"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या विषयायचे गांभिर्य सकस प्रभावीपणे जनतेसमोर पोचवायला नक्कीच अमिर खान कमी पडत आहे. >>>>
Satayamev Jayate team needs to package old wine in new bottle else they would miss out on younger audience. The first episode gave me an impression that the show aimed at middle aged people, younger lot had nothing for them >>>>>>

फेसबुक लाइक्स - ६६०००० +
ट्विटर followers - १५०००० +
यु ट्युब - ३५०००० +
६ मे नंतरची सोशल मिडियावरची स्त्री भ्रुण हत्येच्या चर्चा - १३६००
स्नेहालय ला समस मधुन मिळालेली मदत - ६४ लाख रुपये
६ मे नंतर स्नेहालयच्या वेबसाईटला व्हिजिट दिलेल्यांची संख्या - ४ लाख
६ मे नंतर स्नेहालयला आलेली पत्रे - ३०००
Total viewers = ९ करोड +

हे आकडे पहिल्या इपिसोडनंतरचे आहेत

दोन्ही कार्यक्रमाच्या चर्चा वाचल्या.

कोणी आमिरविरुद्ध, तो किती पैसे घेतो याबद्दल कितीही बोलले, अगदी राजस्थानचे मंत्रीही बोलले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की केवळ आमिरने हे विषय मांडले म्हणुन लोक आज याबद्दल बोलताहेत तरी. तसे हे विषय काही नविन नाहीत, यावर काम करणारेही कमी नाहीत. आमिरच्या निमित्ताने करोडो लोक या विषयांबद्दल बोलताहेत आणि जमलेच तर जागरुक होताहेत हे काय कमी झाले? नाहीतर या विषयांवर रविवारी सकाळी ११ वाजता एखाद्या चॅनेलने एखादा टॉक शो जर ठेवला असता तर किती जणांनी पाहिला असता?? लोक आज पाहताहेत ते आमिरसाठी पाहताहेत.

राजस्थानच्या मंत्र्यांच्या संतापावरुनच आमिरला लोक किती गांभिर्याने घेताहेत के कळते.

राजस्थानच्या मंत्र्यांच्या संतापावरुनच आमिरला लोक किती गांभिर्याने घेताहेत के कळते. >>>

साधनाताईना +१ अनुमोदन
काही का असेना जर हा कार्यक्रम समाजात काही अनुकुल आणि सकारात्मक संदेश पोहचवत असेल आणि त्यातुन १ % पिडीतांना जरी लाभ मिळाला तर मी म्हणेन हे कार्यक्रमाचे यश आहे .
नाही तरी आज बरेच मनोरंजनात्मक कार्यक्रम २४ तास चालुच असतात पण "सत्यमेव जयते" नक्कीच वेगळा.

मी इथली चर्चा वाचून काल दुसरा भाग नेटवर रखडत रखडत बघितला ( दोन्ही भाग हुकले होते बघायचे. )

जियो आमीर! या समस्यांबद्दल लोकांमध्ये जागृती करायचा तुझा हेतू असला तर तो शंभर टक्के साध्य होतोय!

नचिकेता, बरं केलंस धागा उघडलास ते.

साधनाला अनुमोदन.
प्रेक्षकवर्गाला अगदी मठ्ठ समजू नये, सास बहु सिरियल जितक्या आवडीने पाहतात तितकंच ज्वलंत प्रश्नांवरचं काम ही त्यांना तितकंच भावतं. आणि आमिर ते जेन्यूइनली करतोय हे सर्वात महत्वाचं.
फॅक्च्युअली सुजाण लोकांनी कार्यक्रमात कोणता विषय हाताळला जातोय, त्याचं सामाजिक दृष्ट्या महत्व, त्यात आपण लावू शकणारा हातभार याकडे खरं लक्ष द्यायला हवं. पण बाकिच्या डिटेल्स मध्येच लोकांना किती (वेस्टेड)इंटरेस्ट असतो. Sad

दिनेशदा, चर्चा करत राहा. त्यात माघार कसली? मुख्य विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने सादरीकरणावर बोलणे, एखाद्या माबो सदस्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न ई. मधे वेळ घालवू नका अशा स्वरूपाचे तुमचे मत दिसते. असे वाटणे अजिबात चुकीचे नाही, पण हा विषय एखाद्याला तेवढा मह्त्त्वाचा वाटत नाही हेच इतके अविश्वसनीय वाटले की लोक (मी ही आलो त्यात) थोडेफार आपले मुद्दे लगेच मांडतातच. मग येतीलच पुन्हा मूळ विषयाकडे. हा नैसर्गिक फ्लो आहे अशा चर्चांचा.

मंदार_जोशी | 16 May, 2012 - 17:52 नवीन

कळीचानारद, तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करू. लवकर बरे व्हा. तुमच्यासारख्यांसाठीही आमिरने कार्यक्रम करावा अशी त्याला विनंती करू (त्याला तो विषय महत्वाचा वाटेल की नाही ते सोडा).

<<<<

चक्क मंदार जोशी यांचेशी सहमत!

रच्याकने, कळीचानारद ही "त्या" तुशार घाग यांचीच आयडी आहे याची तुम्हाला कल्पना आहे का?

दिनेशदा,

माघार घेण्याचा प्रश्नच नाही इथे. चर्चा विषयाशी निगडीत होत नसेल तर इथे प्रत्येकाला नम्रपणे आक्षेप घेण्याचा हक्क आहे. तेच तुम्ही केलेत.

*****
साधना, दक्षिणा -- तुमची विचारसरणी मला पटली. पण समाजात अशा स्वरुपाच्या घटना आपण चार भिंतींच्या बाहेर जाऊ देत नाही. समाज अशा गोष्टींना वाचा फोडत नाही. अशा घटना कमालीच्या नाजूक स्वरुपाच्या असतात. त्या हळुहळु दबून जातात. आपल्या वर्तुळात जी लोक येतात आणि ज्यांच्यावर आपला हक्क आहे अशाच लोकांना आपण काही मदत करु शकतो, उपदेश करु शकतो, सांगू-बोलू शकतो. मुलांना अशा गोष्टींचे ज्ञान देणे अवघड आहे. आईवडीलांची देखरेख इतकी चोख असायला हवी की त्यांना आपल्या अपत्यासोबत कोण कसे वागत बोलत आहे ह्याची जाणिव लगेच व्हायला हवी.

फारेण्ड +१

<<ज्यांच्यावर आपला हक्क आहे अशाच लोकांना आपण काही मदत करु शकतो>> पूर्णपणे असहमत

<<मुलांना अशा गोष्टींचे ज्ञान देणे अवघड आहे>> ????? अजिबात नाही. कोणीही व्यक्ती त्या मुलाशी चुकीचं/ अशोभनीय वागतेय का हे त्यांना व्यवस्थित समजावलेलं असलं की लगेच कळतं.

<<पण समाजात अशा स्वरुपाच्या घटना आपण चार भिंतींच्या बाहेर जाऊ देत नाही>> तेच तर चुकीचं आहे ना. नुस्तीच कुटुम्बाची/ व्यक्तीची प्रतिष्ठा-अब्रू अशा भ्रामक कल्पना किती दिवस बाळगून चार भिंतीत हे दडपून ठेवायचं?

<<ज्यांच्यावर आपला हक्क आहे अशाच लोकांना आपण काही मदत करु शकतो>> पूर्णपणे असहमत>>>>वर्तमानपत्रात आपल्याच शहरात घडलेल्या अशा घटना आपण जेंव्हा वाचतो तेंव्हा जातीने तिथे जाऊन काही करतो का? त्या लोकांशी, त्या कुटुंबाशी जाऊन कधी भेटतो का? नाही ना.. म्हणूनच मी आपला ज्यांच्यावर हक्क आहे असे म्हंटले आहे.

<<मुलांना अशा गोष्टींचे ज्ञान देणे अवघड आहे>> ????? अजिबात नाही. कोणीही व्यक्ती त्या मुलाशी चुकीचं/ अशोभनीय वागतेय का हे त्यांना व्यवस्थित समजावलेलं असलं की लगेच कळतं. >>>> इथे दोन गोष्टी आहे. एक म्हणजे - मुलांना अशा गोष्टी घडतात ह्याबद्दल ज्ञान देणे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर असे लक्षात आले की अमुक व्यक्ती तुमच्या मुलांशी नीट वागत नाही आहे. तेंव्हा मुलांना ती गोष्ट समजवून सांगणे. इथे मुख्य प्रश्न आहे मुलांना आपण जे सांगतो आहोत ते कितपत कळेल. दुसरा प्रश्न कसे समजवून सांगावे हा आहे कारण मुलांच्या निरागसतेला धक्का पोचण्याची फार मोठी भिती इथे आहे.

अशी वस्तूस्थिती कशी सावरावी, मुलांना कसे समजवून सांगावे ह्याबद्दल ऐकायला आवडेल.

मुलांच्या निरागसतेला धक्का पोचण्याची फार मोठी भिती इथे आहे. >>> मुलांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होण्यापेक्षा त्यांच्या निरागसतेला धक्का लागणे केंव्हाही समर्थनीय आहे.

मुलांच्या निरागसतेला धक्का पोचण्याची फार मोठी भिती इथे आहे. >>> मुलांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होण्यापेक्षा त्यांच्या निरागसतेला धक्का लागणे केंव्हाही समर्थनीय आहे.>>>> बरोबर पण मुलांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही आणि त्यांच्या निरागसतेला धक्का पोचणार नाही ह्या दोन्ही गोष्टी साधता येईल का? अप्लवयात नको त्या गोष्टी आपल्याद्वारे कळून मुलांच्या आयुष्याला जर चुकीची दिशा लाभली तर तिथेही मुलांचे नुकसान आहे. अजून विचारविनियम करायला हवा किंबहुना काहींनी केलेला असेल.

ह्यासाठी शोमधे आमिर खानने एक वर्कशॉप घेतले होते. ते पाहिले असता नक्की कशाप्रकारे मुलाना समजवायचे हे लक्षात येइल. (आमिरने वर्क शॉप घेतले असले तरी ते तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसात डीझाईन केलेले आहे.)

बी, कुठल्या गोष्टी अल्पवयात कळायला नको आहेत??? कुठली चुकीची दिशा??

चाईल्ड अ‍ॅब्युजबद्दल माहिती देणे आणि सेक्स एज्युकेशन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत.

अप्लवयात नको त्या गोष्टी >>> 'अल्पवय' आणि 'नको त्या गोष्टी' या दोहोंचीही व्याख्या आणि व्याप्ती पूर्णपणे बदलली आहे किंबहुना हे सर्वच अत्यंत सापेक्ष आहे हे मान्य करुनही हे एक शिक्षक म्हणून स्वानुभावाने सांगतो की परिस्थिती कधीचीच गंभीर झाली आहे.
उदा. मुलींच्या मासिकपाळीची सुरुवात होण्याचे वयच घटत चालले आहे त्यामुळे त्यासंदर्भातील सर्वच माहिती तथाकथित 'अल्पवया'तच द्यावी लागते.
माध्यमांनी केलेल्या लैंगिकतेच्या भडीमाराला तोंड द्यायचे असले तर या 'नको त्या गोष्टी' मुलांना स्पष्टपणे सांगणे अनिवार्य आहे नाहीतर परिणाम भयानक होतील, नव्हे तर ते होताना मी पाहिले आहेत.

तो मुलांचा जो वर्कशॉप घेतला होता ते मला योग्य पद्धतीनेच घेतला असे वाटले. मुलांना काय दुसर्‍याला करू देऊ नये हे समजेल. ते का करू देउ नये हे त्यांना सांगायचे कारण नाही. अमेरिकेत सुद्धा "good touch, bad touch" सारख्या गोष्टी मुलांना ४-५ वर्षांचे असतानाच सांगितल्या जातात. माझ्या अंदाजाने त्यांना ते "अनोळखी व्यक्तींशी बोलायचे नाही, चॉकोलेट वगैरे घ्यायचे नाही" सारखेच काहीतरी वाटत असावे.

बी, कुठल्या गोष्टी अल्पवयात कळायला नको आहेत??? कुठली चुकीची दिशा??

चाईल्ड अ‍ॅब्युजबद्दल माहिती देणे आणि सेक्स एज्युकेशन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत.
>> कशी देशील ही माहिती मुलांना? मी कधी दिली नाही. सेक्स एज्युकेशनबद्दल खूपदा ऐकले आहे पण हा विषय मुलांसमोर कसा मांडल्या जातो हे आजवर कुठे वाचले नाही. मुलांना हा विषय कळतो का? कळत असल्याच त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? अशा गोष्टी मुलांना कळल्यामुळे काही वाईट घटना घडल्याचे ऐकिवात आहे का? असे प्रश्न मला पडत आहेत. आमच्या लहानपनी आम्हाला, आमच्या मित्रांना ह्या सगळ्यांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ह्या विषयावर उघडपणे बोलायचे नसते हेच अप्रत्यक्षरित्या सांगण्यात आले आहे.

बी, सध्या विषय चाईल्ड अ‍ॅब्युजसंदर्भात चालू आहे.
सेक्स एज्युकेशन संदर्भाची चर्चा इथे करणे अप्रस्तुत होइल.

बी, तुला माहित नाही, तुझ्या अनुभवात नाही किंवा तुझ्या अपब्रिंगिंगचा तो भाग नाही (इथे तू ऐवजी कुणीही किंवा आपण बहुतांशी जण म्हटलं तरी हरकत नाही) म्हणजे ते बरोबर नाही/ निरागसतेला धक्का लावणारं/ अनावश्यक वगैरे होऊ शकतं का? आणि आपल्या लहानपणी सगळं आलबेल होतं आणि आताच अचानक सगळा समाज बिघडलाय असं काही नाही.

सॉरी, पण तुझी १४:४१ ची पूर्ण पोस्ट अत्यंत भाबडी आहे असं मला वाटतं

आईवडीलांची देखरेख इतकी चोख असायला हवी की त्यांना आपल्या अपत्यासोबत कोण कसे वागत बोलत आहे ह्याची जाणिव लगेच व्हायला हवी.

बी तुम्ही अजून लहान आहात,अजून तुम्हाला मुले झालेली नाही हे यावरून स्पष्ट होते. Happy

२४ तास मुलांवर देखरेख ठेवणे अगदी २४ तास घरात राहणार्‍या पालकांनाही शक्य नाहीये.
पुन्हा तो कार्यक्रम बघितल्यावर लक्षात येईल की हे अ‍ॅब्यूजर मुलांना त्यांच्या पालकांना ठार मारण्याची / इतर भयावह धमकी देतात. ज्यामुळे मुले याबाबतीत गप्पच राहणे योग्य समजतात.

बी तुम्ही अजून लहान आहात,अजून तुम्हाला मुले झालेली नाही हे यावरून स्पष्ट होते.
Uhoh

साती, आपल्या पोस्टमधल्या या कंन्क्लुजनची गरज आहे का??

आनंदयात्री, मला मान्य आहे सातीने कदाचित असं स्पष्ट लिहायला नको होतं - पण मीही अगदी हेच वाक्य लिहिता लिहिता हात आवरता घेतलाय. फक्त त्याची पोस्ट भाबडी आहे एवढ्यावरच थांबले. पण सातीच्या भावनांना अनुमोदन. Happy

बी, सध्या विषय चाईल्ड अ‍ॅब्युजसंदर्भात चालू आहे.
सेक्स एज्युकेशन संदर्भाची चर्चा इथे करणे अप्रस्तुत होइल.
>> नंदीनी, हा शब्द तुच आधी वर उच्चारला आहे म्हणून मला लिहिणे आले. संदर्भः "चाईल्ड अ‍ॅब्युजबद्दल माहिती देणे आणि सेक्स एज्युकेशन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत."

माझ्यामते ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे.

*****
आणि आपल्या लहानपणी सगळं आलबेल होतं आणि आताच अचानक सगळा समाज बिघडलाय असं काही नाही.

सॉरी, पण तुझी १४:४१ ची पूर्ण पोस्ट अत्यंत भाबडी आहे असं मला वाटतं
>> मी कुठे असे म्हणालो की आपल्या बालपणी सगळे आलबेल होते. कदाचित आत्ता इतकी पावले उचलूनही आलबेल नसावे.

Pages