कोरा कागद आणि मी....

Submitted by Shrujan on 20 January, 2008 - 01:54

कोरा कागद आणि मी

होते आयुष्य माझे
एक कोरा कागद,
पण त्यावरी शब्द माझे
नेहमीच सावध...

गुंता मनाचा
वाढत चालला
मग शब्दांचा आधारे
त्याला मी सोडला..

एका एका शब्दाने
भावना जिवंत केल्या,
कागदावरच्या ओळी
जिवन गाणे म्हणून लिहील्या...

कधी स्वप्नांचे हितगूज
तर कधी सुखांचे अलगूज
शाईच्या निळाईची
हळूवार अक्षरांशी कूजबूज...

पसारा व्यथांचा,
सुखाच्या ओंजळीत विरला,
आयुष्यात माझ्या आता
कोर्‍या कागदावर
विखुरलेल्या शब्दांचा आधार उरला...

-- सृजन - शोधात खर्‍या प्रेमाच्या !

गुलमोहर: 

मला तुझी कविता फार आवडली , स्रुजन.

कधी स्वप्नांचे हितगूज
तर कधी सुखांचे अलगूज
शाईच्या निळाईची
हळूवार अक्षरांशी कूजबूज...

छान!

सर्वच ओळी छान आहेत.
कविता आवडली. पुढील कवितेच्या प्रतिक्षेत !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुप छान लिहिले आहे.

पुढच्या कवितेची वाट पहात आहे.

पसारा व्यथांचा आवडल