Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46
आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंहगड रस्त्यावरच्या डॉ
सिंहगड रस्त्यावरच्या डॉ मानकरांबद्दल सकारात्मक खूप काही ऐकलं आहे. लोक दुरून दुरून येतात. नंतर लिहीन त्यावर.. कुणी ओळखत असतील तर लिहा
. पण हेही मान्य की बर्याचदा
. पण हेही मान्य की बर्याचदा डॉ ब्रॅन्डेड ड्रग्जच प्रिस्काईब करतात>>
मग त्या कंपन्या डॉक्टराना भेटवस्तु कशा देणार?
डॉ लोक फॉरेनची वारी कशी करणार...
असो.
एपिसोड पाहिलेला नाहिये त्यामुळे मी फार बोलण चुकीचं आहे.
श्री.अक्षर शहा यानी प्रकटलेली
श्री.अक्षर शहा यानी प्रकटलेली "या भागावर फक्त एकच शब्द लिहीण्यासारखा आहे... अप्रतिम !!".... ही भावना अतिशय बोलकी आणि सर्वसमावेशक आहे.
डॉक्टरी पेशाबद्दल [अर्थात त्यात वसलेल्या अपप्रवृत्तीबद्दल] इतक्या सडेतोडपणे, आणि त्यातही त्या क्षेत्रातील उच्चपदस्थांना बोलके करून, देशातील जनतेपुढे आमीर खान टीमने ज्या पद्धतीने मांडले त्याला तोड नाही. प्रत्येकाला कधीनाकधीतरी त्या पेशाच्या संसर्गामुळे (मुकाटपणे) जो त्रास सोसावा लागला आहे त्याना तर हा भाग खूपच भावला.
कार्यक्रमासाठी स्टुडिओत जेष्ठांच्यासमवेत किमान ५० फ्रेशर्स हजर होते, यांच्यातील किमान ५ जणांनी तरी या कार्यक्रमातून योग्य तो बोध घेऊन आपल्या भावी करीअरची रचना केली तरी पुष्कळ मिळविल्यासारखे होईल. अन्यथा "आम्ही ५० लाख डोनेशन दिले होते, ते परत मिळवायला नको का ?" अशी सोयिस्कर पळवाट काढून येणार्या सरसकट पेशन्ट्सना २ रुपयाचे ग्लुकोज टोचून ५०० रुपये घेणार्या डॉक्टरांच्या वरातीत सामील होणारेच जास्त.
अशोक पाटील
कधी असते ही सिरीयल आणि
कधी असते ही सिरीयल आणि कुठल्या चॅनेलवर ? (अनाडी प्रश्न)
कंपन्यांमध्ये रू.१५०००/- खाली
कंपन्यांमध्ये रू.१५०००/- खाली पगार असणार्यांसाठी इ.एस.आय. ची स्कीम असते. पण इ.एस.आय. हॉस्पीटल्सची अवस्था दयनीय असते. मागे एकदा सकाळमध्ये याविषयी बातमी आली होती, फोटोंसहीत.
या स्कीमचा किती जणांना फायदा होतो याबद्दल साशंकता आहे.
कधी असते ही सिरीयल आणि
कधी असते ही सिरीयल आणि कुठल्या चॅनेलवर ? (अनाडी प्रश्न)
>>>>>>>> स्टार प्लस आणि दुरदर्शन वर, रविवारी सकाळी ११.०० वाजता.
जेनेरिक ड्रग्ज वर मागे
जेनेरिक ड्रग्ज वर मागे लोकसत्ता मध्ये एक लेख आला होता . कालच्या भागात झालेली चर्चा त्यात होती. लिंक मिळणे कठीण आहे . पण मिळाल्यास टाकते.
धन्यवाद आबासाहेब ह्या रवीवारी
धन्यवाद आबासाहेब ह्या रवीवारी बघते.
डॉक्टरांच्या चांगल्या
डॉक्टरांच्या चांगल्या अनुभवांचा पण इथे उल्लेख करुया.
आमच्या शिवसृष्टी कॉलनीत, गेली ३५ वर्ष, डॉ. लालजी शहा दवाखाना चालवत आहे. प्रेमळ व्यक्तीमत्व.
आजही त्यांची फी १५/२० रुपयेच आहे. दोन दिवसांचे औषध घेतल्यावर, हमखास बरे वाटतेच. परत येऊ नका, असे ते स्वतःच सांगतात. तसेच काही गंभीर आजार असल्यास, त्यांचे निदान अचूक असते. ते स्वतःच तज्ञ
डॉक्टरकडे पाठवतात.
गोव्याला पर्वरी मधे, डॉ. प्रीती वळवईकर (एम.डी.एस.) आहेत. त्यांनी माझी रुट कॅनल सर्जरी, अत्यंत कुशलतेने केली. पहिल्याच भेटीत मला नेमके काय करणार, किती खर्च येईल, कितीवेळा यावे लागेल याचा
पूर्ण अंदाज दिला आणि तो अचूक होता. प्रत्येक सेशनमधे मला आता मी काय करणार आहे, कितपत दुखेल,
वापरणारे औषध कुठल्या चवीचे आहे, हे सांगत असत. प्रत्येक सेशनला सुरवात करण्यापुर्वी, जेवलास का, अशी
आवर्जून चौकशी करत असत. शिवाय हात इतका हलका, कि मला अजिबात वेदना होत नसे.
आणि खर्चाचे म्हणाल, तर त्या काळात मुंबईत जो खर्च आला असता त्याच्या निम्माच आला.
कालचा भाग अगदी शेवटी पाहता
कालचा भाग अगदी शेवटी पाहता आला.
आमच्या गोरेगावा मध्ये 'प्रबोधन' या संस्थेने 'जेनेरीक' औषंधाचे वाटप सुरु केले आहे. सध्यातरी ज्येष्ठ नागरिंकासाठीच उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामुळे कित्येक नागरिकंचे कितीतरी पैसे वाचताहेत. अशा प्रकारचे उपक्रम बर्याच समाजिक संस्थांना सुरु करता येतील.
Prabodhan Medicine bank
Contact Person: Chandrakant Poddar (Tel: 28797590)
Address : 12, Mangalya Society, Siddhartha nagar, Road no 17, Goregaon (W), Mumbai - 400062
E-mail Id : medicinebank@prabodhan.org
हे पहा http://www.prabodhan.org/medicinebank/jeevanmitra.html
कुठलही लहान हॉस्पिटल म्हणजे
कुठलही लहान हॉस्पिटल म्हणजे वाईट , मोठे हॉप्सिटल म्हणजे चांगले असे कुठचेह भेद ठेवु नये असे माझे मत आहे. एकाचा अतिशय वाईट अनुभव पाहून ठरवले. अनुभव मोठ्या हॉप्सिटलचा होता. हे एका मोठ्या नटीने काढलेल्या हॉस्पिटलचा होता.
ऑपरेशन नंतर सँपल चक्क हरवले व अतिशय मक्खपणे डॉ ने सांगितले.तक्रार केल्यावर त्यात कबूली लिहून घेतली की कुठे बोलणार नाही. व एक लाख दिले फक्त त्या माणसाला. कॅन्सरचे सँपल हरवले लॅबने विचार करा काय हाल झाले असतील. मोठ्या हॉस्पिटलात हे प्रकार झाले.
तेव्हा कुठलेच ठोकताळे लावणं आजकाल कठिण झालेय ह्या डॉ व हॉस्पिटलाबाबतीत.
डॉक्टरांच्या चांगल्या
डॉक्टरांच्या चांगल्या अनुभवांचा पण इथे उल्लेख करुया. >>
दिनेशदा शिवसृष्टी कॉलनीतील डॉक्टरांचा नंबर मिळेल का? मी डॉक्टरांच्या माहिती संबधित एका धाग्यात बोरिवलीच्या मोरोणे डॉक्टरांचा उल्लेख केला होता. डॉक्टर देवाचे दुसरे रूप आहे हे त्यांना भेटून अक्षरशः पटते.
जेनेरिक विरुद्ध ब्रॅन्डेड
जेनेरिक विरुद्ध ब्रॅन्डेड कंपन्या यात फार्मा कंपन्यांना औषधांच्या अवास्तव किंमतीबद्दल दोष देण्याचा सुर जाणवला.. हा मला तितकासा पटला नाही. त्यांनी डॉक्टरांना त्यांची औषधं देण्याकरता भेटी देणं, टक्केवारी देणं हे चुकच आहे.
पण ब्रॅन्डेड कंपन्यांच्या औषधांच्या अवास्तव किंमतीचे मुळ पेटंट लॉ मधे आहे. या ब्रॅन्डेड कंपन्या म्हणजेच इनोव्हेटर कंपन्या, रिसर्च आणि डेव्हलपमेंटमधे अतोनात पैसे ओततात. ड्रग मार्केट मधे येइपर्यंत कित्येक अयशस्वी ड्रग्जना कचर्याची टोपली दाखवली जाते. हा सक्सेस रेशो खुपच कमी असतो. त्यामुळे बर्याचश्या कंपन्या R&D मधे पडुन नवीन औषधं शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत. या कंपन्या मग बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांचं reverse engineering करुन जेनेरिक ड्रग्ज बनवतात. इथे त्यांना फक्त reverse engineering मधेच पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. कारण एक सक्सेसफुल ड्रग बाजारात ऑलरेडी मिळतय. त्यामुळे जेनेरिक कंपन्यांना औषधं स्वस्तात द्यायला परवडतं. कारण हजारो अनसक्सेसफुल ड्रगच्या R&D त ओतलेले पैसे त्यांना वसुल करायचे नसतात.
ब्रॅन्डेड कंपन्या त्यांच्या ड्रगचे पेटंट घेउन, marketing exclusivity मिळवुन काही दिवस जेनेरिक ड्रग बाजारात येण्यापासुन रोखु शकतात. त्यांच्या R&D तील पैसे वसुल करण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी मग ते औषधांच्या किमती वाढवतात. कारण पेटंट टर्मचा खराखुरा फायदा त्यांना जेमतेम ५-१० वर्षं मिळतो. त्यानंतर जेनेरिक औषधं आली की त्यांना पण किमती कमी कराव्याच लागतात. इनोव्हेटर कंपनींना हा थोडासा बेनिफिट दिला नाही तर ते त्यांची R&D मधील गुंतवणुक कमी करतील, पर्यायाने काही वर्षांनी नवीन औषधांची कमतरता भासु लागेल.
पेटंट लॉ मुळे त्यांच्यावर काही बंधनं पण असतात. जसं की त्यांनी औषधं हवी तितक्या प्रमाणात उपलब्द्ध करुन द्यायलाच हवीत. जेनेरिक कंपन्या लोकांना ही औषधं परवडत नाहीत आणि हवी तेव्हा हवी तितक्या प्रमाणात उपलब्द्ध होत नाहीत या कारणांकरता ब्रॅन्डेड कंपनी कडुन कम्प्लसरी लायसेन्स घेउन त्याच औषधाचं जेनेरिक व्हर्जन बाजारात आणु शकतात. भारतात नुकतंच पहिलं कम्प्लसरी लायसेन्स दिलं गेलेलं आहे. त्यामुळे आता कदाचीत ब्रॅन्डेड कंपनीच्या औषधांच्या किंमतीवर थोडंफार नियंत्रण येइल. याशिवाय सरकारदेखील काही इमर्जन्सी कंडीशन्स मधे या कंपन्यांना कमी किमतीत औषधं पुरवण्यास भाग पाडु शकतं.
ड्रग प्राइज कंट्रोल अॅक्ट मुळे सुद्धा थोड्याफार किमती कमी होतील अशी आशा आहे.
इतकं सगळं लिहिण्याचं तात्पर्य इतकंच की फार्मा कंपनीकडुन औषधांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा रास्त असली तरी ती पुर्ण होण्याजोगी नाहिये. त्यामुळे डॉक्टरांनी औषधं लिहुन देताना ब्रॅन्डेड द्यावीत की जेनेरिक याचा व्यवस्थित विचार करणं हेच जास्त योग्य आहे.
मी स्वतः तरी जनरिक मेडिसिनच
मी स्वतः तरी जनरिक मेडिसिनच खातो. तेही क्वचित.. वर्षातून एखाद दुसरी वेळ ... मला तरी बरे वाटते.
सामी, शिवसृष्टीतल्या एस टी
सामी,
शिवसृष्टीतल्या एस टी स्टँडसमोरच त्यांचा दवाखाना आहे. संध्याकाळी ७ नंतर ते असतात. सकाळीही येतात.
आधी वेळ घ्यायची गरज नसते. जो पहिला आला असेल त्याला पहिला तपासतात.
भ्रमर, त्या प्रबोधन संस्थेचा पत्ता देता येईल का ?
जनरिक मेडिसिन म्हणजे
जनरिक मेडिसिन म्हणजे काय?
बाजाराय क्रोसिन, मेटासिन नावाने डोकेदुखीची गोळी मिळते.. ही झाली ब्रँड नावे..
आता त्यात औषध असते पॅरॅसिटेमॉल.. याच नावानेही बाजारात औषध मिळू शकते. हे झाले जेनेरिक नाव.. ही औषधे स्वस्त असतात.
ब्रँड नाव राखून ठेवायला खर्च असतो, शिवाय त्याच्या जाहीरतीसाठीही खर्च होतो. म्हणून ही औषधे महाग असतात
अंगारे धुपारे तंत्रज्ञानाकडे
अंगारे धुपारे तंत्रज्ञानाकडे लोकांनी पुन्हा वळावे..
धन्स जामोप्या!
धन्स जामोप्या!
जामोप्या छान समजावून
जामोप्या छान समजावून सांगितलेत.
पण सर्दी खोकल्यसाठी जनरिक नावं ठिक आहेत शिवाय स्वस्तही आहेत. कॅन्सरसाठी जनरिक औषधांची माहीती कुठुन मिळणार?
औषधाच्या लेबलवर ब्रँद नेम आणि
औषधाच्या लेबलवर ब्रँद नेम आणि जनरिक नेम दोन्ही लिहिलेले असतात.
वैद्यकीयच्या पुस्तकात जनरिक नावेच असतात.. ब्रँड नेम डोक्टराना प्रॅक्टिसमध्ये आल्यावर एम आर कडून कळतात.
कालचा एपिसोड पूर्ण पाहता आला
कालचा एपिसोड पूर्ण पाहता आला नाही. जे पाहिले ते अक्षरशः अंगावर येणारे होते. कमी-अधिक प्रमाणात बिना गरजेच्या टेस्ट करवून घ्यायला लागणे, इन्शुरन्स आहे हे कळल्यानंतर अव्वाच्या सव्वा फीज् चार्ज केले जाणे, हॉस्पिटल्स मध्ये अॅडमिट होताना किंवा नातलगांपैकी कुणाला करवताना मुद्दाम जास्त रेटचीच रूम available आहे असे भासवणे व तीच रूम घ्यावी लागेल अशी बतावणी करणे इ. अनुभव घेऊन झालेत. पण "अडला हरी कोणाचेही पाय धरी" (बिचार्या फक्त गाढवालाच का वेठीस धरा?" अशी हल्ली सामान्य माणसाची गत झाली आहे.
चिमुरी चांगली माहिती देते आहेस.
जेनेरीक औषधे हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.
जामोप्या म्हणजे तुम्ही असं
जामोप्या म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की डॉक्टरने लिहून दिलेलं औषध आपण मेडिकल स्टोर मध्ये तपासून जनरिक औषधाचे डिटेल्स उतरून घ्यायचे आणि मग ते हवे तिथून विकत घ्यायचे?
हो.. किंवा डॉक्टरलाच जनरिक
हो.. किंवा डॉक्टरलाच जनरिक नाव देखील लिहून द्या असे सांगता येईल.
किंवा केमिस्टला या औषधाची जनरिकची औषधे दाखवा/ द्या असे सांगितल्यास तो देईल.
ओके. आता आलं लक्षात. कालच्या
ओके. आता आलं लक्षात.
कालच्या एपिसोडनंतर आता खुपश्या डॉक्टरांना आणि औषध कंपन्यांना जर्क बसेल.
बोरिवलीच्या मोरोणे
बोरिवलीच्या मोरोणे डॉक्टर>>>...
सामी माझी मावस बहीणही त्यांची भक्त आहे... तब्येतीच्या कुठल्याही तक्रारीवर पहीले त्यांचा सल्ला घेते नेहमी... मलाही निले होते एकदा त्यांच्याकडे... माझ्या 'साधी माणसं'च्या लिस्टीत त्यांचाही समावेश आहे...
आमच्या रत्नागिरीतले औरंगाबादकर डॉक्टर (चिंतामणी हॉस्पीटल) त्यांचीही ख्याती आहे की वेळी पैसे न घेता ईलाज करतात... माझी काकी त्यांच्याकडे प्रॅक्टीस करते नि संध्याकाळी स्वतःच्या क्लिनिकमधे... तीही तशीच... वेळी तपासायचेही पैसे नाही घेत...
चव्हाण डॉक्टर (स्वस्तीक हॉस्पीटल)... रत्नागिरीत असताना त्यांच्याशिवाय दुसर्या कुणाचेही औषध चालायचे नाही मला... त्यांच्याबद्दलही नेहमी चांगलेच ऐकुन आहे... सौ. चव्हाण तर गायनॅक आहेत... ऑपरेट करून बाळची डिलीव्हरी करणे हा अगदी शेवटचा ऑप्शन आहे त्यांच्याकडे... बाकी सगळेच डॉक्टर तेवढा वेळ नाही देत...
माझ्याकडची लिस्ट वाढतच जाईल...देवाच्या कृपेने मला भेटणारे ९९% लोक चांगलेच असतात... सो थाबते ईथे...
सगळ्याच हॉस्पीटलमधे ईंशुरंस कितीचे आहे ते विचारुन नंतर ऑपरेशनचे रेट्स सांगितले जातात... अगदी अलिकडचाच अनुभव आहे...
Dr S R Morone Aarti Clinic,
Dr S R Morone
Aarti Clinic, Vidyut Rekha Building, LIC Colony, Borivli Wes India
022 28933328
माझ्या गायनॅककडे एक वाक्य
माझ्या गायनॅककडे एक वाक्य वाचलं... A good surgeon is one who knows when NOT to opertate!
चिमुरी छान माहीती जेनेरिक मेडीसन्स विषयी.
यात एक मुद्दा मांडला होता तुम्हीही जेनेरिक मेडिसिन्सचं स्टोअर ओपन करू शकता, याविषयी काही शंका...
१) यासाठी फार्मसी ची डिग्री आवश्यक असेलच! पण त्या मेडिकल स्टोअर मध्ये फक्त जेनेरिक मेडिसिन्सच ठेऊ शकतो की जेनेरिक व ब्रँडेड अशी दोन्ही?
२) फक्त जेनेरिक मेडिसिन्स ठेवली तर त्यांचा खप कसा होइल? कारण डॉक्टर शक्यतो ब्रँड्स रेफर करतात. (आजकाल तर बर्याच डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन वर 'दिलेल्या नावाची व ब्रँड्सचीच औषधे द्यावीत' अशी सुचना सुद्धा टाईपलेली असते तळटिपेत!)
३) किंमतीतील तफावत ग्राहकाला त्या औषधांच्या विश्वासार्हतेबद्दल संभ्रमात नाही का टाकणार?
४) ब्रँडेड औष्धे सर्वांच्याच ओळखीची झालेत जसे जामोप्यांनी सांगितल्याप्रमाणे क्रोसिन, विक्स, अॅनासिन इ. मग या जेनेरिक औषधांचं महत्व ग्राहकांना पटवून कसं देऊ शकतो?
जनरिक औषधे घ्या असे कुणी आपण
जनरिक औषधे घ्या असे कुणी आपण होऊन सांगणार नाही.. तुमचा विश्वास असेल तर तुम्हीच मागा आणि आनंदात रहा.
जेनेरिक औषधं सुद्धा
जेनेरिक औषधं सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांची असु शकतात. तुमचे डॉक्टर तुमच्या चांगल्या ओळखीचे असतील तर तुम्ही त्यांनाच विचारु शकता की यांची जेनेरिक नावं द्या म्हणुन. कदाचीत पहिल्यांदा मागुन लगेच देणार नाहीत. पण पेशंटच आग्रह करत असेल तर देतीलही कदाचीत.
आता डॉक्टर लोक थोडे बिचकतील
आता डॉक्टर लोक थोडे बिचकतील पण उडवाउडवीची उत्तरं द्यायला.
कारण गाठ आमिरशी आहे.
Pages