अश्या वेळी मी हे छापिल उत्तर देतो.
" मी मारायलाच बोलावला होता तु येउन धरलास त्याला मी काय करु?" चक्क खोटे बोलत काकु म्हणाल्या कारण मी आगदी स्वच्छपणे ऐकले होते त्यांनी साप धरायला बोलावल्याचे. ती पेशवेकालीन आनंदीबाई पुनर्जन्म घेउन आली असावी असा मला संशय यायला लागला.
पण मी `गारदी' हुषार हो ! म्हंटल तुम्हाला मारायचाच आहे ना ? खुषाल मारा मी हा सोडतो त्याला आणि जातो, मग मारा ! त्यामुळेच मग तो साप बचावला !
४] आता दरवेळी पंगा बिनविषारी सापांशी येतो असे नाही पण आपल्या महाराष्ट्रात तरी विषारी जाती कमीच त्यातुन आगदी विषारी म्हणजे 'नाग' मी आत्तापर्यंत आडीच वेळा नाग पकडलेत म्हणजे एकदा `अर्धेल्या' ( अर्धा नाग अर्धी धामण असा असतो म्हणे हा मलाही माहीत नव्हते नेमके शास्त्रीय नाव माहीत नाही ) म्हणुन अर्धा.
त्यातल्या एकावेळी जिव जायचाच, तो प्रसंग माझे अनुभव बी बी वर आहे पण एकदा बाकी मोठा विनोदी प्रकार झाला होता.
एका ठिकाणि घरात शिरलेला नाग पकडला पण त्या लोकांचे म्हणणे होते की तो देवाचा नाग आहे आम्ही त्याला वारुळात सोडावा. त्याना म्हंटले दाखवा वारुळ त्यांनी दाखवलेले वारुळ बघुनच हातापायातल्या मुंग्या जाग्या झाल्य की काय देव जाणे. लाल मुंग्यानी भरलेल्या वारुळात हे नाग सोडायला सांगत होते. त्यात एक तर नाग मेला असता नाहीतर मी तरी. त्यावर मला उत्तर इतके भारी मिळाले की मी गार पडायचाच बाकी
म्हणे हा नाग घरात आला तेवढ्या वेळात मुंग्या लागल्या वारुळाला. आता तुम्ही त्या नागाला सोडलेत की मुंग्या बाहेर पळतील. 'बहूतेक आयत्या बिळावर नागोबा' माहीत नसावे.
बरीच समजुत काढल्यावर तो तयार झाला एकदाचा नाग दुसरीकडे सोडायला. पण म्हणे एकदा त्याला सगळ्या जागेचे दर्शन करु दे ! मग आख्या घरा अंगणापासुन आमची वरात प्लास्टीकच्या बॅगेत नाग घेउन.
आणखि एक आठवण: आमच्या कडे एक गारुडी यायचा नेहमी दर सोमवारी टोपलीत नाग ठेउन मी घरी असलो की त्याला सरळ पुढे पाठवुन द्यायचो. अश्या लोकांचा राग येतो एक तर बिना दाताचे विषग्रंथी काढलेले नाग घेउन येतात त्यात त्यांना सारखे हाताळुन त्यांच्या शरीराचे तापमान वाढवतात मग ते नाग मलुल पडुन रहातात म्हणुन टोचुन टोचुन हलवतात.
तर असाच एकदा तो गारुडी मी असताना आलेला आणि बहूतेक आज ह्याच्याकडून पैसे घेउन जायचेच असे ठरवुन आला असावा
" सायेब, नागोबाला दुध पाजा"
" पाजतो बाबा आणु का घरातुन ?"
" सायेब मस्करी करता का गरीबाची रुपाया द्या द्येवाचं जनावर हाय ह्ये "
" आणि तु घेउन फ़िरतोयस?"
अश्यावेळी हे लोक जे करतात तेच त्याने केले. पटकन नागाचे टोपले माझ्या समोर धरत त्याने झाकण उघडले.
"बगा सायेब, लई इखारी जनावर हाय"
इतके बोलेस्तोवर त्याच्या टोपल्यातुन नाग मी उचलला. आता गडी ढेपाळला, शेवटी इकडे परत यायचे नाही या अटीवर मी त्याला त्याचा नाग परत केला नाहीतरी विषग्रंथी नसलेला आणि विषारी दात नसलेला नाग बाहेर जगणे शक्य नव्हतेच.
थोडक्यात आपण ज्या सापांना घाबरतो ते इतके वाईट नसतात हो !
असेच एकदा कंपनित साप पकडल्यावर मला काहितरी साप पकडण्याचा मंत्र येतो असा गैरसमज सहकारी बंधुंनी करुन घेतला होता त्यातल्या एका बंगाली सहकार्याला मंत्र शिकवतो म्हणुन पार शाकाहारी करुन टाकला. आणि नंतर या आमावस्येला नदिवर भेट सांगुन कटवला होता.
मस्तच अनुभव - दिवड आहे शांत
मस्तच अनुभव -
दिवड आहे शांत पण चांगला कचकचीत चावतो आणि भळाभळा रक्त काढतो.
आणि धामणीचा चावा हा अगदी बोंबलायला लावणारा प्रकार आहे. माझा डावा हात पार फोडून काढला होता...
विषग्रंथी काढतात म्हणजे
विषग्रंथी काढतात म्हणजे नेम्कं काय करतात?
भारी अनुभव आहेत!
भारी अनुभव आहेत!
आशु.... नंतर लय प्रोब्लेम
आशु.... नंतर लय प्रोब्लेम झाला असेल ना...
डावा हात उदय गांडूळ
डावा हात उदय
गांडूळ
सापांना पकडणारा चाफा... लय
सापांना पकडणारा चाफा... लय भारी उद्योग करतोस रे..
आणि धामणीचा चावा हा अगदी
आणि धामणीचा चावा हा अगदी बोंबलायला लावणारा प्रकार आहे.>>>>> आशू नक्की धामणच होती ना ?
एक फोटो अपलोड करतोय त्यात धामणच आहे
सापांना पकडणारा चाफा... लय भारी उद्योग करतोस रे. >>>> अभि खुप काही करतो रे पण बोलून नाही दाखवता येत
हो रे धामणच होती. मी कात्रज
हो रे धामणच होती. मी कात्रज सर्पोद्यानला जायचो तेव्हा धामणीच्या 'पीट' मध्ये उतरलो होतो. माझ्या हातावर अजून त्या चाव्याची खूण आहे. दिवड तर किमान ३-४ वेळेस चावलीये
ही पहा धामण चँप्या-, दिवडानं
ही पहा धामण
चँप्या-, दिवडानं तर माझा अंगठा फोडला होता एकदा
सर्पमित्रांना कदाचित आवडणार
सर्पमित्रांना कदाचित आवडणार नाही ही आठवण. माझ्या लहानपणी एका माणसाची गोष्ट ऐकली होती. त्याने म्हणे दिवड हाताने मारलं होतं. कसं ते माहीत नाही.
बाकी, अर्धेल्यांबद्दल सांगायचं झालं तर मी ऐकलंय की सर्पयोनीत असे संकर स्वाभाविकपणे होतात. म्हणून त्यांना अक्करमाशे अशी संज्ञा आहे. मी ऐकल्याप्रमाणे घोरपड ही सगळ्या सर्पयोनीची प्रमुख आई आहे. ती साप, विंचवांची देखील अंडी घालते म्हणे.
-गा.पै.
गा.पै. घोरपड ही चक्क चार पाय
गा.पै. घोरपड ही चक्क चार पाय असलेला प्राणी आहे. साप विंचू .. कसंशक्य आहे राव ? समज अप्समज फार असतात हो सरिसृपांबद्दल. मला वाटतं आपण एक धागा काढावा साप या विषयावर, नाहीतर लोक म्हणतील टीआरपी वाढवतोय
कचा, माझी माहीती ऐकीव आहे.
कचा,
माझी माहीती ऐकीव आहे.
मात्र अर्धेली खरोखरंच अस्तित्वात आहे हे पाहून प्रजातीसंकर होत असावा असं अनुमान निघतं. यावरून घोरपडीची आठवण झाली. खखोदेजा!
आ.न.,
-गा.पै.
घोरपड ही कॉमेडो ड्रागन च्या
घोरपड ही कॉमेडो ड्रागन च्या जाती मधली........मोठी पाल म्हणा हवे तर... फक्त ती ड्रागॅन सारखी विषारी नसते.....
हीची पकड फार घट्ट असते.. ही तिचे वैशिष्ट्ये आहे..
माहिती आणी मनोरंजन पण...
माहिती आणी मनोरंजन पण...
सापांना पकडणारा चाफा... लय भारी उद्योग करतोस रे. >>>> +१
सापांना पकडणारा चाफा... लय भारी उद्योग करतोस रे. >>>> अभि खुप काही करतो रे पण बोलून नाही दाखवता येत
>>>> लेखनातुन दखवत जा की...
दिनेश दा. >> पुस्तकाच नाव पण
दिनेश दा. >> पुस्तकाच नाव पण सांगा न प्लीज ..
कवठीचाफा >> साष्टांग _/\_
मला सापाची भयंकर भिती वाटते पण आकर्षण पण तेवढच .. त्यामुळे सर्पमित्र होण्याच प्रशिक्षण घ्यायच्या विचारात आहे बघु केव्हा मुहूर्त निघतो ते
आताही अनुभव वाचायला आवडतील.
आताही अनुभव वाचायला आवडतील.
लै भारी अनुभव आहेत रे .....
लै भारी अनुभव आहेत रे .....
साप मारल्यास ७ वर्षे
साप मारल्यास ७ वर्षे तुरुंगवास आणि दन्ड होऊ शकतो .....
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5361725056561140614&Se...!
साप मारल्यास ७ वर्षे
साप मारल्यास ७ वर्षे तुरुंगवास आणि दन्ड होऊ शकतो .....
<<
हाय्ला! खरंच का?
त्या तिकडच्या धाग्यावर कुणीतरी मारल्याची कबुली दिलेली आहे. पाहुन सांगतो.
अल्पसंख्याकांचे लाड
अल्पसंख्याकांचे लाड सापापर्यंत येतील असे वाटले नव्हते::फिदी:
मस्त आहेत किस्से.
मस्त आहेत किस्से.
खर आहेका पण हे
खर आहेका पण हे
खुपच छान आणि रंजक अनुभव आहेत
खुपच छान आणि रंजक अनुभव आहेत तुमचे..
भारी अनुभव आहेत!
भारी अनुभव आहेत!
https://misalpav.com/node
https://misalpav.com/node/25350
इथे सुद्धा एका सर्पमित्राने खूप छान माहिती आणि अनुभव सांगितले आहेत
https://misalpav.com/node
https://misalpav.com/node/25350
इथे सुद्धा एका सर्पमित्राने खूप छान माहिती आणि अनुभव सांगितले आहेत
नवीन Submitted by आदू on 23 December, 2019 - 07:36
खरंच छान आहे माहिती. ते फोटो मात्र बघवत नाहीत (खूपच क्रूरपणा).
2019 - 07:36
2019 - 07:36
खरंच छान आहे माहिती. ते फोटो मात्र बघवत नाहीत >>>खरंय, ते 8 कि10भाग आहेत,सगळे मस्त आहेत
Pages