ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याच्या 'फोलिएज' ह्या संस्थेच्या कॄपेने मध्य प्रदेशातल्या कान्हा नॅशनल पार्कात भटकंती झाली. कान्हा नॅशनल पार्क जबलपूरहून १६० किमी अंतरावर आहे, ह्या नॅशनल पार्कचं प्रमुख आकर्षण अर्थातच वाघ आहे. पण त्याचबरोबर चितळ,सांबर, हार्ड ग्राऊंड बारशिंगा, अस्वल, कोल्हा असे विविध प्राणी आणि अगणित पक्षीही दिसतात.
भारतात ज्या काही जंगलांची व्यवस्थित निगा राखली जाते, काळजी घेतली जाते, अशा जंगलांमध्ये कान्हाचा क्रमांक अर्थातच पहिला लागतो. याचे श्रेय ईथल्या वन खात्याच्या कर्मचार्यांबरोबरच आसपासच्या गावातल्या लोकांनाही द्यावंच लागेल. ईथल्या जंगलात साल वॄक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. खर्या अर्थाने जर जंगल अनुभवायचे असल्यास कान्हाला पर्याय नाही.
प्राण्यांच्या बाबतीत म्हणाल तर आपण त्यांच्या क्षेत्रात त्यांना पहायला जातो, त्यामुळे नशीबाची साथ हवी. वाघ हा तर जंगलचा राजा, तो त्याच्या मर्जीप्रमाणेच जंगलात फिरणार. तेव्हा जंगल सफारीसाठी अनुभवी गाईड असणं महत्वाचं. 'कॉल' ऐकून वाघाचा जंगलात माग काढणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. वाघाच्या हालचाली बाकीच्या बेसावध प्राण्यांपर्यंत पोचवण्याचं काम चितळ, लंगूर आणि सांबर करत असतात. ह्या त्यांच्या सावध करण्याला 'कॉल' म्हणतात. तीन दिवसांच्या सफारीमध्ये असे कित्येल कॉल जंगलात ऐकले पण 'राजां'नी दर्शन मात्र एकदाच दिलं. ह्या वेळच्या जंगल सफारीत मात्र पहिल्यांदाच अस्वलांचं दर्शन झालं.
ह्या सफारीत जे काही प्राणी आणि पक्षी दिसले ते कॅमेर्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, त्याची ही चित्रमय झलक.
१) शिकरा
२) लेसर व्हिस्परिंग डक्स
३) युरेशियन थिक क्नी
४) घुबड
५) सर्पंट ईगल
६) व्हाईट ब्रेस्टेड ईगल
७) मोर
८) बुलबुल
९) बी ईटर
१०) किंगफिशर
११) ब्लॅक आयबीस
१२) वाघ
१३) ईंडियन गौर
१४) हार्ड ग्राऊंड बारशिंगा
१५) अस्वल - स्लॉथ बेअर
१६) चितळ - स्पॉटेड डियर
१७) कोल्हा
१८) सांबर
१९) बार्किंग डियर
२०) लंगूर
आशुतोष, मस्त फोटो.
आशुतोष, मस्त फोटो.
छानच,
छानच,
मोराचा फोटो एकदम ग्रेट...
मोराचा फोटो एकदम ग्रेट... बाकी सगळेच छान..
छान फोटो! फोलिएज ची माहिती
छान फोटो! फोलिएज ची माहिती द्याल का?
मस्त फोटो!
मस्त फोटो!
तोषा मस्तच फोटोस !, मोराचा
तोषा मस्तच फोटोस !, मोराचा केवळ अप्रतिमच !
मस्तच आहेत फोटो ,,, मोराचा तर
मस्तच आहेत फोटो ,,, मोराचा तर झ्याकच
सगळेच फोटो मस्त पण मोराचा
सगळेच फोटो मस्त पण मोराचा फोटो खुपच आवडला.
मस्त फोटो. आवडेश.
मस्त फोटो. आवडेश.
नेहमीप्रमाणेच उत्तम फोटो
नेहमीप्रमाणेच उत्तम फोटो
फारच छान.
फारच छान.
अप्रतिम फोटो बंधो! मोर आणि
अप्रतिम फोटो बंधो!
मोर आणि किंगफिशरचे फोटो जबरी... लंगूर फॅमिली फोटो भारीच
मस्त फोटो..
मस्त फोटो..
छान
छान
मस्त फोटो... (बार्किंग डिअर
मस्त फोटो...
(बार्किंग डिअर हा प्रकार प्रथमच ऐकला.)
अप्रतिम प्रचि.
अप्रतिम प्रचि. धन्यवाद.
वाघाचं वेड घेऊनच लोक कान्हाला जातात त्यामुळे ह्या इतर दुर्मिळ वन्यदर्शनाला मुकतात.
<< भारतात ज्या काही जंगलांची व्यवस्थित निगा राखली जाते, काळजी घेतली जाते, अशा जंगलांमध्ये कान्हाचा क्रमांक अर्थातच पहिला लागतो.>> खरंच असावं . कान्हाला भेट देणं हा अविस्मरणीय अनुभव आहे.
[सहज कुतूहल म्हणून - इतकं सारं नेमकं, छान टिपायला किती दिवसांचा मुक्काम करावा लागला कान्हात ?]
कान्हा इज सो सो क्लोज टू माय
कान्हा इज सो सो क्लोज टू माय हार्ट...
वाघ ,शिकार करताना पाहिलास कि नाही?
पूर्वी एका झाडाला म्हैस बांधून ठेवायचे.. तिथेच जवळच्या उंच झाडावर बांधलेल्या मचाणावर टूरिस्ट्स ना वाघाला शिकार करताना पाहण्याची सोय व्हावी म्हणून..
पण कधी कधी रात्रभर वाघ यायचा नाही ..मात्र म्हशीचं भेदरलेल्या आवाजात हंबरणं ऐकवायचं नाही..तिच्या डोळ्यात तर साक्षात मृत्यू ची भीती दाटून आलेली दिसायची..
बाकी बायसन पाहतानाही फेफे उडायची..
हत्तीणी वरच्या हौद्यात बसून जंगलात टूर घेतलास कि नाही??
खूप मस्त आलेत फोटोज..
अप्रतिम.
अप्रतिम.
सुंदर, मस्त फोटो आलेत एवढे
सुंदर, मस्त फोटो आलेत
एवढे पक्षी , प्राणी दिसले हे नशीबच
अप्रतिम फोटो कान्हाला, मी पण
अप्रतिम फोटो
कान्हाला, मी पण जाऊन आले आहे
अप्रतिम.
अप्रतिम.
अप्रतिम फोटो.. चितळाचे डोळे
अप्रतिम फोटो..
चितळाचे डोळे किती सुंदर आहेत......
मस्तच आलेत फोटो! मोराचा
मस्तच आलेत फोटो!
मोराचा भारीच.
मस्त रे!
मस्त रे!
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
भारी ! खंडोबा,वाघोबा, हरणांची
भारी !
खंडोबा,वाघोबा, हरणांची टक्कर, गवा, कोल्हा अन चक्का अस्वलही ! वा एकदम सगळं जंगल मिळालं की तुला मस्त रे ! फोटो भारी आलेत.
सुंदर फोटो! सगळेच आवडले पण
सुंदर फोटो! सगळेच आवडले पण मोराचा डौल काही औरच आहे आणि तो फोटोतही दिसतोय!
कान्हाला नक्की जाणार!
धन्यवाद आशुतोष!
जबरी प्रचि आवडल्या
जबरी प्रचि आवडल्या
मस्तच पिकासा अल्बम मधे अजुन
मस्तच
पिकासा अल्बम मधे अजुन काही फोटो आहेत का? स्पेशली मोराचे. सानुला ते सारेच फोटो खुप आवडले होते
भारी आहेत फोटु. बाकि वाघ
भारी आहेत फोटु.
बाकि वाघ तुला बघुन घाबरुन पळुन गेला म्हणे.
बघ की वाघ तुला पाठ दाखौन पळुन जातानाचा फटु हाय हिथं.
Pages