Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46
आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेव्यू काका, चुकून काही वाकडे
रेव्यू काका,
चुकून काही वाकडे टंकलो असेल तर सोडून द्या!
शेवटी माझे म्हणणे तुमच्यापर्यंत पोहोचले हे वाचून आनंद झाला. दोस्तीचाच हात काय? आशीर्वादाचाही द्या! मनापासून आवडेल..
धन्यवाद!
@रेव्यु | 29 May, 2012 -
@रेव्यु | 29 May, 2012 - 22:06...
>>>अन मला माहित आहे की इथे ज्यांचे नाव पथॉलोजिस्ट लिहितो, तो कट घेतो/देतो -जे असेल ते~!!<<
काका,
अहो तो पॅथॉलॉजिस्टही त्याच कॉलेजात एम्बीबीएस होऊन मग एम्डी करून दुकान मांडून बसला आहे. तितकेच मार्क. तितकीच हालाखी अन कष्ट. तितकेच स्पेशल स्किल. केवळ डायरेक्ट पायरी चढून पेशंट स्वतः येत नाही तर त्याच्याच जातभाईंनी याच्याकडे पेशंट पाठविणे गरजेचे, म्हणून त्याने या असल्या कट मागणार्या कुत्र्यांपुढे तुकडे फेकावेत हे त्याला कितपत रुचत असेल?
का देत असेल तो पॅथॉलॉजिस्ट कट??
पाणी मुरतंय हो. मान्य आहे मलाही. मार्ग काढण्यासाठी धडपड आहेच. पण Doc Bashing हे त्याला उत्तर नव्हे. या असल्या सिरियल्स पाहून तथा कथित 'सामान्य' लोक गावागावांत केवळ बिल बुडविण्यासाठी 'हलगर्जीपणा' झाला अशी बोंब ठोकत डॉक्टरांना मारहाणी करू लागलेत.
नुसता सकाळ वाचा. रोज कमीत कमी २ बातम्या असतात. 'डॉ.ने हलगर्जीपणा केला असा आरोप' वाल्या :-s
हे थांबावे असे वाटते..
अजून एक महत्त्वाचं म्हणजे
अजून एक महत्त्वाचं म्हणजे हृदयविकार किंवा मधुमेहासारख्या आजारांसाठी डॉक्टरांनी सुचवलेली विशिष्ट ब्रॅण्डेड औषधं वापरणं योग्य, कारण तिथे बायोअव्हेलेबिलिटीचा संबंध असतो. जेनेरिक औषधांचा बायोअव्हेलेबिलिटीचा दर कमीजास्त असू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय भलते प्रयोग करू नयेत.
या एपीसोड मध्ये अजाणतेपणी
या एपीसोड मध्ये अजाणतेपणी झालेलं जनरलायझेशन आणि त्यानंतर उमट्लेली एकंदर प्रतिक्रिया पाहता आमीरखानने ताबड्तोब एक खुलासा करणं आवश्यक आहे. सरसकट सगळ्या डॉक्टरांना यापुढे संशयीत (गुन्हेगाराच्या) नजरेनं बघणं हे भयानक आहे. मुख्य एपीसोडनंतर त्याचा एक फॉलोअप कार्यक्रम असतो असं ऐकुन आहे, आशा आहे आंमीर त्यात हा इश्यु अॅड्रेस करेल.
इब्लिस. +१
चांगल्या डॉक्टरांचे प्रतिनिधी या भुमिकेतुन माबोवर प्रबोधन केल्याबद्धल अभिनंदन आणि धन्यवाद!
इब्लिस , म्हणुनच म्हणले कि
इब्लिस , म्हणुनच म्हणले कि तुम्हि स्वतःला डॉक्टर म्हणता आणी हे माहित नाहि ? धन्य आहे तुमची
फार नाहि ६ महिन्यापुर्वीची गोष्ट आहे
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-12-26/jaipur/30558576_1...
http://www.dnaindia.com/india/report_jammu-and-kashmir-doctors-strike-co...
हव्या तर अजुनहि बर्याच बातम्या आहेत अशाच! पण तुम्हिच शोधुन घ्या. जरा स्वत:च्या सहव्यावसायिकांबद्दल समजेल तुम्हाला.
डॉक्टरांना समजाविण्यासाठी मी व्यक्तिशः काय केले किंवा नाही याचा लेखाजोखा तुम्हाला देण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे स्वतःचे प्रोफेशन पाहिलेत तर कसे? >>>>>>>>>> डॉक्टरांना समजाविण्यासाठी तुम्हि व्यक्तिशः काय केले किंवा नाही हे मी कधी माझ्या पोस्ट मध्ये विचारले ? आणी तुमची भाषा पाहिली तर तुमच्याकडून ती अपेक्षा नाहिच.
डॉ बॅशिंग-जनरल- हे उत्तर नाही
डॉ बॅशिंग-जनरल- हे उत्तर नाही ---मान्य
पण केसेस चव्हाट्यावर तर यायला हव्यात ना-हे एम सी ए चे काम नाही का?
@ चाणक्यजी. माफ करा. माझे
@ चाणक्यजी.
माफ करा. माझे म्हणणे तुमच्या पर्यंत पोहोचत नाहिये.
तुम्ही दिलेल्या लिंका.
१.
>>JAIPUR: Medical services in Rajasthan remained badly affected on the fifth day of the strike by resident doctors Sunday, with at least 40 patients dying across the state so far far due to the agitation, officials said.<<
नॉर्मली, डॉक्टरांनी संप न करता, वा चुकीची ट्रीटमेंट न करता, या देशातील कोणत्याही राज्यात, आपोआप, फक्त वयोमान वा गंभीर आजार वा अपघातांनी किती लोक मरतात याचा काही विदा?? इथे अक्ख्या राज्यात ४० मेले. किती दिवसांत, अन नक्की कशाने ते कुणास ठाऊक? केवळ तो पेपरवाला ओरडतो म्हणून खरे??
कालच पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर एका वेळी २७ मेले अशी बातमी आहे. वाचलीत का? ती बातमी वाचण्या अन समजण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही. तुम्हालाही समजेल.
अन हो. फक्त सरकारी नोकर असलेले डॉक्टर संपावर आहेत तिथे. खेड्यांत नोकरी करण्याची सक्ती असलेले. मी माझ्यासारख्या खासगी व्यावसायिकांच्या संपाबद्दल अन रस्त्यावर उतरण्याबद्दल बोलत होतो.
अन ही तुमची दुसरी बातमी:
>>The emergency services had also been affected although it remained open and was being run by senior doctors, they said. The doctors held demonstration within the GMC complex and several leaders addressed the medicos and demanded immediate fulfillment of their demands.<<
मी वर सरकारी नोकरीतील डॉक्टर्स बद्दल (संपादनः संदर्भ- मार्ड चा संप. MARD. Maharashtra Association of Resident Doctors.) लिहीलंय. ते वाचलंत का?
की फक्त तुमचेच तुणतुणे वाजवायचे आहे?
माझ्या व्यवसायात काय होते ते मला चांगले ठाऊक आहे. त्यातल्या बोगस लोकांमुळे मला काय त्रास होतो हेही मला चांगलेच ठाऊक आहे. तुम्हाला कुठेतरी दुखले असावे डॉक्टरमुळे. तेच तुमचे दुखणे दुसर्या डॉक्टरनेच बरे केले हे विसरला असाल.. असो.
वर जामोप्या म्हटलेच आहेत. गरज सरो, वैद्य 'मरो'
गरज सरो, वैद्य 'मरो'
गरज सरो, वैद्य 'मरो'
@राज | 29 May, 2012 -
@राज | 29 May, 2012 - 22:48
>>इब्लिस. +१
चांगल्या डॉक्टरांचे प्रतिनिधी या भुमिकेतुन माबोवर प्रबोधन केल्याबद्धल अभिनंदन आणि धन्यवाद!<<
मूठभर मांस चढले वाचून अंगावर. माझी भूमीका नक्की कुणाचं प्रतिनिधित्व करते आहे हे आपणांस समजले यामुळे भरून पावलो. (बोल्ड करण्याचा अधिकपणा माझा)
आभारी आहे.
प्रिंसेसच्या पोस्ट्प्रमाणे
प्रिंसेसच्या पोस्ट्प्रमाणे मेडिकल कॉलेजेसचे हॉस्टेलच नाही तर अगदी ब्रीच कॅण्डी सारख्या हॉस्पिटलमधल्या रेसिडेंट डॉक्टरच्या रेस्ट रुम्स देखील भयानक आहेत. तिथे एका छोट्या रुममधे चार एम डी डॉक्टर राहताना बघितलेत. एकच बेड, दोघीजणी बेडवर तर दोघी बेडखाली झोपत,
पण पंचतारांकीत हॉटेलमधल्या स्टाफच्या रुम्स देखील तितक्याच भयाण असतात.
खेड्यात सक्तीने पाठवण्यापेक्षा,टॅक्स हॉलिडे सारख्या योजना हव्यात.
इथे अक्ख्या राज्यात ४० मेले.
इथे अक्ख्या राज्यात ४० मेले. किती दिवसांत, अन नक्की कशाने ते कुणास ठाऊक? केवळ तो पेपरवाला ओरडतो म्हणून खरे?? >>>>>>>>>
असे म्हणले तर कशावर विश्वास ठेवायचा मग ? जेव्हा स्वतःला हवे तेव्हाच विश्वास ठेवणार , अंगावर शेकायला लागले कि बोंबा मारायच्या !
माझ्या व्यवसायात काय होते ते मला चांगले ठाऊक आहे. त्यातल्या बोगस लोकांमुळे मला काय त्रास होतो हेही मला चांगलेच ठाऊक आहे. तुम्हाला कुठेतरी दुखले असावे डॉक्टरमुळे. तेच तुमचे दुखणे दुसर्या डॉक्टरनेच बरे केले हे विसरला असाल.. असो. >>>> अहो महाशय तुम्हाला मुद्दाच लक्षात येत नाहिये. चांगले डॉक्टर असतातच कि , कोणीहि ते अमान्य केले नाहिये पण म्हणुन वाईट डॉक्टर देखील चांगले आहेत हे दाखवण्याचा हा जो तुम्हि खटाटोप चालवला आहे तो हास्यास्पद नाहितर चीड आणणाला आहे. कार्यक्रम निट पहा जरा आधी मग वाद विवाद करायला या!
असो तुमच्याशी वादविवाद करण्यात अर्थ नाहि! तुम्हि देखील इथे वेळ फु़कट घालवु नका . जरा तुमच्या पेशंटकडे पहा . त्यांना तुमची जास्त गरज आहे.
@ चाणक्यजी. >>असो तुमच्याशी
@ चाणक्यजी.
>>असो तुमच्याशी वादविवाद करण्यात अर्थ नाहि! तुम्हि देखील इथे वेळ फु़कट घालवु नका . जरा तुमच्या पेशंटकडे पहा . त्यांना तुमची जास्त गरज आहे<<
धन्यवाद.
किमान माझ्या पेशंटांना माझी गरज वाटते हे तरी मान्य केलेत.
अर्थात, मी माझ्या पेशंटांच्या विश्वासास पात्र आहे अन घेतो तितक्या पैशाचे मोल देतो हेही मान्य व्हावे??
माझा विरोध सरसकट डॉक्टर्सना शिव्या देणार्यांना आहे. तुमच्यासाठी स्पेशल थोडा वेळ फुकट घालतो, कारण काही बाबतींत तुमचे अन माझे विचार पटतात (संदर्भ: येथील इतर बाफ).
असे बघा, राजस्थानात, ५ दिवसांत सगळी सरकारी इस्पितळे मिळून ४० लोक मेले.
रोज ८.
८ जिल्हे आहेत का राजस्थानात? की जास्त? रोज एका इस्पितळात (सिव्हिल हॉस्पिटल) १? हे 'फक्त' त्या संपामुळे?? पटतंय का तुम्हाला? अहो, ओंकारेश्वरावर जाऊन बसा. ताशी ३ मुडदे येतात जाळायला.. फक्त एका शहरात. हे काय डॉक्टरांच्या संपामुळे होते काय?
हे पहा, तुमच्या दृष्टीने 'मेले' हे भयंकर वास्तव आहे. मला ते अल्टिमेट सत्य आहे. मशिनरी स्र्कॅप करण्यासारखे. ते मशीन स्क्रॅप होवू नये म्हणून मी जिवापाड प्रयत्न करीत असतो. तुम्हाला पटो, ना पटो. तिथे मार्केटींगच्या विरोधी तत्व असते. तुम्ही मशीन स्क्रॅप केलेत तर गिर्हाईक नवे मशीन विकत घेते. इथे मी 'साल्व्हेज' केले तर नवी मशिने (रुग्ण) रिपेअर ला (उपचाराला) येतात. ..बघा, समजतंय का मी काय म्हणतो आहे ते तुमच्या आय आय टी ट्रेनिंगला, किंवा असलीच तर एम्बीए ला?
"Medicine is the ONLY profession which strives to eradicate the very cause of its own existance"
@दिनेशदा | 29 May, 2012 -
@दिनेशदा | 29 May, 2012 - 23:28
सहमत!
धन्यवाद.
@ चाणक्यः एक, Sometimes i
@ चाणक्यः
एक,
Sometimes i feel that i am confusing you with someone else.. someone sensible.
दुसरे,
कृपया अर्धवट quote करून विपर्यास करण्याचा येथील टिपिकल झिलतोड्या कंपूसारखा प्रकार करू नये. जमत असेल तर नीट प्रतिवाद करावा, अन्यथा शांत बसावे.
उदा,:
>>चाणक्य. | 29 May, 2012 - 23:40
इथे अक्ख्या राज्यात ४० मेले. किती दिवसांत, अन नक्की कशाने ते कुणास ठाऊक? केवळ तो पेपरवाला ओरडतो म्हणून खरे?? >>>>>>>>>
असे म्हणले तर कशावर विश्वास ठेवायचा मग ? जेव्हा स्वतःला हवे तेव्हाच विश्वास ठेवणार , अंगावर शेकायला लागले कि बोंबा मारायच्या !<<
हे,
>>चाणक्य. | 29 May, 2012 - 23:40
नॉर्मली, डॉक्टरांनी संप न करता, वा चुकीची ट्रीटमेंट न करता, या देशातील कोणत्याही राज्यात, आपोआप, फक्त वयोमान वा गंभीर आजार वा अपघातांनी किती लोक मरतात याचा काही विदा?? इथे अक्ख्या राज्यात ४० मेले. किती दिवसांत, अन नक्की कशाने ते कुणास ठाऊक? केवळ तो पेपरवाला ओरडतो म्हणून खरे?? >>>>>>>>>
असे म्हणले तर कशावर विश्वास ठेवायचा मग ? जेव्हा स्वतःला हवे तेव्हाच विश्वास ठेवणार , अंगावर शेकायला लागले कि बोंबा मारायच्या !<<
असे, बोल्ड केलेल्या भागासह वाचले तर नीट अर्थ लागतो. मुद्दाम बुद्धीभेद करायचे प्रशिक्षण कुठे मिळते ते जरा सांगा पाहू??
असो.
धन्यवाद.
पहिल्या तीन भागात आमीरखानने
पहिल्या तीन भागात आमीरखानने समस्या मांडुन बदल घडवण्यासाठी स्वतःपासुन कशी सुरुवात करु शकतो हे सांगितले होते.
वैद्यकीय क्षेत्रात काही प्रमाणात गैरप्रकार होत असतील्/होतात पण सामान्य माणुस त्यात नेमके काय करु शकतो. आमीरने सुचवलेले उपाय:
- वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी चांगल्या/सेवाभावी डॉक्टरांचा आदर्श घ्यावा
- एनजीओ संस्थांनी जनेरीक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा
- एमसीआय ने सर्व घटनांची सखोल चौकशी करुन कठोर अंमलबजावणी करावी.
ह्यात आम जनता फार काहि करु शकते असे वाटत नाही.
भारतासारख्या देशात(जिथे
भारतासारख्या देशात(जिथे भ्रष्टाचार माजलाय) तिथे कोर्ट कचेर्या कामासाठी वेळ घालवणे अतिशय त्रासदायक आहे.
वरती ते इब्लिश सारखे लाच खाल्ली खाल्ली म्हणून ओरडत होते पण ह्यावर(खालील गोष्टींवर) भाष्य केले नाही.
एमसीआय (MCI) सारख्या ठिकाणी लाखोनी केस पडल्यात तिथे गरीब, आजारी माणसाची नोंद कोणी घेत का? (हो पत्र पाठवले असे एकले होते त्या आजीने)
७० व्या वर्षी मधुमेह, रक्तदाब असे जोडीने असणार्या, रिटायर्ड झालेल्या म्हतार्या लोकांना इतकी शक्ती व वेळ व सर्वात महत्वाचे पैसा सुद्धा असतो काय?
स्वतःच्या प्रोविडंड मधून गेलेले पैसे मिळाले तरी ह्यावरच गरीब लोक धन्यता मानणार ना?
पैशाची गुर्मी दाखवून मुस्कटदाबी करणार्यापुढे अश्या गरीबांचे चालत नाही हे एक कडवे सत्य आहे.
वरचे उदाहरण अश्याच जोडप्याचे होतं.
जसे चांगले डॉक्टर अस्तिवात आहेत व तसेच वाईट ही आहेत. पण दुर्दैवाने "वाईट" नियतीचे ज्यास्त आहेत.
व आमिरने म्हटले तसे, चांगले व वाईट (स्किल मध्ये) ह्याविषयी हा प्रोग्रॅम नाही तर नियत कशी असते ह्या विषयी आहे.
----------------------
बाकी, इब्लिश, तुम्ही इतके आकांडतांडव कशाला करता आहात? एकेकाचा अनुभव असतो. तुमच्या मनासारखेच लिहायला हवे का?
> 'सत्यमेव जयते'च्या पुढच्या
> 'सत्यमेव जयते'च्या पुढच्या दोन भागांमध्ये पुण्यातल्या काही संस्था आणि व्यक्ती झळकणार आहेत. 'तुमच्या संस्थांमधली चांगली दिसणारी माणसं समोर ठेवा', 'ते आजोबा जरा अडखळत बोलतात, त्यांना हटवा तिथून', 'या आजींना जरा चांगली साडी नेसवा', 'तुम्ही हे वाक्य जरा चिडून बोलाल का, म्हणजे जास्त प्रभावी वाटेल', असे प्रकार चित्रीकरणादरम्यान घडले. स्टुडिओतले प्रेक्षकसुद्धा दिसण्यावर निवडले जातात.
चिनूक्स, असे होणे चित्रीकरणाकरता अस्वाभाविक नाही. या मालिकेतील काही गोष्टी या 'कॉमन सेन्सीकल' असूनही त्या दाखवाव्या लागतात आणि सांगाव्या लागतात (उदा. लोक 'मोठे' त्यांच्या वर्तणुकीने बनतात, वयाने नाही). त्यामुळे जास्त प्रभावी बनवण्याचा प्रयत्न अनैसर्गीक नाही. त्यामुळे विषयाचे महत्व कमी होऊ नये. या सर्वच गोष्टी कोण दाखवतय यामुळे कमी-जास्त महत्वाच्या ठरु नये.
सर्वच डॉक्टर्स वाईट नसतात, वाईट असु शकत नाहीत हा खरेतर कॉमन सेन्सचाच भाग आहे. काय दाखवले यावरुन काय दाखवले नाही हे थोडेफार बघणार्याने समजुन घ्यावे. उद्या (नाहीतर परवा, पण लवकरच) लोक हवे ते तुकडे यु-ट्युबवर टाकणार. पण त्या तुकड्यांवरुनही काहीतरी बोध घेता येईलच. ज्या सकारात्मक गोष्टी करता येतील त्या करायच्या ...
अस्चिगला अनुमोदन...
अस्चिगला अनुमोदन...
अस्चिग +१ सत्यमेव जयते हा
अस्चिग +१
सत्यमेव जयते हा 'बसवलेला' कार्यक्रम आहे, पण त्यात तथ्याला चिकटून राहण्याचा प्रामाणिक प्रयत्नही आहे.
हा कार्यक्रम एकांगी का वाटावा? आपले दरपत्रक दर्शनी भागात लावणारा पॅथॉलॉजिस्ट, डॉ देवी शेट्टी, जनरिक औषधांची योजना या गोष्टी सकारात्मक नव्हत्या का?
------
डॉ इब्लिस, तुम्ही शॉप & एस्टॅब्लिशमेंट अॅक्टचा उल्लेख केलात. पण तुम्ही तुमच्या पेशंटकडे कस्टमर म्हणून पहात नसाल याबद्दल खात्री आहे.
----
कार्यक्रमाचा फोकस हलगर्जीपणावर नव्हता तर जाणूनबुजून केलेल्या लुबाडणुकीवर होता. कटप्रॅक्टिसवर होता. आपल्या प्रिस्क्रिप्शनखाली केमिस्टचा नाव पत्ता छापणारे, विशिष्ट लॅबमधूनच टेस्ट्स करून घ्या असे लिहून देणारे डॉक्टर्स असतात. (तसेच शाळेचा गणवेश, वह्या पुस्तके अमुक दुकानदाराकडून/शिंप्याकडूनच घ्या असा 'नियम' करणार्या शाळा आणि आमचेच कॅटरर , डेकोरेटर घेतलेत तरच तारखा मिळतील अशा अटी घालणारी लग्नकार्यालयही असतात.
----
आजही नुसत्या बोलण्याने अर्धा आजार पळवून लावणारे डॉक्टर्स आहेत. डॉक्टरला देव मानणारे लोक आहेत आणि राहतील. दुसरीकडे डॉक्टरांना मारहाण करणारे गुंड या कार्यक्रमापूर्वीही होते. क्षुल्लक कारणावरून बंदचा आवाज देणारे आणि बसगाड्यांच्या काचा फोडणारे लोक आणि या लोकांत फरक का मानावा?
फक्त सरकारी नोकर असलेले
फक्त सरकारी नोकर असलेले डॉक्टर संपावर आहेत तिथे. खेड्यांत नोकरी करण्याची सक्ती असलेले.<<<
खेड्यात नोकरी करण्याची सक्ती का करावी लागते?
ग्रामीण भागातून डॉक्टरी शिकण्यासाठी आलेला विद्यार्थीवर्ग किती प्रमाणात परत खेड्यात जातो?
इतकी भरपूर वैद्यकीय महाविद्यालये इतके भरपूर डॉक्टर्स दरवर्षी प्रसवत असतानाही ४-५ खेडी मिळून एक धड डॉक्टर नाही आणि शहरात ठेचेठेचेला डॉक्टर्स अशी परिस्थिती का दिसते?
डॉक्टरांनाही पैसा कमवायचा असतो (योग्य पद्धतीनेच) तो शहरात अधिक म्हणून खेड्यात जात नाहीत हे लॉजिक मान्यच आहे. पण मग हे लॉजिक मान्य करायचे तर खेड्यात नोकरी करण्याची सक्ती करण्यावाचून सरकारकडे काही पर्याय उरतो का?
या लॉजिकला उत्तर म्हणून माझ्या मैत्रिणीचा अनुभव. झाराप तिठ्याला तिचा दवाखाना आहे. तिचे म्हणणे की वैद्यकीय व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की ज्यात कुठेही गेलात तरी तुमचे शिक्षण झाल्या झाल्या बेसिक आमटीभाताची गरज भागावी इतपत पैसा नक्कीच मिळतो. ही माझी मैत्रिण आजही १० रू फी घेते. पेशंटला शक्य नसेल तर अनेकदा घेतही नाही. नवरा शिक्षणाने डॉक्टर असला तरी पूर्णवेळ सामाजिक कामात आहे. तो करत असलेल्या कामाचे महत्व आणि गरज हे तिला समजते त्यामुळे संपूर्ण घराची ब्रेडविनर तीच आहे.
हा मुद्दा मालप्रॅक्टीसशी संबंधित नाही. पण तरी हा प्रश्न मनात उरतोच.
सगळी चर्चा वाचली, इब्लिसला
सगळी चर्चा वाचली, इब्लिसला अनुमोदन! उद्या शिक्षण क्षेत्रावर कार्यक्रम झाला आणि लोकांचा एकांगी समज होऊ शकतो असे वाटले तर माझी प्रतिक्रिया त्याच्यासारखीच असेल.
भरत म्हणतो तसे हा 'बसवलेला' कार्यक्रम आहे आणि त्यात फार काही चूक नाही. जर त्यांना आपला मुद्दा प्रभावीपणे पोचवायचा असेल तर असे फॅब्रिकेशन होणारच.
मयेकरांनाही अनुमोदन..
मयेकरांनाही अनुमोदन..
आमच्या खानदानात बरेच डॉक्टर
आमच्या खानदानात बरेच डॉक्टर आहेत, नव्या, जुन्या सर्व पिढ्यांमध्ये, शहरात, गावात, छोट्या मोठ्या हॉस्पिटलांमध्ये.सर्व प्रकारचे सँपल साईज आहे. लहानपणापासून लई म्हणजे लई पाहिल्या आहेत दोन्हीही बाजू.
साती, इब्लिस, आगावू, प्रिंसेस, मयेकर, आश्चिग - अनुमोदन.
थोड्याथोड्या काळाने हा विषय ऐरणीवर येतच असतो.
उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी अनिल अवचटांचे 'डॉक्टर: जगवतात की नागवतात' हा लेख आला तेव्हा आधीच्या पिढीत याच बाफ वरील प्रतिक्रियांसारखी चर्चाच चर्चा झाली होती समाजात आणि डॉक्टरांमध्ये ते आठवले.
http://mr.upakram.org/node/27
http://mr.upakram.org/node/2718
कार्यक्रम प्रभावी करण्याच्या नादात वृद्धाश्रमातल्या आजींना त्यांची साडी फारशी चांगली नाही म्हणून काठापदराची साडी घालायला लावणं, अडखळणार्या आजोबांची समस्या खरीखुरी असताना ते अडखळतात म्हणून त्यांची समस्या इतर कोणाच्या तोंडी घालणं, मुद्दाम आवाज चढवून, चिडक्या आवाजात बोलायला लावणं हे मला तरी समर्थनीय वाटत नाही. बिग बॉस, रोडीज यांसारख्या कार्यक्रमात हे ठीक आहे, 'सत्यमेव जयते'नं असं करू नये. यातलं काहीही न करता अफलातून लघुपट निर्माण करणारे किंवा सामाजिक समस्या समोर आणणारे नलिनी सिंग, प्रिया तेंडुलकरांसारखे अनेक आहेत. आणि यामुळे संपूर्ण कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो.
असो.
> यामुळे संपूर्ण
> यामुळे संपूर्ण कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो.
या आधीच्या तिन्ही भागांवरील प्रतिक्रीया पाहिल्यातर हेच दिसते की प्रश्न उभे करणारे कोणताहि मुद्दा घेऊन ते करु शकतात. सगळ्यांनाच अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. प्रश्न हा आहे की त्यामुळे जे मुद्दे पुढे येताहेत त्यांचे महत्व कमी होते का. नसेल होत तर जे पटत नाही त्याची नोंद करुन पुढे जाता यायला हवे.
अमिरला मिळत असलेल पैसा, त्याचा घटस्फोट, मुस्लिमांमधे नसलेला हुंडा, आता अमिरच्या क्रुने केलेली क्रुर वागणुक. हा कार्यक्रम अमिरचा नाही, अमिरबद्दलही नाही. तो एक मिडीयम आहे. निमित्तमात्र आहे. कार्यक्रम तुमच्या-आमच्याबद्दल आहे. जिथे तो अर्धवट असेल, तिथे आपण पूर्ण करायला हवा. ज्या त्रुटी असतील त्या भरुन काढायला हव्या. पण त्रुटी आहेत म्हणुन पार स्टार्ट रेषेवर जायची गरज भासु नये.
सर्वच डॉक्टर्स वाईट नसतात,
सर्वच डॉक्टर्स वाईट नसतात, वाईट असु शकत नाहीत हा खरेतर कॉमन सेन्सचाच भाग आहे. काय दाखवले यावरुन काय दाखवले नाही हे थोडेफार बघणार्याने समजुन घ्यावे. उद्या (नाहीतर परवा, पण लवकरच) लोक हवे ते तुकडे यु-ट्युबवर टाकणार. पण त्या तुकड्यांवरुनही काहीतरी बोध घेता येईलच. ज्या सकारात्मक गोष्टी करता येतील त्या करायच्या ... +१
कट प्रॅक्टिस भरपूर चालते, गरज नसलेल्या शस्त्रक्रिया होतात, बर्याचदा पेशंटला उगीच घाबरवलं जातं...हे सगळं कटु असलं तरी सत्य आहे.
बरेच डॉक्टर असं करत नाहीत....पण बरेच असंच करतात.
मुळात प्रश्न होता...Does healthcare need healing ?
उत्तर आहे - Yes, it needs healing.
पण healthcare आजारी पाडायला डॉक्टर कारणीभूत आहेत असं नाही. सगळं मूळ परत लाचखाऊ राजकारण्यांमध्ये येतं. जेवढे MBBS डॉक्टर्स दरवर्षी बाहेर पडतात, त्याच्या वाजवी प्रमाणात पोस्टग्रॅज्युएशनच्या जागा सरकारी कॉलेजेसमध्ये तयार झाल्या तरी बराच प्रश्न सुटेल.
डॉक्टरांचं शैक्षणिक आयुष्य खडतर असतं. वर वर्णन केलं गेलेलं होस्टेलचं चित्रण तंतोतंत खरं आहे. शिवाय जेवणाखाण्याचे हाल तर न सांगण्यासारखे. लेबर रूममध्ये कळांनी ओरडणार्या पेशंटसमोर बसून वडापाव खाणार्या डॉक्टरांना बघून तिर्हाईत व्यक्तीला हा डॉक्टरांचा कोडगेपणा वाटतो. पण बर्याचदा दिवसभराचं जेवण म्हणून तेवढा वडापावच त्यांच्या नशिबात असतो.
शिक्षण झाल्यावर कमवायला सुरूवात करून आयुष्य सेटल करावं हा इतरांच्या मनात येणारा रास्त विचारच डॉक्टर्स करतात. पण दुर्दैवाने नवीन प्रॅक्टिस चालू करणार्या डॉक्टर्सचा मार्ग दलदलीचा असतो. त्या दलदलीत पाय ठेवला तर प्रॅक्टिस तग धरणार, नाहीतर संपलं.
उदा. - एखाद्या गायनॅकने नवीन हॉस्पिटल टाकलं, त्याने जर आजूबाजूच्या जीपींना (जनरल प्रॅक्टिशनर्स) कट दिला नाही तर जीपी त्याच्याकडे पेशंट पाठवत नाहीत. इथवर सुद्धा ठीक आहे. पण बर्याचदा निगेटिव पब्लिसिटी केली जाते.
त्यावरची साखळी म्हणजे - गायनॅकला सोनोलॉजिस्टने कट दिला नाही तर गायनॅक त्याच्याकडे सोनोग्राफीसाठी पेशंट पाठवत नाही.
जीपीला द्यावा लागलेला कट गायनॅक सोनॉलॉजिस्टकडून वसूल करतो. आणि सोनोलॉजिस्ट हा पैसा पेशंटकडून वसूल करतो !
वरकरणी हा सगळा दोष जीपींचा आहे असं वाटू शकेल. पण मग त्यांनी काय करावं ?
आजकाल नुसतं MBBS करून पेशंट मिळवणं कठीण आहे.
आणि त्यांनाही कुटुंब आहे. त्यांनीही आयुष्यातील उमेदीची वर्षं घालवून शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनाही कमवायचा हक्क आहे.
सगळ्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये घोळ झाला आहे. पण त्याला कारणीभूत डॉक्टर्स नाहीत.
तो घोळ आधी बदलायला हवा. (पण कसा ????)
सामान्य जनता आणि डॉक्टर्स ह्यांच्यात भांडण लावून हा घोळ घालणारे मूळ लोक नामानिराळे झाले आहेत.
<< हा कार्यक्रम अमिरचा नाही, अमिरबद्दलही नाही. तो एक मिडीयम आहे. निमित्तमात्र आहे. कार्यक्रम तुमच्या-आमच्याबद्दल आहे. जिथे तो अर्धवट असेल, तिथे आपण पूर्ण करायला हवा. ज्या त्रुटी असतील त्या भरुन काढायला हव्या. पण त्रुटी आहेत म्हणुन पार स्टार्ट रेषेवर जायची गरज भासु नये.>> पुन्हा एकदा आश्चिग ह्यांना अनुमोदन.
रुणूझुणू, हि दुसरी बाजू खरी
रुणूझुणू, हि दुसरी बाजू खरी आहेच.
इतर कुठल्याही व्यवसायात (सी.ए. / वकील ) पाय रोवणे कठीणच आहे. ज्यांना पालकांकडून प्रॅक्टीस आयती
मिळते, त्यांची गोष्ट वेगळी. पण नव्याने अशील मिळवणे फारच कठीण जाते.
साधारणपणे मोठ्या व्यावसायिकाकडे, अगदी कमी पगारावर उमेदवारी करणे, हे करावेच लागते. त्या काळात
केलेल्या कष्टाचे, चांगल्या कामाचे पुढे फळ मिळते. आणि हे व्यवसायाच्या बाबतीतच नाही तर कलाकारांच्या
बाबतीतही खरे आहे.
डॉक्टरांच्या बाबतीत, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमधे नोकरी करणे हा पर्याय असतोच.
शिक्षणासाठी लागणारा अधिक काळ हे मात्र वैद्यकिय क्षेत्राचे वेगळेपण आहे.
हॉस्टेलमधली गैरव्यवस्था, सार्वत्रिक आहे.
कामाचे अनियमित तास, हे या क्षेत्रात तरी अपरिहार्य आहे. पण रात्री उशीरापर्यंत काम, हे आता बाकीच्या क्षेत्रातही सामान्य झालेय.
>>पाणी मुरतंय हो. मान्य आहे
>>पाणी मुरतंय हो. मान्य आहे मलाही. मार्ग काढण्यासाठी धडपड आहेच. पण Doc Bashing हे त्याला उत्तर नव्हे. या असल्या सिरियल्स पाहून तथा कथित 'सामान्य' लोक गावागावांत केवळ बिल बुडविण्यासाठी 'हलगर्जीपणा' झाला अशी बोंब ठोकत डॉक्टरांना मारहाणी करू लागलेत.<<
इब्लिस जी,
आपण डॉक्टरांचीही बाजू प्रभावी पणे मांडून एकतर्फी झालेल्या चर्चेला दुसरीही बाजू पहा हे सांगितले याबद्दल अभिनंदन!
माझा व्यवसाय डॉक्टर वा त्याशी निगडीत असा नाही हे प्रथम सांगतो. पण बलदंड लोक पेशंट दगावला तर बिल बुडविण्यासाठी काहीही करतात ही बाबही खरी आहे. आणि यात चांगले डॉक्टर देखील भरडले जातात. डॉक्टरांची एकूणात असलेल्या प्रतिमेमुळे बलदंड लोक हे अगदी सहज करू शकतात. या क्षेत्रात शिरलेल्या विविध गैरप्रकारांना प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष रितीने धोरणे ठरविणारे राजकीय क्षेत्रातले लोकही फार मोठ्या प्रमाणाव्र्र जबाबदार आहेत या बाबीकडे एपिसोडम्ध्येही फारसे कांही बोलले गेले नाही.
रुणु, तुझी पोस्ट दुसरी बाजु
रुणु, तुझी पोस्ट दुसरी बाजु दाखवतेय. आता तरी बरेच गैरसमज दुर होतिल अशी आशा करुया.
तुझ्या पोस्टमधल्या काही गोष्टी अगदी खूप पटल्यात
<<<<मुळात प्रश्न होता...Does healthcare need healing ?
उत्तर आहे - Yes, it needs healing. >>>> बरोबर हीलिंग हवय पण त्यासाठी डोक्टर्सला नाही राजकरण्यांना औषधोपचाराची गरज आहे.
<<<< सगळ्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये घोळ झाला आहे. पण त्याला कारणीभूत डॉक्टर्स नाहीत.
तो घोळ आधी बदलायला हवा. (पण कसा ????)
सामान्य जनता आणि डॉक्टर्स ह्यांच्यात भांडण लावून हा घोळ घालणारे मूळ लोक नामानिराळे झाले आहेत.>>>
खरय. पण त्यांचे कोण काय बिघडवणारे? ते अजुन ही केवळ नामानिराळे नाहीत तर माननीय, स्न्माननीय नावाने चौका चौकात झळकत असतात.
दिनेशदा, मी लिहिलेले वर्णन नायर आणि केइएम चे होते पण स्वप्नातही ब्रीच कँडीतही इतकी वाईट परिस्थिती असेल असे वाटले नव्हते.
हेल्थकेअरला हीलींगची गरज आहे हे सगळ्यांनाच मान्य तर त्यावर उपाय काय? डॉक्टर्सना काय वाटते? काय केल्याने ही समस्या सुटु शकेल.
यामुळे संपूर्ण कार्यक्रमाच्या
यामुळे संपूर्ण कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. >>>> विश्वासार्हतेबाबत प्रश्न कसा निर्माण होईल ? ते कार्यक्रमाचं प्रेझेंटेशन प्रभावी करायचा प्रयत्न करत असतील, त्यांची पद्धत चुकीची असू शकेल. इतरांसारखी नसेल पण त्यांनी मांडलेले प्रश्न तर तसेच रहातात ना??? त्याची तिव्रता किंवा प्रश्नाचा खरे/खोटेपणा ह्यात थोडीच बदल होणार आहे ? विश्वासार्हतेचा संबंधच कळला नाही मलातरी..
अस्चिगच्या लेटेस्ट पोस्टलाही अनुमोदन.
Pages