पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

Submitted by अभय आर्वीकर on 28 May, 2012 - 01:29

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते

                          - गंगाधर मुटे
----------------------------------------

गुलमोहर: 

जसा बाज गझलेस येतो मराठी >>>>१००%मार्क या ओळीला

तशी मायबोलीच समृद्ध होते >>>>मायबोली "श्लेश" म्हणून वापरलात ना .............वाह सर वाह क्या बात है !

अतीशय आवडला जिवापाड जपावा असा हा शेर .................

Happy छान

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

हा शेर खूप आवडला.

छान गझल.

वैभव वसंतराव कु... | 28 May, 2012 - 01:46 नवीन
जसा बाज गझलेस येतो मराठी >>>>१००%मार्क या ओळीला

तशी मायबोलीच समृद्ध होते >>>>मायबोली "श्लेश" म्हणून वापरलात ना .............वाह सर वाह क्या बात है !

अतीशय आवडला जिवापाड जपावा असा हा शेर .................

सर अनुमोदन .

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते>>>

मस्त शेर!

धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते >> व्वा!

दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते >>> मति मधला 'ति' ह्रस्व असतो ना? Uhoh

चुभुद्याघ्या Happy

नानूभाऊ: आपण म्हणत आहात तिथे र्‍हस्व-दीर्घ बरोबर आहेत ...........
मती हा शब्दही बरोबरच आहे .........(माझ्या समजूतीप्रमाणे)

आपणास हवे असेल तर आपणही तपासून पाहू शकता
लगागा लगागा लगागा लगागा
माझ्या माहिती प्रमाणे तरी भुजन्गप्रयात आहे हा ................

नानूभाऊ: आपण म्हणत आहात तिथे र्‍हस्व-दीर्घ बरोबर आहेत ...........
मती हा शब्दही बरोबरच आहे .........(माझ्या समजूतीप्रमाणे) >>

असावा.. मी सहजच शंका वाटली म्हणुन विचारलं...
भुजंगप्रयात आहे याबद्द्ल दुमत नाहीच...

मति/मती हा शब्द तर बरोबर आहे, पण सिमा हा शब्द मात्र सीमा असा असू शकतो.

सीमा या शब्दाऐवजी
तमा की सिमा हे दोन पर्याय माझेसमोर होते.
पण तमा या शब्दांच्या वापरामुळे अर्थ वेगळा जातो. अपेक्षित तो अर्थ बदलतो.
त्यामुळे तमा शब्द वापरायचा पर्याय सोडून सुट घेणे अधिक पसंत केले. Happy

जेव्हा तंत्र, वृत्त आणि व्याकरण कठोरपणे सांभाळतांना आशयाला किंवा अभिव्यक्तीलाच मर्यादा पडत असेल तेव्हा मात्र अशा आणिबाणीच्या परिस्थितीत आशयाशी तडजोड न करता तंत्राशी तडजोड करायची, असा मी स्वतःपुरता निर्णय घेतला आहे.

मला माझ्या काव्याचा उपयोग अभिव्यक्तीसाठी/प्रबोधनासाठी करायचा आहे. तेव्हा काव्याच्या सौंदर्यात उणिव भासल्याने फार मोठे संकट कोसळते, असेही मला वाटत नाही.

तसेही आमच्याकडे सीमाचा उच्चार सिमा असाच करतात.

मात्र व्याकरणदोष जेवढे टाळता येईल, तेवढे टाळण्याचा मी प्रयत्न करतोच. Happy

मला माझ्या काव्याचा उपयोग अभिव्यक्तीसाठी/प्रबोधनासाठी करायचा आहे. >>>

'गझल' प्रबोधनासाठी असते हे कोणी सांगीतले आपल्याला?

<<<< 'गझल' प्रबोधनासाठी असते हे कोणी सांगीतले आपल्याला? >>>

गझल माझ्यासाठी आहे, मी गझलेसाठी नाही. Happy

असो

हे तुमचे एक वाक्यः

<<गझल माझ्यासाठी आहे, मी गझलेसाठी नाही. >>

आणि हे दुसरे तुमचे वाक्यः

<<<मला माझ्या काव्याचा उपयोग अभिव्यक्तीसाठी/प्रबोधनासाठी करायचा आहे. तेव्हा काव्याच्या सौंदर्यात उणिव भासल्याने फार मोठे संकट कोसळते, असेही मला वाटत नाही.>>>

अभिव्यक्ती आणि प्रबोधन म्हणजे 'तुम्ही' का? कारण हे सगळे तुमच्याचसाठी असल्याचेही सांगताय

मुटे - स्मितहास्याचे स्मायली माझ्याकडे उपयोगी नाहीत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची माझी वृत्ती. मग नांव देवपूरकरांच्या गुरूजींचे का असेना. चांगले आणि वाईट याच्या माझ्या व्याख्या सापेक्ष आहेत हे नोंदवून टाळ्या घेऊ शकता, पण मनातल्या मनात 'सोचा', 'जितकी गझल तितकी बडबड' हे तत्व आपण पाळतो का

-'बेफिकीर'!

<<<< अभिव्यक्ती आणि प्रबोधन म्हणजे 'तुम्ही' का? >>>

होय. माझ्या इवलाशा भावविश्वाला अभिव्यक्त करणारा "मीच" आहे, दुसरा कोणी कसा काय असणार? Happy

----------
माझ्या काव्याचा दर्जा व साहित्यिक मुल्यमापण करणारा मात्र "मी" नाही.

त्यामुळे
माझे लेखनस्वातंत्र्य आणि रसिकांचे रसग्रहन स्वातंत्र्य, हे दोन्हीही अबाधीत राहायला हवे. एवढेच.

आवडली !
गझल माझ्यासाठी आहे, मी गझलेसाठी नाही. >> नेमका अर्थच लागत नाही
तुम्ही गझलेसाठी नाही तर ती आपोआप होईल, तुम्ही त्यात प्राण ओतला तरच छान गझल होईल ना.

बंडोपंत,
<<<<गझल माझ्यासाठी आहे, मी गझलेसाठी नाही. >> याला वेगळा संदर्भ आहे. आणि हे विधान केवळ त्या संदर्भापुरतेच लागू आहे. Happy

कावळा | 30 May, 2012 - 09:37
<<< उथळ पाण्याला खळखळाट फार. >>>

म्हणा काही पण संदर्भ नाही कळला राव!

कुणाबद्दल बोललात हे?

गझलेबद्दल?

.... माझ्याबद्दल?

की

.......... प्रतिसादकांबद्दल?

शिव्या तरी नीट घालत जा राव! Wink

छान गझल...
आवडली..
युध्द,शुध्द्,सम्रुध्द्..बेस्ट.

Pages