ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याच्या 'फोलिएज' ह्या संस्थेच्या कॄपेने मध्य प्रदेशातल्या कान्हा नॅशनल पार्कात भटकंती झाली. कान्हा नॅशनल पार्क जबलपूरहून १६० किमी अंतरावर आहे, ह्या नॅशनल पार्कचं प्रमुख आकर्षण अर्थातच वाघ आहे. पण त्याचबरोबर चितळ,सांबर, हार्ड ग्राऊंड बारशिंगा, अस्वल, कोल्हा असे विविध प्राणी आणि अगणित पक्षीही दिसतात.
भारतात ज्या काही जंगलांची व्यवस्थित निगा राखली जाते, काळजी घेतली जाते, अशा जंगलांमध्ये कान्हाचा क्रमांक अर्थातच पहिला लागतो. याचे श्रेय ईथल्या वन खात्याच्या कर्मचार्यांबरोबरच आसपासच्या गावातल्या लोकांनाही द्यावंच लागेल. ईथल्या जंगलात साल वॄक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. खर्या अर्थाने जर जंगल अनुभवायचे असल्यास कान्हाला पर्याय नाही.
प्राण्यांच्या बाबतीत म्हणाल तर आपण त्यांच्या क्षेत्रात त्यांना पहायला जातो, त्यामुळे नशीबाची साथ हवी. वाघ हा तर जंगलचा राजा, तो त्याच्या मर्जीप्रमाणेच जंगलात फिरणार. तेव्हा जंगल सफारीसाठी अनुभवी गाईड असणं महत्वाचं. 'कॉल' ऐकून वाघाचा जंगलात माग काढणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. वाघाच्या हालचाली बाकीच्या बेसावध प्राण्यांपर्यंत पोचवण्याचं काम चितळ, लंगूर आणि सांबर करत असतात. ह्या त्यांच्या सावध करण्याला 'कॉल' म्हणतात. तीन दिवसांच्या सफारीमध्ये असे कित्येल कॉल जंगलात ऐकले पण 'राजां'नी दर्शन मात्र एकदाच दिलं. ह्या वेळच्या जंगल सफारीत मात्र पहिल्यांदाच अस्वलांचं दर्शन झालं.
ह्या सफारीत जे काही प्राणी आणि पक्षी दिसले ते कॅमेर्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, त्याची ही चित्रमय झलक.
१) शिकरा
२) लेसर व्हिस्परिंग डक्स
३) युरेशियन थिक क्नी
४) घुबड
५) सर्पंट ईगल
६) व्हाईट ब्रेस्टेड ईगल
७) मोर
८) बुलबुल
९) बी ईटर
१०) किंगफिशर
११) ब्लॅक आयबीस
१२) वाघ
१३) ईंडियन गौर
१४) हार्ड ग्राऊंड बारशिंगा
१५) अस्वल - स्लॉथ बेअर
१६) चितळ - स्पॉटेड डियर
१७) कोल्हा
१८) सांबर
१९) बार्किंग डियर
२०) लंगूर
आशूदा.. मस्तच एकदम..
आशूदा.. मस्तच एकदम..
मस्त फोटु आहेत रे तोषा ....
मस्त फोटु आहेत रे तोषा .... लै भारी..
बहोत खुब! योगायोग ह कि आताच "
बहोत खुब!
योगायोग ह कि आताच " एका रानवेडयाची शोधयात्रा"- लेखक कृष्णमेध कुंटे .ह्यांचा पुस्तक वाचत होतो . थोडक्यात - रसायन शास्त्राची परीक्षा नापास , हातात एक अखं वर्ष .. पुण्याचा धडपडी मुलाचा group , कोनि झाडवाला, कोनि पर्यावरण वाला, कोनी बेडुक तज्ञ,कोनी आळबी तज्ञ .
त्यात कृष्णमेधला नापास होन्याचा chance भेट्ला, सशोधक म्हनुन मर्द मालाईच्या जंगला मध्ये (हो तेच ते मुछ्ड विरप्न्न चे) जान्याची lottery लागलि. रानकुत्री अभ्यासाचा विषय , पण पूर्ण वर्ष मार्दुमलीच्या जंगला मध्ये हत्ती , गवा सगळेच सोबती . अप्रतिम वर्णन .must read.
प्रतेयक चांगल्या पुस्तकाचा hang over माझ्यावर थोडे दिवस राहतो , त्यात तुझ्हे कान्हा चे फोटो बघितले आणि पुन्हा कुठेतरी भटकंतीला जाण्याची उचकी लागली .बघु.
मोराचा फोटो अप्रतिम सुंदर..
मोराचा फोटो अप्रतिम सुंदर.. खुप आवडला.
रच्याकने, वाघोबा जरा बारिक झालाय का?
मस्त.. मजा आली. जरा ट्रिप
मस्त.. मजा आली. जरा ट्रिप बद्दल पण माहिती द्या, प्लान करायला मदत होइल.
मस्त आलेत फोटो!
मस्त आलेत फोटो!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. @भाऊ,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@भाऊ, कान्हाला मी ३ दिवस सकाळ-संध्याकाळ जंगलात फिरत होतो.
@वर्षूताई, हल्ली हत्तीची सफारी बंद केलीय, फक्त टायगर शोच्या वेळेसच हत्ती राईड घेता येते.
@कविन, पिकासा अल्बममध्ये मोराचे बरेच फोटो टाकले होते.
@झकास, वाघ पळतोय कसला? उलट मला बघुन 'वदनी कवळ घेता' म्हणायची तयारी करायच्या बेतात होता.
मस्तच आहेत फोटो. मोर आणि
मस्तच आहेत फोटो. मोर आणि खंड्या सुंदरच. पण सगळ्यात जास्त आवडला तो इंडियन गौर. कसला ऐटबाज दिसतोय तो. म्हणजेच गवा का?
कॅमेरा आणि लेन्स कुठले होते?
किती सुंदर फोटो काढलेत -
किती सुंदर फोटो काढलेत - फोटोकौशल्याला दाद द्यायला पाहिजे......... सर्वच फोटो सुरेख......
मस्त झाली सफर... प्रचि आवडले
मस्त झाली सफर... प्रचि आवडले
मस्त. बरेच सापडले प्राणी.
मस्त. बरेच सापडले प्राणी. पक्षी अजुन नाही का शोधले (एक मैना आहे एका प्रचीत).
नेहमीप्रमाणेच..
नेहमीप्रमाणेच..
मस्त फोटो. चांगले जवळुन आहेत
मस्त फोटो. चांगले जवळुन आहेत त्यामुळे छान वाटले अजुन.
भारीयेत फोटो
भारीयेत फोटो
Pages